Search This Blog

फॅमिली डॉक्टर-अन्नयोग - लाडू


 

फॅमिली डॉक्टर


Posted: 24 Jun 2010 04:55 PM PDT
आरोग्य उवाच चिरोटे, मोदक, बुंदीचे लाडू, मुगाचे लाडू वगैरे लाडूंच्या पाककृती व गुणधर्म आपण मागच्या वेळेला पाहिले. आज आणखी काही लाडूंच्या कृती पाहणार आहोत. चुरमा लाडू गोधूमचूर्णे निक्षिप्य वसुभागेन वै घृतम्‌ । पाणिभ्यां घर्षयेत्पश्‍चात्‌ जलेनार्द्रां विमर्दयेत्‌ ।। यावन्मुष्टिकतां यायादथ मुष्टिर्घृते पचेत्‌ । पक्वानां चूर्णकं कृत्वा तस्मिन्‌ बादामशर्करे ।। पोस्तबीजमरीचैलाचूर्णं क्षिप्त्‌वा घृतेन च । वर्तुलाः लड्डुका कार्या प्रोक्‍तास्ते चूर्णकाभिधाः ।।...निघण्टु रत्नाकर गव्हाच्या रव्यात अष्टमांश प्रमाणात तूप घालावे व हाताने मळावे. नंतर पाणी घालून नीट मळावे. मुटकुळे करून तुपात तळावे, तळून बाहेर काढल्यावर त्याचा चुरा करावा व त्यात साखर, बदाम, पिस्ता, मिरी पूड, वेलची व तूप टाकून लाडू वळावेत.   चुरमा लाडू बनविण्याची अजून एक पद्धत सांगितली आहे. गव्हाचा रवा व गव्हाचे बारीक पीठ समभाग एकत्र करून त्यात एक अष्टमांश तूप घालून चोळावे. नंतर दूध, घालून पुन्हा घट्ट मळावे. या कणकेच्या लहान जाडसर पुऱ्या करून लाल होणार नाहीत अशा बेताने तुपात तळाव्यात.

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content