Search This Blog

ग्रंथराज दासबोधाचे वेब प्रकाशन,पद्मश्री विजय भटकर आणि आचार्य गोविंद गिरी (किशोरजी व्यास) यांच्या हस्ते

पुणे: सत्कार्योत्तेजक सभा धुळे अंकीत वाग्देवता मंदीर यांच्या वतीने श्रीमत ग्रंथराज दासबोधाचे वेब प्रकाशन,पद्मश्री विजय भटकर आणि आचार्य गोविंद गिरी (किशोरजी व्यास) यांच्या हस्ते करण्यात तीन जुलॆ रोजी आले.यावेळी सकाळ्नगर येथे झालेल्या या कार्यक्रमात पंडीत श्री वसंतराव गाडगीळ यांनी मन्त्रोच्चार व पठण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शरद (बाळ्काका) कुबेर यांनी केले.पाचशे पाने असलेल्या ग्रंथराजाची छापील प्रत संस्थेच्या वतीने जशीच्या तशी इंटरनेटवर www.dasbodha.org या संकेत स्थळावर विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या वेबसाईट ची मूळ कल्पना, रचना व आखणी प्रसन्ना मुजूमदार यानी सुचवली असून development चे मुख्य काम मल्टीव्हर्सिटी च्या टीम ने केले आहे.ईंग्रजी मधील संस्थेचा मजकूरासंबंधी प्राची मुजूमदार ह्यांनी योगदान केले.या कामाचे प्रायोजक मल्टीव्हर्सिटीचे समीर पांडे हे आहेत.वेबसाईट व्र,दासबोधाशिवाय समर्थांचे हस्ताक्ष्रर,शिवाजी महाराजांची चाफळ ला दीलेली सनद, काही हस्तलिखीते व संस्थेची माहिती सुद्धा देण्यात आली आहे.शिवाय या दासबोधाची समर्थ हॄदय श्री देव यांची मुळ प्रस्तावना ही या प्रकल्पाचे प्रमुख वॆशिष्ठ्य़ आहे.आपली काही प्रतिक्रीया अथवा सूचना असल्यास अवश्य कळवा.

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content