१) ऍक्युप्रेशर
पुर्ण लेखन बाकी आहे पण माहिती पुरवण्यास विलंब नको म्हणून संकलित नोट्स स्वरूपात लिहीत आहे.चित्रमय महिती साठी खालिल लिन्क पहा.
http://www.dishant.com/acupressure/acu/acupoints.html
जनरल माहिती साठी
http://en.wikipedia.org/wiki/Acupressure
http://www.dishant.com/acupressure/
२)मसाज पद्धती: एक लेख म.टा किंवा सकाळ मधे आला होता,नक्की आठवत नाही. Generally एकात आला की २-३ दिवसात दुसरा पेपरही छापतो ही बाब निराळी पण माहिती फ़ार उपयुक्त आहे. For that Marathi news deserves the due credit
(१) घर्षण (Rubbing) ज्या भागाला मसाज द्यावयाचा आहे, त्या भागावर हाताचा पंजा ठेवून, हाताचा अंगठा व तर्जनी किंवा अंगठा व चारही बोटे यांचा हलकेच दाब देऊन हळूहळू
चोळावे, याला घर्षण पद्धत म्हणतात. दाब देताना अंगठ्याचे टोक किंवा बोटांची टोके यांचा वापर करू नये. साधारणपणे ३ ते ५ किलोग्रॅम एवढाच दाब द्यावा. या प्रकारच्या
मसाजाने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. थकलेले स्नायू उत्तेजित होतात. त्वचा व स्नायू यांना योग्य शारीरिक स्थिती (Tone) प्राप्त होते. हा सर्वसाधारण प्रकारचा मसाज आहे.
पद्धत
(२) चक्रगती (Circular Motion) - या पद्धतीत हाताचा तळवा किंवा बोटे यांचा उपयोग करून स्नायू हळूहळू आवळतात. असे करताना हात गोलाकार फिरवतात. या प्रकारच्या मसाजने
स्नायूंचा थकवा नाहीसा होतो. स्नायूंची ताकद वाढते. स्नायू लवचिक होतात. कठीण, ताठरलेले खांद्याचे स्नायू, पाठीचे स्नायू नरम व सैल होतात. खांदे व मनगटे कार्यक्षम बनतात.
पद्धत
(३) चिमकुटे (Kneading) - अंगठा आणि तर्जनी किंवा मधले बोट किंवा चारही बोटांनी सांध्याच्या स्नायूंना चिमकुटे काढण्याची ही पद्धत आहे. या प्रकारच्या मसाजमुळे सांध्यातील
द्रवपदार्थाचे विघटन होते आणि त्यातील घटकांचा समतोल साधला जातो. दोन हाडांच्या सांध्यांतील द्रवपदार्थ पातळ होऊन सांध्याच्या हालचाली सुरळीत होण्यासाठी या पद्धतीचा
उपयोग होतो. स्नायूंचा बधिरपणा आणि कडकपणा कमी होतो. पद्धत
(४) थापट्या (Tapping) - दोन्ही हातांच्या करंगळीखालच्या भागाने स्नायूंवर आळीपाळीने जलदगतीने थापट्या मारण्याची ही पद्धथ अतिताणामुळे कठीण झालेले स्नायू नरम
करण्यास उपयोगी पडते. थापट्या हळूहळू (Lightly) हलक्या हाताने, पण जलद गतीने मारण्यात याव्यात. एका सेकंदात १३-१४ थापट्या मारता आल्यास चांगला गुण येतो. थापटीचा
दाब १ किलोग्रॅम असावा. पद्धत (५) दाब (Pressure Method) - हाताचा पंजा आणि अंगठा किंवा चारही बोटे यांनी स्नायूंवर साधारणपणे ३ ते ५ किलोग्रॅम वजनापर्यंत ३ ते ५
सेकंद दाब देण्याच्या या पद्धतीस दाब पद्धत म्हणतात. अशा पद्धतीने दिलेला दाब हळूहळू वाढवून थोडा वेळ दाब तसाच ठेवून हळूहळू कमी करण्याचे कसब वापरावे. दाब पद्धत
प्रत्यक्ष अनुभवानेच साध्य होऊ शकेल.
पद्धत (६) बुक्के (Stroking/Hammering) - स्नायूंवर एका किंवा दोन्ही हातांनी बुक्के मारण्याच्या या पद्धतीने कडक झालेले स्नायू नरम होतात. ही पद्धत खेळाडूंना फार फायदेशीर
आहे.
पद्धत (७) पिळणे (Twisting) - हातांचे दंड, पायांच्या मांड्या, पोटऱ्या यावर दोन्ही हातांचे तळवे-एक उलट, एक सुलट ठेवून हलक्या हाताने स्नायूंवर फिरवावे. या मसाजच्या पद्धतीस
पिळणे म्हणतात. या पद्धतीने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. मसाज
पद्धत (८) स्पंदन किंवा कंपन (Vibro Method) - हा मसाजचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या पद्धतीत हाताचा अंगठा आणि बोटे एकदमच स्नायूंवर दाबून, स्पंदने निर्माण करून त्या
स्पंदनांची लय वाढवायची असते. एका सेकंदाला ३०-४० स्पंदने निर्माण करून स्नायूंच्या वेदना कमी करता येतात. या प्रकारच्या मसाजने नसा आणि स्नायू यांची कार्यक्षमता वाढते व रक्ताभिसरण सुरळीत होते
दुसरी एक लिन्क पहा॑
http://www.nlm.nih.gov/me
No comments:
Post a Comment