Search This Blog

फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर

मन सुंदर तर तन सुंदर!

Posted: 23 Dec 2010 04:55 PM PST

मन सुंदर तर तन सुंदर!मानसिक ताण हा सौंदर्याचा शत्रू आहे. एखाद्या रेशमी कापडाच्या पिशवीत खूप वजन टाकले, तर कापड विरून फाटू शकते किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत खूप गरम तापमानाचे द्रव्य ओतले, तर पिशवी वितळून फाटू शकते, तसेच मानसिक ताणाचा परिणाम शरीरावर होतो. बाहेर असते शरीर, तर आत असते मन. मनाची सत्ता सर्व इंद्रियांवर असल्यामुळे मनाने इंद्रियव्यापार व्यवस्थित चालवला नाही, तर आरोग्यावर- पर्यायाने सौंदर्यावर परिणाम होणे अटळ असते. सततच्या मानसिक ताणाने शरीरात उत्पन्न होणारी उष्णता सर्वप्रथम त्वचेवर, त्यानंतर डोळ्यांवर व सरतेशेवटी पचनसंस्थेवर, पर्यायाने सौंदर्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या गोष्टी व तारुण्यावर वाईट परिणाम करते. लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत नाहीत असा एक समज आहे पण तो खरा आहे असे नाही. बुद्धीने निर्णय घ्यायचा म्हटले की ताण उत्पन्न होतो, त्यामुळे सौंदर्यावर परिणाम होतो म्हणून सौंदर्य व बुद्धिमत्ता एकत्र राहत नाही, असेही म्हणतात. याचा अर्थ कुरूप मनुष्य हुषार असतोच असे नाही. मानसिक ताण असल्यास झोप अशांत व अपूर्ण राहून झोपेपासून वंचित राहण्यामुळे त्रास होऊ शकतो व याचा परिणाम सौंदर्यावर होतो.

मरगळ

Posted: 23 Dec 2010 04:40 PM PST

मरगळआपल्याला डिप्रेशन असेल असे वाटणाऱ्या व्यक्तीने प्रथम मानसोपचार तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. जितक्‍या लवकर उपचार सुरू होईल, तितक्‍या लवकर आजारातून बरे होणे शक्‍य असते. उपचारांमध्ये डॉक्‍टरांशी संभाषण हा महत्त्वाचा भाग असतो. डि प्रेशन किंवा खिन्नता ही एक नेहमी आढळणारी व्याधी आहे. आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी खिन्नतेचा अनुभव येणे, ही एक सामान्य घटना होय. अशा माफक खिन्नतेमुळे माणसाला "बरे वाटत नाही' आणि "मनासारखे काही होत नाही' अशी भावना येते. परंतु आपापले दैनंदिन व्यवहार चालू ठेवता येतात. अशा व्यक्तींना जीवन ही एक न संपणारी संघर्षांची साखळी आहे, असे जाणवत राहते. आजाराची तीव्रता वाढल्यास रुग्णाला त्याची नेहमीची जीवनशैली कंठणे कठीण होते. आयुष्यात अर्थ नाही असे वाटू लागते. आत्महत्येचे विचार येतात. अशा व्यक्तीला उपचारांची गरज असते. हा विकार स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात होतो. वाढत्या वयात जेव्हा असा आजार येतो, तेव्हा त्या व्यक्तीला "बुद्धिभ्रंश' (dementia) झाला आहे की काय, अशी शंका येऊ लागते. लहान मुलांना आणि तरुणांनादेखील हा विकार होऊ शकतो.

सौंदर्यवर्धन

Posted: 23 Dec 2010 04:25 PM PST

सौंदर्यवर्धननैसर्गिक द्रव्यांच्या साह्याने सौंदर्यरक्षण व सौंदर्यवर्धन करण्याची प्राचीन परंपरा आहे. आज आपण नैसर्गिक द्रव्यांचा सौंदर्यासाठी कसा उपयोग होतो, अंतर्बाह्य सौंदर्यासाठी कोणकोणती औषधे, कोणकोणते योग उपयोगी पडतात हे पाहणार आहोत. सौंदर्य टिकविण्यासाठी, तसेच वाढविण्यासाठी देवदेवतांपासून मनुष्यांपर्यंत तसेच राजेरजवाड्यांपासून आश्रमात राहणाऱ्या वनकन्येपर्यंत सर्वांनीच प्रयत्न केलेले दिसतात. पार्वतीने गणपतीचे शरीर तिच्या अंगावरील उटणे काढून तयार केले होते, अशी कथा आहे. रामचंद्रांना अष्टगंधाच्या उटण्याने अंघोळ घातली जात असे, अशीही कथा आहे. मुगलांची राणी सुगंधी गुलाबाच्या पाकळ्यांनी, गुलाबाच्या अर्काने युक्‍त पाण्याने स्नान करत असे. शकुंतला आश्रमात राहात असली तरी चेहऱ्याला "कोष्ठ' नावाच्या सुगंधी वनस्पतीचा लेप लावत असे. संस्कृत साहित्यात चंदन, केशर, हळद, अगरू, काजळ, आळता, तिलक वगैरेंचे उल्लेख ठिकठिकाणी आढळतात. स्तन व शरीरावर चित्रे काढून रंगविणे यांसारख्या गोष्टींचेही वर्णन केलेले दिसते. थोडक्‍यात काय, तर नैसर्गिक द्रव्यांच्या साह्याने सौंदर्यरक्षण व सौंदर्यवर्धन करण्याची प्राचीन परंपरा आहे.

