रक्तधातू सशक्त बनवण्यासाठी किंवा रक्तवाढीसाठी नैसर्गिक आहार व औषधांचा वापर करणे सर्वात चांगले. काळ्या मनुका, खजूर, डाळिंब, सफरचंद, पालक, केशर, आवळा, गूळ वगैरे गोष्टींचा आहारात नियमित समावेश असू द्यावा. स्वयंपाक करताना लोखंडाची कढी, तवा, पळी वापरण्यानेही रक्तवाढीला मदत मिळते.
लोखंडाच्या भांड्यात क्षीरपाक (म्हणजे पाण्यासह उकळलेले दूध) पिऊन पथ्याने राहिले असता पांडुरोग, शोष, ग्रहणी या विकारांसाठी उपयोगी पडते.
लोहभस्म, मंडुरभस्म, सुवर्णमाक्षिक भस्म, नवायास लोह वगैरे आयुर्वेदिक योगही रक्तवाढीसाठी उत्तम असतात. रक्तधातूच्या पोषणासाठी "शांती रोझ', "धात्री रसायन' वगैरे रसायन कल्पांचाही चांगला उपयोग होतो, सशक्त रक्तधातूबरोबरच एकंदर आरोग्याचा, तेजस्वितेचाही लाभ होतो.
याखेरीज द्राक्षासव, पुनर्नवामंडूर, धात्र्यारिष्ट वगैरे आयुर्वेदातल्या योगांचाही रक्ताची कमतरता भरून येण्यासाठी चांगला उपयोग होतो.
http://www.esakal.com/esakal/12212006/C0FD4EAE5E.htm
2 comments:
The column is really helpful and worth praise.
SUCH PROJECTS MAKE US BELEIVE IN GOODNESS IN THE WORLD.
THANK YOU!!!
Bhagyashree Borkar
The column is really helpful and worth praise.
SUCH PROJECTS MAKE US BELEIVE IN GOODNESS IN THE WORLD.
THANK YOU!!!
Bhagyashree Borkar
Post a Comment