वाढत्या वयात प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होतेच व त्याचा बहुतेक वृद्धांना त्रासही होतो. पण म्हणून त्यावर इलाज करून घेण्याची गरज नाही, असा मोठा गैरसमज जनमानसात आहे. शरीरात कोठेही, कसलाही त्रास असेल तर तो वैद्यकीय मदतीने दूर केलाच पाहिजे. अन्यथा, आजार बळावण्याची शक्यता असते. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झालेली असेल, तर त्यावरही इलाज केलाच पाहिजे.
तरुण वयात प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीचा त्रास होऊ लागला तर वैद्यकीय मदत घेतली जाते. मात्र वाढत्या वयात असा त्रास झाला तर वैद्यकीय मदत घेण्याचे शक्यतो टाळले जाते किंवा विलंबावर टाकले जाते. वाढत्या वयातील प्रोस्टेट ग्रंथीची वाढ हा एका परीने आजार नाही. वाढत्या वयात घडून येणारा तो एक बदल आहे. अनेक पुरुषांना याचा त्रास होतो. अनेकांना त्रास होतो म्हणजे तो सर्वसामान्यपणे दुर्लक्ष करता येण्याजोगा आहे, असे समजू नये.
त्रास सुरू झाला की त्यावर इलाज हा केलाच पाहिजे. कारण वेळीच इलाज केला नाही, तर आजार बळावण्याची व गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. पण निदान झाले तर डॉक्टर लगेच शस्त्रक्रिया करायला सांगतील या भीतीने अनेक जण युरॉलॉजिस्टकडे जाणे टाळतात. मात्र एक वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे, की प्रोस्टेट वाढलेल्या नव्वद टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. दररोज घेण्याच्या औषधानेच यातून सुटका होते. फक्त दहा टक्के रुग्णांना विविध कारणांनी औषधांमुळे काही गुण येत नाही. अशांनाच शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते.
प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होण्याची किंवा लघवीसंबंधी त्रास होण्याची कारणे थोडी विस्ताराने पाहू. लघवी अडखळत होणे, लघवी पूर्ण झाल्याचे समाधान न होणे असा अनुभव येतो आणि लघवी इतकी घाईची लागते, की त्यावर नियंत्रण न राहता कपडे ओले होतात, असाही अनुभव येतो. लघवी जास्त व्हावी या हेतूने वापरलेल्या (डाययुरेटिक) औषधांनी अचानक कपडे ओले झाल्यासारख्या तक्रारी वाढतात. काही औषधे आपल्या अनैच्छिक मज्जासंस्थेवर काम करण्याकरिता वापरतात. सहसा ॲसिडिटी कमी करण्याकरिता, दमा ताब्यात येण्याकरिता दिलेली औषधे, पोटात दुखू नये किंवा कळ थांबावी याकरिता दिलेल्या औषधांमुळे मूत्राशयाच्या स्नायूंचे आकुंचन मंदावते. या औषधांना अँटिकोलेनर्जिक औषधे म्हणतात. या औषधांच्या वापराने प्रॉस्टेट ग्रंथी वाढण्याने होणारे त्रास वाढतात. सर्दीवर वापरण्यात येणाऱ्या बऱ्याच औषधात सूडोएफिड्रिन नावाचे द्रव्य असते. या द्रव्यामुळे लघवी सुटण्यास अडथळा येऊ लागतो. म्हणून लघवीसंबंधींचा त्रास नेमका कशामुळे होत आहे, हे आधी पाहायला हवे आणि हे मूत्रविकारतज्ज्ञच नेमकेपणाने सांगू शकतो. मूत्राशयात लघवी थोडीफार साचत राहण्याने लघवीत जीवाणू वाढू लागतात. रुग्णाला वारंवार लघवीत जीवाणूजन्य दाह होऊ लागतो. मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग वाढत जाऊन प्रोस्टेट ग्रंथीला त्याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. प्रोस्टेट ग्रंथीत जंतुसंसर्ग झाला, तरीही वृषणात संसर्गबाधा पोचू शकते. तरुण वयात योग्य काळजी न घेता ठेवलेल्या मुक्त लैंगिक संबंधांमुळे जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो. मात्र प्रोस्टेटच्या जंतुसंसर्गाचे हेच एकमेव कारण असेल असे नाही. अनेक प्रकारच्या जंतूंचा संसर्ग या ग्रंथीला होऊ शकतो आणि त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मूत्रमार्गाचा दाह होण्यासारख्या काही लक्षणांवरून याचे निदान करता येऊ शकते. पुरुषांतील ‘क्रॉनिक पेल्व्हिक पेन सिन्ड्रोम’चे ९५ टक्के रुग्ण प्रोस्टेटशी संबंधित विकारांनी ग्रस्त असतात, असे अमेरिकेत २०१७ मधील एका पाहणीत दिसून आले. त्यामुळे अशा वेदना हेही निदानाचे साधन होऊ शकते.
एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे, की प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीकडे दुर्लक्ष करता कामा नये. या ग्रंथीच्या वाढीमुळे मूत्रवाहिनीवर दाब येऊन मूत्रवहनात अडथळे निर्माण होतात, त्याचा एक परिणाम म्हणून मूत्राशयात खडे होण्याची शक्यता वाढू लागते. प्रॉस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रनलिकेतील रक्तवाहिन्या रुंदावतात, त्या फुटू शकतात व लघवीतून रक्त जाऊ लागते. लघवी बाहेर पडण्याला येणारा अडथळा वाढत जातो. अखेर मूत्रपिंडावर त्याचा दुष्परिणाम होऊ लागतो व मूत्रपिंडाचे कार्य नीट होईनासे होते. अखेर मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात.
लघवी पूर्णतः होत नसल्याने शरीरातून बाहेर टाकावयाची उत्सर्जक द्रव्ये शरीरामध्येच साचून राहतात. त्यामुळे रक्त दूषित होऊ लागते. अशा वेळी युरिमिया हा विकार होण्याचा धोका असतो. म्हणून रक्तात दोष पसरण्यापूर्वीच त्यावर इलाज करण्याची गरज असते.
निदान पद्धती प्रोस्टेट गाठीची वृद्धी झाली किंवा नाही याचे निदान करण्यासाठी दिवसभरात रुग्णाला कशाप्रकारे लघवी होते, याचा एक तक्ता (प्रोस्टेट सिम्टन स्कोअर) केला जातो. वेगवेगळ्या सात प्रश्नांच्या उत्तरांची येथे नोंद घेतली जाते. या तक्त्याचे डॉक्टर परीक्षण करतात, त्यावरून आजाराचे प्राथमिक निदान तज्ज्ञ डॉक्टर लगेच करू शकतात.
पर रेक्टल (पी.आर.) तपासणी - मूत्रविकार तज्ज्ञ अथवा शल्य चिकित्सक गुदद्वारात बोट घालून प्रोस्टेटची तपासणी करतात. यात प्रोस्टेटचा वाढलेला आकार, सूज लक्षात येते. बोटाने केलेल्या तपासणीत बी.पी.एच. झालेल्या रुग्णांची प्रोस्टेट गुळगुळीत आणि रबराप्रमाणे लवचिक लागते.
सोनोग्राफी - या तपासणीत रुग्णाचे मूत्राशय पूर्ण भरलेले असताना प्रथम पोटाची सोनोग्राफी केली जाते आणि मूत्राशयात असलेली लघवी मापली जाते. त्यानंतर त्याला मूत्रविसर्जन करायला सांगून पुन्हा मूत्राशयात शिल्लक राहिलेली लघवीचे मोजमाप केले जाते. ग्रंथीच्या आकाराचा, वजनाचा अंदाजही सोनोग्राफीत येतो. प्रोस्टेटच्या आकारमानात झालेली वाढ, मूत्र विसर्जन केल्यावर जास्त प्रमाणात मूत्राशयात शिल्लक राहिलेली लघवी यावरून बीपीएचचे निदान केले जाते. अलीकडे प्रोस्टेटची अधिक माहिती मिळण्यासाठी ट्रान्स रेक्टल सोनोग्राफी केली जाते.
प्रयोगशाळेतील चाचण्या - यात बी.पी.एच.चे निदान झाले नाही तरी, बी.पी.एच.मुळे होणाऱ्या त्रासांचे निदान मात्र नक्की होते. लघवीच्या तपासणीत लघवीतील जंतुसंसर्ग, रक्तातील क्रिएटिनिन, युरिया यांची माहिती मिळते. जीएफआर या चाचण्यांमध्ये मूत्रपिंडांच्या कार्यावर प्रकाश पडू शकतो. रक्तातील पीएसए (प्रॉस्टेट स्पेसेफिक अँटिनेन) पातळीचे मापन केल्यामुळे रुग्णाला हा त्रास प्रोस्टेटच्या कर्करोगामुळे असू शकेल का, याचा अंदाज येतो. कर्करोग नसणाऱ्या व्यक्तीत ते ०.२ ते ४ एवढे असते. ४ ते १० प्रमाण असल्यास कर्करोगाची थोडी शक्यता असते. १० किंवा जास्त प्रमाण असल्यास कर्करोग असण्याची शक्यता अधिक बळावते.
