जालना : आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतल्यामुळे शेतकरी संघटनेने जालन्यासह परभणी लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने निवृत्त जिल्हा न्यायाधीश त्रिबंक बाबुराव जाधव यांना तर परभाणी लोकसभेसाठी डॉ. आप्पासाहेब कदम यांनी उमदेवारी अर्ज दाखल केल्याची माहिती शनिवारी (ता.6) आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या वेळी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष कैलास तवार, तालुकाध्यक्ष प्रताप लहाने, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, अशोक वाटुळे, नारायण बोराडे अदी उपस्थित होते.
सगळे पक्ष सत्ता मिळविण्यासाठी निवडणुक लढवत आहेत. मात्र, शेतकरी संघटना देशाची व्यवस्था बदलण्यासाठी या निवडणुकीत उभी राहिली असल्याचे डॉ. कदम यांनी या वेळी सांगितले. तर शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमालाला भाव नाही, त्यांच्या मालासाठी स्वतंत्र बाजार पेठ नाही.
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही. अशा अनेक समस्यांमुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे. पंतप्रधानांनी जगभरात दौरे केले. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नव तंत्रज्ञान आणि इतर बाबीसाठी एकाही देशाशी करार केला नाही. संसद मुकी, बहीरी आणि आंधळी झाल्याचे सांगत ही व्यवस्था बदलण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांना शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन या वेळी टी.बी जाधव यांनी केले.

No comments:
Post a Comment