Search This Blog

दूध,दही,तूप,मध (संकलीत)

दूध - गाईचे दूध सर्वात श्रेष्ठ. ते पचायला हलके, गोड, पित्ताचा नाश करणारे, बळ देणारे आहे. शेळीचे दूध हे ही पथ्यकर असते. म्हशीचे दूध पचायला जड असते. - दूध तापवून प्यावे. - दूध कुठल्याही आंबट फळाबरोबर, खार्‍या पदार्थांबरोबर घेउ नये.

दही - दही खाताना थंड असले तरी पचल्यानंतर उष्ण गुणाचे होते. गोड, व्यवस्थित लागलेले दही पुष्टीकर असते. अर्धवट लागलेले किंवा आंबट दही त्वचाविकार निर्माण करते, सूज वाढवते. दही रात्री खाउ नये. - सर्दी, खोकला असताना दही खाऊ नये.

तूप - तूप भूक वाढवणारे, स्मृति, बुद्धी वाढवणारे, त्वचेचे कांतिवर्धन करणारे असते. डोळ्यांची आग होणे, दुखणे, चष्म्याचा नंबर यासाठी उपयुक्त. - अजीर्ण असताना तूप खाऊ नये. - पोट साफ होण्यासाठी रात्री झोपताना गरम दूध + तूप घ्यावे. - नाक लाल होऊन रक्त येत असेल तर नाकात तूप सोडावे. - डोळ्यांसाठी तूप, मध साखर रोज खाल्ल्याने फायदा होतो.

मध - मध गोड, रूक्ष, कफावर कार्य करणारा आहे. - मध गरम करून अथवा उष्ण पदार्थांसह खाऊ नये. - डोळ्यात मध घातल्यास डोळ्यांना फायदा होतो. - मध पाण्याने वारंवार लागणारी तहान शमते. - तोंड आले असता मध घालून पाण्याच्या गुळण्या कराव्या.

2 comments:

DR.VRUSHALI TOLE said...

mala tumchi hi website khup avadli. mi svataha ayurvedatcharak samhitemadhe M.D. zaley. sadhhya mi U.S.A. madhe aste. mazya dnyanacha kahi tumhala upayog hoil ani malahi apnasarkhya anubhavi vaidyankadun kahi shikayla milel tar mi maze bhagya samjen.

Dr. Vrushali Tole
Seattle, WA, U.S.A.

Anonymous said...

Vrushali,

I have sent you an email on Drs behalf to your ID

regards

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content