Search This Blog

Showing posts with label माहिती. Show all posts
Showing posts with label माहिती. Show all posts
Jul 26, Ayurveda Ghee - Ayurveda Clarified Butter Or Ghritam In Diet And Cooking http://dlvr.it/2bNyf cc:doctormujumdar.in
Jul 18, Ayurveda And Yoga Therapy As Complimentary And Synergistic Tools Of Holistic Living And... http://dlvr.it/2bNzG cc:doctormujumdar.in

रिफ्लेक्सॉलॉजी

पायाचे पॉईंट्स accupressure पद्धतीने दाबून त्या ठिकाणच्या Nerve points ना stimulate करून शरीराच्या विवीध भागांचे आरोग्य चांगले राखणे असा रिफ्लेक्सॉलॉजीचा concept आहे असे म्हणता येईल.रोज थोडावेळ सेल्फ़ रिफ्लेक्सॉलॉजी करून आपल्या अनुभवाची नोंद आपण आपल्या गुग्ल ग्रुप मधे करू शकता.खाली काही माहीती चित्र स्वरूपात आहे. सर्वसामान्य पणे जर प्रयोग म्हणून ४-५ points निवडून प्रत्येकी २-३ मिनिटे मसाज करण्यास हरकत नाही.अर्थात हे सर्व फ़क्त पूरक म्हणूनच





  1. Top of Head


  2. Sinuses


  3. Pituitary Gland


  4. Temporal Area


  5. Neck, Cervical


  6. Upper Lymph Area


  7. Parathyroid Gland


  8. Ears


  9. Eyes


  10. Thyroid Glands


  11. Shoulder


  12. Lungs and Bronchi


  13. Heart Area


  14. Heart


  15. Spine, Vertebra


  16. Pancreas


  17. Solar Plexus


  18. Stomach & Duodenum


  19. Liver


  20. Spleen


  21. Spleenic Fixture


  22. Gall Bladder


  23. Adrenal Glands


  24. Hepatic Flexure


  25. Kidneys


  26. Transverse Colon


  27. Waist


  28. Ureters


  29. Ascending Colon


  30. Descending Colon


  31. Lumbar


  32. Small Intestines


  33. Sacral


  34. Bladder


  35. Ileo-Caecal Valve


  36. Appendix


  37. Sigmoid Flexure


  38. Hip & Lower Back


  39. Coccyx


  40. Sciatic Area

आयुर्वेद ग्रंथ

Arogya Kalpadruma आरोग्य  कल्पद्रुम    

Arka Prakashan अर्क  प्रकाशन्    

Arya Bhishak आर्य  भिशक्    

Ashtanga Hridaya अष्टांग  ह्रिदय    

Ashtanga Samgraha अष्टांग  संग्रह    

Ayurveda Kalpadruma आयुर्वेद  कल्पद्रुम    

Ayurveda Prakasha आयुर्वेद  प्रकाश    

Ayurveda Samgraha आयुर्वेद  संग्रह    

Bhaishajya Ratnavali भैषज्य  रत्नावलि    

Bharat Bhaishajya Ratnakara भरत्  भैषज्य रत्नाकर   

Bhava Prakasha भव  प्रकाश    

Brihat Nighantu Ratnakara ब्रिहत्  निघन्तु रत्नाकर   

charka Samhita चरक  संहिता    

Chakra Datta चरक  दत्त    

Gada Nigraha गद  निग्रह    

Kupi Pakva rasayana कुपि  पक्व रसयन   

Nighantu Ratnakara निघन्तु  रत्नाकर    

rasa Chandanshu रस  चन्दन्शु    

rasa Raja Sundara रस  रज सुन्दर   

rasaratna Samuchaya रसारत्न  समुचय    

rasatantra Sara Va Siddha Prayoga Sangraha Part-1 रसतन्त्र  सार सिद्ध प्रयोग सन्ग्रह

