Search This Blog

आरोग्य आणि वैद्

आरोग्य आणि वैद्


वैद्यकाच्या दाही दिशा : ताई ची आणि ...

Posted: 25 Aug 2010 09:00 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २६ ऑगस्ट २०१०
चीनच्या सुंग घराणे राज्यातील (इ. स. ९६० ते १२७९) चँग सॅन फेंग नावाच्या टाओपंथीय, मार्शल आर्ट प्रवीण मुनीची ही गोष्ट! (कदाचित कल्पितही असू शकेल!) त्याने एकदा प्रचंड सारस पक्ष्याची व एका सर्पाची लढाई पाहिली. ज्या लवचिकतेने, सफाईने व गतीने त्या छोटय़ाशा सर्पाने त्याच्याहून खूप मोठय़ा व ताकदवान सारस पक्षाशी लढत दिली, स्वसंरक्षण केले व योग्यवेळी चपळतेने, आक्रमण करून शेवटी त्याचा पराभव केला,

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ...

Posted: 21 Jul 2010 08:07 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २२ जुलै २०१०
'दमा' हा श्वसनाचा विकार आहे हे आपणास सहजगत्या उमगते; पण सतत दमल्यासारखे वाटते हे 'चुकीच्या श्वसनामुळे' असू शकेल हे आपल्या लक्षात येणे जरा कठीण आहे. 'स्पाँडिलायटीस' किंवा 'स्लिप डिस्क'मुळे मान, पाठ दुखते हे आपणास माहीत असते; पण श्वासाचा आकृतीबंध बिघडल्यामुळेही असे होऊ शकते, असे कोणी आपणास सांगितले तर ते खरे वाटणार नाही. मनोविकृतींमुळे नैराश्य व नाहक चिंता निर्माण होतात हे आपण वाचलेले असते; पण श्वसनतंत्र बिघडल्यानेही ते निर्माण होऊ शकतात हे आपल्या गावीही नसते;

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : उपचारांची ...

Posted: 07 Jul 2010 07:38 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर, गुरुवार, ८ जुलै २०१०
सर्वसाधारणपणे उपचार म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर गोळ्या, औषधे, शल्यक्रिया, मसाज, लेप, व्यायाम, आहार-विहाराची पथ्ये, किरणोपचार, मानसोपचार, समुपदेशन या व अशा काही ठोस गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण कोणी नुसते आपले हात हातात घेऊन किंवा स्पर्श करून किंवा शरीराभोवती काही हातवारे करून आपल्याला बरे करतो म्हणाला तर आपल्याला निश्चितच चमत्कारीक वाटेल.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : अस्तित्वाचे ...

Posted: 23 Jun 2010 07:55 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २४ जून २०१०
विविध व्याधी विकारांवर उपलब्ध असलेल्या उपचारपद्धतींकडे एक धावती नजर टाकली तरी त्यांचे अधिष्ठान फार पूर्वीच्या काळी फक्त 'देह' हेच होते उदा. मसाज, सांधे व मऊ उती यांच्या मसाजावर अधिष्ठित चिनी उपचारपद्धत टय़ुइना (Tuina) इ. व आता त्या अधिकाधिक 'मना'धिष्ठित होत चालल्या आहेत. उदा. डॉ. बारव पुष्पोपचार पद्धती इ. हे सहज लक्षात येते. वास्तविक अस्तित्वाचे दोन्ही आयाम 'मन' व 'देह' हे महत्त्वाचे आहेत, परस्परावलंबी आहेत व कोणत्याही व्याधी विकारात दोघांवर उपचार महत्त्वाचे असतात हे विसरून चालणार नाही.

Read more...


सायलंट किलर ‘हिपेटायटिस सी’पासून ...

Posted: 19 Jun 2010 09:04 AM PDT

सुहास धुरी
suhas.dhuri@expressindia.com
सायलंट किलर म्हणून ओळखला जाणारा हिपेटायटिस सी हा आजार दिवसेंदिवस घातक होत चालला असून याबाबत निष्काळजी केल्यास तो थेट मृत्यूच्या दाढेत तो घेऊन जाऊ शकतो अशी भीती जसलोक आणि फोर्टिस रुग्णालयाच्या कन्सल्टिंग हेपॅटोलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. आभा नगराल यांनी व्यक्त केली आहे. इन्सालच्या अभ्यासानुसार  एचसीव्ही चा प्रसार हा भारतात अधिक वेगाने होत असून दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांना याची लागन होत आहे.

Read more...


