फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर


'ताप'दायक?

Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT

'ताप'दायक?पूर्ण विश्रांती हाच साध्या तापावरचा परिणामकारक उपाय आहे. पण आपल्या धावपळीच्या जीवनात आपण ताप घालवायला औषधे वापरू लागलो. आपली प्रतिकारशक्ती कमी होत चालली आणि विषाणू मात्र अधिकाधिक प्रबल होत चालले आहेत. त्यामुळे अँटिबायोटिक्‍सचा वापरही वाढला आहे. ताप हा खरे तर तापदायक नाही. तो आपल्याला आजाराविषयी सावध करणारा आहे. त्यामुळेच औषधाने ताप दडपून टाकण्याऐवजी त्यामागची कारणे शोधायला हवीत. पूर्वी पावसाळ्यात सर्दी-तापाच्या रुग्णांत वाढ व्हायची. सर्दी असली की अंगात थोडी कसकस असायची. काही वेळा तापही अंगात असायचा. पण त्याचे काही वाटायचे नाही. साध्या पॅरासिटामॉलने रुग्ण बरे व्हायचे. तुळशीची पाने टाकून गरम पाण्याचा वाफारा आणि सुंठीचा काढाही सर्दीच्या रुग्णांना पुरायचा. पण गेल्या काही वर्षांत आम्हाला तापही तापदायक वाटू लागलाय. प्रदूषण वाढले आहे. व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे आपली प्रतिकारशक्तीही कमी होते आहे. या पार्श्‍वभूमीवर विषाणू मात्र दिवसेंदिवस साध्या औषधांना न जुमानण्याची क्षमता मिळवत आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्णांना साध्या औषधाने बरे वाटले नाही, तर अँटिबायोटिक्‍स देण्याची वेळ येते.


मूळव्याध

Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT

मूळव्याध आठ महाव्याधींपैकी एक. वेळीच योग्य उपचारांच्या अभावी बरे होणे अतिशय अवघड. असंयम हे मूळव्याधीचे एक कारण आहे. "आ युर्वेद उवाच' या सदरात सध्या आपण रोगांचे निदान आयुर्वेदानुसार कसे केले जाते, याविषयी माहिती घेतो आहोत. नेमके आणि पक्के निदान करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांची आवश्‍यकता असते, यात वाद नाही. मात्र निदान करण्यासाठी वैद्याला किती गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, हे यातून समजू शकते. निदान करण्यासाठी अत्यावश्‍यक अशी जी लक्षणे- त्यांचीही थोडीफार माहिती रुग्णाला असली तर निदानाचे काम सोपे होऊ शकते, त्यानुसार रुग्णाला आहार-आचरणात बदल करणे शक्‍य होते. अतिसार, ग्रहणीनंतर आपण या दोघांशी साधर्म्य असणाऱ्या अर्श म्हणजेच मूळव्याध या रोगाची माहिती घेणार आहोत. आयुर्वेदात मूळव्याधीला 'अर्श" म्हटले जाते. "अरिवत्‌ प्राणान्‌ श्रुणाति हिनस्तीत्यर्शांसि ।' असा अर्श या शब्दाचा अर्थ आहे. जो मांसाकुर गुदमार्गात अवरोध उत्पन्न करून मनुष्याला शत्रूप्रमाणे कष्ट देतो तो अर्श व्याधी होय. मूळव्याध हा आठ महाव्याधींपैकी एक सांगितला आहे. महाव्याधी म्हणजे असे व्याधी- जे वेळीच योग्य उपचारांच्या अभावी बरे होणे अतिशय अवघड असतात.