rasa Trangini रस  त्रन्गिनि    

rasa Yoga Ratnakara रस  योग रत्नाकर   

rasa Yoga Samgraha रस  योग संग्रह   

rasa Pradipika रस  प्रदिपिका    

Rasendra Sara Samgraha रसेन्द्र  सार संग्रह   

rasa Pradipika रस  प्रदिपिका    

Sahasrayoga सहस्रयोग      

Savaroga Chikitsa Ratnam सवरोग  चिकित्सा रत्न   

Sarvayoga Chikitsa Ratanam सार्वयोग  चिकित्सा रत्न   

Sharangadhara Samhita शरन्गधर  संहिता    

Siddha Bhaishajaya Manimala सिद्ध  भैशजय मनिमल   

Siddha Yoga Samgraha सिद्ध  योग संग्रह   

Sushruta Samhita सुश्रुत  संहिता    

Vaidya Chintamani वैद्य  चिंतामणी    

Vaidyaka Shabda Sindu वैद्यक  शब्द सिन्दु   

Vaidyaka Chikitsa Sara वैद्यक  चिकित्सा सार   

Vaidya Jiwan वैद्य  जिवन्    

Basava Rajeeyam बसव  रजीयं    

Yoga Ratnakara योग  रत्नाकर    

Yoga Tarangini योग  तरन्गिनि    

Yoga Chintamani योग  चिंतामणी    

Kashyapa Samhita कश्यप  संहिता    

Bhela Samhita भेल  संहिता    

Vishwanatha Chikitsa विश्वनाथ  चिकित्सा    

Vrinda Chikitsa व्रिन्द  चिकित्सा    

Ayurveda Chintamani आयुर्वेद  चिंतामणी    

Abhinava Chintamani आभिनव  चिंतामणी    

Ayurveda Ratnakar आयुर्वेद  रत्नाकर्    

Yogaratna Sangraha योगरत्न  सन्ग्रह    

rasamrita साम्रित      

Dravyaguna Nighantu द्रव्यगुन  निघन्तु    

rasamanjari रसमन्जरि    

Bangasena Samhita बन्गसेन    

Ayurveda Sara Samgraha आयुर्वेदिक  सार संग्रह   

 

 



TV dinner still cooling?
Check out "Tonight's Picks" on Yahoo! TV.

औषध सुची: श्वास

धन्वन्तरी गुटिका १ ते २ पिल्स
पुश्कर्मुल चुर्ण ५ ते १५ ग्राम.
श्रिन्ग्यदि चुर्ण ५ ते १५ ग्राम.
कनकासव १० ते ३० मि.ली.
वासारीष्ट १० ते ३० मि.ली.
सुवर्ण समीर् पन्नग् ५-६ मि.ग्रा

ब्लॉग वर किंवा वेबसाइट वर व्यक्त प्रसिद्ध केलेली सुची ही सामान्यञान या उद्दिष्टाने आहे.कुठ्ल्याही प्रकारची उपाययोजना वैद्यकीय सल्यानुसारच करावी.Please take expert advise before trying any major therapy.

औषध सुची: ज्वर , नवज्वर

त्रिभुवन कीर्ती रस१२५ ते २५० मि.ग्रा.Tribhuvan Kiriti Ras125 to 250 mg.

सन्जिवनि १२५ ते २५० मि.ग्रा.Sanjivani Vati125 to 250 mg.

गॊदन्ति मिश्रण१२५ ते २५० मि.ग्रा.Godanti Mishrana 125 to 250 mg.

विषमज्वर आयुश ६४५०० मि.ग्रा. ते १ ग्राम.Ayush 64500 mg. To 1 gm.
सप्तपर्ण घन वटी २५०मि.ग्रा. ते ५०० मि.ग्रा.Saptaparna ghana Vati250mg. To 500 mg.

सुदर्शन चुर्ण३ ते ६ ग्राम.Sudarshana Churna3 to 6 gm.

या ब्लॉग वर किंवा वेबसाइट वर व्यक्त प्रसिद्ध केलेली सुची ही सामान्यञान या उद्दिष्टाने आहे.कुठ्ल्याही प्रकारची उपाययोजना वैद्यकीय सल्यानुसारच करावी.Please take expert advise before trying any major therapy.

काही नेहेमीच्या वन्स्पतींची शास्त्रीय नावे-२

वनस्पती----ईंग्रजी नाव----शास्त्रिय नाव
पपई--Papai--Carica Papaya
जेष्ठमध--Jeshthmadh(Licorice)--Glycyrrhiza Glabra
दालचिनी--Dalchini(Cinnamon)--Cinnamomum Cassia
मका--Maka(Bhringraj)--Eclipta Prestrata
रिठा--Ritha(Soapnul tree)--Sapindus Trifoliatus
शतावरी--Shatavari (Wild Asparagus) --Asparagus Racemoses
बेहडा--Behada--Terminallia Bellerica
गुग्गुळ--Guggul--Balsamodendron Mukul
कडुनिम्ब--Kadunimb(Neem)--Azadirachta Indica

काही नेहेमीच्या वन्स्पतींची शास्त्रीय नावे

वनस्पती----ईंग्रजी नाव----शास्त्रिय नाव

तुळस बी Tulas bee(Holy Basil) Ocimum santum -Seed
दारुहळद Daruhalad Berberis Aristata
पुनर्नवा Punarnava Boerhavia Diffusa
कार्ले Karle(Bitter Melon) Momordica Charantia
वाळा Wala(Khus) Andropogon Muricatus
अडुळसा Adulsa Adhatoda Vasica

