Search This Blog

न चुकता पाळा आहाराच्या वेळा

उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला हवे, पण त्याचबरोबर आहार कोणता घेणार हेही पाहायला हवे. उन्हाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावलेली असते हे लक्षात घेऊन दोन जेवणात पुरेसे अंतर असायला हवे. मात्र आम्लपित्ताचा त्रास संभवू शकेल इतकेही अंतर असता कामा नये. 

उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला पाहिजेच. शरीराला त्याची गरज असते. आपणही पाणी, सरबते पिऊन शरीरातील जलाचे प्रमाण व्यवस्थित राहील हे पाहात असतोच. पण तेवढे करणे पुरेसे नाही. म्हणजे पाणी प्यायला हवेच, पण त्याचबरोबर आहाराच्या वेळा आणि आहाराचे प्रमाण यालाही खूप महत्त्व द्यायला हवे. शक्ती मिळवण्यासाठी आहार हवा, हे आपल्याला माहित असते. पण आहार पचवण्याची शक्ती ऋतूंनुसार वेगवेगळी असते, हे आपण विसरतो. कोणत्या ऋतूत, कोणत्या वेळेला आहार घेत आहोत यावर त्या आहाराचे परिणाम अवलंबून असतात. म्हणजे जरी आहार चांगला असला तरी तो आहार आपण कोणत्या काळात, कोणत्या वेळेला घेतो यावर त्या आहारापासूनचे फायदे व त्याचे प्रमाण अवलंबून असते. म्हणून आहाराच्या वेळेला महत्त्व असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आहार घेण्यात खूप कमी किंवा खूप जास्त अंतर असता नये. दोन्हींचा त्रास होतो. त्यामुळे काय खावे, किती खावे याबरोबरच कधी खावे हेही आपल्यासाठी महत्त्वाचे असते. 

उन्हाळ्यात दिवस मोठा असतो व रात्र लहान. वातावरण थंड असल्याने अन्न पचविण्याची शक्ती हिवाळ्यात अधिक असते, त्या तुलनेत उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे आहार घेताना एकाच वेळी खूप आहार असू नये. उन्हाळ्यात कधीही पोटाला तडस लागेपर्यंत जेवण घेता नये. असे झाले तर अन्न नीट पचत नाही. तसेच आहाराच्या दोन वेळांमध्ये फार कमी अंतर असू नये. त्यामुळे आधीच्या अन्नाचे पचन होण्याआधीच पुढचे अन्न खाल्ले तर ते पचविणे शरीरास जड जाते. त्यामुळे अपचनाचा त्रास हमखास होऊ शकतो. जसे दोन जेवणातील अंतर कमी असू नये, तसे ते जास्तही असू नये. दोन जेवणांमध्ये खूप जास्त अंतर असल्यास आम्लपित्ताचा त्रास संभवू शकतो. उन्हाळ्यात रात्रीचे जेवण उशिरा होणार नाही, याची शक्‍यतो काळजी घ्यावी. जागरणेही टाळावीत. रात्रीचे जेवण शक्‍य तितक्‍या लवकर व हलके असावे. खूप जड अन्न उन्हाळ्यामध्ये त्रासदायक होते. रात्रीच्या वेळी मांसाहार टाळणेच योग्य होईल. रात्रीच्या जेवणात शक्‍यतो ज्वारीची भाकरी घेतल्यास उत्तम. सकाळच्या न्याहरीला उशीर करू नये. सकाळची न्याहरी, दुपारचे जेवण, संध्याकाळी अगदी हलका आहार व रात्रीचे हलके जेवण असे घ्यावे. दोहोंमध्ये साधारण साडेतीन-चार तासांचे अंतर राहील असे पाहावे. तसेच, शीतपेये टाळायलाच हवीत.