ताण मनाला, ताप तनाला

Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT

ताण मनाला, ताप तनालासध्या मनुष्याचे जीवन आधीच दगदगीचे झालेले आहे. त्यात जर सभोवतालच्या गोष्टींचा स्वीकार हसतखेळत न करता मानसिक ताण घेतला, तर शरीराला ताप येईल व मनुष्याची वार्धक्‍याकडे वाटचाल अधिक गतीने होईल, अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकेल. ॐकार गुंजनामुळे शरीराला आवश्‍यक असणारी प्रतिकारशक्‍ती, आरोग्य हे सर्व साध्य होईलच पण मानसिक ताण दूर होऊन मनाला आनंदित, प्रफुल्लित व शांत अवस्था प्राप्त झाली तर "ताप'ही दूर ठेवता येतील. स काळी सकाळी अकाउंट्‌स ऑफिसमधून जोराने चाललेली चर्चा ऐकू आली, म्हणून चौकशी केली तेव्हा कळले, की एक गृहस्थ शिबिराचे पैसे भरण्यासाठी आले आहेत, पण पैसे घेण्यासाठी कोणी नाही म्हणून ते गृहस्थ रागावलेले असून, त्यांची आरडाओरड चालू आहे. पैसे घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते आज कामावर आलेले नसल्याने हा प्रसंग आला होता. त्यांचे म्हणणे, ऑफिसमधल्या इतर कोणीतरी पैसे घ्यावेत, पण आज त्या ऑफिसमधल्या एकूण तीन व्यक्‍ती गैरहजर आहेत. फक्‍त शिपाई हजर आहे, त्यामुळे तो पैसे घेऊन पावती देऊ शकत नव्हता.


प्रश्‍नोत्तरे

Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT

प्रश्‍नोत्तरेमा झ्या मुलाचे वय 21 आहे. त्याला श्‍वासाचा त्रास होतो. इन्हेलर चालू आहे. कोणते आयुर्वेदिक औषध घ्यावे हे कळवावे. ... सौ. मंगला उत्तर - इन्हेलर घेण्याने श्‍वासाचा त्रास थोड्या वेळापुरता कमी झाला तरी पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून योग्य उपचार घेणे आवश्‍यक असते. आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्यांकडून प्रत्यक्ष तपासणी करून औषध सुरू करणे सर्वांत श्रेयस्कर. त्याबरोबरीने छाती-पाठ-पोटाला नियमितपणे "संतुलन अभ्यंग तेल' लावण्याचा उपयोग होईल. आठवड्यातून दोन-तीन वेळा छाती-पाठीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेकण्याचा उपयोग होईल. वैद्यांच्या सल्ल्याने "प्राणसॅन योग'सारखे औषध घेण्याचाही फायदा होईल. प्राणशक्‍ती स्वीकारण्याची फुफ्फुसांची ताकद वाढावी म्हणून अनुलोम-विलोमसारखी श्‍वसनक्रिया करण्याचा, "संतुलन च्यवनप्राश' किंवा "संतुलन आत्मप्राश'सारखा रसायनयोग घेण्याचाही उत्तम उपयोग होईल. म ला दर 10-15 दिवसांनी तोंड येते, सतत त्रास होत राहतो. कृपया मार्गदर्शन करावे....रूपा ठाकूर उत्तर - वारंवार तोंड येणे हे अपचनाचे आणि शरीरात उष्णता वाढल्याचे लक्षण असते.


