- आरोग्यवधिर्नी , त्रिकटू , मुस्ता यासारखी दव्ये यकृतावर प्रभावी ठरतात. व्यवहारामध्ये दीर्घकाळ आरोग्यवधिर्नीचे सेवन केल्यावर रक्तदाब कमी झालेला आढळतो.
- मूत्रपिंडात विकृती असेल तर गोसूर , चंदन , वाळा , गुग्गुळ ही दव्ये उत्तम कार्य करतात. गोक्षूरादी गुग्गुळ हे नेहमी वापरले जाणारे एक चांगले औषध आहे. गोक्षर हा मूत्रमार्ग साफ करतो पण गुग्गुळ हा रक्तवाहिन्यांचा उपलेप (आतील क्षारयुक्त थर) कमी करणे , आहारातील क्लेद कमी करणे हे सुद्धा महत्त्वाचे कार्य करतो. पुर्नवासव ,
- दशमूलारिष्ट , अर्जुनारिष्ट यांचापण आवर्जून उल्लेख केला पाहिजे. मूत्रमार्ग समान , अपान , हृदय यावर कार्य करणारी ही प्रभावी औषधे आहेत.
- फुफ्फुसाचे कार्य सुधारणारी तलीसादी चूर्ण शृँगभस्म , अर्भकभस्म , चौसष्ठ पिंपळी ही द्रव्ये आहेत
- अग्निमांद्य, अपचन, गॅस हे विकार बळावतात. त्यासाठी गोरखचिंचावलेह, दाक्षासव, पिप्पलादी काढा.
- जुलाबासाठी कुडावटी, शनवटी या गोळ्या आणि कुटजादीकषाय हा काढा.
- उलट्यांकरिता राजगिरा लाह्या, भाताच्या साळीच्या लाह्या, आलं चघळून खावं. लघुसूतशेखर गोळ्या चघळाव्यात आणि गोरखाचिंचवलेह सायरप प्यावं.
- काविळीसाठी फलत्रिकादी क्वाथ आरोग्य काढा . पचनासाठी गॅससाठी पिप्पलादी काढा, पंचकोलासव काढा घ्यावा.
- कफ, सर्दी, खोकला, दमा, ताप यासाठी ज्वरांकुश लक्ष्मिनारायण, लवंगादी गुग्गुळ या गोळ्या नागरादीकषाय,
- संधीवात, आमवात, कंबरदुखी, पाठदुखी यामध्ये बलदायी महानारायण तेल, शतवारी तेलाने मसाज. पोटातून घेण्यासाठी संधिवातारी गुग्गुळ, गणेश गुग्गुळ, वातगजांकुश गोळ्या आभादी गुग्गुळ, गोसुरादी गुग्गुळ, सौभाग्य सुंठ, आस्कंद चूर्ण घ्यावे.
- टॉनिक घ्यावयाचं झाल्यास घरगुती टॉनिक अष्टवर्गयुक्त च्यवनप्राश ,मनुका, बेदाणे, जर्दाळू, टॉनिक म्हणून थोडं थोडं खायला हरकत नाही. शक्यतो बदाम, अक्रोड, पिस्ते असे जड पदार्थ टॉनिक म्हणून खाऊ नयेत.
(एका म. टा. लेखाचा सारांश वापरून)
No comments:
Post a Comment