Search This Blog

प्रश्नोत्तरे

माझी मुलगी नऊ वर्षांची आहे. तिच्या एका गालावर दोन महिन्यांपासून पांढरा चट्टा दिसतो आहे. लहानपणापासून मान, बगल येथील त्वचा काळवंडलेली आहे. रोझ ब्युटी तेल लावतो आहोत. कृपया मार्गदर्शन करावे. 

‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईलच, बरोबरीने आतून रक्‍तशुद्धी होणे गरजेचे आहे. त्यासाठी शतावरी कल्प घालून दूध घेणे, ‘अनंत सॅन’ गोळ्या घेणे चांगले. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे पांढरट डाग किंवा चट्टे हे पोटात जंत असल्याचे निदर्शक असतात. तेव्हा मुलीला दर तीन महिन्यांनी जंतांचे औषध देणे चांगले. महिन्यातून आठ दिवस सकाळी पाव चमचा वावडिंग चूर्ण मधात मिसळून देण्याचा, काही दिवस सकाळ-संध्याकाळ ‘संतुलन बाल हर्बल सिरप’ देण्याचा उपयोग होईल. बेकरी उत्पादने, तळलेले व आंबवलेले पदार्थ, गवार, ढोबळी मिरची, वांगे, दही या गोष्टी आहारातून टाळणे चांगले.

माझ्या पत्नीचे गुडघे दुखतात व गुडघ्यांवर सूजही आलेली आहे. गुडघ्यांमध्ये इंजेक्‍शन घेतले की दुखणे तात्पुरते बंद होते. सध्या इंजेक्‍शन बंद केले आहे. मात्र गुडघे दुखल्यामुळे उठणे, बसणे, चालणे कठीण झालेले आहे. कृपया उपाय सुचवावा.
- माधव मोरे

त्रासाची तीव्रता लक्षात घेता वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन नेमकी औषधे सुरू करणे सर्वांत चांगले. बरोबरीने दिवसातून दोन-तीन वेळा गुडघ्यांवर ‘सॅन वात लेप’ गरम पाण्यात मिसळून लावणे व तीस-चाळीस मिनिटांनी काढून टाकणे, ‘संतुलन वातबल गोळ्या’, रास्नादी गुग्गुळ, ‘संतुलन संदेश’ आसव घेणे हे उपाय सुरू करता येतील. दिवसभर प्यायचे पाणी अगोदर उकळून घेतलेले व थर्मासमध्ये भरून ठेवून गरम असताना पिणेसुद्धा चांगले. तांदूळ, ज्वारी, नाचणी, मूग, वेलीवर येणाऱ्या फळभाज्या, ताजे गोड ताक, घरी बनविलेले साजूक तूप यांचा आहारात समावेश असावा. 

माझा मुलगा झोपेत बऱ्याच वेळा तोंडाने श्वास घेतो. याचे कारण काय असावे? यावर उपाय काय योजावा?
- पाटील 

झोपेत तोंडाने श्वास घ्यावा लागण्यामागे सहसा नाक बंद पडणे हे मुख्य कारण असते. सर्दी नसली तरी असा त्रास होऊ शकतो. यावर उत्तम उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी नाकात ‘नस्यसॅन घृता’चे दोन-तीन थेंब टाकणे व रोज सकाळी पाच मिनिटांसाठी अनुलोम-विलोम हा प्राणायाम करणे. यामुळे नाकातील अवरोध दूर होण्यास मदत मिळाली की हळूहळू तोंडाने श्वास घेणे बंद होईल. सर्दी होण्याची प्रवृत्ती असली तर ‘ब्राँकोसॅन सिरप’ घेणे, अधून मधून गरम पाण्याचा वाफारा घेणे हे सुद्धा चांगले.

माझे वय ४० वर्षे असून सात-आठ वर्षांपासून रक्‍तदाबाचा व थायरॉइडचा त्रास आहे. सध्या आयुर्वेदिक औषधे घेते आहे, पण चेहरा व दोन्ही हात खूप काळवंडलेले आहेत. सकाळी उठल्यावर हाडे कटकट वाजतात. हाडे व्यवस्थित राहावीत यासाठी काही उपाय सुचवावा. फेमिसॅन तेलाचा घरच्या घरी वापर केला तर चालेल का? किंवा डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा लागेल?
- चंदा कोकटनूर

कमी वयात त्रास सुरू झाले आहेत. आयुर्वेदिक औषधे घेणे चांगलेच आहे. योग्य निदान करून प्रकृतीनुरूप आयुर्वेदिक औषधे घेण्याने क्रमाक्रमाने उच्च रक्‍तदाब व थायरॉइडच्या गोळ्या कमी करता येतात असा अनुभव आहे.