थंडी-ताप

Posted: 14 Jul 2011 04:40 PM PDT

उष्णतेने त्रस्त झालेल्या जिवाला, पृथ्वीला पावसाळ्यामुळे दिलासा मिळतो खरा, पण बरोबरीने अनेक आजारांनाही आमंत्रण मिळत असते. सर्दी, ताप, जुलाब, कावीळ, साथीचे रोग यांना सहज वाव मिळतो तो पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये हवामान थंड व दमट झालेले असते. पाऊस पडत असतो. बाह्य वातावरणात ज्याप्रमाणे पावसाळ्यात बुरशी येते, अन्नपदार्थ पटकन खराब होतात, जीवजंतू, किडे-कीटकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले दिसते, त्याचप्रमाणे शरीरातही बुरशीमुळे (फंगल इन्फेक्‍शन) किंवा अदृश्‍य जीवजंतू (जीवाणू, विषाणूंमुळे होणारे इन्फेक्‍शन) मुळे रोग होण्याचे प्रमाण वाढते. तापाची लक्षणे पावसाळ्यामध्ये ताप येतो. त्याची लक्षणे सहसा आयुर्वेदात सांगितलेल्या वात-कफ ज्वराशी मिळती-जुळती असतात. स्तैमित्यं पर्वणां मेदो निद्रां गौरवमेव च । शिरोग्रहः प्रतिश्‍यायः कासः स्वेदाप्रवर्तनम्‌ ।। संतापो मध्यवेगश्‍च वातश्‍लेष्मज्वराकृतिः ।।...माधवनिदान शरीर स्तिमित म्हणजे जखडल्यासारखे वाटते, विशेषतः ओल्या फडक्‍याने बांधून ठेवल्यासारखे वाटते. शरीरातील सांधे दुखतात. खूप झोप येते. सर्व शरीर जड झाल्यासारखे वाटते. डोके जड, जखडल्यासारखे वाटते.


फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर


मल

Posted: 02 Jun 2011 04:55 PM PDT

मलशरीरातील सर्व कार्ये ज्यांच्याकरवी होतात ते दोष, शरीर ज्यांच्यापासून बनले आहे आणि ज्यांच्या आधाराने सशक्‍त, सक्षम राहते ते धातू आणि शरीरात असेपर्यंत स्वत-चे काम करणारे, पण त्यानंतर मात्र वेळेवर उत्सर्जित होऊन शरीराला शुद्ध ठेवणारे ते मल होत. संतुलित दोष, उत्तम परिपूर्ण अवस्थेतील धातू व नियत प्रमाणात व योग्य वेळी उत्सर्जित होणारे मल हा निरोगी आयुष्याचा पायाच आहे. दोषधातुमलमूलं हि शरीरम्‌ । असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. शरीरातील सर्व कार्ये ज्यांच्याकरवी होतात ते दोष, शरीर ज्यांच्यापासून बनले आहे आणि ज्यांच्या आधाराने सशक्‍त, सक्षम राहते ते धातू आणि शरीरात असेपर्यंत स्वत-चे काम करणारे, पण त्यानंतर मात्र वेळेवर उत्सर्जित होऊन शरीराला शुद्ध ठेवणारे ते मल होत. लिनीकरणात्‌ मला- ।...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान जे शरीराला मलीन करू शकतात ते मल होय. पण म्हणून मल अगदीच अनावश्‍यक असतात असे नाही. तीन मल विष्ठा,मूत्र व घाम हे तीन मुख्य मल होत. तसेच शरीरातील कार्य संपल्यानंतर जीर्ण झालेले, झरलेले म्हणजे दूषित झालेले रक्‍त, मांस वगैरे धातू हेही मल समजले जातात.


मंत्र स्वास्थ्याचा ३/२१ (मल)

