Search This Blog

Showing posts with label बातम्या. Show all posts
Showing posts with label बातम्या. Show all posts

Articles

jaswandहरतालिका,  गणेशपूजन आणि ऋषीपंचमी या तीन दिवसांमध्ये पूजेसाठी विविध पत्री वापरल्या जातात. उद्या हरतालिका आणि परवा गणपती बाप्पांचं आगमन. या तीन दिवसांत वापरल्या जाणा-या काही महत्त्वाच्या वनस्पती अतिशय औषधी आहेत. त्यातल्या काही महत्त्वाच्या औषधी पत्रींचे गुणधर्म जाणून घेऊयात. अवघ्या दोन दिवसांवर गणपती आले आहेत. ज्यांच्या घरी गणपती असतो त्यांची लगबग सुरू असेल. साफसफाई, गणपतीची आरास, […]http://prahaar.in/healthpage/353221

lady fingerभेंडी ही फळभाजी अनेक नावाने ओळखली जाते. भेंडीचं झाड साधारण एक मीटर लांब वाढतं. ही फळभाजी अनेक नावाने ओळखली जाते. भेंडीचं झाड साधारण एक मीटर लांब वाढतं. बनारसमध्ये ही भेंडी राम तरोई तर छत्तीसगडमध्ये रामकलीय, मराठीत भेंडी, हिंदीत भिंडी, गुजरातीत भींडाम फारसीत वामिया तर इंग्रजीत लेडी फिंगर किंवा ऑक्रा या नावाने ओळखली जाते. भेंडीत प्रोटिन, […]http://prahaar.in/healthpage/353230

aasanया आसनात नितंब आणि हातावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळला जातो. तराजूसारखी त्याची अवस्था असते. या आसनात नितंब आणि हातावर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळला जातो. तराजूसारखी त्याची अवस्था असते. कणा मजबूत होतो तसंच श्रीरावर साचलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना शरीराचा आकार तराजूसारखा दिसतो. म्हणून या आसनाला तोलांगुलासन असं म्हणतात. कृती प्रथम […]http://prahaar.in/healthpage/353234

healthआजची पिढी एकविसाव्या शतकात जगतेय. ही तरुण मंडळी हुशार आहेतच तसंच प्रत्येक क्षेत्रात ती पुढे आहेत. ती सतत तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतायेत. ही चांगली गोष्ट आहे मात्र त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या ती आहारी गेली आहेत. मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही याचा अतिरिक्त वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उलट- सुलट खाणं. ही तरुणांची सध्याची जीवनशैलीच झाली आहे. यामुळे मुलांच्या […]http://prahaar.in/healthpage/351312

suchita sorateहे आसन करताना चंद्राची शीतलता अनुभवायला मिळते तर आकार सशाप्रमाणे दिसतो. पाठदुखी कमी होते तसंच पोटावरची चरबी कमी होण्यासही मदत होते. संस्कृतमध्ये शशांक याचा अर्थ 'चंद्र' आहे. या शब्दांचे दोन अर्थ आहेत. दुसरे म्हणजे 'ससा.' हे आसन करताना त्याचा आकार सशासारखा दिसतो. तसेच चंद्र हा शीतल व शांत आहे. हे आसन करताना आपण पूर्णपणे रिलॅक्स […]http://prahaar.in/healthpage/351318

bitter groundकारल्याच्या कडवट चवीमुळे कारलं खाणारी मंडळी तशी खूप कमी आहेत. इंग्रजीत बिटर गोर्ड किंवा बिटर मेलन या नावानेही प्रसिद्ध आहे. चवीला कडू असलं तरी कारल्यामध्ये बरेच गुण आहेत. कारल्याच्या कडवट चवीमुळे कारलं खाणारी मंडळी तशी खूप कमी आहेत. इंग्रजीत बिटर गोर्ड किंवा बिटर मेलन या नावानेही प्रसिद्ध आहे. चवीला कडू असलं तरी कारल्यामध्ये बरेच गुण […]http://prahaar.in/healthpage/351323