‘फेमिसॅन तेल’ घरच्या घरी वापरता येते. यामुळे चेहरा व हातांवरचा काळपटपणा कमी होण्यासाठी मदत मिळेल. बरोबरीने सकाळ-संध्याकाळ पंचतिक्‍त घृत घेता येईल. हाडांचा कटकट आवाज येतो त्यासाठी तसेच हाडांच्या एकंदर आरोग्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण अंगाला ‘संतुलन अभ्यंग (तीळ) सिद्ध तेल’लावण्याचा आणि सकाळ-संध्याकाळ ‘कॅल्सिसॅन गोळ्या’ घेण्याचा उपयोग होईल. स्त्रीसंतुलन, तसेच एकंदर रक्‍तदाब, थायरॉइड वगैरे तक्रारींवर नियमित ज्योतिध्यान करण्याचा, तसेच ‘सोम’ध्यान करण्याचाही उत्तम गुण येतो असा अनुभव आहे.

‘फॅमिली डॉक्‍टर’ पुरवणीमधील लेखांमधून खूप मार्गदर्शन होते. ‘प्रश्नोत्तर’ सदरातील उत्तरांनी अनेक शंकांचे निरसन होते व आरोग्य चांगले राहते हा आमचा अनुभव आहे. माझा मुलगा १४ वर्षांचा आहे. सध्या त्याच्या दोन्ही हातांची बोटे खूप भगभग करतात. गेल्या वर्षी चिरा पडून त्यातून रक्‍तही आले होते. त्याला थंडीतही गरम होते. कृपया यावर उपाय सुचवावा. हातांच्या जळजळीमुळे तो फार बेचैन होतो.
- मंगल

रक्‍तामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे या प्रकारचा त्रास होऊ शकतो. मुलाला तळहातांना आलटून पालटून तूप लावून काशाच्या वाटीने चोळण्याचा उपयोग होईल. साध्या तुपाऐवजी ‘संतुलन पादाभ्यंग घृत’ किंवा वैद्यांच्या सल्ल्याने मधुरम्‌ घृत वापरणे अधिक चांगले. ‘संतुलन पित्तशांती’, ‘अनंत सॅन’ गोळ्या घेणे, आहारात चार-पाच चमचे साजूक तुपाचा समावेश करणे चांगले. वांगे, गवार, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, चिंच, टोमॅटो, आंबट फळे, दही, तळलेले पदार्थ आहारातून वर्ज्य करणे श्रेयस्कर.

News Item ID: 
558-news_story-1556271749
Mobile Device Headline: 
प्रश्नोत्तरे
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Question Answer
Author Type: 
External Author
डॉ. श्री बालाजी तांबे
Search Functional Tags: 
आरोग्य, दूध, drug, सकाळ, Bali, मूग, आयुर्वेद, Health, स्त्री, थंडी
Twitter Publish: 

मणक्‍याची शस्त्रक्रिया समज-गैरसमज

शस्त्रक्रियांबद्दल कोणीतरी त्याचा अनुभव म्हणून काही तरी सांगते. त्यातून गैरसमज पसरत जातात. आपल्याला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आलेला असेल, तर आसपासच्यांची अशास्त्रीय मते-सल्ला ऐकण्याऐवजी वैद्यकीय तज्ज्ञांकडून त्या शस्त्रक्रियेचे धोके, फायदे समजून घेणेच उत्तम ठरेल.

‘डॉक्‍टर, मणक्‍याच्या शस्त्रक्रियेनंतर अनेक महिने झोपून राहावे लागते ना?’’

