Search This Blog

फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर


मल

Posted: 02 Jun 2011 04:55 PM PDT

मलशरीरातील सर्व कार्ये ज्यांच्याकरवी होतात ते दोष, शरीर ज्यांच्यापासून बनले आहे आणि ज्यांच्या आधाराने सशक्‍त, सक्षम राहते ते धातू आणि शरीरात असेपर्यंत स्वत-चे काम करणारे, पण त्यानंतर मात्र वेळेवर उत्सर्जित होऊन शरीराला शुद्ध ठेवणारे ते मल होत. संतुलित दोष, उत्तम परिपूर्ण अवस्थेतील धातू व नियत प्रमाणात व योग्य वेळी उत्सर्जित होणारे मल हा निरोगी आयुष्याचा पायाच आहे. दोषधातुमलमूलं हि शरीरम्‌ । असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. शरीरातील सर्व कार्ये ज्यांच्याकरवी होतात ते दोष, शरीर ज्यांच्यापासून बनले आहे आणि ज्यांच्या आधाराने सशक्‍त, सक्षम राहते ते धातू आणि शरीरात असेपर्यंत स्वत-चे काम करणारे, पण त्यानंतर मात्र वेळेवर उत्सर्जित होऊन शरीराला शुद्ध ठेवणारे ते मल होत. लिनीकरणात्‌ मला- ।...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान जे शरीराला मलीन करू शकतात ते मल होय. पण म्हणून मल अगदीच अनावश्‍यक असतात असे नाही. तीन मल विष्ठा,मूत्र व घाम हे तीन मुख्य मल होत. तसेच शरीरातील कार्य संपल्यानंतर जीर्ण झालेले, झरलेले म्हणजे दूषित झालेले रक्‍त, मांस वगैरे धातू हेही मल समजले जातात.


मंत्र स्वास्थ्याचा ३/२१ (मल)

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

मंत्र स्वास्थ्याचा ३/२१ (मल)पंचमहाभूतांपासून तयार झालेला कुठलाही पदार्थ (मग ती हवा असो, पाणी असो, अन्न असो, मनाला चालना देणारे विचार असो, ज्या वेळी शरीरात स्वीकारला जातो त्या सर्वांमध्ये मल असतोच. हा मल शरीरात ठेवून चालत नाही, तर तो शरीरातून विसर्जित व्हावा लागतो. शरीरात आलेल्या अन्नातील सारभाग स्वीकारून मल भाग बाहेर टाकून देण्याची अत्यंत सुंदर व्यवस्था निसर्गाने केलेली आढळते. पण मनात येणारा कुविचाररूपी मल मात्र सद्विचार, सत्संग, ध्यान याद्वारे काढून टाकावा लागतो. जीवनाची मुख्य त्रिसूत्री म्हणजे स्थैर्य, गतिमानता आणि ध्येय वा पुरुषार्थ. सर्व प्राणिमात्रांची वस्तुमात्रांची प्रकृती या त्रिसूत्रीवर आधारलेली असते. अर्थात कफामुळे स्थैर्य, वातामुळे गतिमानता आणि पित्तामुळे ध्येय वा पुरुषार्थ साध्य होतो. परंतु हे सर्व साध्य करण्यासाठी आवश्‍यक असते शरीर. स्थैर्य आवश्‍यक असले तरी दगडासारखे स्थैर्य उपयोगाचे नसते तर ध्येयसिद्धी होईपर्यंत आवश्‍यक असलेली चिकाटी हा गुण स्थैर्य या शब्दात अभिप्रेत आहे. तसेच गतिमानता ही अत्यंत स्वाधीन बदलाची प्रक्रिया येथे अभिप्रेत आहे. ध्येय वा पुरुषार्थ सिद्ध करायचा म्हटला तर त्यासाठी शरीराची मदत घ्यावीच लागते.


आईचे दूध

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

गर्भवती स्त्री प्रसूत झाल्यानंतर आपल्या गोड गोजिऱ्या इवल्याशा बाळाला जवळ घेऊन जेव्हा प्रथम स्तनपान देते आणि बाळही आनंदाने स्तनपान करते तेव्हा तो तिचा आनंद मला वाटतं जगातील सर्व सुखांपेक्षा मोठा असतो. प्रसूतिवेदना, गर्भावस्थेतील त्रास या सर्वांचा त्या एका क्षणात विसर पडतो तिला! आणि प्रेमाने पान्हा फुटतो- ज्याला "स्तन्य' म्हणतात. बाळाचा स्पर्श "मातृस्तन्य' निर्मितीतील एक घटक मानला जातो. बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. नार्यास्तु मधुरं स्तन्यं कषायनुरसं हिमम्‌ । स्निग्धं स्थैर्यकरं शीत चक्षुष्य बलवर्धनम्‌ ।। आईचे दूध मधुर, कषाय रसात्मक, स्निग्ध, बलवर्धक, शीत गुणात्मक, डोळ्यांना हितकर अशा गुणांचे असते. मातृस्तन्याचे महत्त्व - बाळाच्या पोषणासाठी मातृस्तन्य अत्यंत हितकारी असते. शिवाय आई आणि बाळ यांच्यामध्ये सुंदर भावनिक नाते स्तनपानाने निर्माण होते. अतिशय स्वच्छ, जंतुरहित असे हे स्तन्य असते, अतिसार, प्रवाहिका, उलट्या, कृमी इ. तक्रारी वरच्या दुधाने निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी "आईचे दूध' बाळाला द्यावे. ते पचण्यास हलके असते.