उन्हाळ्यात काय प्याल?
उन्हाळ्यात पाणी पिणे महत्त्वाचे असते, पण जेवतांना पाण्यानेच पोट भरणार नाही, याची काळजी घ्यावी. पूर्वी आचमन करून जेवायला सुरूवात करीत, ते आठवा. साधारण तेवढ्या पाण्याने, म्हणजे एक-दोन घोट पाण्याने सुरूवात करावी. अन्न शक्‍य तितके पातळ करून खावे. जेवताना अधूनमधून पाणी पिण्याची गरज असेल तर ते प्यावे. पण घास घशाखाली नीट उतरण्यापुरतेच पाणी प्यावे. जेवण संपल्यानंतर थोडा वेळ जाऊ देऊन पाणी प्यावे. अन्यथा पाण्यानेच पोट भरते. मग थोडया वेळाने परत भूक लागल्याची जाणीव होते. त्यामुळे कमी अंतराने परत परत खाल्ले जाण्याची शक्‍यता असते. माठातले पाणी प्यायला हरकत नाही, पण फ्रीजमधील थंडगार पाणी टाळावे. पचनशक्ती आधीच मंदावलेली असते, त्यात गारेगार पाणी प्यायल्याने पचनशक्ती आणखीच मंदावेल. हे टाळण्यासाठी फ्रीजच्या पाण्यात साधे पाणी मिसळून नंतर प्यावे.

भारतीय वैद्यकशास्त्राने ऋतुकाळ व आहार यांचा नीट विचार केला आहे. वातावरणात उष्णता वाढू लागली की, निसर्गातील पाणी आटू लागते, हवेत कोरडेपणा वाढतो, त्याचवेली शरीरातील जलतत्त्वसुद्धा कमी होऊ लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जलतत्त्वपोषक आहारांचे सेवन करणे आवश्‍यक ठरते. ऋतुनुरूप आहार घेतला तर आरोग्य टिकून राहायला मदत होते. उन्हाळ्यात केवळ पाणीच पितो असे नाही, तर रसधातूचे पोषण करण्यासाठी लिंबू सरबत, कोकम सरबत, शहाळ्याचे पाणी हेही उत्तम आहे. विशेषतः उन्हाळी लागली तर कोकम सरबत उत्तम.

उन्हाळी पित्त अंगावर उठू लागले तर आमसोलांचे पाणी शरीराला लावावे. शीत गुणधर्माची द्राक्षे, गोड डाळिंबे, मोसंबी यांचा रस साखरेसह घेता येतो. कैरीचे पन्हे प्यायला सर्वांनाच आवडते. कैरी उकडून तिचा गर वेगळा करावा व त्यात पाणी घालून एकजीव मिश्रण तयार करावे व चवीनुरूप साखर, मीठ, जिरे, केशर वगैरे गोष्टी घालून घोट घोट प्यावे. कैरी उकडण्याऐवजी ती जाळावर भाजून घेतली आणि साखरेऐवजी गूळ वापरले तर पन्ह्याची गंमत आणखी वाढते. या पन्ह्याने शरीराबरोबरच मनही प्रसन्न होते. पचनशक्‍ती वाढते व मरगळ दूर होते. 

उसाचा रस हाही उन्हाळ्यात फार चांगला आहे. फक्‍त तो काढताना स्वच्छता पाळलेली असावी व त्यात अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ टाकलेला नसावा.

खस अर्थात वाळा व चंदनाचे आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले सरबतही उन्हाळ्यात उपयुक्‍त होय. मातीच्या छोट्या माठामध्ये रात्री ग्लासभर पाणी, वाळा, अनंतमूळ, चंदन चुरा यांचे थोडेसे मिश्रण भिजत घालावे, सकाळी हे सर्व मिश्रण हाताने कुस्करावे किंवा रवीने घुसळावे व गाळून घ्यावे. त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून प्यावे. अशा सरबताने शरीरातील अतिरिक्‍त उष्णता कमी होते, तहान शमते, ऊन बाधत नाही व उन्हाळा सुसह्य होतो.