इतर तपासण्या - युरोफ्लोमेट्री या तपासणीमध्ये लघवीच्या धारेतील तीव्रता मोजली जाते. सिस्टोस्कोपी आणि युरेथ्रोग्रामसारख्या विशिष्ट तपासण्या केल्यास मूत्राशयातील आणि मूत्रसंस्थेतील इतर त्रास कळू शकतात. मूत्राशयाचे शैथिल्य, अधिक संवेदनक्षम होणे असे मूत्राशयाचे विकार (विशेषत्न: ओव्हर अक्टिव्ह ब्लॅडर) सिस्टोमेट्री या तपासणीत समजतात.
विविध उपचार पद्धती
वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे सध्या विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांच्या आजाराची स्थिती लक्षात घेऊन या उपचार पद्धतींचा अवलंब करता येऊ शकतो. औषधोपचार सुरू असताना मूत्रविकार तज्ज्ञाकडून नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. गरजेनुसार शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असू शकतो.
औषधोपचार - एकेकाळी प्रोस्टेटच्या त्रासावर शस्त्रक्रिया हा एकच इलाज समजला जायचा. मात्र बी.पी.एच.मुळे जर लघवीला खूपदा आणि वारंवार होण्याचा त्रास होत नसेल आणि कोणतीही गंभीर गुंतागुंत नसेल, तर काही औषधे घेऊन त्यावर उत्तम प्रकारे नियंत्रण आणता येते. अल्फा ब्लॉकर्स किंवा फिनास्टेराइड, ड्युटास्टेराइड अशा औषधांमुळे मूत्रमार्गातला अडथळा कमी करता येतो. यासाठी प्रथम काही औषधांचा वापर केला जातो. मूत्रमार्गाचे स्नायू शिथिल करण्यासाठी औषधे देऊन रुग्णाच्या तक्रारींवर काय परिणाम होतो, हे पाहिले जाते.
फिनास्टेराईड हा रेणू प्रॉस्टेट ग्रंथीतील अँड्रोजेन (टेस्टास्टेरॉन) संप्रेरकांची पातळी कमी करतो. या रेणूने प्रॉस्टेट ग्रंथीचा आकारच कमी होतो; परंतु या औषधांचा फायदा व्हायला वेळ लागतो. साधारण तीन ते सहा महिने एवढा कालावधी लागू शकतो. मात्र जे पुरुष फिनास्टेराइड घेतात, त्यांना शस्त्रक्रियेची गरज लागण्याची शक्यता कमी होते. या औषधांचा एक दुष्परिणामही लक्षात घेतला पाहिजे. टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचा स्राव व परिणाम कमी करण्याकरता हे औषध असल्याने कामेच्छा कमी होणे आणि शिश्नाच्या कर्मी स्थितीत ताठरपणा कमी होणे (erectile dysfunctions) असे नको असणारे परिणाम होणे संभवते. ज्यांचे यकृत खराब अथवा अशक्त असते, त्यांनीही हे औषध घेणे टाळावे.
आल्फा ब्लॉकर्स नावाचे अनेक रेणू (प्रॅझोसिन, टेराझोसीन डॉक्साझोसीन, टॅमस्युलोसिन, ॲफ्लूझोसिन, सिलोडोसिन) बाजारात उपलब्ध आहेत. या रेणूंच्या परिणामामुळे मूत्रमार्गाचे स्नायू सैल होतात. वाढलेल्या प्रॉस्टेट ग्रंथीमुळे लागणारी घाई किंवा लघवी रोखण्यावरचा ताबा सुटणे अशा तक्रारी या औषधांच्या वापराने कमी होतात. या रेणूंमुळे पहिल्या डोसनंतर अकस्मात रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. आल्फा ब्लॉकर्स घेणाऱ्या सत्तर टक्के पुरुषांना थोड्या दिवसांत किंवा काही आठवड्यांतच आराम पडू लागतो; परंतु या पुरुषांत थकवा जाणवण्याचे प्रमाण जास्त असते. अशा औषधांचा वापर करणाऱ्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टारांच्या नजरेखालीच औषधे घ्यावीत.