Pimpleसध्याची तरुण पिढी आधुनिक जीवनशैलीत इतकी गुरफटून गेली आहे की त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायलाही अजिबात वेळ नाही. खाण्या-पिण्याची अनियमितता आणि कमी झोप आदी कारणांमुळे सध्या तरुणांना मुरुमांची समस्या भेडसावते आहे. या समस्येविषयी थोडक्यात जाणून घेऊ या. सुचित्राच्या गालावर भरपूर प्रमाणात मुरुमं येत होती. हळूहळू ती मुरुमं कपाळावरही यायला लागली होती. सुचित्राला हे अजिबात आवडत नव्हतं. […]http://prahaar.in/healthpage/349558

bringleया भाजीचं शास्त्रीय नाव सोलानम मेजाँजेना असं आहे. ही सोलानम प्रजातीतील वनस्पती आहे. या भाजीचं शास्त्रीय नाव सोलानम मेजाँजेना असं आहे. ही सोलानम प्रजातीतील वनस्पती आहे. मूळ उगम दक्षिण आशियातून आहे. या वनस्पतीची लागवड उष्ण कटिबंधात आणि समशितोष्ण कटिबंधात प्रामुख्याने केली जाते. सर्वप्रथम चीनमध्ये वांगी वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. इंग्रजीत याला एग एलिफंट किंवा ब्रिंजल […]http://prahaar.in/healthpage/349562

mundakasanपद्मासनात जे फायदे असतात तेच फायदे या आसनात होतात. हे आसन करताना मांडयांवर ताण येतो, म्हणून हे आसन करताना काळजी घ्यावी. या आसनात मांडय़ा, नितंब आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते. हे आसन करत असताना शरीराचा आकार हा बेडकासारखा दिसतो म्हणून याला मंडुकासन असं म्हणतात. कृती » सुरुवातीला वज्रासनात बसावं. » […]http://prahaar.in/healthpage/349566

mobile handle by childमोबाईल फोन ही आजची अतिशय गरज झाली आहे, असं म्हटलं तरीही चालेल. अगदी वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळेच जण मोबाईलचा सर्रास वापर करताना आढळतात. पण या मोबाईलवर सतत वापर केल्याने कित्येकांना डोकेदुखी, चिडचिडेपणा, त्वचा लाल होणे यांसारख्या अनेक विकारांना सामोरं जावं लागतंय. एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी मोबाईल फोन वापरले जाऊ लागले आणि बघता बघता ते प्रत्येकाच्या […]http://prahaar.in/healthpage/347533

अल्झेमर्सचा आजार आणि आयुर्वेद-डॉ. जळूकर on http://marathisrushti.com/

२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.



अलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने १९०६ साली ह्या आजाराचा शोध लावला. त्यामुळे ह्याला अल्झेमर्स डिसीज नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठळ्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याने अभ्यासला. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यु झाला होता. त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर अल्झेमर्स डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढत जातो. पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे, आपली स्वतःची लक्षणांच्या वेळी घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा फार उशीर झालेला असतो. कारण अल्झेमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष उलटल्यावर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. ६५ वर्षे वया नंतर शेकडा २० टक्के लोकांमध्ये अल्झेमर्स होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे.



अल्झेमर्सची कारणे काय ?



आज ह्या रोगाची वैद्यक शास्त्राला ओळख होऊन १०३ वर्षे झाली आहेत. पण ह्याचे कारण फक्त ३ शब्दांत सांगता येते ‘‘नक्की माहित नाही’’ अनेक संस्था, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आपल्या ज्ञान कौशल्याची शिकस्त करुनही आज ह्या आजारावर नक्की इलाज सापडलेला नाही ही बाब खरी आहे. मुळात कारणच माहित नाही तर उपचार करणार तरी कुठल्या आधारावर? ह्या आजाराचे निदान करण्यासाठी फक्त लक्षणांचाच आधार घ्यावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामुग्री पण विशेष उपयोगी पडत

नाही. मृत्यू नंतर शवविच्छेदन करण्याची वेळ आली तरच त्याचा उलगडा होतो.



