अर्धशिशी म्हणजे अर्धे डोके दुखणे. डोके कुठल्याही भागात किंवा संपूर्ण डोकेही दुखू शकते. अर्धशिशीमध्ये डोके खूप जोरात ठणकते ; परंतु बऱ्याच वेळा डोकेदुखीवर पोटात मळमळते किंवा उलटी होते. अर्धशिशी कोणालाही होऊ शकते. ती पुन्हा पुन्हा होते ; परंतु त्याची वारंवारता , तीव्रता व त्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो. मळमळणे किंवा उलटी होणे अशी लक्षणे सोबत येतात. त्याचा निश्चित कालावधी सांगता येत नाही.
डोक्यातील रक्तवाहिन्या प्रमाणापेक्षा जास्त आकुंचन व नंतर प्रसरण पावतात. त्यामुळे डोके दुखते. हा आजार अनुवांशिकही आढळतो. एखाद्यालाच अर्धशिशी का होते याचे नेमके असे कारण नाही. उपाशी राहणे , प्रखर प्रकाशात खूप वेळ राहणे , जागरण , दगदग , मानसिक ताण , इ. गोष्टींमुळे डोकेदुखी होऊ शकते. कॉफी , अजिनोमोटो , कोळंबी , चीज , आंबवलेले पदार्थ , आंबट फळे यांच्या सेवनानेही कधीकधी डोकेदुखी होते ; परंतु प्रत्येक व्यक्तीत डोकेदुखीचे कारण भिन्न असू शकते.
खाल्ल्यानंतर दरवेळी डोके दुखले तरच तो पदार्थ टाळावा. अर्धशिशीची लक्षणे : डोके दुखायला सुरू होण्यापूवीर् जांभया येणे , थकवा अथवा अतिउत्साह वाटणे , अंधारी येणे , नीट न दिसणे , डोळ्यांसमोर ठिपक्यांसारखे किंवा रेघांसारखे काजवे चमकणे. प्रत्येकात ती दिसतातच असे नाही ; परंतु थोड्या वेळात हळूहळू डोके ठणकू लागते. या काळात आवाज , उजेड किंवा गोंगाट सहन होत नाही. डोके घट्ट बांधून पडून राहावेसे वाटते. यानंतर पोटात मळमळू लागते व उलटीही होऊ शकते. बहुतेकांना उलटी केल्याने बरे वाटते व झोपही लागते. काही तासानंतर डोकेदुखी थांबते ; परंतु नेमक्या किती तासानंतर हे नक्की सांगता येत नाही. काहींना तर सदासर्वदा डोकेदुखीचा त्रास असतो. चुकीच्या आहारामुळे आपल्याला हा त्रास होतोय हे त्यांच्या गावीही नसतं. हवामानात बदल झाल्याने , उग्र वासामुळे , अत्तरामुळे , तीव्र उजेडामुळे तसंच मासिक पाळीमुळे डोकेदुखी उद्भवते. या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेऊ शकत नसल्याने आहारावर नियंत्रण ठेवणे अधिक चांगलं! काही पदार्थांमुळे हटकून डोकेदुखी होते. किंबहुना हे पदार्थ डोकेदुखी निर्माण करणारे पदार्थ म्हणूनच ओळखले जातात.
ज्यांना कामाचा ताण असतो , त्यांना मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होते. ध्यानधारणा आणि प्राणायाम केल्याने या त्रासापासून बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळू शकते.
काही पदार्थ असे आहेत ज्यामुळे डोकेदुखीपासून बराच आराम मिळतो. त्यात आल्याचं नाव सर्वात आधी घ्यावं लागेल. म्हणजे आल्याकडे आपण ' पेन रिलिव्हर ' म्हणून बघू शकतो. आल्याचा एक तुकडा घेऊन त्यावर थोडं लिंबू पिळा. चवीसाठी त्यावर थोडं काळं मीठ घाला आणि हलके चघळा. आलं चघळल्याने साधी डोकेदुखी थांबत असेल तर चिवट अर्धशिशीवरही नियंत्रण मिळवता येतं. आलं वेदना कमी करतं.
उष्ण प्रकृती --आल्यानी त्रास, त्रिभुवन किर्ती,शिरशूल वनस्पती,त्रिशून,सुंठ दुधातून/लेप,मिरी पावडर
ज्यांचं वारंवार डोकं दुखतं अशांनी दोन ते चार टेबलस्पून आळशीच्या बियांची पूड नियमितपणे दोन-तीन महिने खावी. आळशीच्या बियांची पावडर बनवण्यासाठी आधी त्या कोरड्याच भाजाव्या. चवीसाठी त्यात मीठ मिसळा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोकेदुखीला कारणीभूत ठरणाऱ्या या पदार्थांचं सेवन पूर्णपणे टाळलं पाहिजे. तसंच शरीराचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजे त्यातले विषारी घटक नेहमी काढून टाकले पाहिजेत. ठराविक वनौषधी व भाज्यांच्या रसाच्या सेवनामुळे डिटॉक्सिफिकेशन करता येतं.
4 comments:
It will be really nice if you could make an article on such detoxification methods. Currently, there is a lot of fad of such 'detoxification'. Many talk about it and practice it in different way. Its very hard to guess whose method is correct one. Such article from an experienced practitioner like you would certainly clear many doubts.
Recently, I was suggested a recipe where a juice of equal amounts of beetroot and apple together is one of the detoxification method, recommended routine is not more than twice a week. I will be glad if you could comment on this.
Definitely,there will be article/tips written on detoxification. Thanks for asking very valid question.The variety of methods and overall organisation of information is big problem in this field.Some attempts are being made to comeup with Clinical trial data.We will shortly write something on this.
On Dr's -Behalf
Prasanna(ediitng)
मलहि अर्धशिशि चा फ़ार त्रास होतो. डोक दुखन्याआधि माझ्या डोल्यासमोर काहि भागात मुन्ग्या आल्यासारख़्या दिसाता अणि हळुहळु त्या कमि होतात, मग डोकेदुखिला सुरुवात होते. थोड्या वेळाने मला ऊलटि देखिल होते, मग हळुहळु डोके दुखयचे बन्द होते. हा त्रास मला १५ वर्षा पासुन होत अहे मझे वय अत्ता २६ आहे. आज पर्यन्त मि होमिओपेथिक, एलोपेथिक आणि अयुर्र्वेदिक औशधे सर्व काहि ट्राय करुन झाले तात्पुर्ते बरे वाटते पन कायमचा हा त्रास बरा होत नहि.
मायग्रेन होऊ नये या साठि जर काहि प्रिकॉश्न्स असतिल तर क्रुपाया मला कळवावे हि विनन्ति.
धन्यवाद,
सोनल
MAZ NAV MANOJ CHAVAN ....MAZA DOKYACHA DAVYA BAJULA...MUNGYA AALYA SARKH HOT....KADHI DOKYACHA MADHYA BHAGI PAN DAYA BAJULACH DUKHAT....DAVI BAJU JAD ZALYASARKHI VATATI...GELI 3 MAHINE ASA TRAS HOTOY..PLZ HYAVAR KAHITARI UPAY..DYA
Post a Comment