या ठिकाणी आयुर्वेद तसेच घरगुती उपचार ,योगाधरित उपचार अशा विवीध विषयांसबंधी माहिती संकलन हे आमचे उद्दिष्ट आहे Mobile:9604040305, LL 020 - 25888547. |Done as social work.
Search This Blog
सकाळ: स्थूलपणा संबंधी
स्थूलपणा कमी करण्यासाठी असलेल्या अनेक प्रचलित उपायांशिवाय ऍक्युपंक्चर उपचारपद्धतीने वजन आटोक्यात ठेवण्यास निश्चितच मदत होते
http://www.esakal.com/esakal/04092007/Family_DoctorB7594EB088.htm
हृदयविकार | मनोगता वरील लिन्क्स
लेख कॉपी केलेले नाहीत पण मुळ लेखांच्या प्रथम अंकाला लिन्क दिली आहे.......
पहील्या लेखाची लिन्क हृदयविकार
हृदयविकारः १-झटका का येतो?
हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
हृदयविकारः ४-रक्तदाब
हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
हृदयविकारः ९-पहिला दिवस
हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
हृदयविकारः १३-पुनर्वसन
हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
हृदयविकार-१६ आहार
हृदयविकार-१७ विहार
हृदयविकार-१८ व्यायाम
हृदयविकार-१९ प्राणायाम
हृदयविकार-२० शिथिलीकरण
हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
हृदयविकार: २८-एकाकीपणा
हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
औषध सुची: श्वास
पुश्कर्मुल चुर्ण ५ ते १५ ग्राम.
श्रिन्ग्यदि चुर्ण ५ ते १५ ग्राम.
कनकासव १० ते ३० मि.ली.
वासारीष्ट १० ते ३० मि.ली.
सुवर्ण समीर् पन्नग् ५-६ मि.ग्रा
ब्लॉग वर किंवा वेबसाइट वर व्यक्त प्रसिद्ध केलेली सुची ही सामान्यञान या उद्दिष्टाने आहे.कुठ्ल्याही प्रकारची उपाययोजना वैद्यकीय सल्यानुसारच करावी.Please take expert advise before trying any major therapy.
औषध सुची: ज्वर , नवज्वर
सन्जिवनि १२५ ते २५० मि.ग्रा.Sanjivani Vati125 to 250 mg.
गॊदन्ति मिश्रण१२५ ते २५० मि.ग्रा.Godanti Mishrana 125 to 250 mg.
विषमज्वर आयुश ६४५०० मि.ग्रा. ते १ ग्राम.Ayush 64500 mg. To 1 gm.
सप्तपर्ण घन वटी २५०मि.ग्रा. ते ५०० मि.ग्रा.Saptaparna ghana Vati250mg. To 500 mg.
सुदर्शन चुर्ण३ ते ६ ग्राम.Sudarshana Churna3 to 6 gm.
या ब्लॉग वर किंवा वेबसाइट वर व्यक्त प्रसिद्ध केलेली सुची ही सामान्यञान या उद्दिष्टाने आहे.कुठ्ल्याही प्रकारची उपाययोजना वैद्यकीय सल्यानुसारच करावी.Please take expert advise before trying any major therapy.
काही औषधे
- आरोग्यवधिर्नी , त्रिकटू , मुस्ता यासारखी दव्ये यकृतावर प्रभावी ठरतात. व्यवहारामध्ये दीर्घकाळ आरोग्यवधिर्नीचे सेवन केल्यावर रक्तदाब कमी झालेला आढळतो.
- मूत्रपिंडात विकृती असेल तर गोसूर , चंदन , वाळा , गुग्गुळ ही दव्ये उत्तम कार्य करतात. गोक्षूरादी गुग्गुळ हे नेहमी वापरले जाणारे एक चांगले औषध आहे. गोक्षर हा मूत्रमार्ग साफ करतो पण गुग्गुळ हा रक्तवाहिन्यांचा उपलेप (आतील क्षारयुक्त थर) कमी करणे , आहारातील क्लेद कमी करणे हे सुद्धा महत्त्वाचे कार्य करतो. पुर्नवासव ,
- दशमूलारिष्ट , अर्जुनारिष्ट यांचापण आवर्जून उल्लेख केला पाहिजे. मूत्रमार्ग समान , अपान , हृदय यावर कार्य करणारी ही प्रभावी औषधे आहेत.
