Search This Blog

करू रक्ताची चाचणी

बरेचदा लॅबमध्ये कोणत्या चाचण्या कराव्यात अथवा डॉक्‍टरांनी सांगितलेल्या चाचण्या कशासाठी सांगितल्या असाव्यात याबाबत संभ्रम असतो. याबाबत जरा समजून घेतले तर त्याचा आपल्या उपचारात काय संबंध आहे हे कळू शकेल. काही नेहमीच्या चाचण्या कशासाठी असतात, हे पाहू. 

हिमोग्राम 
ही तपासणी रुग्णाच्या शरीरातील हिमोग्लोबिन आणि इतर पेशी याबद्दल उपयुक्त माहिती देणारी आहे. अत्यंत सर्वसाधारण अशी ही चाचणी आहे. हिमोग्रामसाठी रुग्ण कोणत्याही वेळेस रक्त देऊ शकतो. हिमोग्राममध्ये आपणास हिमोग्लोबिन, लाल पेशींची संख्या, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्‌ची संख्या आणि या सर्वांशी निगडित असे एमसीव्ही, एमसीएच, एमसीएचसी आरडीडब्ल्यू, पीडीडब्ल्यू असे विविध विश्‍लेषणात्मक घटक मिळतात आणि प्रत्येकाच्या रिझल्टवरून विशेष अनुमान काढता येते.

यासाठी आपण काही उदाहरणे बघू-   
हिमोग्लोबिनचे प्रमाण हे स्त्री आणि पुरुष, तसेच बालके यामध्ये वेगवेगळे असते. समजा, एक प्रौढ पुरुष आहे तर त्याचे योग्य हिमोग्लोबिन १४  ते १६ या पातळीत असते आणि प्रौढ स्त्रीचे १२ ते १४ असते. पुरुषाचे हिमोग्लोबिन १३च्या खाली येऊ लागले आणि स्त्रीचे ११च्या आत येऊ लागले तर, त्यांना ॲनिमिया (रक्तक्षय) होतो आहे असे ठरवता येते. ते करताना त्यांच्या एमसीव्ही  या घटकाची मदत होते. म्हणजे एमसीव्हीची पातळी ७६ ते ९६ असते. जर हे प्रमाण त्यापेक्षा कमी झाले तर लाल रक्तपेशी ज्यामध्ये हिमोग्लोबिन असते, त्याचा आकार लहान असतो आणि जर पातळीपेक्षा जास्त असेल तर आकार वाढतो. रक्तपेशींच्या आकारावरून रक्तक्षयातील दोन उप-प्रकार (मायक्रोसायटीक आणि मॅक्रोसायटीक) पडतात आणि त्यावरून ढोबळमानाने हा रक्तक्षय लोहाच्या कमतरेने आहे अथवा बी १२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेने आहे याचा अंदाज घेता येतो. हिमोग्लोबिनचे कार्य हे शरीरातील सर्व पेशींना ऑक्‍सिजन पुरवणे हे असल्याने त्याचा हा उहापोह फारच महत्वाचा ठरतो. 

पांढऱ्या रक्तपेशी या मनुष्याच्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या द्योतक असतात. त्यामध्ये न्युट्रोफिल्स, इओसिनोफील्स, लिम्फोसाईट्‌स, मोनोसाईट्‌स आणि बेसोफील्स हे उपप्रकार असतात. पांढऱ्या पेशींची संख्या आणि त्यातील उपपेशींचे गुणोत्तर हे ठरलेले असते. त्यामुळे पांढऱ्या पेशी वाढणे अथवा कमी होणे आणि त्यासोबत बाकी प्रकारात झालेली वाढ अथवा घट याचा अभ्यास रोगनिदानासाठी खूप महत्वाचा ठरतो. उदा.  फुफ्फुसांचा जंतुसंसर्ग अथवा मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग यामध्ये पांढऱ्या पेशी आणि न्युट्रोफिल्स या पेशी वाढलेल्या दिसतात. तर टायफॉईडसारख्या आजारात पांढऱ्या पेशी कमी तर लिम्फोसाईट्‌स मात्र नेहमीपेक्षा जास्त आढळतात. 

प्लेटलेटचे कार्य हे रक्तस्त्राव थांबविण्याला मदत करणे असते. डेंगू, चिकन गुनिया सारख्या आजारात प्लेटलेटचे प्रमाण कमी होऊन रक्तस्त्राव होण्याची भीती असते. रुग्णाच्या आजारात सुधारणा होते आहे का नाही हे बघण्यासाठी अशा वेळी काही अंतराने हे काउंट्‌स परत परत करावे लागतात. 
याशिवाय हिवतापाचे परजीवी विषाणू स्लाइड्‌वरती दिसू शकतात.