अल्झेमर्स होऊ नये म्हणून :



अल्झेमर्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ह्या विषयी बरेच काही वाचायला मिळते. त्यात ‘‘नियमित व्यायाम करावा, सकस - हलका व आपल्याला पचेल असाच आहार घ्यावा, ताजी फळे - पालेभाज्या खाव्यात, आनंदी व उत्साही वातावरण ठेवावे असे काही उपाय सांगितले जातात. हे उपाय सर्वसाधारण प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी पण सांगितले जातात, अल्झेमर्स होऊ नये म्हणून विशेष असे ह्यात काहीही नाही. नाही म्हणायला डोनपझिल आणि रिव्हास्टिगमिन नावाची दोन औषधे आहेत. शौचाला पातळ होणे, सतत लघवी होणे, मळमळणे, उलटी, निद्रनाश, चित्रविचित्र स्वप्न, चक्कर, वजन घटणे, हाता-पायात गोळे, सांधेदुखी, डोकदुखी अशी अनेक लक्षणे होतात. शिवाय इतर औषधांच्या उपयुक्ततेवर विपरित परिणाम होतात. हे उपचार रोग बरा करण्यासाठी नसून फक्त तात्पुरता आराम देण्यासाठी आहेत एवढे लक्षात ठेवले पाहिजे. थोडक्यात म्हणजे अल्झेमर्स डिसीज वर हमखास उपयोग होईल असा काही इलाज आज तागायत आधुनिक वैद्यक शास्त्रात नाही. पण शास्त्रज्ञानी ह्या विषयावर जो कही अभ्यास केला आहे त्यावर आधारित काही आयुर्वेदिक तत्वांचा आणि उपचारांचाही एक वेगळी दिशा दाखवणारा एक प्रामणिक प्रयत्न आपण करू शकतो.



मेंदूचा विचार :



मेंदूची रचना किंवा घडण करण्यामध्ये ७० टक्के वाटा स्निग्ध पदार्थांचा आहे आणि ३० टक्के वाटा प्रथिनांचा आहे. म्हणजेच मेंदू हा मुख्यतः लायपोफिलिक भाग आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार चार स्निग्ध पदार्थ असतात ते म्हणजे ‘‘घृत-तैल-वसा-मज्जा’’ अर्थात - तूप, तेल, चरबी आणि मज्जा म्हणजेच मेंदू किंवा हाडांमधली चरबी त्यातल्या रासायनिक घटकांबद्दल सूक्ष्म विश्लेषण नसलं तरी त्यांच्या गुणधर्मांबद्दल सखोल माहिती उपलब्ध आहे. ह्या मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आयुर्वेदात जे उपाय सांगितले आहेत त्यांचा अभ्यास वेगळ्या प्रकारे केला पाहिजे. तुपाबद्दल आयुर्वेदात केलेलं वर्णन असं आहे -



‘‘शस्तं धी स्मृति मेधाग्नि, बलायुः शुक्र च क्षुषाम,’’...



म्हणजेच गायीचं तूप हे मेंदूच्या तीन क्रिया, ‘ज्ञान ग्रहण करणं, ते योग्य प्रकारे साठवून ठेवणं आणि वेळेवर स्मरण होणं ह्यासाठी श्रेष्ठ आहे. आधुनिक शास्त्रज्ञांच्या अनेक संशोधनांचा अभ्यास केल्यावर ह्या श्लोकाचा खरा अर्थ कळतो. स्निग्ध पदार्थांचा उपयोग गर्भावस्थेपासून मेंदूच्या पोषणासाठी कसा होतो ह्या विषयी एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. इटलीच्या सेराफिना सल्वाति ह्या शास्त्रज्ञाने मेंदूच्या मायलिन नावाच्या महत्वाच्या आवरणाचा मुख्य घटक स्निग्ध पदार्थ असून त्याचा मेंदूच्या घडण्यामध्ये किती मोलाचा वाटा आहे ह्यावर प्रबंध प्रसिद्ध केला आहे.



