Search This Blog

#FamilyDoctor लठ्ठ आहात? हताश होऊ नका! 

स्थूल होणे योग्य नाहीच. लठ्ठपणा हा आजार आहे, हे मान्य करायला हवे. पण आपले गैरसमजच खूप असतात. त्यामुळे अघोरी उपाय योजून आपण सडपातळ व्हायचा प्रयत्न करतो. परिणामी, आरोग्याची आणखी हानी होते. लठ्ठपणासंबंधी सर्वांगाने योग्य माहिती आपल्यापर्यंत पोचली तरच आरोग्याची हानी टाळली जाईल व नैराश्‍यापासून दूर राहता येईल. ‘ओबेसिटी मंत्रा’ हे पुस्तक आपल्या मनात सकारात्मकता रुजवते.

शरीराची तंदुरुस्ती आणि सुडौलपणा याविषयी जागरूकता वाढत चाललेली आहे. तन दुरुस्त तर मन दुरुस्त, हे पटू लागले आहे. त्यामुळेच सकाळच्यावेळी चालायला जाणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली दिसते. डाएटिंगविषयी चर्चा होताना दिसतात. ‘दीक्षित’ आणि ‘दिवेकर’ यांचे प्रत्यक्षात, सामाजिक माध्यमांमध्ये गट-तट पडलेले दिसतात. आणखीही काही डाएटिंग फॅड मध्येच सुरू होतात मित्रमैत्रिणीत. कधी जिम, ॲरोबिक्‍स, योगासने यांची चर्चा जोरात सुरू होते घरात. एकूण काय तर कोणालाही स्थूल झालेले आवडत नाही एवढे खरे. तरीही काही कालावधीनंतर नित्यक्रमात बदल होतो. वजन वाढते. पोट सुटते, कमरेचा घेर वाढतो. जांघा एकमेकांना घासू लागतात, हनुवटीखाली फुगीरपणा दिसू लागतो. प्रश्न पडतो, की आपण स्थूल का होत आहोत? आपणच का, या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायचे असेल, तर ‘ओबेसिटी मंत्रा (लठ्ठपणा : आजार व उपचार)’ हे डॉ. जयश्री तोडकर व संतोष शेणई यांचे पुस्तक वाचायला हवे.

आपण स्थूल होऊ लागलो आहोत, हे आपल्याला माहीत असते. ते दुसऱ्या कोणी सांगण्याआधी आपलेच कपडे सांगू लागतात, आपल्या समोरचा आरसा दाखवू लागतो, मानेपाशी वाढणारे काळेपण जाचू लागलेले असते. लठ्ठपणाचे फायदे काहीच नसतात, मात्र तोटे अनेक असतात. हे तोटे अनुभवायला येऊ लागतात. पूर्वीचा चपळपणा जातो आणि हालचालीत मंदपणा येतो. समोरच्याला जाणवेल इतका मंदपणा लाज आणतो. स्वाभाविकच सामाजिक पातळीवर आपण चेष्टेचा, टिंगलीचा विषय होतो. 

शरीराचे वाढते वजन काहीही काम करण्यास नकार देऊ लागते. शरीर लवकर थकत असल्याने आळशी म्हणून हेटाळणी होऊ लागते, त्याचवेळी अगदी बसून बसूनही भूक वाढत जाते. त्यामुळे अधाशी म्हणूनही कुचेष्टा होते. त्यामुळे एकलकोंडेपण येते. नैराश्‍य वाढते. नैराश्‍यामुळे लठ्ठपणा येत नाही, तर लठ्ठपणातून नैराश्‍य येते. आपण लठ्ठ होतो, पण त्यामागची कारणे समजून घेतलेली नसतात. अनेक अपसमज, गैरसमज आपण कवटाळून असतो. त्याच्या आधारेच लठ्ठपणा घालविण्याचे प्रयोग करीत असतो. अगदी अघोरी उपायांनी शरीर व मन शिणवतो, पण लठ्ठपणा काही हटत नाही. हे अपसमज, गैरसमज दूर करून लठ्ठपणाची सांगोपांग माहिती करून घेण्यासाठी ‘ओबेसिटी मंत्रा (लठ्ठपणा : आजार व उपचार)’ हे पुस्तक उपयुक्त ठरेल. 

हे पुस्तक सांगते काय? लठ्ठपणा म्हणजे नेमके काय? आपणच स्थूल का? लठ्ठपणा हे एखाद्या आजाराचे लक्षण आहे की लठ्ठपणा हाच आजार आहे? लठ्ठपणाची लढाई कशी जिंकायची? लठ्ठपणामुळे इतर आजार होऊ शकतात का आणि गुंतागुंतीच्या व्याधी टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची? शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे का? आहार व व्यायाम यांचे नियोजन कसे करायचे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात, त्याचीच उत्तरे ‘ओबेसिटी मंत्रा’ हे पुस्तक देते. 

