उन्हाळ्याच्या झळा वाढत जातात; तशी जठराग्नीची शक्ती अर्थात पचनशक्ती कमी कमी होत जाते. वाढलेल्या उष्णतेने जसे नद्या, झऱ्यांचे पाणी कमी होते, विहिरी खोल जातात, तसेच शरीराचे प्रीणन करणारा, तृप्ती देणारा रसधातूही अशक्त होतो. अर्थातच, वातावरणातील व शरीरातीलही रुक्षता वाढते. थकवा, निरुत्साह जाणवायला सुरवात होते. उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे धातू शिथिल (ढिले) झालेले असतात. अर्थातच, शरीरशक्तीसुद्धा कमी झालेली असते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या हा घराघरांत आनंदाचा विषय असतो. सुट्ट्यांच्या निमित्ताने प्रवास योजायचा असला, आंबा, आईस्क्रीमचा आनंद घ्यायचा असला तरी वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे बाधा येणार नाही, यासाठी काळजी घेणे अपरिहार्य असते. उन्हाळ्यामुळे शरीरात काय काय बदल होत असतात आणि त्यादृष्टीने आपण काय काळजी घेऊ शकतो, याची आज आपण माहिती करून घेणार आहोत.
उन्हाळा येतो हिवाळ्यानंतर. जसजशी थंडी कमी कमी होत जाईल, तसतशी जाठराग्नीची शक्ती अर्थात पचनशक्ती कमी कमी होत जाते. वाढलेल्या उष्णतेने जसे नद्या, झऱ्यांचे पाणी कमी होते, विहिरी खोल जातात, तसेच शरीराचे प्रीणन करणारा, तृप्ती देणारा रसधातूही अशक्त होतो. अर्थातच, रुक्षता वाढते, शरीरशक्ती कमी होते. थकवा, निरुत्साह जाणवायला सुरवात होते. उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे धातू शिथिल (ढिले) झालेले असतात.
अर्थातच, शरीरशक्तीसुद्धा कमी झालेली असते. उष्णतेशी जुळवून घेता यावे यासाठी शरीराने आपणहून केलेली तजवीज म्हणजे घामाचे वाढलेले प्रमाण. घाम अत्याधिक प्रमाणात येत असला आणि शरीरातही पित्तदोष, रक्तदोष वाढलेले असले, तर घामोळे येण्याचा त्रास होऊ शकतो. लहान मुले तसेच नाजूक त्वचा असणाऱ्यांनाही उन्हाळ्यामध्ये रॅश येण्याचा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण वाढणे साहजिक असले तरी, कपडे ओले होतील इतका घाम येणे, घामाला एक प्रकारचा तीक्ष्ण गंध असणे फारच त्रासदायक असते. हे टाळण्यासाठी स्नानाच्या वेळी कुळथाचे पीठ, वाळा, अनंत मूळ, नागरमोथा वगैरे द्रव्यांपासून तयार केलेले उटणे लावण्याचा उपयोग होतो. स्नानानंतर काखेमध्ये किंवा अति प्रमाणात घाम येणाऱ्या इतर ठिकाणी तुरटीचा खडा फिरवण्याचाही उपयोग होतो.
उन्हाळ्यात त्वचेवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून उन्हात जाताना सनस्क्रीन क्रीम लावणे सर्वपरिचित असते. मात्र, त्याबरोबरीने पुढील उपाय योजता येतात.
स्नानाच्या वेळी साबणाऐवजी अनंतमूळ, चंदन वगैरे शीतल द्रव्यांपासून बनविलेले उटणे वापरण्याने, मसुराचे पीठ व सॅन मसाज पावडर यांचे समभाग मिश्रण वापरण्यानेही उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण होत असते.
उन्हाळ्यात कपडे सुती किंवा रेशमी, शक्यतो हलक्या रंगाचे घालणे, फार घट्ट कपडे घालणे टाळणे श्रेयस्कर असते. घामोळे आल्यास त्यावर चंदनाचे गंध लावण्याचा उपयोग होतो. वाळा, धणे व नागरमोथा यांच्या चूर्णाचा थंड पाण्यात लेप करण्याने किंवा जांभळाची बी उगाळून लावण्यानेही घामोळ्या कमी होतात. शरीरातील उष्णता कमी व्हावी, बरोबरीने रक्तशुद्धी व्हावी यासाठी अनंत कल्प, शतावरी कल्प, संतुलन पित्तशांती गोळ्या घेणेही उत्तम असते.
