http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/52468.cms
सततचा तणाव आणि चिंता यामुळे "इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोटाच्या विकारांत वाढ होते, असे ब्रिटनमधील साउदॅम्पटन विद्यापीठातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. पोटात कळा येणे तसेच अतिसार किंवा बद्दकोष्ठता अशी टोकाची लक्षणे असणाऱ्या या व्याधीची नेमकी कारणे शास्त्राला अद्याप कळलेली नाहीत आणि ही व्याधी मानसिक कारणांमुळे निर्माण होते, की त्यामागे काही जीवशास्त्रीय कारणे आहेत अथवा दोहोंच्या एकत्रित परिणामांचा यात हात आहे, याबद्दल तज्ज्ञांत मतभेद आहेत. साउदॅम्पटन विद्यापीठातील तज्ज्ञांनी या व्याधीमागील मानसशास्त्रीय कारणांचा शोध घेण्यासाठी अशा त्रासाचा पुर्वेतिहास नसलेल्या ६२० रुग्णांकडून तीन ते सहा महिन्यांच्या अंतराने त्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेणाऱ्या प्रश्नावल्या भरून घेतल्या. सततचा तणाव, अति चिंता आणि आजारांबाबतचे चुकीचे समज या कारणांमुळे या व्याधीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे त्यातून दिसून आले. म्हणजे या व्याधीची मूळ कारणे जरी जैविक असली तरी, मानसिक कारणांमुळे व्याधीच्या प्रमाणात वाढ होते, असे त्यांना आढळून आले.
आरोग्य मंत्र - चिडचिडी आतडी किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा तपास
[ Monday, June 30, 2003 10:23:02 pm] या विकाराची लक्षणे पोटाशी निगडित असल्यामुळे प्रथम शौचाचा तपास करून संसर्ग नाही याची खात्री केली जाते व गरज पडल्यास दुबिर्णीतून जठर , आद्यांत्रे तसेच मोठी आतडी यांचा तपास केला जातो. अर्थातच हे सर्व तपास थोड्याबहुत प्रमाणात नकाराथीर् निघतात. एक्स रे मध्ये किंवा बेरियम तपासातही काही आढळत नाही. अन्नाचा जलद प्रवास दिसून येतो.
उपचार : चिडचिड्या आतड्यांना शांत करण्यासाठी प्रामुख्याने दोन गोष्टी कराव्या लागतात.
1. मन:शांती व
2. आहाराची पथ्ये
1. मन:शांती : मानसिक तणावामुळे निर्माण होणाऱ्या विविध नैसगिर्क अंतस्त्रावाच्या आतड्यावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी मानसिक ताण कमी करणे हाच खरा उपाय आहे. त्यासाठी सकारात्मक वृत्ती जोपासणे , ध्याननिदा , नियमित व्यायाम , खेळ तसेच मोकळ्या हवेत फिरणे , अधुनमधून कामातून विश्रांती घेणे , एखादा छंद जोपासणे हे विविध उपाय आहेत.
आहारातील पथ्य
हे लक्षणांवर अवलंबून असावे परंतु सर्वसाधारणपणे तंतूमय पदार्थांचा आहारात अंतर्भाव करून व एका वेळेस जास्त खाऊन लक्षणे सुधारू शकतात.
रोजच्या जेवणात भरपूर फळे , भाज्या , कोशिंबिरी असाव्यात. त्यांचे तुकडे मोठे असावेत. कोंडायुक्त अन्न खावे. दलिया किंवा सोजीचा रवा शौचासाठी चांगला. दही किंवा ताकामुळे लॅक्टोबॅसिलस पोटात जाऊन त्याचा फायदा होतो.
काही रुग्णांना दूध किंवा दुधाचे पदार्थ पचत नाहीत. तसेच मांसाहाराचा किंवा अंड्यांचा काही जणांना त्रास असतो. असे पदार्थ शोधून आपल्या आहारात सुधारणा करून बऱ्याच रुग्णांना आराम मिळतो.
औषधोपचार : शौचाचा तपास न करता प्रतिजैविकोचा किंवा अमिबांचा नाश करणाऱ्या औषधांचा वापर टाळावा. हल्ली आतड्यांची हालचाल नियमित करयण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. परंत वैद्यकीय सल्ल्यानेच त्याचा वापर करावा. थोडक्यात , बऱ्याच रुग्णांना औषधांपेक्षा मार्गदर्शनामुळे आराम मिळतो.
No comments:
Post a Comment