- फुफ्फुसाचे कार्य सुधारणारी तलीसादी चूर्ण शृँगभस्म , अर्भकभस्म , चौसष्ठ पिंपळी ही द्रव्ये आहेत
- अग्निमांद्य, अपचन, गॅस हे विकार बळावतात. त्यासाठी गोरखचिंचावलेह, दाक्षासव, पिप्पलादी काढा.
- जुलाबासाठी कुडावटी, शनवटी या गोळ्या आणि कुटजादीकषाय हा काढा.
- उलट्यांकरिता राजगिरा लाह्या, भाताच्या साळीच्या लाह्या, आलं चघळून खावं. लघुसूतशेखर गोळ्या चघळाव्यात आणि गोरखाचिंचवलेह सायरप प्यावं.
- काविळीसाठी फलत्रिकादी क्वाथ आरोग्य काढा . पचनासाठी गॅससाठी पिप्पलादी काढा, पंचकोलासव काढा घ्यावा.
- कफ, सर्दी, खोकला, दमा, ताप यासाठी ज्वरांकुश लक्ष्मिनारायण, लवंगादी गुग्गुळ या गोळ्या नागरादीकषाय,
- संधीवात, आमवात, कंबरदुखी, पाठदुखी यामध्ये बलदायी महानारायण तेल, शतवारी तेलाने मसाज. पोटातून घेण्यासाठी संधिवातारी गुग्गुळ, गणेश गुग्गुळ, वातगजांकुश गोळ्या आभादी गुग्गुळ, गोसुरादी गुग्गुळ, सौभाग्य सुंठ, आस्कंद चूर्ण घ्यावे.
- टॉनिक घ्यावयाचं झाल्यास घरगुती टॉनिक अष्टवर्गयुक्त च्यवनप्राश ,मनुका, बेदाणे, जर्दाळू, टॉनिक म्हणून थोडं थोडं खायला हरकत नाही. शक्यतो बदाम, अक्रोड, पिस्ते असे जड पदार्थ टॉनिक म्हणून खाऊ नयेत.
(एका म. टा. लेखाचा सारांश वापरून)
इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/52468.cms
सततचा तणाव आणि चिंता यामुळे "इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोटाच्या विकारांत वाढ होते, असे ब्रिटनमधील साउदॅम्पटन विद्यापीठातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. पोटात कळा येणे तसेच अतिसार किंवा बद्दकोष्ठता अशी टोकाची लक्षणे असणाऱ्या या व्याधीची नेमकी कारणे शास्त्राला अद्याप कळलेली नाहीत आणि ही व्याधी मानसिक कारणांमुळे निर्माण होते, की त्यामागे काही जीवशास्त्रीय कारणे आहेत अथवा दोहोंच्या एकत्रित परिणामांचा यात हात आहे, याबद्दल तज्ज्ञांत मतभेद आहेत. साउदॅम्पटन विद्यापीठातील तज्ज्ञांनी या व्याधीमागील मानसशास्त्रीय कारणांचा शोध घेण्यासाठी अशा त्रासाचा पुर्वेतिहास नसलेल्या ६२० रुग्णांकडून तीन ते सहा महिन्यांच्या अंतराने त्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेणाऱ्या प्रश्नावल्या भरून घेतल्या. सततचा तणाव, अति चिंता आणि आजारांबाबतचे चुकीचे समज या कारणांमुळे या व्याधीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे त्यातून दिसून आले. म्हणजे या व्याधीची मूळ कारणे जरी जैविक असली तरी, मानसिक कारणांमुळे व्याधीच्या प्रमाणात वाढ होते, असे त्यांना आढळून आले.
आरोग्य मंत्र - चिडचिडी आतडी किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा तपास
[ Monday, June 30, 2003 10:23:02 pm] या विकाराची लक्षणे पोटाशी निगडित असल्यामुळे प्रथम शौचाचा तपास करून संसर्ग नाही याची खात्री केली जाते व गरज पडल्यास दुबिर्णीतून जठर , आद्यांत्रे तसेच मोठी आतडी यांचा तपास केला जातो. अर्थातच हे सर्व तपास थोड्याबहुत प्रमाणात नकाराथीर् निघतात. एक्स रे मध्ये किंवा बेरियम तपासातही काही आढळत नाही. अन्नाचा जलद प्रवास दिसून येतो.
उपचार : चिडचिड्या आतड्यांना शांत करण्यासाठी प्रामुख्याने दोन गोष्टी कराव्या लागतात.