रोगांचे प्रकार

Posted: 23 Dec 2010 04:10 PM PST

उपचार करताना दोष आणि दूष्य या दोन्ही कारणांचा नाश होईल याकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. प्रकूपित झालेला दोष शमवणे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच दोष-दूष्यांचा संयोग तोडणेही महत्त्वाचे आहे. दोष-दूष्यांचा संयोग तसाच राहिला तर रोग मुळापासून पूर्ण बरा झाला, असे म्हणता येत नाही. रोगांचे पर्यायवाचक शब्द आणि त्यांचे अर्थ आपण मागच्या वेळेला पाहिले. दोष व दूष्य (धातू व मल) यांच्यातील परस्परसंबंधही पाहिला. दोषांच्या प्रकोपामुळे विविध रोग होतात असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा यातील प्रकूपित दोष हे कारण असतात, तर रोग हे कार्य असते. कोणतेही कार्य कारणाशिवाय होत नाही. ज्याप्रमाणे कापड तयार होण्यासाठी धागे आवश्‍यक असतात, त्याचप्रमाणे धाग्यांचा संयोगही महत्त्वाचा असतो. तसेच रोग होण्यासाठी प्रकूपित दोषांबरोबरच दोष व दूष्य (धातू व मल) यांचा संयोग होणे, हेही महत्त्वाचे असते. आयुर्वेदात यालाच दोष-दूष्य संमूर्च्छना असे म्हणतात. उपचार करताना या दोन्ही कारणांचा नाश होईल याकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. म्हणजे प्रकूपित झालेला दोष शमवणे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच दोष-दूष्यांचा संयोग तोडणेही महत्त्वाचे आहे.

प्रश्‍नोत्तरे

Posted: 23 Dec 2010 03:55 PM PST

मला ऍसिडिटीचा खूप त्रास आहे, विशेषतः पाळीच्या आधी ऍसिडिटी वाढते. पोट खूप दुखते, उलट्या वा जुलाब होतात. ५-६ जुलाब झाले की मग बरे वाटते. एरवीही मला रोजच २-३ वेळा शौचाला होते. कृपया मार्गदर्शन करावे....अपर्णा के. उत्तर - पाळीच्या आधी थोड्या प्रमाणात उष्णता वाढणे स्वाभाविक असते पण उलट्या-जुलाब होण्यापर्यंत त्रास होतो आहे त्यावर स्त्रीसंतुलनासाठी उपाय योजणेही आवश्‍यक होय. स्त्रीसंतुलनासाठी तसेच शरीरातील अतिरिक्‍त उष्णता कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी "फेमिसॅन तेला'चा पिचू योनीमध्ये ठेवणे उत्तम असते. शतावरी कल्प घालून दूध घेण्याचा, सकाळ-संध्याकाळ "पित्तशांती'सारख्या पित्त संतुलनास मदत करणाऱ्या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. नियमित पादाभ्यंग करण्यानेही ऍसिडिटी कमी होण्यास मदत होईल. मी १५ वर्षांची असल्यापासून माझ्या पाठीवर खूप पिंपल्स येतात, त्याचे नंतर डाग राहतात. खूप उपाय करूनही माझी पाठ कधीच क्‍लिअर नसते. मी चिकन, मासे खाणे सोडून दिले आहे. रोज मोरावळा आणि एक चमचा तूप खाते आहे. वर्षातून दोन वेळा एरंडेल घेते. कृपया आपण उपाय सुचवावा....

आरोग्य सुभाषित

Posted: 23 Dec 2010 03:40 PM PST

स्मितं किञ्चिद्वक्‍त्रे सरलतरलो दृष्टिविभवः परिस्पन्दो वाचामभिनवविलासोक्‍तिरसः । गतानामारम्भः किसलयितलीलापरिकरः स्पृश्‍यन्त्यास्तारुण्यं किमिव न हि रम्यं मृगदृशः ।।....भर्तृहरी ओठावर मंद स्मित, यौवनाने सजलेली मोहक नजर, मधुर, सरस वाणी असणाऱ्या, पालवी फुटण्यापूर्वी येणाऱ्या नवांकुराप्रमाणे कोमल पाय टाकत चालणाऱ्या मृगनयनी युवतीचा कोणता आविष्कार मोहक व आकर्षक नसतो? निश्‍चितच मोह वाढवतो. - संकलन - डॉ. सौ. वीणा तांबे

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content