पुष्पौषधी-'Batch' flower therapy लेख

म.टा. लेख--एक महिती म्हणून

"धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला ताणतणावांना सामोरं जावं लागतं. आनंदाची बाब अशी की मन सुदृढ व तंदुरुस्त राखण्यासाठी औषधं उपलब्ध आहेत. ती औषधं म्हणजे डॉ. बॅच यांनी शोधून काढलेली 'पुष्पौषधी' ".............................पुढे वाचा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1654207.cms

one english website:http://www.charminghealth.com/

मधुमेह, हृदयविकार दूर ठेवणे

मधुमेह, हृदयविकार या आजारांना जर आपणास दूर ठेवायचे असेल, तर आपल्याला आपली जीवनपद्धतीत बदल करण्यावाचून पर्यायच नाही.

त्यासाठी खालील चार गोष्टीचा अवलंब करणे चांग्ले होईल.
  • नियमित व्यायाम - शारीरिक हालचाल नियमित व्यायाम ही आपल्या शरीराची दैनंदिन गरज आ हे. (झोपणे, खाणे, पिणे इ.पेक्षाही जास्त महत्त्वाची) व्यायाम हा नियमित असावा. कमीत कमी अर्धा ते एक तास शारीरिक हालचाल, चालणे, प्राणायाम, योगासने यांचा योग्य समावेश असावा. व्यायामामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहते, चरबी कमी होते, इन्शुलिनचे कार्य सुधारते, त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यापासून आपण निश्‍चितच दूर राहू शकतो.
  • नियमित पथ्य - पाश्‍चात्त्य जीवनपद्धतीचे अंधानुकरण करताना आजच्या पिढीने आपले खाणे- पिणे पूर्णपणे चुकीचे केले आहे. व्यायामाबरोबर समतोल आहार ही अत्यंत निकडीची बाब आहे. आपल्या आहारातील फास्टफूड, तळलेले, वातूळ पदार्थ, अधिक उष्मांक असलेले पदार्थ, मद्यपान, धूम्रपान यांचे प्रमाण कमी करून समतोल सात्त्विक आहार पद्धती आपण अवलंबिणे गरजेचे आहे. वेळी- अवेळी खाणे, चुकीचे अन्न खाणे आणि गरजेपेक्षा जास्त खाणे, या तिन्ही गोष्टी आपण टाळल्या तर बऱ्याचशा गोष्टी आपोआप साध्य होतील. जास्त उष्मांक असलेल्या पदार्थांपेक्षा फळे, पालेभाज्या, कडधान्ये, सॅलड या घटकांचा जास्तीत जास्त वापर करणे तसेच एक दोन वेळा जास्त खाण्यापेक्षा तीन- चार वेळा थोडे थोडे खाणे, तसेच रात्रीचा आहार लवकर आणि कमी प्रमाणात घेणे हितावह आहे.
  • ताणतणाव कमी करणे - आजच्या धकाधकीच्या यंत्रयुगात आपणास टीव्ही, कॉम्प्युटर, सोफा, गाड्या ही आरामाची सवय जरी लागली असली तरी याबरोबरच आधुनिकीकरणाबरोबर आपोआपच आलेली प्रचंड दैनंदिन धावपळ आपल्या शरीर तसेच मनावरील ताण वाढवीत आहेत. या ताणाचे परिणाम शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांवर होत आहेत.
  • नियमित तपासण्या - चोरपावलांनी येणारे मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, रक्तदाब हे विकार किंवा त्यांचे दुष्परिणाम यांचा योग्य वेळी प्रतिबंध करणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्‍यता इतर

काही नेहेमीच्या वन्स्पती-फळे व घरगुती औषधोपचार

प्राथमिक स्वरूपाचे उपचार फ़क्त सर्वसाधारण तक्रारींकरता. काहि क्लिष्ट व्याधींसाठी वॆद्यकीय मार्गदर्शन आवश्यक आहे


  • अडुळसा:-
पाने वाटून रस करणे.कफ़ावर उत्तम औषध--अडुळसा रस १ चमचा,मध १/२ चमचा,थोडी पिंपळी--३ ते ४ वेळा चाटणे. उष्णता,नाकातून रक्त येणे- अडुळसा रस १ चमचा,खडीसाखर जखम-अडुळसा पाने वाटून जखमेवर बांधणे.