रमेशना बहुतेक ही माहिती कुणीतरी शेजारच्यांनी दिली होती. रमेशजी... वय सदुसष्ट वर्षे. मधुमेह व रक्तदाब दोन्ही आहेत. त्यांना गेली तीन वर्षे कंबरदुखी सुरू होती. हळूहळू कंबरदुखीबरोबरच मांड्या आणि पोटऱ्यांत कळ यायला लागली होती. एक वर्षापासून चालण्याचे अंतर हळूहळू कमी होत गेले होते. मला भेटायला आले, तेव्हा जेमतेम पाच ते दहा मिनिटे कसेबसे चालत होते. संध्याकाळी व्यायाम म्हणून फिरायला निघाल्यावर पहिल्या पाच मिनिटांतच कंबर, कुल्ले, मांड्या व पोटऱ्या ‘भरून’ येऊ लागायच्या. अजून दोन-पाच मिनिटांत पाय जड पडून आणि वेदना वाढून त्यांना थांबावेच लागायचे. रमेशजींच्या कमरेच्या मणक्‍याचा एमआरआय त्यांच्या डॉक्‍टरांनी केला होता आणि त्यांना शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला ऐकून त्यांच्या अनेक आसपासच्या हितचिंतकांनी त्यांच्यावर सल्ल्यांचा भडिमारच केला होता. 

रमेशजींना जो आजार झाला होता. त्याला ‘न्यूरोजेनिक क्‍लॉडिकेशन’ म्हणतात. या आजारात कंबर दुखणे, थोडे अंतर गेल्यावर मांड्या, पोटऱ्या भरून येणे, जड पडणे, बधिर होणे, त्यात मुंग्या व कळा येणे अशा गोष्टी सुरू होतात. त्यामुळे पुढे चालणे अवघड होऊन थांबावे लागते. काही वेळ थांबले, की परत पुढे चालता येते. हे जे ‘चालू शकता येईल’ असे अंतर असते, ते दिवसेंदिवस कमी-कमी होत जाते. शेवटी-शेवटी काही वेळ उभे राहिले तरी मांड्या व पाय भरून येऊन बसावे लागते. या आजाराचे योग्य निदान व उपचार झाले नाहीत, तर कालांतराने लघवीवरचे नियंत्रण (कंट्रोल) जाणे, पावलातली शक्ती जाणे यांसारखे त्रास होऊ शकतात. या आजाराच्या शस्त्रक्रियेचा निर्णय नेमका कसा घ्यावा व या निर्णयाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे, याचा विचार आवश्‍यक ठरतो. 

माझा असा अनुभव आहे, की अशा आजारात मणक्‍याची शस्त्रक्रिया का करावी, याबाबत रुग्णांच्याच नव्हे, तर या विषयाशी संबंधित नसलेल्या डॉक्‍टरांच्या मनातसुद्धा सुस्पष्ट कल्पना नसते. या शस्त्रक्रियेचा उद्देश फक्त ‘दुखणे जाणे’ हा नसून ‘दुखणे जाऊन परत तीन ते पाच किलोमीटर चालता येणे’ हा आहे. विशेषतः उतारवयात चालण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. वय वाढेल, तसे चालण्याचे महत्त्व वाढत जाते. जर या वयात चालले नाही, तर मधुमेह, रक्तदाब, मानसिक औदास्य, परावलंबित्व वाढत जाते.

सभा-समारंभांना जाणे बंद होते. आयुष्य उपभोगणेच खंडित होते. त्यामुळे ‘चालल्यावर पाय भरून येतात. म्हणून वयोमानानुसार मी चालणेच बंद करतो आणि मग माझे दुखणे जाईल,’ हा युक्तिवाद चुकीचा ठरतो.

त्याचप्रमाणे, आजाराचे प्रमाण वाढल्यावर पायातली शक्ती व लघवी-संडासवरचा ‘कंट्रोल’ कमी होण्याची शक्‍यता असते, हे तर आहेच.

विशेषतः पासष्ट ते सत्तर वर्षे वयानंतर जर हा आजार झाला, तर केवळ गैरसमजामुळेच ही शस्त्रक्रिया टाळू नये, असे मला प्रकर्षाने वाटते. अर्थात, या आधी मनातल्या शंका तज्ज्ञाला जरूर विचाराव्यात, पण त्यात शास्त्रीय दृष्टिकोनच ठेवावा.