नाकातून औषध देणं



‘‘नासा हि शिरसोद्वारं...’’ म्हणजे नाक हा मेंदूचा दरवाजा आहे असं छोटसं वचन आयुर्वेदात सांगितलं आहे. ह्या विषयी ‘विहाई यांग’ नावाच्या शास्त्रज्ञांनी एक प्रबंध लिहिला आहे. फ्युचर न्युरोलॉजी नामक अमेरिकन जर्नल मध्ये (२००८,३ (१) १-४) ह्या विषयी विस्ताराने वर्णन आहे. ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या अनेक विकारांसाठी उपयोगी ठरणारा मार्ग म्हणजे नाकातून औषध देणे. नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वेचेतून स्निग्ध पदार्थ जलद गतीने मेंदूकडे पोचवले जातात. तोंडावाटे घेतलेली औषधं ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या विकारात कुचकामी होतात किंवा फारच अल्पांशाने उपयोगी पडतात. त्यासाठी नाकातून औषध देणे हा सहज, सोपा आणि परिणाम करणारा मार्ग आहे.विहाई यांग यांच्या प्रबंधाचा हा सारांश आहे. आयुर्वेदात एक - दोन ओळींच्या श्लोकांत जी माहिती दिली असते ती म्हणजे एखाद्या क्लिष्ट गणिताचं सोपं उत्तर जगात असंख्य शास्त्रज्ञ वर्षानुवर्ष अभ्यास करून जे निष्कर्ष काढतात ते उत्तर आयुर्वेदात एक-दोन ओळींच्या श्लोकात दिलेलं असतं.



अल्झेमर्स मधे आयुर्वेद :



अल्झेमर्स डिसीज मधे मेंदूच्या पेशी क्रमाक्रमाने सुकण्याची क्रिया घडते. मेंदूच्या पेशींची रचना भरपूर स्निग्ध पदार्थांच्या उपस्थितीतून झालेली असते. त्यासाठी आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे ‘‘घृत नस्य’’ म्हणजे गायीचं तूप ४-६ थेंब नियमितपणे घालण्यामुळे अल्झेमर्स होण्याची शक्यता टाळता येऊ शकेल. इंद्रियांच्या पोषणासाठी तूप नक्कीच उपयोगी होऊ शकेल असा विश्वास आपण बाळगण्यास हरकत नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव, कानात तेल घालून ऐक, तैलबुद्धी हे वाक्यप्रचार प्रचारात आले त्यामागे काहीतरी शास्त्रीय अभ्यास नक्कीच असणार. नाकातून प्रविष्ट केलेलं एक विशिष्ट फ्लूरोसंट औषध NXX-066 हे मेंदूतल्या CSF (सेरिब्रो स्पायनल फ्लुइड) मधे २ मिनिटांच्या आत शोषलं जातं असा अभ्यास स्वीडन मधील शास्त्रज्ञांनी करून त्याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. EEG म्हणजे मेंदूतील विद्युत यंत्रणेचा वेग तपासण्याची

एक यंत्रणा आहे. त्यात P300 नावाची एक रेषा (Wave) ज्ञानेंद्रियांपासुन मेंदूपर्यंत संवेदना पोचवण्याची गती मोजण्यासाठी अभ्यासली जाते. स्निग्ध आहार दिल्या नंतर ही गती कशी वाढते ह्या विषयी शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत.ओमेगा ३ जातीच्या स्निग्ध आहारामुळे ही गती वाढते असं सिद्ध झालं आहे. ओमेगा ३ हे माशापासून काढलेले तेल आहे. अमेरिकेत दुधापासून लोणी काढणं त्यातून तूप तयार करणं ही गोष्ट माहिती नसल्यामुळे कादाचित त्या शास्त्रज्ञांनी ओमेगा ३ चा वापर केला असावा. भारतात साजुक तूप तयार करण्याची कला अवगत आहे त्यामुळे माशा पासून काढलेल्या तेलाची आवश्यकता नाही. आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर कमी कमी होत चालला आहे हे पण अल्झेमर वाढण्याचं कारण असू शकतं. आयोवा युनिव्हर्सिटी मधे स्टॅटिन्स वर एक संशोधन प्रसिद्ध झालेले नुकतेच वाचण्यात आले. हजारो केसेस केसेस मधे अभ्यास करून असा न िष्कर्ष काढण्यात आला आहे की, स्टॅटिन्स (रक्तातील चरबी कमी करणारे औषध) मुळे अल्झेमर्सची शक्यता खूप प्रमाणात वाढते. कोलेस्टेरॉल हा यकृतात तयार होणारा घटक मेंदूच्या पोषणासाठी फार महत्वाचा आहे. त्याला प्रतिबंध केल्यामुळे मेंदू शुष्क होऊन त्याची कार्यक्षमता क्रमाक्रमाने कमी होत जाते.




