सूर्यास्तानंतर जर "नीरा' काढली आणि योग्य पद्धतीने जर त्याची साठवण केली नाही, तर ते अंबून जाते. त्यानंतर त्याला "सिंधी' किंवा "ताडी' म्हणतात. राज्य फलोत्पादन खात्याने "नीरा' साठवणूक आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवे विकसित तंत्र मिळविले आहे. या तंत्राने नीरा दीड ते दोन महिने चांगल्या पद्धतीने साठवून ठेवता येणार आहे. नीरा हे अतिशय पौष्टिक पेय आहे. त्यात विविध क्षारांबरोबरच ऍस्कॉर्बिक आम्ल, निकोटिनिक आम्ल आणि रायबोफ्लेवीन तसेच प्रोटिन आणि व्हिटॅमीनसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. कॅलरीज अतिशय कमी असून स्वादही चांगला आहे. नीरा मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. नीरेपासून गूळ आणि चॉकलेट तयार करण्याबद्दलही सरकारचा विचार आहे
स्त्रोत: http://esakal.com/esakal/01202007/714339C074.htm
1 comment:
I should notify my girlfriend about it.
Post a Comment