एक लक्षात घेतले पाहिजे, की कोणत्याही शस्त्रक्रियेत काही ना काही धोके असतातच. पूर्णतः निर्धोक शस्त्रक्रिया नसते. ते धोके टाळण्याचा प्रयत्न करीत डॉक्‍टर शस्त्रक्रिया करतात. पण, आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे शस्त्रक्रिया न करण्यातसुद्धा धोके असू शकतात व ते अधिक गंभीर असू शकतात. तसेच हे धोके टाळता येत नाहीत. मात्र, ही शक्‍यता आपण पाहत नाही. या दोन विधानांच्या पैकी आपल्या बाबतीत कुठले धोके अधिक आहेत, हे जाणून घेऊन या प्रश्नाच्या उत्तरावरच आपला निर्णय आधारित असावा. 

शस्त्रक्रिया कधी, कोणावर व कुठल्या पद्धतीने करावी, हे ठरवणे एक शास्त्र आहे. हे शास्त्र प्रगत व उपयुक्त आहे. गरज नसताना शस्त्रक्रिया करणे व गरज असताना ती टाळणे या दोन्ही धोकादायक गोष्टी आहेत. 
रमेशजींच्या कंबरेच्या तीन, चार व पाच नंबरच्या मणक्‍यांमधील नसा दाबल्या गेल्या होत्या. (कॅनॉल स्टेनोसिस) मायक्रोस्कोपच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करून तो दाब काढला गेला. हे शास्त्र इतके प्रगत आहे, की आता या शस्त्रक्रियेनंतर फार काळ झोपून राहावे लागत नाही. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रमेशजींनी चालायला सुरुवात केली. आता शस्त्रक्रिया होऊन वर्ष झाल्यानंतर ते दीड तास सलग चालतात. सभा-समारंभाला जातात. त्यांचा मधुमेह व रक्तदाब नियंत्रित आहे. हेच खरे या शस्त्रक्रियेचे यश म्हणता येईल.

News Item ID: 
558-news_story-1556270712

Human Surgery Misconception
Author Type: 
External Author
डॉ. जयदेव पंचवाघ
Search Functional Tags: 
डॉक्‍टर, स्त्री, मधुमेह, Machine, Topics
Twitter Publish: 

उन्हाळ्याच्या झळा

उन्हाळा तीव्र व्हायला लागला की त्याच्या झळा व ज्वाळा बंद घरातही येऊ लागतात. कारण दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्‍ती परत घेण्यास सुरवात करतो. उन्हाळ्यात जलशक्‍ती परत ओढून घेण्याचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी उन्हाळ्याची तक्रार न करता उन्हाळा कसा सुसह्य होईल हे पाहणे इष्ट ठरेल.

पृथ्वीच्या स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याने सूर्याचे जाणे सहा महिने उत्तरेकडे व सहा महिने दक्षिणेकडे असते. मकरसंक्रांतीच्या आरंभापासून ते कर्कसंक्रांतीच्या आरंभापर्यंत सूर्याची गती उत्तरेकडे असते म्हणून त्यास उत्तरायण म्हणतात. साधारण मार्गशीर्ष महिन्यात (२१ डिसेंबर) उत्तरायणास सुरवात होते व त्यात शिशिर, वसंत व ग्रीष्म ऋतूंचा समावेश होतो. आषाढ महिन्यापासून (२१ जून) दक्षिणायनास प्रारंभ होतो व त्यात वर्षा, शरद व हेमंत ऋतूंचा समावेश होतो. दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्‍ती परत घेण्यास सुरवात करतो. हे सर्व निसर्गतः चक्राकार गतीने सुरू असते. एकूण उन्हाळ्यात जलशक्‍ती परत ओढून घेण्याचे काम सुरू झाले की उन्हाळ्याची तक्रार न करता आपल्या वागण्याने उन्हाळा कसा सुसह्य होईल हे पाहणे इष्ट ठरेल. सूर्याच्या उष्णतेपासून तात्पुरत्या संरक्षणासाठी छत्रीचा वापर करता येतो. 

पाऊस पडत असताना सुटलेल्या गार वाऱ्यामुळे जर काही इच्छा उत्पन्न होत असेल तर ती असते ऊबदार पांघरूण घेऊन घरात बसण्याची. पावसाळा संपताना तो पुढच्या उन्हाळ्याची तयारी करायला साधारणतः सुचवतो.