बाजारात मिळणारी चंदन किंवा वाळ्याची सरबते बहुधा केमिकल्स व अनैसर्गिक रंग टाकून तयार केलेली असतात. काही थंड प्यायला मिळाल्याच्या समाधानाखेरीज त्यातून शरीराला फायदा असा काही होत नाही. बाजारातील ताक व लस्सीमध्येही भेसळ असू शकते. त्यामुळे खात्रीचे असेल तरच ताक व लस्सी बाहेर पिणे योग्य होईल. शक्‍यतो घरातीलच ताक प्यावे. लहान मुलांना व वृद्धांना धणे-जिऱ्याचे पाणी प्यायला द्यावे. धणे-जिरे प्रत्येकी दोन चमचे अर्धवट कुटून थंड पाण्यात भिजत ठेवावेत. दिवसभर ते भिजवून रात्री झोपताना गाळून त्यात थोडीशी खडीसाखर टाकावी. मग ते वापरावे. रात्रभर भिजवून ठेवलेले धणे-जिरे यांचे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी प्यावे. 

द्राक्षे, डाळिंब, फालसा वगैरे फळांचा गर काढून तो पातळ होईपर्यंत पाणी टाकावे. यातच थोडे किसलेले आले, चवीपुरती साखर, तसेच दालचिनी, तमालपत्र, वेलची, नागकेशर, मिरी व थोडासा कापून घालून एकत्र करावे. नंतर गाळून घेऊन तयार झालेल्या पेयाला ‘पानक‘ म्हणतात व ते रुचकर; तृप्ती देणारे; वात, पित्त, थकवा, तहान, चक्कर, उलटी, दाह नष्ट करणारे असून शरीर, मन ताजेतवाने करण्यास समर्थ आहे.

उन्हाळ्यात काय खाल?
उन्हाळ्यात मांसाहार व जडान्न टाळणेच उत्तम. रोजच्या आहारात दूध, घरचे ताजे लोणी व तूप यांचा समावेश असावा. तांदळाची  किंवा रव्याची खीर, गव्हाचा शिरा, दुधी हलवा, नारायण शिरा, नारळाची बर्फी,  साखर भात वगैरे पचण्यास हलके; पण ताकद देणारे गोड पदार्थ उन्हाळ्यात सेवन करावेत. ओल्या नारळाचा वापर करावा. मुख्य जेवणात तांदूळ, ज्वारी, नाचणी, गहू या धान्यांचा समावेश असावा. त्यातही गव्हाऐवजी तांदूळ अधिक उत्तम. डाळी, कडधान्यांमध्ये मूग, तूर, मसूर, मटकी आहारात असावी. दुधी भोपळा, पडवळ, घोसाळी, दोडकी, भेंडी, काकडी, बटाटा, पालक या भाज्या उन्हाळ्यामध्ये वापरण्यास चांगल्या होय. कोहळ्यापासून तयार केलेला पेठा हाही उन्हाळ्यात चांगला असतो. जिरे, धणे, दालचिनी, तमालपत्र, हळद, कोकम, वेलची, आले आदी मसाले जरूर वापरावेत. जेवणानंतर ताजे गोड ताक जिऱ्याची पूड टाकून घेणे हेसुद्धा हितावह होय. सुक्‍या मेव्यामधील मनुका, अंजीर, खारीक, रात्रभर पाण्यात भिजविलेले बदाम खाणेही चांगले असते.

News Item ID: 
558-news_story-1556095001
Mobile Device Headline: 
न चुकता पाळा आहाराच्या वेळा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Article Santosh Shenai
Author Type: 
External Author
संतोष शेणई
Search Functional Tags: 
Water, Jowar, सकाळ, भारत, निसर्ग, Health, Lemon, डाळ, साखर, आयुर्वेद
Twitter Publish: 

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content