Search This Blog

बाराक्षार पद्धती

excerpt from Upkaram.org article
बाराक्षार पद्धती
यांना इंग्रजीत बायोकेमीक रेमीडीज असेही म्हणतात. या चिकित्सा पद्धतीची 'सुरुवात' डॉ. हनेमान यांनी केली. शरीरातल्या काही लवणांमुळे निरनिराळी लक्षणे शरीर दाखवते असे मत त्यांनी मांडले. शरीराच्या लक्षणांनुसार उपचार केले पाहिजेत या विचारावरा आधारीत ही पद्धती आहे. या पद्धातीवर डॉ. स्टाफ यांनीही मते मांडली. पण त्याला मूर्त स्वरूप मात्र डॉ. विलियम सुशलर यांनी दिले.या पद्धती मध्ये बारा प्रकारचे क्षार शरीरातली निरनिराळी कामे करतात असे मानले जाते. जेंव्हा या क्षारांचे प्रमाण कमी जासत होते तसे शरीराच्या त्या भागाचे काम विस्कळीत होते. तो क्षार शरीराला पुरवला तर परत शरीर योग्य प्रकारे काम करू लागते. अशी साधारणपणे ही पद्धती काम करते.
यामध्ये खालील बारा क्षार आहेत१. कल्केरिया सल्फ्युरीका२. फेरम फॉस्फोटीकम३. कॅलीमूरएटिकम४. कॅली फॉस्फोरिकम५. कॅली सल्फ्युरिकम६. मॅग्नेशिया फॉस्फोरेका७. नायट्रम म्युरेटिकम८. नायट्रम फॉस्फोरिकम९. नायट्रम सल्फ्युरिकम१०. सायलिशिया११. कल्केरिया फ्लोरिका१२. कल्केरिया फॉस्फोरिका
या औषधी वेगवेगळ्या रोगांवर कामी येतात.या औषधांना क्रमवारीने वेगवेगळ्या ताकदी आहेत जसे ३ एक्स, ६ एक्स ते २०० एक्स.शारिरीक अवस्था व वेळेनुसार कमी व जास्त ताकदीची औषधे दिली जातात.ही औषधे प्राण्यांवर व वनस्पतींवरही काम करतात असा दावा केला जातो.
ऍलोपॅथीचे डॉक्टर सर्वसाधारण पणे या चिकित्सेची खिल्ली उडवतात असे दिसते. (पण स्वतःच्या आजारात अनेकदा सगळी कडे ठोकरा खावून हे तर हे असे म्हणून परत येथेच आलेलेही पाहिले आहेत.) शिवाय या चिकित्सेमध्ये शस्त्रक्रिया होत नाहीत. तसेच आपात्कालीन समस्यांवरही उपायही नाहीत अशी टीका होते. मात्र जुनाट रोगांवर ही उपायकारक असतात असे अनेक लोक मानतात.
ऍलोपॅथी चिकित्सा ही दोष जेथे आहे त्या दोषाचे निराकरण करते. तर बायोकेमिक चिकित्सा हा दोष मुळात का उत्पन्न झाला त्या कारणाचे मुळ नष्ट करण्याचा प्रयत्न करते.

1 comment:

kanchan said...

site is good but it is difficult to understand medical term to non-medical plp.

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content