मुंबई - काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या (ता. २५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपने काँग्रेसलाही खिंडार पाडले आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे तीन तालुके माढा मतदारसंघात येतात. या भागात रणजितसिंह यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपसाठी फायद्याची ठरू शकते, असा मुख्यमंत्र्यांचा कयास आहे. राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर रणजितसिंह निंबाळकर यांचा भाजपात प्रवेश होत आहे. त्यामुळे माढ्यामधील भाजपचा उमेदवार कोण? याबाबत पेच निर्माण झाला आहे. फलटणच्या निंबाळकरांना भाजपकडून माढ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या काही दिवसापासून नेत्यांमध्ये पक्षबदल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत. नगर जिल्ह्यातील सुजय विखे, सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील आणि भारती पवार यांच्यानंतर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव भाजपबरोबर जोडले जाणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस पक्षात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अंतर्गत कलहामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
आतापर्यंत महत्त्वाची पक्षांतरे
रणजितसिंह निंबाळकर : काँग्रेस ते भाजप
सुजय विखे : काँग्रेस ते भाजप
रणजितसिंह मोहिते पाटील : राष्ट्रवादी ते भाजप
डॉ. भारती पवार : राष्ट्रवादी ते भाजप
नरेंद्र पाटील : राष्ट्रवादी, भाजप आता शिवसेना
प्रवीण छेडा : काँग्रेस ते भाजप
सुरेश धानोरकर : शिवसेना ते काँग्रेस
सुभाष वानखेडे : शिवसेना ते काँग्रेस
संजय मामा शिंदे : भाजप सहयोगी ते राष्ट्रवादी
समीर दुधगावकर, नाविद अंतुले, जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा

No comments:
Post a Comment