‘उन्हाळ्या लागणे’ या शब्दावरून हा त्रास उन्हाळ्यात होत असणार, हे लक्षात येते. उन्हाळ्या लागणे म्हणजे लघवीला जळजळ होणे. हा त्रास उन्हाळ्यात अनेकांना होतो. विशेषतः पुरेशा प्रमाणात पाणी न पिण्याने उन्हाळ्या लागण्याची प्रवृत्ती तयार होते. यावर सकाळ-संध्याकाळ साळीच्या लाह्यांचे पाणी किंवा धणे-जिऱ्याचे पाणी पिणे, अधून मधून शहाळ्याचे पाणी पिणे, धणे, जिरे, अनंतमूळ प्रत्येकी पाव पाव चमचा रात्रभर कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेऊन पिणे, हे उपाय करता येतात.
उन्हाळ्यात हाता-पायांची आग होणे हीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळणारी तक्रार असते. यावर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे पादाभ्यंग करणे. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याने उष्णता कमी होते.
उपलब्धता असल्यास दूर्वांच्या हिरवळीवर सकाळ संध्याकाळ अनवाणी पायांनी चालण्याने तळपायांचा दाह कमी होण्यास मदत मिळते.
उन्हाळ्यात संपूर्ण अंगाचाही दाह होऊ शकतो. अशा वेळी कलिंगडाच्या सालीच्या आत असणारा पांढरा गर अंगावर लावण्याचा उपयोग होतो. मेंदीची ताजी पाने वाटून तयार केलेला लेप तळपाय व तळहातांवर लावण्यानेही आग कमी होते.
उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होणेही स्वाभाविक असते. झोपण्यापूर्वी बंद डोळ्यांवर शुद्ध गुलाबजलाच्या घड्या ठेवण्याचा किंवा गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवण्याचा उपयोग होतो. कोरफडीचा गर बंद डोळ्यांवर ठेवण्यानेही डोळ्यांची आग, लालसरपणा वगैरे त्रास कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्याची उष्णता बाधल्याने नाकाचा घोळणा फुटून नाकातून रक्त येऊ शकते, विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास होताना दिसतो. डोक्यावर थंड पाणी लावणे, शक्य असल्यास आवळ्याचे चूर्ण व पाणी एकत्र करून तयार केलेला लेप टाळूवर लावणे यामुळे रक्त थांबण्यास मदत होते. मात्र वारंवार त्रास होत असल्यास अडुळशाच्या पानांचा रस (अर्धा ते एक चमचा) त्यात खडीसाखर घालून रोज घेणे, कोहळ्याचा रस खडीसाखर टाकून घेणे, रात्री झोपण्यापूर्वी घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा नस्यसॅन घृताचे नाकात दोन-तीन थेंब टाकणे, ज्येष्ठमध व मनुका यांचा काढा करून घेणे हे उपाय योजता येतात.
कमी झालेली पचनशक्ती, जलतत्त्वाची कमतरता यांच्यामुळे शरीरात वाढणारी रुक्षता, उष्णता या सर्वांच्या एकत्रीकरणातून मलावष्टंभ, मूळव्याध, तोंड येणे वगैरे त्रासही या ऋतूत होताना दिसतात. यावर पुढील उपाययोजना करता येते.
आहारात घरचे साजूक तूप, ताजे लोणी यांचा समावेश असणे. जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण तसेच कपभर कोमट पाण्यासह दोन चमचे साजूक तूप घेणे.
भिजत घातलेली एक-दोन अंजिरे, मूठभर काळ्या मनुका रोज सेवन करणे.
संध्याकाळच्या जेवणात वरण-भात, मऊ खिचडी, वेगवेगळ्या भाज्यांचे किंवा धान्यांचे सूप यांचा समावेश असणे. उन्हाळ्यात रात्री फारशी भूक लागत नाही, अशा वेळी मुगाचे कढण पिणे सर्वांत चांगले. मूग वीर्याने थंड असून, पचायला हलके असतातच; पण ताकद कायम ठेवणारेही असतात.
मुगाचे कढण बनवण्याची पद्धत अशी - अर्धा वाटी मुगाच्या डाळीत आठ कप पाणी, १-२ आमसुले, ५-६ मनुका व चवीपुरते सैंधव घालून शिजवावे. योग्य प्रकारे शिजल्यावर गाळून घेऊन प्यावे. याने उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास म्हणजे हाता-पायाच्या तळव्यांची रसरस होणे, डोळे जळणे, लाल होणे, एकसारखी तहान लागणे वगैरे लक्षणे कमी व्हायला मदत होते.
