त्राटक म्हणजे एकटक एका लक्ष्यावर डोळे खिळवणं. या त्राटकाने मनाची एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वाढतो, स्मरणशक्ती सुधारते, मनाची संकल्पशक्ती वाढून नियोजित ध्येयात यशस्वी होण्यास मदत होते. दृष्टी सुधारते, डोळ्यांची शक्ती वाढून त्याचे त्रास कमी होतात. मन:शांती मिळते. त्राटकामुळे उजेर्चं केंदीकरण होऊन उत्साह वाढण्यास मदत होते. घेरंड संहितेत शरीर-मनाच्या स्वच्छतेनंतर आसन, प्राणायामांनी आरोग्याचे लिंपन साध्य होतं, असं सांगितलं आहे. त्या शुद्धीक्रियेत त्राटकाचा समावेश होतो. आकाशातले चंद, तारे यावर लक्ष केंदित करणं, मेणबत्तीच्या ज्योतीवर त्राटक, दक्षिणदृष्टी, वामदृष्टी (नजर डावी-उजवीकडे वळवून एका बिंदूवर एकाग्रता वाढवणे) अशा अनेक प्रकारांनी त्राटक करता येतं.
पुर्ण महितीसाठी म.टा लेख
म.टा: ताणतणावाचं लोडशेडिंग : त्राटक
No comments:
Post a Comment