1. मन:शांती व
2. आहाराची पथ्ये
1. मन:शांती : मानसिक तणावामुळे निर्माण होणाऱ्या विविध नैसगिर्क अंतस्त्रावाच्या आतड्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी मानसिक ताण कमी करणे हाच खरा उपाय आहे. त्यासाठी सकारात्मक वृत्ती जोपासणे , ध्याननिदा , नियमित व्यायाम , खेळ तसेच मोकळ्या हवेत फिरणे , अधुनमधून कामातून विश्रांती घेणे , एखादा छंद जोपासणे हे विविध उपाय आहेत.
आहारातील पथ्य
हे लक्षणांवर अवलंबून असावे परंतु सर्वसाधारणपणे तंतूमय पदार्थांचा आहारात अंतर्भाव करून व एका वेळेस जास्त खाऊन लक्षणे सुधारू शकतात.
रोजच्या जेवणात भरपूर फळे , भाज्या , कोशिंबिरी असाव्यात. त्यांचे तुकडे मोठे असावेत. कोंडायुक्त अन्न खावे. दलिया किंवा सोजीचा रवा शौचासाठी चांगला. दही किंवा ताकामुळे लॅक्टोबॅसिलस पोटात जाऊन त्याचा फायदा होतो.
काही रुग्णांना दूध किंवा दुधाचे पदार्थ पचत नाहीत. तसेच मांसाहाराचा किंवा अंड्यांचा काही जणांना त्रास असतो. असे पदार्थ शोधून आपल्या आहारात सुधारणा करून बऱ्याच रुग्णांना आराम मिळतो.
औषधोपचार : शौचाचा तपास न करता प्रतिजैविकोचा किंवा अमिबांचा नाश करणाऱ्या औषधांचा वापर टाळावा. हल्ली आतड्यांची हालचाल नियमित करयण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. परंत वैद्यकीय सल्ल्यानेच त्याचा वापर करावा. थोडक्यात , बऱ्याच रुग्णांना औषधांपेक्षा मार्गदर्शनामुळे आराम मिळतो.
कोलेस्टेरॉल नियंत्रण
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1731600.cms
डोकं दुखतं ?
डोक्यातील रक्तवाहिन्या प्रमाणापेक्षा जास्त आकुंचन व नंतर प्रसरण पावतात. त्यामुळे डोके दुखते. हा आजार अनुवांशिकही आढळतो. एखाद्यालाच अर्धशिशी का होते याचे नेमके असे कारण नाही. उपाशी राहणे , प्रखर प्रकाशात खूप वेळ राहणे , जागरण , दगदग , मानसिक ताण , इ. गोष्टींमुळे डोकेदुखी होऊ शकते. कॉफी , अजिनोमोटो , कोळंबी , चीज , आंबवलेले पदार्थ , आंबट फळे यांच्या सेवनानेही कधीकधी डोकेदुखी होते ; परंतु प्रत्येक व्यक्तीत डोकेदुखीचे कारण भिन्न असू शकते.
खाल्ल्यानंतर दरवेळी डोके दुखले तरच तो पदार्थ टाळावा. अर्धशिशीची लक्षणे : डोके दुखायला सुरू होण्यापूवीर् जांभया येणे , थकवा अथवा अतिउत्साह वाटणे , अंधारी येणे , नीट न दिसणे , डोळ्यांसमोर ठिपक्यांसारखे किंवा रेघांसारखे काजवे चमकणे. प्रत्येकात ती दिसतातच असे नाही ; परंतु थोड्या वेळात हळूहळू डोके ठणकू लागते. या काळात आवाज , उजेड किंवा गोंगाट सहन होत नाही. डोके घट्ट बांधून पडून राहावेसे वाटते. यानंतर पोटात मळमळू लागते व उलटीही होऊ शकते. बहुतेकांना उलटी केल्याने बरे वाटते व झोपही लागते. काही तासानंतर डोकेदुखी थांबते ; परंतु नेमक्या किती तासानंतर हे नक्की सांगता येत नाही. काहींना तर सदासर्वदा डोकेदुखीचा त्रास असतो. चुकीच्या आहारामुळे आपल्याला हा त्रास होतोय हे त्यांच्या गावीही नसतं. हवामानात बदल झाल्याने , उग्र वासामुळे , अत्तरामुळे , तीव्र उजेडामुळे तसंच मासिक पाळीमुळे डोकेदुखी उद्भवते. या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेऊ शकत नसल्याने आहारावर नियंत्रण ठेवणे अधिक चांगलं! काही पदार्थांमुळे हटकून डोकेदुखी होते. किंबहुना हे पदार्थ डोकेदुखी निर्माण करणारे पदार्थ म्हणूनच ओळखले जातात.
ज्यांना कामाचा ताण असतो , त्यांना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होते. ध्यानधारणा आणि प्राणायाम केल्याने या त्रासापासून बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळू शकते.