पावसाळ्यानंतर जरी शरद ऋतू येणार असला व शरदाचे चांदणे पित्त शांत करणारे असले तरी शरदातही सूर्य आपला प्रभाव दाखवायला सुरवात करतोच. शरदानंतर सुरू होते थंडी. थंडी सुरू झाल्यावर मात्र शेकोटी, हिटर यांची नुसती आठवण काढून भागत नाही, तर या गोष्टी प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतात. सूर्य हा सर्व वस्तुजाताचा जगत्पिता तेव्हा त्याला हे सर्व सहन न झाले तरच नवल. ‘‘मीच देतो नं उष्णता, बंद करा ते हिटर, पुरे झाली होळी’’ असे म्हणून तो मनुष्यमात्राला आधार देतो. अर्थात, एकदम घाबरून जाऊ नये म्हणून आधीच्या वसंत ऋतूत सावकाश सावकाश स्वतःच्या किरणांची उष्णता वाढवत नेऊन नंतर ग्रीष्म ऋतूची सुरवात होते. 

उन्हाळा तीव्र व्हायला लागला की त्याच्या झळा व ज्वाळा बंद घरातही येऊ लागतात, दुपारच्या वेळी नळ सोडला तर त्यातून उकळते पाणी येऊ लागते. या त्रासांबद्दल फारशी तक्रार करण्याचे काही कारण नाही. पण कितीही पाणी प्यायले तरी मूत्रविसर्जन होत नाही, मूत्रविसर्जन झालेच तर जळजळ जाणवते, शरीरावर घामाचा चिकचिकाट होतो अशा वेळी फळांचे रस घ्यावे म्हटले, तर बाजारातून मोसंबी अदृश्‍य झालेली असतात. राहता राहते रस देणारे फळ कलिंगड व उसाचा रस. अशा वेळी लिंबाचे सरबत, कोकमचे सरबत घ्यावे, कोकम चघळून त्यावर पाणी प्यावे, कैरीचे पन्हे प्यावे. किंवा नेहमीचा चहा न पिता जो चहा थंड पिता येतो असा चहा प्यावा. खूप सारे रससेवन केले तर त्यातल्या त्यात उन्हाळ्यातील उष्णतेपासून मनुष्य स्वतःला वाचवू शकतो. उन्हाळ्यात समुद्रकाठी फिरायला गेले तरी तिथली खारी हवा गरमच असते. अशा वेळी अंगकांती काळवंडली नाही तरच नवल. उन्हाळ्यात नेमकी लिंबे महाग होतात. पण असा विचार करून लिंबे स्वस्त असताना लिंबाचा रस साखरेच्या पाकात टाकून लिंबाचे सिरप का करून ठेवले जात नाही, याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. उन्हाळ्यात नेमके आंबे येतात, त्यांच्यावर ताव मारल्यास गळवे शरीरावर होत राहतात. ही गळवे चोळली वा फोडली तर अधिकच चिडचिड होते. 

लहान मुले शाळेत भरपूर पाणीही पिऊ शकत नाहीत व शाळेत तशी खात्रीशीर चांगली व्यवस्थाही नसते. रस वगैरे पिणे तर दूरच. अशा वेळी नाकाचा घोळणा फुटला नाही तरच नवल. उकाड्यामुळे डोक्‍यावर पाणी टाकावे म्हटले तर गणवेश ओला होतो. वास देण्यासाठी कांदा ठेवावा म्हटला तर बहुतेक सगळे कांदे काही अकलेच्या कांद्यांनी डोक्‍यात भरून घेतल्यामुळे शाळेत सुटा कांदा मिळणे अवघड असते.

अशा वेळी उन्हाळ्याचा त्रास अनेक प्रकारे होऊ लागतो. सुटी असल्याने वेळ भरपूर असतो, पण दुपारच्या वेळी बाहेर जाता येत नाही. दुपारच्या उन्हाची तिरीप अंगावरून गेल्यास उलट्या, जुलाब यांना सामोरे जावे लागते. पूर्वीच्या काळी एरंडीच्या किंवा नागवेलीच्या पानाला एरंडीचे तेल लावून अशी पाने डोक्‍यावर ठेवून त्यावर टोपी घालण्याची पद्धत होती. 