तोंडावाटे औषध घेणं?



अल्झेमर्स विकारात तोंडावाटे औषध घेऊन कितपत फायदा होईल ही शंकाच आहे. ब्राम्ही, शंखपुष्पी, वेखंड, तुळस, केशर अशा अनेक गुणी वनस्पती उपयोगी पडू शकतील पण त्या नाकाच्या मार्गाने दिल्या तर त्यांचा परिणाम नेमक्या ठिकाणी, लवकर आणि अचूक होऊ शकेल. अशा वनस्पतींनी सिद्ध केलेलं गायीचं तूप ४-६ थेंब रोज नाकात सोडावं. वयाची पन्नाशी उलटली की ही एक सवयच लावून घ्यायला हवी. ‘‘काही फायदा झाला नाही तरी अपाय तर नक्कीच होणार नाही’’ आयुर्वेदावर नितांत श्रद्धा असणार्यांना ह्या वाक्याचा खूप राग येतो. पण अल्झेमर विकाराच्या यातना बघितल्या की, खरेच हे वाक्य आवर्जून म्हणावसं वाटते. कारण रोगाची सुरूवात मेंदूच्या पेशींमधे सुरू झाल्यानंतर १० ते १५ वर्षांनी अल्झेमरची लक्षणं दिसायला सुरूवात होते. तेव्हा उपचार करण्याची वेळ केव्हाच टळून गेलेली असते.



लेखक



डॉ. संतोष जळूकर

सकाळ वृत्तसेवा: आयुर्वेदिक औषधांवर अंतिम मुदत नाही

सकाळ वृत्तसेवा: विजय लाड -

पुणे, ता. १५ - बहुतांश आयुर्वेदिक औषधांवर अंतिम मुदत (Expiery Date) छापील स्वरूपात नसल्याचे आढळून आले आहे.
मुदत नसल्याने दुकानातून औषध विकत घेताना किंवा घरात असलेले औषध किती दिवसांपर्यंत घेता येईल यासंबंधी नागरिकांच्या मनात कायम संभ्रम असतो. मात्र, छापील मुदतीची गरज असली तरी या औषधांमध्ये रासायनिक द्रव्यांचा अंश नसल्याने मुदत संपल्यावरही त्यांचा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

आयुर्वेद ही प्राचीन भारतीय औषध पद्धती आहे. या पद्धतीत उलट परिणाम (Side Effects) नसल्याने इतर औषधांच्या तुलनेत अनेकांची याला पसंती असल्याचे दिसून येते. परदेशातही आयुर्वेदाची ख्याती पोचली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या १९४० च्या कायद्याप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर अंतिम मुदत छापली असणे आवश्‍यक नाही; त्यामुळे या औषधांवर आपल्याला बहुधा छापील किंमत दिसत नाही. या कायद्यात आतापर्यंत अनेक सुधारणा करण्यात आल्या. मात्र, अंतिम मुदतीसंबंधी ठोस निर्णय झालेला नाही. नुकत्याच आलेल्या जीएमपी (Goods Manufacturing Practises) कायद्यात औषधी तयार करताना घ्यावयाच्या काळजीसंबंधी माहिती दिली आहे. औषधी निर्माण करणाऱ्या कंपनीला त्याची अंमलबजावणी करावीच लागते.

