जेवण हे नेहमीच षड्रसात्मक हवे. म्हणजेच गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट हे सहा रस (सहा चवी), यातील प्रत्येक चव (रस) थोड्या थोड्या प्रमाणात का होईना हवीसहाही चवी कशासाठी तर गोड, आंबट, खारट या रसांमुळे वातदोषाचे शमन होते आणि कफदोष वाढतो. तिखट, कडू, तुरट या तीन रसांमुळे कफदोष कमी होतो आणि वातदोष वाढतो. तर, गोड, कडू व तुरट या तीन रसांमुळे पित्तदोष कमी होतो आणि आंबट, खारट, तिखट या तीन रसांमुळे पित्तदोष वाढतो. वात, पित्त आणि कफ हे तीन दोष जेव्हा सम प्रमाणात राहतील, तेव्हा मनुष्य निरोगी राहतो.
http://esakal.com/esakal/02252007/164DE338E4.htm
No comments:
Post a Comment