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

मंत्र स्वास्थ्याचा ३/२१ (मल)पंचमहाभूतांपासून तयार झालेला कुठलाही पदार्थ (मग ती हवा असो, पाणी असो, अन्न असो, मनाला चालना देणारे विचार असो, ज्या वेळी शरीरात स्वीकारला जातो त्या सर्वांमध्ये मल असतोच. हा मल शरीरात ठेवून चालत नाही, तर तो शरीरातून विसर्जित व्हावा लागतो. शरीरात आलेल्या अन्नातील सारभाग स्वीकारून मल भाग बाहेर टाकून देण्याची अत्यंत सुंदर व्यवस्था निसर्गाने केलेली आढळते. पण मनात येणारा कुविचाररूपी मल मात्र सद्विचार, सत्संग, ध्यान याद्वारे काढून टाकावा लागतो. जीवनाची मुख्य त्रिसूत्री म्हणजे स्थैर्य, गतिमानता आणि ध्येय वा पुरुषार्थ. सर्व प्राणिमात्रांची वस्तुमात्रांची प्रकृती या त्रिसूत्रीवर आधारलेली असते. अर्थात कफामुळे स्थैर्य, वातामुळे गतिमानता आणि पित्तामुळे ध्येय वा पुरुषार्थ साध्य होतो. परंतु हे सर्व साध्य करण्यासाठी आवश्‍यक असते शरीर. स्थैर्य आवश्‍यक असले तरी दगडासारखे स्थैर्य उपयोगाचे नसते तर ध्येयसिद्धी होईपर्यंत आवश्‍यक असलेली चिकाटी हा गुण स्थैर्य या शब्दात अभिप्रेत आहे. तसेच गतिमानता ही अत्यंत स्वाधीन बदलाची प्रक्रिया येथे अभिप्रेत आहे. ध्येय वा पुरुषार्थ सिद्ध करायचा म्हटला तर त्यासाठी शरीराची मदत घ्यावीच लागते.


आईचे दूध

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

गर्भवती स्त्री प्रसूत झाल्यानंतर आपल्या गोड गोजिऱ्या इवल्याशा बाळाला जवळ घेऊन जेव्हा प्रथम स्तनपान देते आणि बाळही आनंदाने स्तनपान करते तेव्हा तो तिचा आनंद मला वाटतं जगातील सर्व सुखांपेक्षा मोठा असतो. प्रसूतिवेदना, गर्भावस्थेतील त्रास या सर्वांचा त्या एका क्षणात विसर पडतो तिला! आणि प्रेमाने पान्हा फुटतो- ज्याला "स्तन्य' म्हणतात. बाळाचा स्पर्श "मातृस्तन्य' निर्मितीतील एक घटक मानला जातो. बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. नार्यास्तु मधुरं स्तन्यं कषायनुरसं हिमम्‌ । स्निग्धं स्थैर्यकरं शीत चक्षुष्य बलवर्धनम्‌ ।। आईचे दूध मधुर, कषाय रसात्मक, स्निग्ध, बलवर्धक, शीत गुणात्मक, डोळ्यांना हितकर अशा गुणांचे असते. मातृस्तन्याचे महत्त्व - बाळाच्या पोषणासाठी मातृस्तन्य अत्यंत हितकारी असते. शिवाय आई आणि बाळ यांच्यामध्ये सुंदर भावनिक नाते स्तनपानाने निर्माण होते. अतिशय स्वच्छ, जंतुरहित असे हे स्तन्य असते, अतिसार, प्रवाहिका, उलट्या, कृमी इ. तक्रारी वरच्या दुधाने निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी "आईचे दूध' बाळाला द्यावे. ते पचण्यास हलके असते.


आईचे दूध

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

आईचे दूधगर्भवती स्त्री प्रसूत झाल्यानंतर आपल्या गोड गोजिऱ्या इवल्याशा बाळाला जवळ घेऊन जेव्हा प्रथम स्तनपान देते आणि बाळही आनंदाने स्तनपान करते तेव्हा तो तिचा आनंद मला वाटतं जगातील सर्व सुखांपेक्षा मोठा असतो. प्रसूतिवेदना, गर्भावस्थेतील त्रास या सर्वांचा त्या एका क्षणात विसर पडतो तिला! आणि प्रेमाने पान्हा फुटतो- ज्याला "स्तन्य' म्हणतात. बाळाचा स्पर्श "मातृस्तन्य' निर्मितीतील एक घटक मानला जातो. बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. नार्यास्तु मधुरं स्तन्यं कषायनुरसं हिमम्‌ । स्निग्धं स्थैर्यकरं शीत चक्षुष्य बलवर्धनम्‌ ।। आईचे दूध मधुर, कषाय रसात्मक, स्निग्ध, बलवर्धक, शीत गुणात्मक, डोळ्यांना हितकर अशा गुणांचे असते. मातृस्तन्याचे महत्त्व - बाळाच्या पोषणासाठी मातृस्तन्य अत्यंत हितकारी असते. शिवाय आई आणि बाळ यांच्यामध्ये सुंदर भावनिक नाते स्तनपानाने निर्माण होते. अतिशय स्वच्छ, जंतुरहित असे हे स्तन्य असते, अतिसार, प्रवाहिका, उलट्या, कृमी इ. तक्रारी वरच्या दुधाने निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी "आईचे दूध' बाळाला द्यावे. ते पचण्यास हलके असते.