प्रॉस्टेटायटिस (Prostatits) हा प्रॉस्टेट ग्रंथीचा जीवाणूजन्य दाह असतो. अनेकदा तो लैंगिक संबंधातून पुरुषाला होऊ शकतो. लघवीच्या तपासणीत जीवाणूचा संसर्ग झाल्याचे दिसते. डॉक्टरांनी केलेल्या ’रेक्टल एक्झामिनेशन’मध्ये प्रॉस्टेट ग्रंथीवर हलकासा दाब दिल्यावर रुग्णाला वेदना होतात व लघवीच्या वाटेने स्राव बाहेर पडतो. योग्य प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) वापर केल्याने आजार बरा होऊ शकतो.
कोणतीही औषधे पूर्णतः वैद्यकीय तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखालीच घ्यावीत. कित्येकदा थोडे बरे वाटले, की औषध घेण्याची गरज नाही, असे रुग्णच ठरवतो. पण त्याचा दोष पूर्णतः दूर झालेला नसतो. त्यामुळे परस्पर औषधे घेऊही नयेत किंवा डॉक्टरांनी सुचवल्याशिवाय बंदही करू नयेत. औषध कोणते, किती प्रमाणात व कधीपर्यंत घ्यायचे हे डॉक्टरांना ठरवू द्या.
औषधांनी सुधारणा नसेल तर...?
ज्या रुग्णांना योग्य औषधे देऊनही त्यांच्या लक्षणात सुधारणा होत नाही, त्यांना विशिष्ट उपचारांची गरज भासते. काही लक्षणे याबाबत महत्त्वाची ठरतात. यामध्ये
ज्यांना प्रयत्न करूनही बराच काळ लघवी करता येत नाही.
ज्यांना कॅंथेटरच्याच मदतीनेच लघवी होते.
ज्यांना वारंवार लघवीत जंतुसंसर्ग होतो.
ज्यांना लघवीतून रक्त जाण्याचा त्रास होतो.
लघवी केल्यानंतरही ज्यांच्या मूत्राशयात खूप प्रमाणात लघवी शिल्लक राहते.
मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साठल्याने ज्यांच्या मूत्रपिंडाचा आणि मूत्रनलिकेचा आकार फुगून वाढतो.
लघवी साठल्यामुळे ज्यांना मूतखडे होत राहतात
अशांना टीयूआरपी, पोटाची शस्त्रक्रिया किंवा इतर विशिष्ट पद्धतीच्या उपचारांची गरज भासते.
टीयूआरपी (ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट) - वाढलेल्या पूरःस्थ ग्रंथीमुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होत असल्यास तो दूर करण्यासाठी मूत्रमार्गावर उच्छेदन (टीयूआरपी) ही शस्त्रक्रिया करतात. यासाठी एक दुर्बीण शिश्नाद्वारे मूत्रमार्गात सारतात व वाढलेल्या ग्रंथींचे तुकडे कापून मूत्रमार्ग मोकळा केला जातो. बीपीएचच्या उपचारांसाठी ही सर्वांत परिणामकारक आणि सर्वाधिक प्रचलित पद्धत आहे. औषधोपचारांचा विशेष फायदा न होणाऱ्या नव्वद टक्के रुग्णांसाठी हा उपचार वापरला जातो.
या पद्धतीत चिरफाड करणारी शस्त्रक्रिया किंवा शरीरावर कुठलीही जखम नसते.
सामान्यपणे रुग्णाला पूर्ण भूल न देता मणक्यात इंजेक्शन देऊन स्पायनल ॲनेस्थेशियाद्वारे कमरेच्या खालचा भाग बधिर केला जातो.
या उपचारात मूत्रनलिकेतून दुर्बीण घालून प्रोस्टेट ग्रंथीचा अडथळा निर्माण करणारा भाग काढला जातो.
ही प्रक्रिया दुर्बीण अथवा व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारा दुर्बिणीत पाहून केली जाते. त्यामुळे प्रोस्टेटचा अडथळा निर्माण करणारा भाग काढला जातो. यामुळे रक्तस्राव खूपच कमी होतो.
या शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे तीन ते चार दिवस रुग्णालयात राहावे लागते. या क्रियेत पूर्ण प्रॉस्टेट ग्रंथी काढत नाहीत. काहींना डायलरेशन परत परत करावे लागते. विशेषतः ज्या रुग्णांना स्ट्रिक्चरचा त्रास असतो, त्यांना डायलरेशन पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासू शकते. अशा रुग्णांत मूत्रमार्गात कुरुपासारखा भाग वारंवार वाढतो. हा कुरुपासारखा भाग वाढल्यानंतर तो दुर्बिणीच्या साह्याने काढून टाकला जातो. काही वेळा यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागते.
शस्त्रक्रिया - जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीची वाढ खूप जास्त प्रमाणात झालेली असते आणि त्याचबरोबर मूत्राशयात मूतखडे वाढलेले असतात तेव्हा शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. कारण या परिस्थितीत दुर्बिणीच्या मदतीने परिणामकारक उपचार होऊ शकत नाहीत. अशावेळी मूत्रवाहक नलिकेवर येत असणारा दाब शस्त्रक्रियेने दूर केला जातो. या शस्त्रक्रियेत सामान्यपणे जांघेचा भाग आणि मूत्राशयावर चीर घेऊन प्रोस्टेट बाहेर काढली जाते व वाढलेला भाग कापून काढला जातो.
अन्य पद्धती - याशिवाय लेझरद्वारे, औष्णिक पद्धतीद्वारे (थर्मल ॲब्लेशन), मूत्रमार्गात विशेष प्रकारची नळी (स्टेंट) घालून प्रोस्टेटचा इलाज केला जातो. बायपोलर, वॉटर ॲब्लेशन अशाही नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत. शरीराची चिरफाड केली जात नसल्याने रक्तस्राव कमी होतो व सुरक्षितता वाढते हा या पद्धतींचा मोठा फायदा आहे.
प्रतिबंधात्मक उपाय
आपल्या आयुर्वेदीय परंपरेमध्ये आहारापासून तणावमुक्तीपर्यंत विविध परिणाम देणारे अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यांच्या साह्याने प्रोस्टेट ग्रंथीसंबंधीचे काही विकार दूर ठेवता येऊ शकतात. - आयुर्वेदातील संकल्पनेनुसार ‘उष्ण’ आहार टाळणे, पचनक्रियेवर विपरीत परिणाम होणार नाही, बद्धकोष्ठता होणार नाही असा आहार ठेवणे, सतत वातानुकूलित वातावरणात बसून न राहणे, आखडून किंवा एकाच स्थितीत बराचकाळ
बसून न राहणे, योगामध्ये वर्णन केलेल्या अश्विनीमुद्रेचा नित्य अभ्यास करणे, प्राणायामाचा अभ्यास करणे अशा उपायांद्वारे ही व्याधी दूर ठेवता येऊ शकते.
वयाच्या पन्नाशीनंतर आहारात फळे, फळांचा रस, विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा.
धान्यक, गोक्षुर, शतावरी, उशीर, श्वेतचंदन, पंचकोल, अनंतमूळ यांसारख्या औषधांपासून बनवलेली शास्त्रशुद्ध तूप, गुटी-वटी वैद्यांच्या सल्ल्याने घेतल्यास प्रोस्टेटची वाढ कमी होत जाते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. सिंगापूर येथील नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये आणि कैरोमधील नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ड्रग्ज कंट्रोल अँड रिसर्च येथील प्रयोगात गोक्षुर म्हणजे गोखरूचा वापर करण्यात आला होता. उंदरांना गोखरूचा अर्क दिल्यानंतर त्यांच्या टेस्टोस्टेरॉन संप्रेरकात वाढ झाल्याचे आणि रक्तातील अँड्रोजेन्सची पातळी वाढल्याचे आढळले.
मूग, कुळीथ, उडीद, जुने लाल तांदूळ यांपासून बनवलेले वेगवेगळे सूप, यवागू, खजूर, हिरडा, लाह्या अशा प्रकारचा पचण्यास हलका आहार घ्यावा, असे सुचवण्यात आले आहे.
औषधी मात्रेमध्ये नित्य स्नेहपान (औषधीसिद्ध तुपाचे सेवन) घेतल्यास त्या औषधी तुपाने प्रोस्टेटची वाढ कमी होऊ शकते. याशिवाय नित्य चंदनबला लाक्षादी यांसारख्या तेलांचा अभ्यंग, पंचकोलसिद्ध औषधी, बस्ती, उत्तरबस्ती यांसारखे पंचकर्म वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावे, असे आयुर्वेदात सुचवण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment