आचार्यांकडून मिळालेले ज्ञान ही खरी विद्या. या विद्येच्या जोरावर विद्यार्थी पुढे यशप्राप्ती करून घेऊ शकतो. आयुर्वेद, योग, स्थापत्य वगैरे सर्व शास्त्रे लक्षात येण्यासाठी त्याचा अनुभव मिळण्यासाठी म्हणजे शास्त्रातील ज्ञानाचा स्वतःला आणि इतरांना उपयोग होण्यासाठी आचार्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाची आवश्यकता असते. नुसती पुस्तके वाचून किंवा परीक्षेत चांगले गुण मिळविण्याने हे साध्य करता येईलच, असे नाही.
अगदी थोडक्यात विषयाचे मर्म सांगण्यात अग्र्यसंग्रह अग्रणी राहतो. जीवनातील सर्व अंगांचा उल्लेख चरकाचार्यांनी त्याच्या अग्र्यसंग्रहात केला आहे. मागच्या वेळी आपण विद्वान व्यक्तीबरोबर केलेले संभाषण हे बुद्धिवर्धनामध्ये सर्वश्रेष्ठ असते हा पाहिले. आता या पुढचा भाग पाहू.
आचार्यः शास्त्राधिगमहेतूनाम् - शास्त्र समजण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कारणांमध्ये आचार्य म्हणजे शिक्षण सर्वांत महत्त्वाचे असतात.
पुस्तक किंवा आजच्या इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळू शकते, परंतु आचार्यांकडून मिळालेले ज्ञान ही खरी विद्या. या विद्येच्या जोरावर विद्यार्थी पुढे यशप्राप्ती करून घेऊ शकतो. आयुर्वेद, योग, स्थापत्य वगैरे सर्व शास्त्रे लक्षात येण्यासाठी त्याचा अनुभव मिळण्यासाठी म्हणजे शास्त्रातील ज्ञानाचा स्वतःला आणि इतरांना उपयोग होण्यासाठी आचार्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाची आवश्यकता असते. नुुसती पुस्तके वाचून किंवा परीक्षेत चांगले गुण मिळविण्याने हे साध्य करता येईलच असे नाही.
आयुर्वेदोऽमृतानाम् - जे जीवन देते ते अमृत. रोग, भीती, दुःख, असहायता. वेदना अशा सर्व गोष्टींवर विजय मिळविता येतो तो अमृताने. अशी जी कोणती अमृते आहेत, त्यात आयुर्वेद सर्वश्रेष्ठ होय.
या एका लहानशा सूत्रातील आयुर्वेदाचे सामर्थ्य लक्षात येते. फक्त रोगनाशन करणे एवढाच या शास्त्राचा उद्देश नाही, तर जीवन सर्वार्थाने जगायचे असेल तर त्यासाठी लागणारे अमृत म्हणजे आयुर्वेदशास्त्र आहे. जर प्रत्येकाने आयुर्वेदातील तत्त्वे समजून त्याप्रमाणे आहार-आचरण-मानसिकतेमध्ये त्यांचा अवलंब केला तर आरोग्य उत्तम राहील, शिवाय संपन्न जीवन जगता येईल.
सद्वचनं अनुष्ठेयानाम् - निष्ठा, श्रद्धा ठेवल्यास योग्य गोष्टींमध्ये सद्वचन म्हणजे सद्गुरू, सज्जन, संतमंडळी, ज्ञानाचा अनुभव घेतलेल्या मंडळींचे वचन सर्वश्रेष्ठ होय.
सध्या या सूत्राची सर्वांना फार आवश्यकता आहे. साध्या साध्या किंवा कित्येकदा पूर्वापार चालत आलेल्या नेहमीच्या रिवाजांवर सुद्धा सध्या अनेक मतमतांतरे असलेली दिसतात. अशा वेळी नेमके काय करावे, काय खरे, काय खोटे हे समजणे अवघड होऊन जाते. अशा वेळी जो ज्ञानी आहे, अनुभवू आहे, ज्याने शास्त्र समजून घेतलेले आहे त्यांचे म्हणणे ऐकणे हे श्रेयस्कर होय.
असद्ग्रहणं सर्वाहितानाम् - अहितकर अशा सर्व कर्मांमध्ये असद्ग्रहण म्हणजे चुकीच्या व्यक्तीचे ऐकणे हे सर्वश्रेष्ठ होय.
थोडक्यात, मार्गदर्शन करणाराच चुकीचा असेल तर त्यातून घडणारी पुढची प्रत्येक गोष्ट अहिताला कारणीभूत ठरेल. तेव्हा आपले अहित होऊ नये असे वाटत असेल तर कुणाचे ऐकायचे हे विचारपूर्वक ठरवायला हवे.
सर्वसंन्यासः मुखानामिति - सुख देणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये सर्व विषयांपासून विरक्ती सर्वश्रेष्ठ होय.
आइस्क्रीम खाण्याने सुख मिळेल, प्रवास केल्याने सुख मिळेल, नवीन कपडे घेण्याने सुख मिळेल असे आपल्याला प्रत्येक विषयात वाटत राहते, पण ते तात्पुरते असते. चरकाचार्य येथे सांगत आहेत की खरे सुख हवे असेल, अक्षय सुख हवे असेल तर कशाचाही लोभ मनात न ठेवणे, कशाचीही आसक्ती नसणे हेच सर्वश्रेष्ठ असते.

No comments:
Post a Comment