यासंबंधी आयुर्वेदिक रसशाळेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. प्रश्‍नचंद बिल्लोरे म्हणाले, ""आयुर्वेदिक औषधे तयार करताना वापरण्यात येणाऱ्या बहुतांश पदार्थांना अंतिम मुदत आहे. तसे सविस्तर विवरण प्राचीन ग्रंथांमध्ये आढळून येते. मात्र, रसऔषधी, अस्व अरिष्ट, पिस्ती, भस्म, परपती, स्वर्ण आदी पदार्थांना अंतिम मुदत नाही. या औषधांमध्ये रासायनिक द्रव्ये वापरण्यात येत नसल्याने मुदत संपल्यानंतरही त्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. केवळ त्याची परिणामकारकता कमी होते.

रसशाळेच्या उपमुख्य व्यवस्थापिका डॉ. विजया पालकर म्हणाल्या, ""कायद्याप्रमाणे एकदा अंतिम मुदत ठरविण्यात आली, की ती संपल्यावर औषधांना नष्ट करावे लागते. कायदा आला तर अंतिम मुदत नसणारी औषधीही नष्ट करावी लागतील. आयुर्वेदिक औषधांमध्ये साखरेचा वापर केला जातो. त्यांना अंतिम मुदत नक्कीच असावी. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कायद्यातील प्रस्तावित सुधारणेत अंतिम मुदतीचा मुद्दा असण्याची शक्‍यता आहे. मात्र, ही सुधारणा केव्हा अमलात येईल त्यासंबंधी निश्‍चित सांगता येणार नाही.

ग्रंथराज दासबोधाचे वेब प्रकाशन,पद्मश्री विजय भटकर आणि आचार्य गोविंद गिरी (किशोरजी व्यास) यांच्या हस्ते

पुणे: सत्कार्योत्तेजक सभा धुळे अंकीत वाग्देवता मंदीर यांच्या वतीने श्रीमत ग्रंथराज दासबोधाचे वेब प्रकाशन,पद्मश्री विजय भटकर आणि आचार्य गोविंद गिरी (किशोरजी व्यास) यांच्या हस्ते करण्यात तीन जुलॆ रोजी आले.यावेळी सकाळ्नगर येथे झालेल्या या कार्यक्रमात पंडीत श्री वसंतराव गाडगीळ यांनी मन्त्रोच्चार व पठण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शरद (बाळ्काका) कुबेर यांनी केले.पाचशे पाने असलेल्या ग्रंथराजाची छापील प्रत संस्थेच्या वतीने जशीच्या तशी इंटरनेटवर www.dasbodha.org या संकेत स्थळावर विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या वेबसाईट ची मूळ कल्पना, रचना व आखणी प्रसन्ना मुजूमदार यानी सुचवली असून development चे मुख्य काम मल्टीव्हर्सिटी च्या टीम ने केले आहे.ईंग्रजी मधील संस्थेचा मजकूरासंबंधी प्राची मुजूमदार ह्यांनी योगदान केले.या कामाचे प्रायोजक मल्टीव्हर्सिटीचे समीर पांडे हे आहेत.वेबसाईट व्र,दासबोधाशिवाय समर्थांचे हस्ताक्ष्रर,शिवाजी महाराजांची चाफळ ला दीलेली सनद, काही हस्तलिखीते व संस्थेची माहिती सुद्धा देण्यात आली आहे.शिवाय या दासबोधाची समर्थ हॄदय श्री देव यांची मुळ प्रस्तावना ही या प्रकल्पाचे प्रमुख वॆशिष्ठ्य़ आहे.आपली काही प्रतिक्रीया अथवा सूचना असल्यास अवश्य कळवा.

रक्तधातू -( डॉ. श्री बालाजी तांबे ) -सकाळ

रक्तधातू सशक्‍त बनवण्यासाठी किंवा रक्‍तवाढीसाठी नैसर्गिक आहार व औषधांचा वापर करणे सर्वात चांगले. काळ्या मनुका, खजूर, डाळिंब, सफरचंद, पालक, केशर, आवळा, गूळ वगैरे गोष्टींचा आहारात नियमित समावेश असू द्यावा. स्वयंपाक करताना लोखंडाची कढी, तवा, पळी वापरण्यानेही रक्‍तवाढीला मदत मिळते.

