कलिंगड केवळ आपली तहानच भागवत नाही तर यातले अॅण्टिऑक्सिण्डण्टस फ्री रॅडिकल्सपासून आपलं संरक्षणही करतात. फ्री रॅडिकल्समुळे कोलेस्टेरॉलचं ऑक्सिडायझेशन होतं व ते रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला चिकटून राहतं. त्यामुळे हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोक येण्याची दाट शक्यता असते.
कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात 'क' जीवनसत्व असतं. तसंच यात 'अ' जीवनसत्वही भरपूर असतं. 'क' जीवनसत्वामुळे हृद्विकार होण्याची शक्यता तर कमी होतेच शिवाय दम्याचा त्रासही कमी होतो. यात 'ब६' व 'ब१' ही जीवनसत्वं व मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम ही खनिजंही भरपूर असतात.
कलिंगडामध्ये भरपूर पाणी (९२ टक्के) व कमी कॅलरीज (एक मोठी वाटी कलिंगडामध्ये केवळ ४८ कॅलरीज) असतात. त्यामुळे हे फळ कितीही खाल्लं तरी नो प्रॉब्लेम!
डोळ्यांचं आरोग्य राखायचं असेल तर प्रामुख्याने गाजर खाल्लं जातं. परंतु दिवसातून साधारणपणे तीन वेळा कलिंगड खाल्ल्यास तेही डोळ्यांची चांगली निगा राखतं. तसंच वयामुळे दृष्टी अधू होण्याची शक्यताही कमी होते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1731594.cms
No comments:
Post a Comment