  • अननस:-

फ़ोडी,रस दिवसातून १ ते २ वेळा मिरी पावडर टाकून अननस रुचीप्रद आहे,अजीर्ण कमी करतो. पोटात केस गिळला गेल्यास अननस त्रास कमी करतो. फार वेळा लघवी होणे त्या करिता उपयोगी.
  • आले:
आल्याचा रस १ चमचा,गरम तूप १/२ चमचा,खडीसाखर १/२ चमचा. मीठ,आले खाल्यास रूची उत्पन्न होते.घसा साफ होतो.जिभेचा बुळबुळीत पणा नाहीसा होतो. श्वासाची तक्रार कमी होते.
  • आवळा:
फार मोठे औषध आहे.पित्त झाल्यास आवळा+खडीसाखर घ्यावे.आम्लपीत्तावर -आवळा रस १ चमचा,थोडी जिरेपूड,खडीसाखर सकाळ-संध्याकाळ असे ८-१० दिवस घेतल्यास बरे वाटते.च्यवनप्राश आणि मोरावळा ह्या मधला आवळा हा मुख्य घटक आहे.


  • क्रमश:

--डॉ. वि. दी मुजूमदार

दूध,दही,तूप,मध (संकलीत)

दूध - गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ. ते पचायला हलके, गोड, पित्ताचा नाश करणारे, बळ देणारे आहे. शेळीचे दूध हे ही पथ्यकर असते. म्हशीचे दूध पचायला जड असते. - दूध तापवून प्यावे. - दूध कुठल्याही आंबट फळाबरोबर, खार्‍या पदार्थांबरोबर घेउ नये.

दही - दही खाताना थंड असले तरी पचल्यानंतर उष्ण गुणाचे होते. गोड, व्यवस्थित लागलेले दही पुष्टीकर असते. अर्धवट लागलेले किंवा आंबट दही त्वचाविकार निर्माण करते, सूज वाढवते. दही रात्री खाउ नये. - सर्दी, खोकला असताना दही खाऊ नये.

तूप - तूप भूक वाढवणारे, स्मृति, बुद्धी वाढवणारे, त्वचेचे कांतिवर्धन करणारे असते. डोळ्यांची आग होणे, दुखणे, चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त. - अजीर्ण असताना तूप खाऊ नये. - पोट साफ होण्यासाठी रात्री झोपताना गरम दूध + तूप घ्यावे. - नाक लाल होऊन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे. - डोळ्यांसाठी तूप, मध साखर रोज खाल्ल्याने फायदा होतो.

मध - मध गोड, रूक्ष, कफावर कार्य करणारा आहे. - मध गरम करून अथवा उष्ण पदार्थांसह खाऊ नये. - डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो. - मध पाण्याने वारंवार लागणारी तहान शमते. - तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळण्या कराव्या.

मह्त्वाची आयुर्वेदीक औषधे अणि त्यांचा उपयोग--प्रास्ताविक

या शिर्षकाखाली साधारणत: ३०० आयुर्वेदिक औषधांची माहिती ही सामान्यञान म्हणून देणार आहोत.

क्रमश:--------

आयुर्वेद - मुलभूत माहिती


आयुर्वेद आणि त्यासारख्या संग्रहामधून भारतात प्राचीन काळापासून असलेले वैद्यकीय ज्ञान मिळते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक वगैरे नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तिला वाढविण्यावर भर दिला जातो.


आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या वेदामधून घेतले आहेत आणि त्यामुळे आयुर्वेद हा वेदाचा एक घटक समजला जातो. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात. आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन परंपरा आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले.


आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. चरक आणि सुश्रुत संहितांचे बर्‍याच लोकांनी संपादन केले आहे आणि अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही परंपरा आहे, जिची सुरूवात सुश्रुताने केली.


इसवीसनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणार्‍या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदीक साहित्यांचे संश्लेषण केले ज्याला अष्टांग संहिता असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळाधार समजले जाते आणि या तिघांना आदराने वृद्ध त्रयी , बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला.


आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्त्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्याप्रमाणात वापरली जाऊ लागली. आठव्या शतकात उग्रादित्य आणि चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बर्‍याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला.
मार्गदर्शक आणि मूळ तत्वे
पंचमहाभूते
प्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेले आहे ज्यात सर्व भौतिक जग हे पाच मूळ तत्वांपासून तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळतत्वाचे स्वत:चे काही गुण आहेत. ही मूळतत्वे खालील प्रमाणे आहेत.

  1. आकाश
  2. वायू
  3. अग्नी
  4. आप
  5. पृथ्वी
  6. दोष


सर्व शारिरीक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात.
वात दोष
वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छवास, मनातील विचार इत्यादि गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बर्‍याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.
कफ दोष
कफ आपतत्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकार शक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक, जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि ऍलर्जि इत्यादि त्रास होतात.
पित्त दोष
पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्न पचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अती पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.


ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content