लोखंडाच्या भांड्यात क्षीरपाक (म्हणजे पाण्यासह उकळलेले दूध) पिऊन पथ्याने राहिले असता पांडुरोग, शोष, ग्रहणी या विकारांसाठी उपयोगी पडते.

लोहभस्म, मंडुरभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, नवायास लोह वगैरे आयुर्वेदिक योगही रक्‍तवाढीसाठी उत्तम असतात. रक्‍तधातूच्या पोषणासाठी "शांती रोझ', "धात्री रसायन' वगैरे रसायन कल्पांचाही चांगला उपयोग होतो, सशक्‍त रक्‍तधातूबरोबरच एकंदर आरोग्याचा, तेजस्वितेचाही लाभ होतो.

याखेरीज द्राक्षासव, पुनर्नवामंडूर, धात्र्यारिष्ट वगैरे आयुर्वेदातल्या योगांचाही रक्‍ताची कमतरता भरून येण्यासाठी चांगला उपयोग होतो.

http://www.esakal.com/esakal/12212006/C0FD4EAE5E.htm

सकाळ: बाबा रामदेवांचा योग व प्राणायाम -लेख

निव्वळ योगासने आणि प्राणायाम यांच्या नियमित अभ्यासाने शेकडो प्रकारचे रोग दूर होऊ शकतात.प्राणायामाची अनमोल विद्या आजवर केवळ मोठ्‌मोठ्या ग्रंथांत अडकून पडलेली होती. अनेक बंधनांमुळे सर्वसामान्य जन या विद्येच्या लाभापासून वंचित राहिले होते. मात्र, आता हळूहळू हे चित्र बदलू लागले आहे. प्रत्येकाने या विद्येचा अभ्यास करावा आणि व्याधिमुक्त जीवनाचा भरपूर आनंद घ्यावा. योग ही एक परिपूर्ण जीवनपद्धती आहे. सर्वांच्या आरोग्यसमस्या नियमित योगाभ्यासाने सोडविल्या जाऊ शकतात
अशा अनेक व्याधी दूर करणारे चौदा प्रकारचे सूक्ष्म व्यायाम, सात प्रकारचे प्राणायाम आणि सात आसने योगगुरू स्वामी रामदेव सात दिवसांच्या योग विज्ञान शिबिरात शिकवतात. त्यांचा अभ्यास करून घेतात. व्याधीमुक्तीच्या या योग सप्तपदीचा खास "फॅमिली डॉक्‍टर'च्या वाचकांसाठी त्यांनी करून दिलेला परिचय...
http://www.esakal.com/esakal/01092007/2B299CA723.htm

ऍक्युप्रेशर आणि मसाज-internet संकलित

१) ऍक्युप्रेशर

पुर्ण लेखन बाकी आहे पण माहिती पुरवण्यास विलंब नको म्हणून संकलित नोट्स स्वरूपात लिहीत आहे.चित्रमय महिती साठी खालिल लिन्क पहा.
http://www.dishant.com/acupressure/acu/acupoints.html

जनरल माहिती साठी
http://en.wikipedia.org/wiki/Acupressure
http://www.dishant.com/acupressure/

२)मसाज पद्धती: एक लेख म.टा किंवा सकाळ मधे आला होता,नक्की आठवत नाही. Generally एकात आला की २-३ दिवसात दुसरा पेपरही छापतो ही बाब निराळी पण माहिती फ़ार उपयुक्त आहे. For that Marathi news deserves the due credit


