Search This Blog

आली संक्रांत

आकाशगंगेतील तीस अंशांच्या एका भागास मकर असे नाव दिलेले आहे. त्या राशीचा अधिपती शनी आहे. तो थंड व मंद गतीचा असतो. ही राशी सूर्याला असुविधा करणारी असते. सूर्य राशीत प्रवेश करतो त्या काळाला संक्रमण काळ असे म्हटले जाते व या कालात उत्पन्न झालेल्या शक्‍तीला संक्रांती असे म्हटले जाते. भारतीय ज्योतिष व पंचांग या शास्त्रांमध्ये ह्या संक्रांतीदेवीचे स्वरूप वर्णन करून दाखविलेले असते. संक्रांतीदेवीचा आकार, तिने वापरलेली वस्त्रे, ती कुठल्या दिशेकडून येत आहे, कुठल्या दिशेकडे जात आहे वगैरे सविस्तर वर्णने व त्या शक्‍तीचे फायदे-तोटेही वर्णिलेले असतात. 

या वर्षी १४ जानेवारी २०१९ म्हणजे सोमवारी सायंकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे यावर्षी मकरसंक्रांत मंगळवार, ता. १५ जानेवारी २०१९ रोजी आहे. ही संक्रांत बाल वयाची असून, तिने पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे, कस्तुरीचा टिळा लावला आहे, हातात भृशुंडी रत्न धारण केले आहे, ती अन्नभक्षण करत आहे व तिने प्रवाळ रत्न धारण केलेले आहे, वासाकरिता चाफ्याचे फूल घेतलेले आहे, वगैरे वर्णन आपल्याला सापडेल. एखाद्यावर काही संकट आल्यास त्याच्यावर संक्रांत आली असे म्हटले जाते. 

सूर्य सर्व जगाला उष्णता व शक्‍ती देणारा असल्याने त्याचा स्वभाव साहजिकच उष्ण व गतिमान आहे. संक्रांत थंडीच्या दिवसात असल्याने त्या काळात सूर्याची उष्णता मिळत नाही. त्यामुळे या काळात अग्नीचे महत्त्व वाढलेले असते. या काळात उष्णता देणाऱ्या अग्नीबरोबरच आयुर्वेदीय संकल्पनेतील जाठराग्नीवर व इतर शारीरिक क्रिया करण्यास जबाबदार असलेला अग्नीवर (म्हणजेच हॉर्मोन्सवर) संक्रांतीचा परिणाम होत असावा. स्त्रियांच्या बाबतीत तर हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे हॉर्मोन्सचे व पर्यायाने स्त्रीआरोग्याचे असंतुलन अधिक होत असल्यामुळे संक्रांतीच्या काळात स्त्रियांसाठी अनेक व्रते सांगितलेली असतात. काळ्या वस्त्रात सूर्यांच्या उष्णतेचे शोषण अधिक प्रमाणात होते, म्हणून संक्रांतीला काळी वस्त्रे घालण्याची प्रथा आहे. सकाळच्या वेळी लवकर जेवण्याची प्रथा आहे, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक वेळ मिळतो. जेवणात खिचडी, गुळाची पोळी खाण्याचा प्रघात दिसतो. धुंधुर्मास म्हणून सकाळी सूर्योदयाच्या वेळी तूप घालून गरमागरम खिचडी, गूळपोळी, वांग्याचे भरीत वगैरे जेवणात घेण्याचा प्रघात असतो. नाश्‍त्यासाठी भरपूर खावे असे म्हणणाऱ्यांना सकाळच्या वेळी जेवण घेणे नक्कीच आवडेल. आयुर्वेदिक पद्धतीने सिद्ध केलेल्या तिळाच्या तेलाचा अभ्यंग करणे, तीळ वाटून अंगाला लावणे, गूळ व तिळापासून केलेले लाडू खाणे असे अनेक आचार-विचार प्रचारात दिसतात. तसेच या काळात गरम शेगडीवर परात ठेवून तिळावर साखर चढवून हलवा केलेला असतो. अशा रीतीने या दिवसात गरम शेगडीभोवती बसणे, शेकोटी पेटवून त्याभोवती बसणे वगैरे आचरणही सुचविलेले दिसते. शिवाय मानसिक ऊब वाढण्याच्या दृष्टीने आजूबाजूच्या स्त्रियांना आपल्या घरी बोलावून त्यांना काहीतरी भेट वस्तू देणे अशा आचरणातून एकूणच संबंधात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला जातो. 

घराबाहेर जास्तीत जास्ती राहून सूर्याची शक्‍ती जास्त मिळावी, या हेतूने गच्चीवर वगैरे पतंग उडविण्यासारखी पद्धत रूढ झालेली दिसते. पतंग उडविणे हे एका दृष्टीने आकाशध्यानच आहे. नुसत्या मोकळ्या आकाशाकडे पाहणे तेवढे सोपे व मनाला फारसे आवडण्यासारखे नसल्याने सुंदर रंगीत पतंग आकाशाच्या कपाळावर ठेवून त्यावर त्राटक करण्याची क्रिया म्हणजे पतंग उडविण्याचा खेळ. अर्थात एकमेकाचे पतंग कापल्याशिवाय आरडाओरडा होत नाही व खेळाला जोशही येत नाही. 

मानवाच्या आरोग्याची प्रत्येक ऋतूशी सांगड घालून किंवा विश्वात घडणाऱ्या घटना व ग्रहमानात होणारे बदल लक्षात घेऊन सांगोपांग व वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून आयुर्वेदाने सर्वसामान्यासाठी निरनिराळे उत्सव, कुळधर्म, कुलाचार निश्‍चित करून ठेवलेले दिसतात. त्यापैकी संक्रांत हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. संक्रांतीच्या वर्णनावरून वर्षात पाऊस किती पडेल, धान्य किती पिकेल, मारामाऱ्या होतील का, लोक शांततेने जीवन जगतील वगैरे भाकिते करण्याचाही प्रयत्न केलेला दिसतो. 

संक्रांतीच्या निमित्ताने दानधर्म करावा, हा प्रघात सामाजिक बांधिलकीसाठी अत्यंत उपयोगी ठरतो. तसेच आपापसातील संबंधात वा मैत्रीत आलेला कडूपणा दूर करून ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून पुन्हा गोड संबंध प्रस्थापित करून प्रेम वाढविणे हा तर या सणाचा सर्वोच्च बिंदू! थंडी घालविण्यासाठी लागते ऊब व तिळगूळ घ्या गोड बोला म्हणून मारलेली ‘जादू की झप्पी’ हे काम उत्तम करते.

News Item ID: 
51-news_story-1547385158
Mobile Device Headline: 
आली संक्रांत
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
health message Dr. shri balaji tambe article
Author Type: 
External Author
डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Search Functional Tags: 
फॅमिली डॉक्टर, डॉ. श्री बालाजी तांबे
Twitter Publish: 

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content