ज्वराच्या अवस्था

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

ज्वराच्या अवस्थाआयुर्वेदात ज्वर व्याधीचा किती विस्तृतपणे विचार केला आहे हे आपण पाहात आहोत. निदानस्थानात ज्वर हा पहिला समजावला आहे आणि सर्व पैलूंतून त्याची विस्तृत माहिती दिलेली आहे. असे म्हटले जाते की एकदा का ज्वर नीट समजला, की मग इतर रोग लक्षात येणे सोपे असते. मागच्या वेळी आपण ज्वर धातुगत झाला तर काय काय होते हे पाहिले, आता आपण ज्वराच्या तीन अवस्था पाहणार आहोत. ज्वराच्या तीन अवस्था ज्वराच्या एकूण तीन अवस्था सांगितल्या आहेत. १. आमावस्था २. पच्यमानावस्था ३. निरामावस्था आमावस्था : ज्वर येतो तेव्हा अग्निमांद्य असतेच. अग्निमांद्यामुळे आम तयार झाला आणि रसधातू स-आम झाला की ज्वर येतो. जेव्हा फक्‍त रसधातूच नाही तर ज्वराला कारणीभूत असणारा दोष स-आम असतो तेव्हा ज्वराला आमावस्था आली असे म्हणतात. आमावस्थेतील ज्वराची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात. - भूक लागत नाही, तोंडाला चव नसते, शरीर जड होते. - लाळ अधिक तयार होते, घशाशी येते. - छातीत, हृदयात काही तरी भरून ठेवले आहे असे वाटते. - डोके जड होते, तंद्रा अनुभूत होते. - उठणे-बसणे-हलणे वगैरे हालचाली करण्यानेही थकवा प्रतीत होतो. - मूत्रप्रवृत्ती अधिक प्रमाणात होते.


प्रश्‍नोत्तरे -

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

माझे वय ५६ वर्षे आहे. मला थायरॉईडचा त्रास आहे. सध्या सर्व तपासण्या व्यवस्थित आहेत पण गेल्या दोन महिन्यांपासून त्वचा व केस एकाएकी फार कोरडे होत आहेत. त्वचेवर सुरकुत्याही पडू लागल्या आहेत. सकाळी उठावेसे वाटत नाही. अंगात ताकद नाही असे वाटते. मी मसाज करून घेतला तर चालेल का? या वयात पंचकर्म करावे का? कृपया मार्गदर्शन करावे..... - श्रीमती आशा उत्तर - प्रकृतीचा व्यवस्थित विचार करून शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करण्याचा उपयोग होईल. मसाज करण्याचा म्हणजे प्रशिक्षित परिचारकाकडून, औषधांनी सिद्ध तेलाच्या साहाय्याने अभ्यंग करण्याचाही फायदा होईल. शरीरात आतपर्यंत जिरण्याची क्षमता असलेले "संतुलन अभ्यंग तेला'सारखे तेल हलक्‍या हाताने रोज रात्री झोपण्यापूर्वी लावण्याचाही उत्तम गुण येईल. थायरॉईडचे रिपोर्ट व्यवस्थित असले तरी थायरॉईड ग्रंथीला पुन्हा काम करण्यास प्रवृत्त करण्यास मदत करणारी आयुर्वेदिक औषधे घेणे श्रेयस्कर असते. यामुळे थायरॉईड ग्रंथीच्या अकार्यक्षमतेमुळे शरीराचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. पर्यायाने अशक्‍तता, त्वचा कोरडी पडणे वगैरे त्रास दूर होऊ शकतात. माझा मुलगा १३ वर्षांचा आहे.