(१) घर्षण (Rubbing) ज्या भागाला मसाज द्यावयाचा आहे, त्या भागावर हाताचा पंजा ठेवून, हाताचा अंगठा व तर्जनी किंवा अंगठा व चारही बोटे यांचा हलकेच दाब देऊन हळूहळू
चोळावे, याला घर्षण पद्धत म्हणतात. दाब देताना अंगठ्याचे टोक किंवा बोटांची टोके यांचा वापर करू नये. साधारणपणे ३ ते ५ किलोग्रॅम एवढाच दाब द्यावा. या प्रकारच्या
मसाजाने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. थकलेले स्नायू उत्तेजित होतात. त्वचा व स्नायू यांना योग्य शारीरिक स्थिती (Tone) प्राप्त होते. हा सर्वसाधारण प्रकारचा मसाज आहे.
पद्धत
(२) चक्रगती (Circular Motion) - या पद्धतीत हाताचा तळवा किंवा बोटे यांचा उपयोग करून स्नायू हळूहळू आवळतात. असे करताना हात गोलाकार फिरवतात. या प्रकारच्या मसाजने
स्नायूंचा थकवा नाहीसा होतो. स्नायूंची ताकद वाढते. स्नायू लवचिक होतात. कठीण, ताठरलेले खांद्याचे स्नायू, पाठीचे स्नायू नरम व सैल होतात. खांदे व मनगटे कार्यक्षम बनतात.
पद्धत
(३) चिमकुटे (Kneading) - अंगठा आणि तर्जनी किंवा मधले बोट किंवा चारही बोटांनी सांध्याच्या स्नायूंना चिमकुटे काढण्याची ही पद्धत आहे. या प्रकारच्या मसाजमुळे सांध्यातील
द्रवपदार्थाचे विघटन होते आणि त्यातील घटकांचा समतोल साधला जातो. दोन हाडांच्या सांध्यांतील द्रवपदार्थ पातळ होऊन सांध्याच्या हालचाली सुरळीत होण्यासाठी या पद्धतीचा
उपयोग होतो. स्नायूंचा बधिरपणा आणि कडकपणा कमी होतो. पद्धत
(४) थापट्या (Tapping) - दोन्ही हातांच्या करंगळीखालच्या भागाने स्नायूंवर आळीपाळीने जलदगतीने थापट्या मारण्याची ही पद्धथ अतिताणामुळे कठीण झालेले स्नायू नरम
करण्यास उपयोगी पडते. थापट्या हळूहळू (Lightly) हलक्‍या हाताने, पण जलद गतीने मारण्यात याव्यात. एका सेकंदात १३-१४ थापट्या मारता आल्यास चांगला गुण येतो. थापटीचा
दाब १ किलोग्रॅम असावा. पद्धत (५) दाब (Pressure Method) - हाताचा पंजा आणि अंगठा किंवा चारही बोटे यांनी स्नायूंवर साधारणपणे ३ ते ५ किलोग्रॅम वजनापर्यंत ३ ते ५
सेकंद दाब देण्याच्या या पद्धतीस दाब पद्धत म्हणतात. अशा पद्धतीने दिलेला दाब हळूहळू वाढवून थोडा वेळ दाब तसाच ठेवून हळूहळू कमी करण्याचे कसब वापरावे. दाब पद्धत
प्रत्यक्ष अनुभवानेच साध्य होऊ शकेल.

पद्धत (६) बुक्के (Stroking/Hammering) - स्नायूंवर एका किंवा दोन्ही हातांनी बुक्के मारण्याच्या या पद्धतीने कडक झालेले स्नायू नरम होतात. ही पद्धत खेळाडूंना फार फायदेशीर
आहे.
पद्धत (७) पिळणे (Twisting) - हातांचे दंड, पायांच्या मांड्या, पोटऱ्या यावर दोन्ही हातांचे तळवे-एक उलट, एक सुलट ठेवून हलक्‍या हाताने स्नायूंवर फिरवावे. या मसाजच्या पद्धतीस
पिळणे म्हणतात. या पद्धतीने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. मसाज
पद्धत (८) स्पंदन किंवा कंपन (Vibro Method) - हा मसाजचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या पद्धतीत हाताचा अंगठा आणि बोटे एकदमच स्नायूंवर दाबून, स्पंदने निर्माण करून त्या
स्पंदनांची लय वाढवायची असते. एका सेकंदाला ३०-४० स्पंदने निर्माण करून स्नायूंच्या वेदना कमी करता येतात. या प्रकारच्या मसाजने नसा आणि स्नायू यांची कार्यक्षमता वाढते व रक्ताभिसरण सुरळीत होते

दुसरी एक लिन्क पहा॑

http://www.nlm.nih.gov/me

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content