फॅमिली डॉक्टर |
| Posted: 21 Oct 2010 04:40 PM PDT जीवन संतुलित नसले आणि वागण्या बोलण्यात केवळ स्वार्थप्रेरित स्वभाव ठेवला, की त्यातून उत्पन्न होते, संग्रहाची आवड. वस्तूंचा अति संग्रह केला, की जसे कशाचाच उपयोग होत नाही, तसेच मलसंग्रह वाढवत नेला की अन्नातील कुठलीच शक्ती मिळत नाही. श रीरपोषणासाठी ज्या ज्या वस्तू शरीरात स्वीकारल्या जातात म्हणजे अगदी अन्न-पाणी सुद्धा, त्या वस्तूंमधील महत्त्वाचा शरीरोपयोगी भाग काढून घेतला, की मलभाग (म्हणजे मूत्र-शौच वगैरे) बाहेर टाकावाच लागतो. हा मल जर पोटात धरून ठेवला तर तो माणसाचे जीवनच चावून टाकतो आणि कधी कधी वारंवार शौचालयाकडे पळायलाही लावतो. खरोखर काय काय नाही केले माणसाने पोट साफ व्हावे म्हणून! कमी जेवून पाहिले, जास्त जेवून पाहिले, जमालगोट्याचीही कमाल काही दिसली नाही. आयुर्वेदाने तर रेचनीय व पोट साफ होण्यासाठी अनेक औषधे सुचवली. काही कंपन्यांनी तर औषधाला नावच असे दिले, की त्यावरून लक्षात यावे, की बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) कधीच जाणार नाही व औषध कायमच घ्यावे लागेल. तेही करून पाहिले, पण बद्धकोष्ठ तसेच! मनुष्य जेवतो. त्यानंतर त्यातील सार भाग स्वीकारला जाऊन मलभाग टाकून द्यावा ही योजना असते. |
| You are subscribed to email updates from फॅमिली डॉक्टर To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
| Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 | |
No comments:
Post a Comment