आरोग्य सुभाषित

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

समदोषः समाग्निश्‍च समधातुमलक्रियः। प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ।। ....सुश्रुतसंहिता ज्या व्यक्‍तीचे वातादी दोष सम स्थितीत म्हणजे संतुलित आहेत, ज्याचा जाठराग्नी प्रखर किंवा मंद नसून मध्यम व सम प्रमाणात आहे, ज्याच्या शरीरातील धातू नियत प्रमाणात व संपन्न स्थितीत आहेत, ज्याची मलविसर्जनाची क्रिया व्यवस्थित होते आहे आणि ज्याचे मन, इंद्रिये व आत्मा प्रसन्न आहेत, त्या व्यक्‍तीला स्वस्थ (निरोगी) म्हणावे. शरीरातील त्रिदोष, सप्तधातू व त्रिमल आणि शरीरातील अग्नी (म्हणजेच हॉर्मोन्स) प्रमाणापेक्षा वाढून चालत नाहीत, तसेच प्रमाणापेक्षा कमी होऊनही चालत नाहीत. तेव्हा निरोगी आयुष्याची इच्छा असणाऱ्यां प्रत्येकाने ह्या सगळ्यांच्या संतुलनासाठी हर एक प्रकारे प्रयत्न करणे आवश्‍यक असते. संकलन - डॉ. सौ. वीणा तांबे


कांजिण्या

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

कांजिण्याकांजिण्या हा एक संसर्गजन्य विकार आहे. तो सहसा लहान मुलांना होतो परंतु मोठ्या माणसांनादेखील होऊ शकतो. लहान मुलांमध्ये सात ते दहा दिवसांच्या आजारपणानंतर हा त्रास शमतो. मोठ्या वयात हा गंभीर स्वरूप धारण करू शकतो. आजार बरा व्हायला जास्त दिवस लागतात व आजाराची तीव्रता आणि गुंतागुंत जास्त असते. आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे त्वचेवर लाल चट्टे उठतात. त्यावर लहान लहान पाणी धरलेले फोड येतात. असे चट्टे उठण्यापूर्वी रुग्णाला ताप येतो व आपली प्रकृती बरी नसल्याचे जाणवत असते. हे चट्टे चेहऱ्यावर आधी उठतात. शरीरावरून ते डोक्‍यात आणि हातापायांवर पसरतात. कधी कधी तोंडाला आणि जननेंद्रियांवरही असे चट्टे येतात. त्या भागांवर खूप खाज सुटू लागते. छोटे छोटे फोड मोठे होतात व त्यांवर खपली धरते. नव्या नव्या चट्ट्यांच्या लाटा येऊ लागतात. हा आजार व्हेरिसिला झॉस्टर नावाच्या विषाणूमुळे होतो. रुग्णाच्या अंगावर उठलेल्या फोडांतून स्पर्शाने अथवा हवेतून हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो.


How I Got Myself to Eat Cilantro http://dlvr.it/RQn0y
Bok Choy: 10 Healthy Facts http://dlvr.it/RQn0x
Do Bedbugs Spread MRSA? http://dlvr.it/RQn0w
Reducing Need for Diabetes, High Blood Pressure, Cholesterol, and Osteoarthritis Drugs http://dlvr.it/RJkqm
Heart Failure May Be Linked to Osteoporosis http://dlvr.it/RJkqw
Top Acne Treatment Mistakes: Popping Pimples, Overdoing Products, and More http://dlvr.it/RJkqF
Jenny Craig Nabs ‘Best Diet’ Ranking http://dlvr.it/RJkpK
Type 2 Diabetes in Women: Risks, Pregnancy, and More http://dlvr.it/RJkpd

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य