गुलकंद व मोरावळा हे दोन आयुर्वेदिक योग म्हणजे उन्हाळ्यातील वरदानच होत. देशी गुलाबाच्या गुलाबी नाजूक पाकळ्या व खडीसाखरेपासून सूर्याच्या उष्णतेच्या साहाय्याने तयार केलेला शुद्ध गुलकंद, तोही जर प्रवाळयुक्त असला तर त्यामुळे उष्णतेचा त्रास निश्चित कमी होतो.
उन्हाळ्यात शरीरातील जलांश कमी होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यामुळेच उन्हाळ्यात सरबत पिण्याची पद्धत असते. मात्र, बाजारात मिळणारी तयार सरबते ही सहसा रासायनिक द्रव्ये व अनैसर्गिक रंग टाकून तयार केलेली असतात. यामुळे सरबताचा खरा फायदा होत नाही. त्यापेक्षा घरच्या घरी खालील पद्धतीप्रमाणे लिंबू सरबत, कोकम सरबत बवनणे कोणालाही जमण्यासारखे असते.
लिंबू सरबत
लिंबू बाराही महिने मिळत असले तरी, उन्हाळ्यात ते विशेष उपयोगी असते. उन्हाळ्यामध्ये भूक न लागणे, पचन मंदावणे, पित्त वाढल्याने जुलाब होणे वगैरे तक्रारी उद्भवू शकतात. लिंबू आंबट चवीचे असल्याने रुचकर असते, भूक वाढवते, दीपक, पाचक, अनुलोमक गुणाचे असल्यामुळे पचन सुधरवते. असे लिंबाचे सरबत उन्हाळ्यामध्ये शरीरातील जलांश टिकवून ठेवण्यास मदत करते.
साहित्य -
१ रसदार कागदी लिंबू
४० ग्रॅम साखर
१ चिमूट मीठ
४०० मिली लि. माठातील थंड पाणी
कृती - थोडेसे केशर, चिमूटभर जिऱ्याची पूड व वरील सर्व घटकद्रव्ये एकत्र करून प्यावे.
कोकम सरबत
२० ग्रॅम आमसुले भिजत टाकून साधारणपणे अर्ध्या तासाने कुस्करून व गाळून घ्यावी. यात ग्लासभर थंड पाणी, आवडीप्रमाणे (१ -२ चमचे) साखर, चवीपुरते मीठ व थोडे जिऱ्याचे चूर्ण घालून प्यावे.
बाजारात कोकमचे सिरपही मिळते किंवा कोकमची (रातांबे) ताजी फळे मिळत असल्यास घरीच सिरप बनवून ठेवता येते, त्यात चवीप्रमाणे पाणी, मीठ, जिऱ्याचे चूर्ण टाकूनही झटपट सरबत बनवता येते. हे सरबत उन्हाळ्याच्या झळा लागल्यानंतर किंवा दुपारच्या उन्हातून फिरून आल्यानंतर घेतल्याने उन्हाचा त्रास होत नाही, तसेच पित्ताचे शमनपण होते.
उन्हाळ्यात निसर्गतःच रसाळ फळे येतात. आहारात या फळांचा समावेश करण्यानेही उन्हाळा सुसह्य होण्यास मदत मिळत असते. विशेषतः शहाळे, तुती, कलिंगड, मोसंबी, खरबूज, जाम, डाळिंब, द्राक्षे, प्रकृतीला सोसवत असल्यास आंबा ही फळे योग्य प्रमाणात सेवन करणे चांगले असते.
थोडक्यात, आहारात थोडा बदल केला, घरच्या घरी असणाऱ्या द्रव्यांची नीट योजना केली आणि पित्तशमनाकडे लक्ष ठेवले तर उन्हाळा सुसह्य होईल हे नक्की.

12 comments:
Good one. Kerala Ayurveda Treatment
Buy Sakhi Complete bridal jewellery Set & gold jewellery set from buymyJewel more than 100 designs with authentic jewellery certificate
Just inspired by your writing. What a blog! Can you please come to my website and review a few of my blogs.
Very useful information,
one can also visit: Ayurved jeevan to know your Body type as per Ayurveda.
