Search This Blog

सामाजिक आरोग्यासाठी मार्गदर्शन

शास्त्रावर, शास्त्र सांगणाऱ्या व्यक्‍तीवर विश्वास नसेल, शास्त्रानुसार वागण्याची तयारी नसेल तर त्या व्यक्‍तीला शास्त्राची मदत घेण्याचा अधिकार राहात नाही. 

आयुर्वेदशास्त्र हे जीवनाचे शास्त्र असल्याने त्यात आरोग्याच्या बरोबरीने जीवनातील इतर सर्व महत्त्वाच्या पैलूंचा विचार केलेला आढळतो. काय खावे, काय प्यावे, कोणती औषधे घ्यावीत, कोणती रसायने सेवन करावीत एवढेच आयुर्वेदात दिलेले नाही, तर सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही मार्गदर्शन केलेले आढळते. अग्र्यसंग्रहातील पुढील सूत्र या प्रकारचे आहे.

नास्तिको वर्ज्याणाम्‌ - नास्तिक व्यक्‍ती ही वर्ज्य करण्यास व्यक्‍तींमध्ये अग्रणी समजावी.

या ठिकाणी नास्तिक म्हणजे कोणावरही विश्वास न ठेवणारी, दुसऱ्याचे ऐकण्याची तयारी नसणारी व्यक्‍ती असा अर्थ घ्यायचा आहे. शास्त्रावर, शास्त्र सांगणाऱ्या व्यक्‍तीवर विश्वास नसेल, शास्त्रानुसार वागण्याची तयारी नसेल तर त्या व्यक्‍तीला शास्त्राची मदत घेण्याचा अधिकार राहात नाही. असे या ठिकाणी सांगितलेले आहे. पंचकर्मासारखा उपचार करताना हा मुद्दा विशेषत्वाने लक्षात घ्यायचा असतो. 
न एवंविधस्य कुर्यात्‌ अनपवादप्रतिकारस्य ।
...चरक विमानस्थान
म्हणजे जो रुग्ण वैद्याचे सांगितलेले ऐकणार नाही, त्याप्रमाणे वागणार नाही त्याचे पंचकर्म करू नये. पंचकर्मादरम्यान आहारासंबंधी घ्यायची काळजी, आचरणात पाळायचे नियम पंचकर्मानंतरही आहार-आचरणात अपेक्षित असणारे बदल प्रत्यक्षात आणण्याची तयारी हे सर्व किती आवश्‍यक आहे हे यावरून समजते. 

याशिवाय ज्यांची चित्तवृत्ती स्थिर नाही, चिडचिड, राग, द्वेष, असूया यांनी ज्यांचे मन व्यापलेले आहे, ज्यांचा निसर्गावर, स्वतःवर किंवा कशावरच विश्वास नाही, ज्यांना स्वतःला मनापासून पंचकर्म करण्याची इच्छा नाही, त्यांना पंचकर्म करू नये. 

ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आरोग्य चांगले ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ज्या समाजात ‘शील’ महत्त्वाचे असते, तो समाज निरोगी, स्वस्थ असतो असे आयुर्वेदशास्त्र सांगते. 
वित्तबन्धुवयोविद्यावृत्तैः पूज्या यथोत्तरम्‌ ।
धनवान व्यक्‍तीपेक्षा आपल्या रक्‍ताच्या नात्याचा आदर ठेवावा, त्याहीपेक्षा वयाने मोठ्या व्यक्‍तीला सन्मान द्यावा, वयाने मोठ्या व्यक्‍तीपेक्षाही ज्ञानी व्यक्‍तीला अधिक महत्त्व द्यावे आणि ज्ञानी व्यक्‍तीपेक्षाही शीलवान व्यक्‍तीला मान द्यावा.

शीलयुक्‍त आचरणामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो.
जो समाजासाठी विघातक विचार-आचार करतो, जो राजा किंवा

राज्यकर्त्याचा विश्वासघात करणारा असतो, त्याच्याशी संगत करू नये. 

जे लोक कशावरही विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्याशी मैत्री करू नये. 

काही कारणाने एखाद्याशी भांडण झाले तरी त्याचे कायमस्वरूपी वैर मनात ठेवू नये. 

कायम शास्त्र काय सांगते याबद्दल कुतूहल असू द्यावे म्हणजे सध्याच्या भाषेत नवीन गोष्ट दिसली तर ती कशी काम करते हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. 

कोणतेही काम करताना किंवा निर्णय घेताना मागचा पुढचा विचार करून, सर्वांसाठी श्रेयस्कर काय आहे हे पाहावे.

माझे-तुझे किंवा हा माझा सगा-सोयरा हा परका असा भेदभाव मनात राहू देऊ नये. 

काही न करता किंवा निरुपयोगी गोष्टी करण्यात वेळ वाया घालवू नये. 

आपले जे काही काम आहे ते पूर्ण प्रयत्नपूर्वक आणि उत्साहाने करावे. 

घरी आलेल्या पाहुण्याची किंवा मदत मागणाऱ्या व्यक्‍तीची यथाशक्‍ती कदर करावी. 

सामाजिक बांधिलकीची जाणीव कायम ठेवावी, त्यादृष्टीने विहीर बांधणे, दवाखाना, शाळा वगैरे बांधणे अशा कामांना प्रोत्साहन द्यावे, त्यासाठी यथाशक्‍ती मदत करण्यासाठी तत्पर राहावे. 

आपल्यापेक्षा कमी शक्‍तिवान, कमी बुद्धिमान व्यक्‍तीला यथाशक्‍ती मदत करावी, घाबरलेल्या व्यक्‍तीला धीर द्यावा. रागावलेल्या व्यक्‍तीला शांत करण्याचा प्रयत्न करावा. 

ओळखीची व्यक्‍ती दिसली तर आपणहून त्याचे कुशल मंगल विचारावे. 

निष्फळ बडबड करू नये, उलट ज्याला अर्थ आहे, ज्या बोलण्याचा समोरच्याला उपयोग होणार आहे, जे समोरच्याला ऐकायला आवडते आणि जे सत्य आहे असेच बोलावे. 

पैसा, ज्ञान, शक्‍ती, शरीरसंपदा, चांगले आचरण यापैकी कोणत्याही बाबतीत एखादा आपल्यापेक्षा कमी असेल तर त्याला तुच्छ लेखू नये किंवा त्याचा तिरस्कार करू नये. 

एखाद्याला मनाला लागेल किंवा मर्मस्थानी ठेच पोचेल असे बोलू नये.

आपल्यापेक्षा अधिक यशस्वी व्यक्‍तीची ईर्ष्या करू नये. तसेच त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू नये, उलट त्याच्या यशाचे कारण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

चुकीच्या कामात, मग त्यामुळे लाभ होत असला तरी सहभागी होऊ नये. 
जर प्रत्येकाने असे ‘सुशील’ आचरण ठेवले तर त्या समाजाची, त्या देशाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही.

News Item ID: 
558-news_story-1551692696
Mobile Device Headline: 
सामाजिक आरोग्यासाठी मार्गदर्शन
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Community Health Guidance
Author Type: 
External Author
डॉ. श्री बालाजी तांबे
Search Functional Tags: 
आयुर्वेद, forest, Health, निसर्ग
Twitter Publish: 

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content