यात सगळ्यांत समाधानाची गोष्ट एकच असते की सुट्या सुरू होणार असतात. वेळेवर ठरविले असले, वेळेवर रिझर्व्हेशन्स केली असली तर कमी पैशात थंड हवेच्या ठिकाणी जाता येते. रेल्वेची हॉटेलची वेळेवर रिझर्व्हेशन्स केली नसली तर मात्र भरपूर अडचणी सोसून, भरपूर पैसे देऊन जवळच्या डोंगरावर जाण्याची वेळ येते. उन्हाळ्याच्या सुटीत थंड हवेच्या ठिकाणी परदेशी जाणारे भाग्यवानही सध्या वाढलेले दिसतात ही गोष्ट वेगळी.

परीक्षेच्या ताणाची उष्णता व बाहेरचा उन्हाळा यांनी स्वतःचा प्रभाव दाखविल्यानंतर मगच सुटीचा आनंद मिळू शकतो. हे सर्व पाहिले की सूर्याला एक नमस्कार घालून पुरत नाही, त्याला बारा नमस्कार का घालावे लागतात हे लक्षात येते. ‘तुझे नि माझे जमेना, परि तुझ्यावाचुनि करमेना’ असा हा आदित्यनारायण नसला तर सर्व विश्‍वच संपेल व तो असतो म्हणून आपले अस्तित्वच असते म्हणून त्याची कृपा मिळवावीच लागते.

News Item ID: 
558-news_story-1556270467

Summer Heat Temperature Effect Health Care
Author Type: 
External Author
डॉ. श्री बालाजी तांबे
Search Functional Tags: 
आरोग्य, सूर्य, Water, forest, ऊस, पाऊस, उत्पन्न, Kids, आरोग्य_संदेश
Twitter Publish: 

अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) - आयुर्वेद अमृतांमध्ये श्रेष्ठ

आचार्यांकडून मिळालेले ज्ञान ही खरी विद्या. या विद्येच्या जोरावर विद्यार्थी पुढे यशप्राप्ती करून घेऊ शकतो. आयुर्वेद, योग, स्थापत्य वगैरे सर्व शास्त्रे लक्षात येण्यासाठी त्याचा अनुभव मिळण्यासाठी म्हणजे शास्त्रातील ज्ञानाचा स्वतःला आणि इतरांना उपयोग होण्यासाठी आचार्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. नुसती पुस्तके वाचून किंवा परीक्षेत चांगले गुण मिळविण्याने हे साध्य करता येईलच, असे नाही.

अगदी थोडक्‍यात विषयाचे मर्म सांगण्यात अग्र्यसंग्रह अग्रणी राहतो. जीवनातील सर्व अंगांचा उल्लेख चरकाचार्यांनी त्याच्या अग्र्यसंग्रहात केला आहे. मागच्या वेळी आपण विद्वान व्यक्‍तीबरोबर केलेले संभाषण हे बुद्धिवर्धनामध्ये सर्वश्रेष्ठ असते हा पाहिले. आता या पुढचा भाग पाहू. 

आचार्यः शास्त्राधिगमहेतूनाम्‌ - शास्त्र समजण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व कारणांमध्ये आचार्य म्हणजे शिक्षण सर्वांत महत्त्वाचे असतात.  
पुस्तक किंवा आजच्या इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळू शकते, परंतु आचार्यांकडून मिळालेले ज्ञान ही खरी विद्या. या विद्येच्या जोरावर विद्यार्थी पुढे यशप्राप्ती करून घेऊ शकतो. आयुर्वेद, योग, स्थापत्य वगैरे सर्व शास्त्रे लक्षात येण्यासाठी त्याचा अनुभव मिळण्यासाठी म्हणजे शास्त्रातील ज्ञानाचा स्वतःला आणि इतरांना उपयोग होण्यासाठी आचार्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. नुुसती पुस्तके वाचून किंवा परीक्षेत चांगले गुण मिळविण्याने हे साध्य करता येईलच असे नाही. 
आयुर्वेदोऽमृतानाम्‌ - जे जीवन देते ते अमृत. रोग, भीती, दुःख, असहायता. वेदना अशा सर्व गोष्टींवर विजय मिळविता येतो तो अमृताने. अशी जी कोणती अमृते आहेत, त्यात आयुर्वेद सर्वश्रेष्ठ होय. 