हिमोग्राममध्येच पीबीएस या तपासणीचा अंतर्भाव होतो. हल्ली जवळपास सर्वच ठिकाणी या टेस्ट्‌स ऑटोमेटेड सेल कॉउंटरवर होतात. त्यासोबत पीबीएस म्हणजे त्यातील रक्ताची स्लाईड बनवून ती स्टेन करून डोळ्यांनी मायक्रोस्कोप खाली बघणे आणि त्याचे कोरिलेशन मशीन निष्कर्षांशी करणे अत्यंत महत्वाचे आहे . बरेचदा प्लेटलेट्‌ची संख्या ही मशीनवर कमी आलेली असते, परंतु मायक्रोस्कोपखाली बघून त्याचा शहानिशा करावा लागतो.

कारण विषाणूचे आजार असताना प्लेटलेटचा आकार वाढून मेगाप्लेटलेट तयार होतात, ज्या मशीन प्लेटलेट म्हणून मोजत नाही, परंतु प्रत्यक्षात त्या असतात. अशा वेळी त्याचा उल्लेख हा आलेल्या निष्कर्षांपेक्षा संख्या जास्त आहे हे सांगण्याचे फारच महत्वाचे काम पॅथॉलिजिस्टकडून केले जाते. पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीखालीच तपासणी करणे केव्हाही आवश्‍यक असते. 

युरीन रुटीन 
हिमोग्रामप्रमाणेच अतिशय साधी आणि उपयुक्त अशी ही तपासणी असते. या तपासणीत लघवीचा रंग, त्याची पीएच (आम्ल की अल्कली), प्रोटीन, शुगर, किटोन्स, तसेच बाईल सॉल्ट आणि पिगमेंट हे घटक तपासले जातात. याशिवाय मायक्रोस्कोपिक तपासणीच्या भागात त्यातील रक्तपेशी (लाल आणि पांढऱ्या), तसेच मूत्रमार्गातील पेशी, क्रिस्टल्स आणि कास्ट, परजीवी अथवा जंतू असे सर्व बघितले जाते.  

काविळीचे निदान, मधुमेह अथवा उच्च रक्तदाबाची शक्‍यता, मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग, मूत्रमार्गातील खडे असण्याची शक्‍यता, किटोसिस (चयापचय बिघडून होणारी गुंतागुंतीची अवस्था) अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टींची माहिती या चाचणीमुळे कळते. 

रक्तशर्करा (ब्लड शुगर) 
रक्तशर्करा ही मधुमेही व्यक्तींसाठी अत्यावश्‍यक चाचणी आहे. मधुमेही व्यक्तींमध्ये उपाशीपोटी आणि जेवणांनंतर दीड ते दोन तासांच्यामध्ये ही तपासणी केली जाते. उपाशीपोटी तपासणी करतांना १० ते १२ तासांचा वेळ उपाशी असणे आवश्‍यक असते. याव्यतिरिक्त कोणत्याही वेळेस जेव्हा शुगर बघितली जाते तेव्हा त्याला बीएसल रॅन्डम असे म्हटले जाते. 

सामान्य परिस्थितीत उपाशीपोटी साखर ६० ते ११०, तर जेवणांनंतर १०० ते १५० या दरम्यान असते. रुग्ण मधुमेही आहे अथवा नाही यासाठीची मानके वेळोवेळीच्या शोधनिबंध, अभ्यास आणि केस स्टडीजवर बदलत जाते. तथापि जेवणांनंतरची साखर अथवा इतर कोणत्याही वेळची साखर २००च्या पुढे गेल्यास मधुमेह समजले जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण हे त्यावेळचा अथवा अगदी आदल्या जेवणातील आहार, तणाव, शारीरिक धावपळ, इतर औषधे यावरही अवलंबून असते. त्यामुळे बरेचदा निष्कर्षांमध्ये फरक पडू शकतो. यासाठी रक्तशर्करेच्या अभ्यासात एचबीए१सी  नावाची चाचणी केली जाते. ही चाचणी कधीही करता येते आणि त्यातील रिझल्ट हे जास्त भरवशाचे आणि सातत्य दाखवणारे असतात. मधुमेही रुग्णांनी दर तीन महिन्यांनी ही चाचणी करणे अतिशय हितावह आहे.

News Item ID: 
51-news_story-1548575399
Mobile Device Headline: 
करू रक्ताची चाचणी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Blood test
Author Type: 
External Author
डॉ हरीश सरोदे
Search Functional Tags: 
जीवनसत्त्व, Oxygen, नासा, चिकन, मधुमेह, साखर, शोधनिबंध
Twitter Publish: 

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content