आईचे दूध

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

आईचे दूधगर्भवती स्त्री प्रसूत झाल्यानंतर आपल्या गोड गोजिऱ्या इवल्याशा बाळाला जवळ घेऊन जेव्हा प्रथम स्तनपान देते आणि बाळही आनंदाने स्तनपान करते तेव्हा तो तिचा आनंद मला वाटतं जगातील सर्व सुखांपेक्षा मोठा असतो. प्रसूतिवेदना, गर्भावस्थेतील त्रास या सर्वांचा त्या एका क्षणात विसर पडतो तिला! आणि प्रेमाने पान्हा फुटतो- ज्याला "स्तन्य' म्हणतात. बाळाचा स्पर्श "मातृस्तन्य' निर्मितीतील एक घटक मानला जातो. बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. नार्यास्तु मधुरं स्तन्यं कषायनुरसं हिमम्‌ । स्निग्धं स्थैर्यकरं शीत चक्षुष्य बलवर्धनम्‌ ।। आईचे दूध मधुर, कषाय रसात्मक, स्निग्ध, बलवर्धक, शीत गुणात्मक, डोळ्यांना हितकर अशा गुणांचे असते. मातृस्तन्याचे महत्त्व - बाळाच्या पोषणासाठी मातृस्तन्य अत्यंत हितकारी असते. शिवाय आई आणि बाळ यांच्यामध्ये सुंदर भावनिक नाते स्तनपानाने निर्माण होते. अतिशय स्वच्छ, जंतुरहित असे हे स्तन्य असते, अतिसार, प्रवाहिका, उलट्या, कृमी इ. तक्रारी वरच्या दुधाने निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी "आईचे दूध' बाळाला द्यावे. ते पचण्यास हलके असते.


ज्वराच्या अवस्था

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

ज्वराच्या अवस्थाआयुर्वेदात ज्वर व्याधीचा किती विस्तृतपणे विचार केला आहे हे आपण पाहात आहोत. निदानस्थानात ज्वर हा पहिला समजावला आहे आणि सर्व पैलूंतून त्याची विस्तृत माहिती दिलेली आहे. असे म्हटले जाते की एकदा का ज्वर नीट समजला, की मग इतर रोग लक्षात येणे सोपे असते. मागच्या वेळी आपण ज्वर धातुगत झाला तर काय काय होते हे पाहिले, आता आपण ज्वराच्या तीन अवस्था पाहणार आहोत. ज्वराच्या तीन अवस्था ज्वराच्या एकूण तीन अवस्था सांगितल्या आहेत. १. आमावस्था २. पच्यमानावस्था ३. निरामावस्था आमावस्था : ज्वर येतो तेव्हा अग्निमांद्य असतेच. अग्निमांद्यामुळे आम तयार झाला आणि रसधातू स-आम झाला की ज्वर येतो. जेव्हा फक्‍त रसधातूच नाही तर ज्वराला कारणीभूत असणारा दोष स-आम असतो तेव्हा ज्वराला आमावस्था आली असे म्हणतात. आमावस्थेतील ज्वराची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात. - भूक लागत नाही, तोंडाला चव नसते, शरीर जड होते. - लाळ अधिक तयार होते, घशाशी येते. - छातीत, हृदयात काही तरी भरून ठेवले आहे असे वाटते. - डोके जड होते, तंद्रा अनुभूत होते. - उठणे-बसणे-हलणे वगैरे हालचाली करण्यानेही थकवा प्रतीत होतो. - मूत्रप्रवृत्ती अधिक प्रमाणात होते.


प्रश्‍नोत्तरे -

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

माझे वय ५६ वर्षे आहे. मला थायरॉईडचा त्रास आहे. सध्या सर्व तपासण्या व्यवस्थित आहेत पण गेल्या दोन महिन्यांपासून त्वचा व केस एकाएकी फार कोरडे होत आहेत. त्वचेवर सुरकुत्याही पडू लागल्या आहेत. सकाळी उठावेसे वाटत नाही. अंगात ताकद नाही असे वाटते. मी मसाज करून घेतला तर चालेल का? या वयात पंचकर्म करावे का? कृपया मार्गदर्शन करावे..... - श्रीमती आशा उत्तर - प्रकृतीचा व्यवस्थित विचार करून शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करण्याचा उपयोग होईल. मसाज करण्याचा म्हणजे प्रशिक्षित परिचारकाकडून, औषधांनी सिद्ध तेलाच्या साहाय्याने अभ्यंग करण्याचाही फायदा होईल. शरीरात आतपर्यंत जिरण्याची क्षमता असलेले "संतुलन अभ्यंग तेला'सारखे तेल हलक्‍या हाताने रोज रात्री झोपण्यापूर्वी लावण्याचाही उत्तम गुण येईल. थायरॉईडचे रिपोर्ट व्यवस्थित असले तरी थायरॉईड ग्रंथीला पुन्हा काम करण्यास प्रवृत्त करण्यास मदत करणारी आयुर्वेदिक औषधे घेणे श्रेयस्कर असते. यामुळे थायरॉईड ग्रंथीच्या अकार्यक्षमतेमुळे शरीराचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. पर्यायाने अशक्‍तता, त्वचा कोरडी पडणे वगैरे त्रास दूर होऊ शकतात. माझा मुलगा १३ वर्षांचा आहे.


आरोग्य सुभाषित

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

समदोषः समाग्निश्‍च समधातुमलक्रियः। प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ।। ....सुश्रुतसंहिता ज्या व्यक्‍तीचे वातादी दोष सम स्थितीत म्हणजे संतुलित आहेत, ज्याचा जाठराग्नी प्रखर किंवा मंद नसून मध्यम व सम प्रमाणात आहे, ज्याच्या शरीरातील धातू नियत प्रमाणात व संपन्न स्थितीत आहेत, ज्याची मलविसर्जनाची क्रिया व्यवस्थित होते आहे आणि ज्याचे मन, इंद्रिये व आत्मा प्रसन्न आहेत, त्या व्यक्‍तीला स्वस्थ (निरोगी) म्हणावे. शरीरातील त्रिदोष, सप्तधातू व त्रिमल आणि शरीरातील अग्नी (म्हणजेच हॉर्मोन्स) प्रमाणापेक्षा वाढून चालत नाहीत, तसेच प्रमाणापेक्षा कमी होऊनही चालत नाहीत. तेव्हा निरोगी आयुष्याची इच्छा असणाऱ्यां प्रत्येकाने ह्या सगळ्यांच्या संतुलनासाठी हर एक प्रकारे प्रयत्न करणे आवश्‍यक असते. संकलन - डॉ. सौ. वीणा तांबे


कांजिण्या

Posted: 02 Jun 2011 04:40 PM PDT

कांजिण्याकांजिण्या हा एक संसर्गजन्य विकार आहे. तो सहसा लहान मुलांना होतो परंतु मोठ्या माणसांनादेखील होऊ शकतो. लहान मुलांमध्ये सात ते दहा दिवसांच्या आजारपणानंतर हा त्रास शमतो. मोठ्या वयात हा गंभीर स्वरूप धारण करू शकतो. आजार बरा व्हायला जास्त दिवस लागतात व आजाराची तीव्रता आणि गुंतागुंत जास्त असते. आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे त्वचेवर लाल चट्टे उठतात. त्यावर लहान लहान पाणी धरलेले फोड येतात. असे चट्टे उठण्यापूर्वी रुग्णाला ताप येतो व आपली प्रकृती बरी नसल्याचे जाणवत असते. हे चट्टे चेहऱ्यावर आधी उठतात. शरीरावरून ते डोक्‍यात आणि हातापायांवर पसरतात. कधी कधी तोंडाला आणि जननेंद्रियांवरही असे चट्टे येतात. त्या भागांवर खूप खाज सुटू लागते. छोटे छोटे फोड मोठे होतात व त्यांवर खपली धरते. नव्या नव्या चट्ट्यांच्या लाटा येऊ लागतात. हा आजार व्हेरिसिला झॉस्टर नावाच्या विषाणूमुळे होतो. रुग्णाच्या अंगावर उठलेल्या फोडांतून स्पर्शाने अथवा हवेतून हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो.


1 comment:

Unknown said...

नमस्कार ,
आपला आयुर्वेद वरील ब्लॉग वाचण्यात आला .जनजागृती आपल्या ब्लॉग द्वारे होतेय हे बघून आनंद झाला .आपले काम प्रशंसनीय आहे.मी स्वत:
आयुर्वेद वैद्य आहे .आमची टीमचे ई -आयुर्वेद दिपावली विशेषांक 2012 चे प्रयोजन आहे .त्यासाठी ब्लॉगर मंडळीकडून लेख मागवण्यात येत आहे .अधिक
माहिती साठी संपर्क : dr.abhay16@gmail.com
या लिंक ला भेट दया :https://www.facebook.com/pages/E-ayurved-dipavali-visheshank-2012/413528472041170?ref=hl

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content