या एका लहानशा सूत्रातील आयुर्वेदाचे सामर्थ्य लक्षात येते. फक्‍त रोगनाशन करणे एवढाच या शास्त्राचा उद्देश नाही, तर जीवन सर्वार्थाने जगायचे असेल तर त्यासाठी लागणारे अमृत म्हणजे आयुर्वेदशास्त्र आहे. जर प्रत्येकाने आयुर्वेदातील तत्त्वे समजून त्याप्रमाणे आहार-आचरण-मानसिकतेमध्ये त्यांचा अवलंब केला तर आरोग्य उत्तम राहील, शिवाय संपन्न जीवन जगता येईल.

सद्वचनं अनुष्ठेयानाम्‌ - निष्ठा, श्रद्धा ठेवल्यास योग्य गोष्टींमध्ये सद्‌वचन म्हणजे सद्‌गुरू, सज्जन, संतमंडळी, ज्ञानाचा अनुभव घेतलेल्या मंडळींचे वचन सर्वश्रेष्ठ होय. 

सध्या या सूत्राची सर्वांना फार आवश्‍यकता आहे. साध्या साध्या किंवा कित्येकदा पूर्वापार चालत आलेल्या नेहमीच्या रिवाजांवर सुद्धा सध्या अनेक मतमतांतरे असलेली दिसतात. अशा वेळी नेमके काय करावे, काय खरे, काय खोटे हे समजणे अवघड होऊन जाते. अशा वेळी जो ज्ञानी आहे, अनुभवू आहे, ज्याने शास्त्र समजून घेतलेले आहे त्यांचे म्हणणे ऐकणे हे श्रेयस्कर होय. 
असद्‌ग्रहणं सर्वाहितानाम्‌ - अहितकर अशा सर्व कर्मांमध्ये असद्‌ग्रहण म्हणजे चुकीच्या व्यक्‍तीचे ऐकणे हे सर्वश्रेष्ठ होय. 

थोडक्‍यात, मार्गदर्शन करणाराच चुकीचा असेल तर त्यातून घडणारी पुढची प्रत्येक गोष्ट अहिताला कारणीभूत ठरेल. तेव्हा आपले अहित होऊ नये असे वाटत असेल तर कुणाचे ऐकायचे हे विचारपूर्वक ठरवायला हवे.
सर्वसंन्यासः मुखानामिति - सुख देणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये सर्व विषयांपासून विरक्‍ती सर्वश्रेष्ठ होय. 

आइस्क्रीम खाण्याने सुख मिळेल, प्रवास केल्याने सुख मिळेल, नवीन कपडे घेण्याने सुख मिळेल असे आपल्याला प्रत्येक विषयात वाटत राहते, पण ते तात्पुरते असते. चरकाचार्य येथे सांगत आहेत की खरे सुख हवे असेल, अक्षय सुख हवे असेल तर कशाचाही लोभ मनात न ठेवणे, कशाचीही आसक्‍ती नसणे हेच सर्वश्रेष्ठ असते.

News Item ID: 
558-news_story-1556270900

Dr Balaji Tambe Article Ayurved
Author Type: 
External Author
डॉ. श्री बालाजी तांबे
Search Functional Tags: 
आयुर्वेद, Topics, forest, Education, victory, Health
Twitter Publish: 

तापातील चाचण्या

अलीकडे ताप आला की पटकन हटत नाही, त्यामुळे ताप आला की घाबरायला होते. अशा वेळी डॉक्‍टरकडे गेल्यास काही तपासण्या केल्या जातात. त्या का करतात आणि सामान्यतः कोणकोणत्या असतात या तपासण्या? 

कोणत्याही व्यक्तीला ताप येतो, याचा अर्थ शरीर कोणत्या तरी जंतुसंसर्गाशी मुकाबला करीत असते आणि या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या घटकांमुळे माणसाला ताप येतो. तापामध्ये कोणत्या तपासण्या कराव्यात आणि कोणत्या मुदतीत कराव्या, याचे काही निकष प्रमाणित केलेले आहेत. त्यानुसार या तपासण्या असतात. सामान्यतः प्रत्येक तापात हिमोग्राम आणि युरीन रुटीन या तपासण्या कराव्या लागतात. त्यांचे महत्त्व पाहू. 

हिमोग्राम - (यालाच सीबीसी असेही म्हटले जाते.) यामध्ये तुमच्या शरीरात काय उलथापालथ चालली आहे, याचा एक ढोबळ अंदाज बांधता येतो.

