Search This Blog

फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर


श्रमिकाची विश्रांती

Posted: 05 May 2011 04:40 PM PDT

विश्रांतीसाठी फार न ताणता त्या बिंदूवर थोडा वेळ थांबल्याने व विश्रांती घेतल्याने शक्‍ती संक्रमणाची क्रिया जास्त चांगली व सुसूत्रित होऊ शकते. उलट, मध्ये विश्रांती न घेता सतत कार्यरत राहिल्यास शक्‍तीच्या परिवर्तनासाठी लागणारी मूळ शक्‍तीच अतिशय कमी होऊन गेल्यानंतर संपूर्ण कार्यक्षमताच कमी होते आणि म्हणून विश्रांती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. जीवन सर्वांसाठी जगून कृतकृत्य झाल्यानंतर घेतलेली समाधी म्हणजे ब्रह्मज्ञानी माणसाची विश्रांतीच असते. ल हान मुले निष्पाप, निरागस आणि देवासारखी असतात, शून्यात पाहतात, खूप झोपतात, पण म्हणून काही त्या समाधी अवस्थेला महत्त्व येत नाही. जी गोष्ट माहीतच नाही किंवा करताही येत नाही, ती न केली तर कुठले पुण्य मिळणार? जीवन सर्वांसाठी जगून कृतकृत्य झाल्यानंतर घेतलेली समाधी म्हणजे ब्रह्मज्ञानी माणसाची विश्रांतीच! श्रांत झाल्याशिवाय म्हणजेच काम करून दमल्याशिवाय विश्रांतीची मजा नाही.


No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content