काही पदार्थ असे आहेत ज्यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मिळतो. त्यात आल्याचं नाव सर्वात आधी घ्यावं लागेल. म्हणजे आल्याकडे आपण ' पेन रिलिव्हर ' म्हणून बघू शकतो. आल्याचा एक तुकडा घेऊन त्यावर थोडं लिंबू पिळा. चवीसाठी त्यावर थोडं काळं मीठ घाला आणि हलके चघळा. आलं चघळल्याने साधी डोकेदुखी थांबत असेल तर चिवट अर्धशिशीवरही नियंत्रण मिळवता येतं. आलं वेदना कमी करतं.
उष्ण प्रकृती --आल्यानी त्रास, त्रिभुवन किर्ती,शिरशूल वनस्पती,त्रिशून,सुंठ दुधातून/लेप,मिरी पावडर
ज्यांचं वारंवार डोकं दुखतं अशांनी दोन ते चार टेबलस्पून आळशीच्या बियांची पूड नियमितपणे दोन-तीन महिने खावी. आळशीच्या बियांची पावडर बनवण्यासाठी आधी त्या कोरड्याच भाजाव्या. चवीसाठी त्यात मीठ मिसळा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोकेदुखीला कारणीभूत ठरणाऱ्या या पदार्थांचं सेवन पूर्णपणे टाळलं पाहिजे. तसंच शरीराचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे त्यातले विषारी घटक नेहमी काढून टाकले पाहिजेत. ठराविक वनौषधी व भाज्यांच्या रसाच्या सेवनामुळे डिटॉक्सिफिकेशन करता येतं.
मधुमेहावरील औषधे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-9791809,prtpage-1.cms
मधुमेह, हृदयविकार दूर ठेवणे
त्यासाठी खालील चार गोष्टीचा अवलंब करणे चांग्ले होईल.
- नियमित व्यायाम - शारीरिक हालचाल नियमित व्यायाम ही आपल्या शरीराची दैनंदिन गरज आ हे. (झोपणे, खाणे, पिणे इ.पेक्षाही जास्त महत्त्वाची) व्यायाम हा नियमित असावा. कमीत कमी अर्धा ते एक तास शारीरिक हालचाल, चालणे, प्राणायाम, योगासने यांचा योग्य समावेश असावा. व्यायामामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहते, चरबी कमी होते, इन्शुलिनचे कार्य सुधारते, त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यापासून आपण निश्चितच दूर राहू शकतो.
- नियमित पथ्य - पाश्चात्त्य जीवनपद्धतीचे अंधानुकरण करताना आजच्या पिढीने आपले खाणे- पिणे पूर्णपणे चुकीचे केले आहे. व्यायामाबरोबर समतोल आहार ही अत्यंत निकडीची बाब आहे. आपल्या आहारातील फास्टफूड, तळलेले, वातूळ पदार्थ, अधिक उष्मांक असलेले पदार्थ, मद्यपान, धूम्रपान यांचे प्रमाण कमी करून समतोल सात्त्विक आहार पद्धती आपण अवलंबिणे गरजेचे आहे. वेळी- अवेळी खाणे, चुकीचे अन्न खाणे आणि गरजेपेक्षा जास्त खाणे, या तिन्ही गोष्टी आपण टाळल्या तर बऱ्याचशा गोष्टी आपोआप साध्य होतील. जास्त उष्मांक असलेल्या पदार्थांपेक्षा फळे, पालेभाज्या, कडधान्ये, सॅलड या घटकांचा जास्तीत जास्त वापर करणे तसेच एक दोन वेळा जास्त खाण्यापेक्षा तीन- चार वेळा थोडे थोडे खाणे, तसेच रात्रीचा आहार लवकर आणि कमी प्रमाणात घेणे हितावह आहे.
- ताणतणाव कमी करणे - आजच्या धकाधकीच्या यंत्रयुगात आपणास टीव्ही, कॉम्प्युटर, सोफा, गाड्या ही आरामाची सवय जरी लागली असली तरी याबरोबरच आधुनिकीकरणाबरोबर आपोआपच आलेली प्रचंड दैनंदिन धावपळ आपल्या शरीर तसेच मनावरील ताण वाढवीत आहेत. या ताणाचे परिणाम शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांवर होत आहेत.
- नियमित तपासण्या - चोरपावलांनी येणारे मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, रक्तदाब हे विकार किंवा त्यांचे दुष्परिणाम यांचा योग्य वेळी प्रतिबंध करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता इतर