Ayurveda offers valuable tips to maintain health and balance during winter. Emphasizing warming foods, it suggests eating seasonal produce like root vegetables, warming spices (such as ginger, cinnamon, and cloves), and healthy fats to boost immunity. Daily self-massage with warm oils, staying hydrated, and practicing gentle exercise like yoga helps keep the body warm and resilient. These practices help balance the body's internal energies and combat winter ailments, promoting overall well-being and vitality during the colder months.
Discover the ideal diet for your body type with our Dosha-Based Diet Tips! According to Ayurveda, each individual has a unique constitution, or dosha—Vata, Pitta, or Kapha. Tailoring your diet to your dosha can promote better health, energy, and balance. Whether you’re looking to soothe, energize, or ground yourself, explore the foods and meal plans that best suit your body type and lifestyle on Trayi Ayurveda.
Discover the natural approach to tackling dandruff with Trayi Ayurveda's authentic Ayurvedic solutions. Our treatments focus on balancing the scalp's natural oils and reducing dryness, which are often the root causes of dandruff. Using herbal ingredients like neem, fenugreek, and aloe vera, we provide a gentle yet effective remedy that soothes the scalp and promotes healthy hair growth. Embrace a dandruff-free, revitalized scalp with holistic care tailored to bring balance and long-term relief.
Liver health ke liye Ayurveda mein hai kuch khas herbs aur remedies jese Bhumi Amla, Kalmegh, aur Triphala jo liver ko detoxify aur rejuvenate karte hain. Trayi Ayurveda ke Ayurvedic treatments se liver ko mile natural healing aur toxins se mukti. Apnaaye Ayurveda aur liver ko de swasth jeevan ka uphaar!
Ayurveda ke natural beauty tips aapki skin aur hair ko healthy aur glowing banate hain. Daily face cleansing ke liye besan aur haldi ka paste use karein. Skin hydration ke liye aloe vera gel aur coconut oil lagayein. Hair ke liye amla, bhringraj, aur neem oil ka regular massage karein. Detoxification ke liye warm water mein nimbu aur honey lein aur fresh fruits aur vegetables apne diet mein shamil karein. Stress-free rehne ke liye yoga aur meditation karein. Trayi Ayurveda ke expert tips aur therapies ke saath apna natural glow wapas payein! Visit https://trayiayurveda.in.
Migraine, yaani aadha sir dard, ek common aur painful condition hai jo stress, improper diet, aur lifestyle imbalance ke kaaran hoti hai. Ayurveda ke mutabik, migraine ka main reason Pitta aur Vata dosh ka imbalance hai. Trayi Ayurveda natural remedies jaisi Shirodhara (medicated oil therapy), Nasya (nasal treatment), aur stress-reducing herbs like Brahmi aur Jatamansi ko use karke migraine ka holistic treatment offer karta hai. Saath hi, aapko cooling foods, proper hydration, aur meditation ko daily routine mein shamil karne ki salah di jaati hai. Visit https://trayiayurveda.in for expert consultation aur permanent relief.
"Joint pain, yaani sandhiyon ka dard, ek common health issue hai jo arthritis, gout, ya injury ke kaaran ho sakta hai. Ayurveda isse naturally treat karne ka best way offer karta hai.
Herbal Remedies: Ashwagandha, Shallaki, aur Guggul jaisi herbs inflammation aur pain reduce karte hain.
Panchakarma Therapy: Abhyanga (oil massage), Swedana (steam therapy), aur Basti (medicated enema) se Vata dosh balance hota hai.
Diet aur Lifestyle: Haldi, ginger aur warm food consume karein. Daily yoga aur stretching se joints flexible bante hain.
Ayurvedic Oils: Mahanarayan aur Dhanwantharam oils se massage karna pain relief ke liye effective hai.
Trayi Ayurveda ke personalized treatments ke saath aap apni joint pain problem ka permanent solution pa sakte hain. Visit https://trayiayurveda.in for expert advice."
Ayurvedic cosmetics natural ingredients aur ancient wisdom ka blend hain jo aapki skin aur hair ko safe aur effective care dete hain. Haldi, neem, aloe vera, aur chandan jaise herbs se enriched ye products chemical-free hote hain aur har skin type ke liye suitable hote hain. Trayi Ayurveda ke Ayurvedic cosmetics aapki beauty needs ko fulfill karte hain, jaise glowing skin ke liye face packs, dandruff-free hair ke liye herbal oils, aur anti-aging solutions. Nature ke touch ke saath apni beauty routine ko upgrade karein aur khud ko naturally pamper karein!
Post a Comment