हे पुस्तक चार भागात विभागण्यात आले आहे. पहिल्या भागात ‘लठ्ठ होण्याची गोष्ट’ सांगितली आहे. लठ्ठ होतो म्हणजे काय होते आणि का होते याची शास्त्रीय माहिती या भागातील पाच लेखांमध्ये आहे. ही माहिती शास्त्रीय असली तरी ती क्‍लिष्ट किंवा कंटाळवाणी नाही. किस्से, लोककथा, कविता अशा विविध गोष्टींचा उपयोग करून अत्यंत रंजक, सुबोध पद्धतीने ही माहिती सांगण्यात येते. आरोग्याचे विज्ञान कसे समजावून द्यावे, याचे हे चांगले उदाहरण आहे. या पाच लेखांची शीर्षकेच पाहा ‘सावध ऐका पुढल्या हाका’, ‘गब्दुल्याची गोष्ट’, ‘वाढता वाढता वाढे’, ‘पॉवर स्टेशनमधील बिघाड’, ‘आम्ही साठेबाज.’ ही शीर्षके जशी रंजक व सुबोध आहेत, तशाच पद्धतीने लेखातील माहितीही आहे. आपण लठ्ठ होतो कसे, हे मला तरी नीट समजून घेता आले. 

लठ्ठपणा हा आजार आहे, हे वैद्यकशास्त्रात आता मान्य झाले आहे. पण हा आजार इतर आजारांनाही निमंत्रण देणारा आहे. हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, वंध्यत्व, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, मासिकपाळीतील अनियमितपणा, अर्धशिशी, निद्रानाश, आम्लपित्त, अस्थमा, मूत्रपिंडविषयक आजार असे तब्बल एकशेऐंशी आजार लठ्ठपणामुळे होऊ शकतात, हे या पुस्तकामुळेच समजले. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आजारांबद्दल ‘आजारांचे आगार’ या दुसऱ्या भागात सावध करण्यात आले आहे. 
तिसऱ्या भागात ‘करावे तरी काय?’ हे समजावून देण्यात आले आहे. लठ्ठपणा दूर करण्यासाठी अनेक झटपट उपाय सुचवले जातात, औषधे सांगितली जातात. त्याचा कितपत उपयोग होतो, त्याचे दुष्परिणाम काय होतात, एखादे यंत्र बाहेरून चरबी हटवू शकते का, औषधे शरीरातील चरबी वितळवतात का हे समजावून सांगितले आहे. भूलथापांना भुलून फसवणूक करून घेण्याऐवजी लठ्ठपणावरचे उपाय नीट समजून घेतले पाहिजेत. आपणच आहार, निद्रा व व्यायाम यांच्या आधारे, योग्य जीवनशैली सांभाळून सडपातळ होऊ शकतो, हा विश्वास हे पुस्तक देते. 

चौथ्या भागात, वेगवेगळ्या रुग्णांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. त्या शंकानिरसनातून आपल्याही मनातील प्रश्नांना आपोआप उत्तरे मिळतात. तर शेवटचा लेख पुन्हा सर्व गोष्टींची उजळणी करणारा आहे. 

डॉ. जयश्री तोडकर या खरे तर विख्यात बॅरिएट्रिक सर्जन आहेत. पण बॅरिएट्रिक शस्त्रक्रियांच्या प्रचारासाठी हे पुस्तक लिहिलेले नाही, हे लक्षात येते. रुग्णांचे शिक्षण करून त्यांना स्वतःच व्यायाम व आहार यांच्या आधारे सडपातळ होण्याचा सल्ला पुस्तकात देण्यात आला आहे. पुस्तकाचा संपूर्ण रोख हा रुग्णांनी लठ्ठपणाचा आजार समजून घेऊन स्वतःच्या जीवनशैलीत योग्य बदल घडवून आणण्यावर आहे. लठ्ठपणावरचा अखेरचा उपाय म्हणजे शस्त्रक्रिया हे या पुस्तकात समजावून देण्यात येते. वैद्यकीय विज्ञान समजून घेत संतोष शेणई यांनी ते सुबोधपणे समजावून दिले आहे. 

या पुस्तकाला तीन प्रस्तावना आहे. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी लठ्ठपणाच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी लठ्ठ असतानाचा व उपचारानंतरचा स्वानुभव कथन केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात या विषयाला राज्यशासनाने दिलेला अग्रक्रम व त्या अनुषंगाने आखलेल्या योजना सांगितलेल्या आहेत.

आपला लठ्ठपणा हा चेष्टेचा विषय होणार नाही, कुठेही वाचताना कमीपणा वाटणार नाही याची काळजी डॉ. जयश्री तोडकर व संतोष शेणई या लेखकद्वयांनी घेतली आहे. हा शास्त्रीय विषय शास्त्रशुद्धपणे मांडतानाच, सकारात्मक दृष्टिकोन रुजवणारे असे ‘ओबेसिटी मंत्रा’ हे पुस्तक आहे.

News Item ID: 
51-news_story-1543578995
Mobile Device Headline: 
#FamilyDoctor लठ्ठ आहात? हताश होऊ नका! 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
obesity mantra book
Author Type: 
External Author
कामिनी मुंदडा
Search Functional Tags: 
संतोष शेणई, डॉ. जयश्री तोडकर, Jayashri Todkar, आरोग्य
Twitter Publish: 

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content