Search This Blog

फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर


उन्हाळ्यातील रसपूर्ती

Posted: 21 Apr 2011 04:55 PM PDT

उन्हाळ्यातील रसपूर्तीउन्हाळ्याच्या दिवसात उष्ण गुणाच्या चहा-कॉफीच्या ऐवजी शहाळ्याचे पाणी, निरनिराळी सरबते किंवा आयुर्वेदात सांगितलेली पानके घेणे श्रेयस्कर असते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, रसाची पूर्ती होते आणि मनालाही समाधान मिळते. वा तावरणातील बदलांचा पडसाद जसा निसर्गात उमटतो, तसाच आपल्या शरीरात उमटत असतो. या बदलांना सहज सामोरे जाण्यासाठी आहार-आचरणात, जीवनशैलीत थोडाफार फरक करणेही आवश्‍यक असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यात जेव्हा बाह्य वातावरणातील तापमान वाढते, त्यावेळी शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीरात अनेक क्रिया घडत असतात. याचा परिणाम म्हणून घामाचे प्रमाण वाढते, शरीराला पाण्याची आवश्‍यकता अधिक प्रमाणात जाणवू लागते, थंड, रसरशीत आणि पातळ पदार्थ खाण्याची इच्छा होऊ लागते. उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण गुणाच्या चहा-कॉफीच्या ऐवजी शहाळ्याचे पाणी, निरनिराळी सरबते किंवा आयुर्वेदात सांगितलेली पानके घेणे श्रेयस्कर असते. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, रसाची पूर्ती होते आणि मनालाही समाधान मिळते. 1. लिंबू सरबत लिंबू बाराही महिने मिळत असले तरी उन्हाळ्यात ते विशेष उपयोगी असते.


माया सूर्याची

Posted: 21 Apr 2011 04:40 PM PDT

माया सूर्याचीजलतत्त्वाशिवाय जीवन नाही, किंबहुना पाण्यालाच 'जीवन' म्हणतात. माणसामाणसातील आपुलकी, ओलावा हेच जीवन ! शरीरात जवळ जवळ दोन तृतीयांश पाणीच असते व ह्यामुळे माणसाला ऊब जास्त आवडते. ऊब म्हणजे बाहेरील उष्णतेचा व मायेचा संबंध! शरीर आतून किंवा बाहेरून उष्णतेने तापू लागले की शरीरातील पाणी कमी होऊ लागते व जीव अस्वस्थ होतो. शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडले की एकूण जीवनाचेच संतुलन बिघडते. आ पल्याला काही मिळाले, की बरे वाटते पण द्यायची वेळ आली की नकोसे होते. आणि म्हणूनच देणारा तो 'देव' असे समजले जाते. मदत, कर्ज घेताना आनंद होतो, पण परत करण्याच्या वेळी नाना क्‍लृप्त्या लढवून टाळाटाळ करण्याचा प्रसंग येतो. हे सर्व मनुष्य स्वभावाला धरून साहजिकच घडत असते. पण ज्याने आपल्याला दिले, त्याच्याशी फसवाफसवी बरी नव्हे. जलतत्त्वाशिवाय जीवन नाही, किंबहुना पाण्यालाच 'जीवन'म्हणतात. माणसामाणसातील आपुलकी, ओलावा हेच जीवन ! पाण्यावाचून जगण्याची कल्पनाच करवत नाही. म्हणून वैज्ञानिक मंडळी मंगळ किंवा शुक्र ग्रहावर पाणी शोधण्याचा प्रयत्न करतात.


अरिष्ट लक्षणे

Posted: 21 Apr 2011 04:40 PM PDT

अरिष्ट लक्षणेअरिष्ट लक्षणांमध्ये शुभ-अशुभ स्वप्नांचाही समावेश केलेला आहे. रुग्ण स्वतः किंवा रुग्णाचे हितचिंतक, मित्र यापैकी कोणालाही शुभ-अशुभ स्वप्ने दिसली, तर त्याचे इष्ट किंवा अनिष्ट फळ येते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. अशुभ स्वप्नांचा परिणाम नाहीसा किंवा कमी करण्यासाठी काय करावे हे सुद्धा सांगितले आहे. रो गनिदान करताना पंचनिदानाखेरीज अरिष्ट लक्षणांकडे लक्ष ठेवणेही आवश्‍यक असते. अरिष्ट लक्षण म्हणजे मृत्यूसूचक लक्षणे. रोगिणो मरणं यस्मात्‌ अवश्‍यंभावि लक्ष्यते । तल्लक्षणमरिष्टं स्यात्‌ रिष्टं चापि तदुच्यते ।।...भावप्रकाश ज्या लक्षणांद्वारे भविष्यकाळात मृत्यू होणार आहे हे समजते त्यांना अरिष्ट किंवा रिष्ट असे म्हटले जाते. अरिष्ट लक्षणे दिसली की मृत्यू निश्‍चित असतो आणि मृत्यूपूर्वी अरिष्ट लक्षणे दिसतातच. सुश्रुतसंहितेत हे पुढील उदाहरणांवरून समजावलेले आहे. फलाग्निजलवृष्टीनां पुष्पधूमाम्बुदा यथा । ख्यापयन्ति भविष्यत्वं तथा रिष्टानि पञ्चताम्‌ ।। ज्याप्रमाणे फळ येणार हे फुलावरून सूचित होते, धूर आहे म्हणजे अग्नी आहे हे समजते, पाऊस ढगांशिवाय येत नाही, त्याप्रमाणे अरिष्ट लक्षणे दिसली की मृत्यू येणार हे निश्‍चित होते.


मुलामुलींची वाढ

Posted: 21 Apr 2011 04:40 PM PDT

मुलामुलींची वाढदीर्घकाळ हाल-उपेक्षा किंवा अपुरा आहार अशा कारणांनी मुलांची वाढ खुंटते. मुलांची वाढ व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने सकस संतुलित आहार, विविध प्रकारचे व्यायाम आणि मनाचे स्वास्थ्य यांचे महत्त्व प्रत्येक पालकाने जाणले पाहिजे. आ नुवंशिकतेतून आलेले गुणधर्म, सकस आणि संतुलित आहार आणि अंतःग्रंथींचे स्राव यावर वाढ अवलंबून असते. मुलाची उंची, वजन आणि डोक्‍याचा घेर या मोजण्यांवरून वाढीचा अंदाज लागतो. अर्भकांची, लहान मुलांची आणि प्रजननक्षमता प्राप्त होताना अशा तीन स्थितींतून वाढ होत राहते. वयाच्या पहिल्या दोन वर्षांत मुलांची वाढ सर्वांत जलद होते. नंतर काही वर्षे वाढ संथावते. पौगंडावस्थेच्या सुरवातीला पुन्हा वाढ जलद होऊ लागते. मुलांपेक्षा मुलींत ही पौगंडावस्थेच्या सुरवातीला होणारी वाढ अधिक लवकर व जलद दिसू लागते. कोणत्या वयात किती उंची असावी, किती वजन असावे व डोक्‍याचा घेर किती असावा, हे दर्शविणारे तक्तेही उपलब्ध आहेत. वेगळ्या देशांचे व देशातील वेगवेगळ्या ठिकाणांतील मुलांच्या वाढीचे तक्तेही आता उपलब्ध आहेत.


No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content