यशस्वी भव! (२०१०)

Posted: 15 Jun 2010 05:52 AM PDT

शालांत परीक्षेच्या उंबरठ्यावर

मराठी माध्यम

मराठी (प्रथम भाषा)
लेख-१ | लेख-२ |लेख-३ |लेख-४ | लेख-५ | लेख-६ 

ENGLISH (L.L.)
लेख-१ | लेख-२ | लेख-३ | विशेष लेख  | लेख-४

संस्कृत (संपूर्ण)
लेख-१ |लेख-२ |लेख-३

संस्कृत (संयुक्त)
लेख-१ |लेख-२ | लेख-३ |

हिंदी (संपूर्ण)
लेख-१ | लेख-२ | लेख-३लेख-४ 

हिंदी (संयुक्त)
लेख-१ |लेख-२ |लेख-३ 

इतिहास-
लेख-१
| लेख-२ | लेख-३ |लेख-४ | लेख-५  |    

नागरिकशास्त्र

लेख-१ |लेख-२ (new)

भूगोल-
लेख-१ | लेख-२ | लेख-३  | लेख-४ 

अर्थशास्त्र
लेख-१| लेख-२|

विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग एक)
लेख-१ | लेख-२ | लेख-३ |लेख-४ | लेख-५ | लेख-६  

विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग दोन)
लेख-१ |लेख-२ |लेख-३ |लेख-४  |लेख-५ 

बीजगणित
लेख-१ |लेख-२ |लेख-३ |लेख-४ | लेख-५ 

भूमिती
लेख-१ | लेख-२ | लेख-३| लेख-४ 

English Medium

Science & Technology Part I
Article-1 | Article-2 | Article-3 | Article-4 |Article-5  |Article-6 |

Science & Technology Part II
Article-1 | Article-2 | Article-3 | Article-4 | Article-5 | Article-6   

Geometry -
Article-1 | Article-2 |Article-3 | Article-4 | Article-5 |  

Algebra -

Article-1 |Article | Article-3 | Article-4 | Article-5  


वैद्यकाच्या दाही दिशा : उपचारांच्या ...

Posted: 09 Jun 2010 07:50 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर , गुरुवार, १० जून २०१०
तो १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील, रंगभूमीवरील एक नामवंत शेक्सपिअरिअन नट! त्याच भांडवल म्हणजे त्याचा अवाज, पण तोच हळूहळू बसत एक दिवस नाहीसा होतो. सर्व प्रकारचे उपचार तो करून पाहातो; पण कशाचाच उपयोग होत नाही. मग एक दिवस आरशासमोर उभे राहून सराव करताना, संवाद फेकताना आपले शरीर नको एवढे ताठरते हे  त्याच्या लक्षात येते आणि तो हळूहळू शरीरातील विविध स्नायूंमधील हा तणाव प्रयत्नपूर्वक काढून टाकतो आणि एक दिवस, अहो आश्चर्यम्, त्याचा आवाज चक्क पूर्ववत होतो!

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ‘देही’ असो ...

Posted: 19 May 2010 07:48 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २० मे २०१०
'चित्ती असो द्यावे समाधान' या संतवचनाला अनुसरून आणि अगदी आधुनिक चेतावैद्यकाच्या सिद्धांतानुसारही, शरीरस्वास्थ्याकरिता मानसिक समाधान असणे अत्यावश्यक असते. तसे असेल तर शरीरात अनेक प्रकारची पोषक चेतारसायने उदा. आनन्दामाईड्स निर्माण होऊन एकप्रकारची 'फील गुड' भावना तर निर्माण होतेच, पण रक्तदाब, रक्तशर्करा पातळी नियमनापासून ते विविध संप्रेरकांचा समतोल साधण्यापर्यंत अनेक गोष्टी साध्य होतात.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ...

Posted: 05 May 2010 07:56 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, ६ मे २०१०
अमेरिकेतील टेक्सास विश्वविद्यालयातील क्ष-किरण चिकित्सक डॉ. ओ. कार्ल सिमॉनटन यांनी १९७१ साली वर्णन केलेल्या ६१ वर्षांच्या घशाच्या असाध्य कर्करोगाने ग्रस्त रुग्णाची ही कहाणी 'शरीर-मन वैद्यकाच्या' इतिहासात एक नवीन अध्याय सुरू करण्यास कारणीभूत ठरली असं म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. या रुग्णाचा कर्करोग हा अंतिम अवस्थेत होता, त्याला गिळताही येत नव्हते,

Read more...


क्षयरोग

Posted: 27 Apr 2010 11:59 AM PDT

अलकनंदा सुळे - बुधवार, २८ एप्रिल २०१०
डॉ. चित्ररेखा कुलकर्णी

एखाद्या गोष्टीचा क्षय होणे म्हणजे नाश होणे असे आपण समजतो. तसेच क्षयरोगाचा संसर्ग आपल्या शरीरातील निरनिराळय़ा अवयवांना झाल्यास त्यातील पेशींचा नाश होऊन रसग्रंथी व आवरण यांचा क्षय होतो. क्षय हा आजार संसर्गजन्य असून पूर्वी तो गुरांकडून संसर्गित होतो असे समजले जात असे. पूर्वीच्या काळी क्षय हा जीवघेणा आजार होता. त्यास राजयक्ष्मा असे संबोधिले जायचे. तसेच क्षय हा दीर्घकाळ चालणारा आजार असून फक्त फुफ्फुसाचा रोग समजला जायचा. परंतु तो इतर अवयवांनासुद्धा बाधा करू शकतो.

Read more...


No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content