Search This Blog

जेट लॅग टाळण्यासाठी...

 

प्रवास केल्यानंतर येणारा शिणवटा म्हणजे जेट लॅग! विमानातून बराच काळ प्रवास केल्यानंतर अस्वस्थपणा,

सुस्ती, थकवा, डोकेदुखी आणि वैताग अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल, तर तुम्ही जेट लॅगने पछाडले आहात असं समजायला हरकत नाही.
जेट लॅगपासून सुटका मिळवण्यासाठी हे लक्षात ठेवा :
विमानात मधल्या मागिर्केमधून थोडा वेळ चाला. यामुळे पायाचे आणि शरीराचे स्नायू आखडणार नाहीत. तसंच रक्ताभिसरण सुधारून पायात क्रॅम्प येण्यापासून रोखलं जातं.
पाय स्ट्रेच करताना पायातील चपला/शूज काढून ठेवा.
भरपूर पाणी प्या.
कानाला दडे बसू नये म्हणून कानात कापसाचे बोळे किंवा इअर फोन घाला.
डीप व्हेन थ्रॉमबोसिस : बराच काळच्या विमानप्रवासामुळे अनेकांना अस्वस्थपणा, पायात क्रॅम्प येणं किंवा शरीर कडक बनणं अशा समस्या उद्भवू शकतात. पुढे जाऊन या समस्या गंभीर रूप घेऊ शकतात. यालाच डीप व्हेन थ्रॉमबोसिस म्हणतात. यामुळे रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊन अनेक समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी जमेल तेव्हा विमानात मधून मधून थोडा वेळ चालायला हवं.
विमानात बसल्या जागी काही सोपे व्यायाम करून जेट लॅगला रोखता येईल.
विमानात बसलेले असताना शरीर स्ट्रेच करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि स्नायूंना येणारा बधिरपणा रोखता येईल. थोड्या थोड्या वेळाने शरीर ताठपणे स्ट्रेच करून आपला विमानप्रवास सुसह्य करता येईल.
बसलेल्या स्थितीत एक पाय सीटवर घ्या. हळूहळू त्या पायाचा गुडघा छातीला टेकवा. थोड्या वेळाने दुसरा पाय सीटवर घेऊन असाच व्यायाम करा.
शोल्डर रोल्स : दोन्ही हात खांद्यांवर टेकवून खांदे पुढच्या बाजूने आणि मग मागच्या बाजूने फिरवा.
हात आणि पाठीचा कणा स्ट्रेच करा : दोन्ही हात डोक्यावर सरळ वर धरा. अशा स्थितीत हात आणि पाठीचा कणा दोन्ही ताठ करून थोडं वरच्या बाजूने स्ट्रेच करा.
टो रेज : तळव्यावर उभं रहा आणि मग, थोड्या वेळाने पूर्ण पाय जमिनीवर टेकवून पायांना आराम द्या.
फीट रोटेशन : काही वेळ घड्याळातील काट्यांप्रमाणे आणि काही वेळ काट्यांच्या विरुद्ध दिशेप्रमाणे पाय फिरवा.
- क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्स्पर्ट, नमिता जैन

Maharashtra Times

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content