हिमोग्राममध्ये पांढऱ्या पेशींची संख्या वाढली आहे, की सामान्य पातळीपेक्षा कमी आहे? पांढऱ्या पेशींमधील उपप्रकारातील न्यूट्रोफिल, लिंफोसाइट, इओसिनोफील इत्यादी पेशींचे प्रमाण सामान्य आहे की जास्त आहे?

प्लेटलेटची संख्या कमी आहे का?
यावरून निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची दिशा मिळते. उदाहरणार्थ लघवीतील जंतुसंसर्ग, फुफ्फुसातील अथवा शरीरात इतर कुठे उत्पन्न झालेल्या जिवाणू (बॅक्‍टेरियल) प्रकारच्या संसर्गात पांढऱ्या पेशींची संख्या वाढलेली दिसते. उपप्रकारांपैकी न्यूट्रोफिल पेशींची संख्यादेखील वाढलेली असते, तर प्लेटलेटचे प्रमाण सामान्य अथवा वाढलेले आढळते. याच्या उलट विषाणूजन्य (व्हायरल) आजारांमध्ये पांढऱ्या पेशींची संख्या सामान्यतः पातळीखाली जाते. या पाहणीवरून उपचार करणाऱ्या धन्वंतरींना ढोबळ वर्गीकरण करता येते. याशिवाय विषाणूजन्य आजारांमध्ये प्लेटलेट्‌ची संख्या कमी व्हायला सुरवात होते. डेंगी, मलेरिया, चिकुन गुनिया, स्वाइन फ्लू या आजारांमध्ये पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट कमी होतात, तसेच लिंफोसाईट्‌स जास्त असे आढळते. आणि नेमक्‍या याच समान निरीक्षणांमुळे नेमके निदान करण्यासाठी पुढील तपासण्या आवश्‍यक ठरतात.

युरीन रुटीन - या तपासणीत पॅथॉलॉजिस्ट लघवीत पांढऱ्या पेशी आहेत का, यावर जो अहवाल देतो तो बऱ्याचदा तापाचे कारण स्पष्ट करतो. लघवीत पांढऱ्या पेशी (पस सेल्स) असल्यास मूत्रमार्गाचा अथवा मूत्राशयाचा अथवा प्रोस्टेट ग्रंथीचा जंतुसंसर्ग तापाचे कारण असतो. 

पेरिफेरल स्मियर तपासणी - रक्तामध्ये हिवतापाचे (मलेरियाचे) जंतू एका विशिष्ट पातळीपर्यंत पोचले की ते विशिष्ट स्टेनिंग करून मायक्रोस्कोपखाली दिसतात. मलेरियाचे निदान तापाचे कारण दर्शवते. 

रॅपिड मलेरिया टेस्ट (आरएमटी ) - ज्यावेळी मलेरियाचे जंतू कमी प्रमाणात असतात त्या वेळी ते डोळ्यांना दिसत नाहीत अथवा कमी संख्येमुळे त्याचे निदान हुकू शकते. हे टाळण्यासाठी सदर चाचणी करतात. सदर चाचणीत मलेरियाच्या जंतूंचे प्रोटिन कवच (अँटीजेन ) आहे की नाही, हे समजते. शिवाय तो कोणत्या प्रकारचा आहे, हेदेखील कळते. 

डेंगीची तपासणी - गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र डेंगीच्या तापाने धुमाकूळ माजविला आहे. एडिस इजिप्ती नावाच्या डासाच्या चाव्यानंतर या रोगाचा विषाणू रक्तात प्रवेश करतो. त्या वेळेस लगेचच त्याच दिवशी अथवा एक-दोन दिवसांत खूप ताप येणे, थकल्यासारखे मलूल वाटणे, हातपाय दुखणे, अशी लक्षणे दिसू लागतात. कधीकधी रुग्णाला नुसतीच कणकण जाणवते.

आजाराच्या सुरवातीच्या या कालावधीत एनएन एक अँटीजन ही तपासणी करावी. तापाच्या पहिल्या दिवसापासून, तर सहा दिवसांपर्यंत त्याचे निष्कर्ष निदान करण्यासाठी उपयोगी असतात. त्यानंतर हे अँटीजन कमी होते अथवा नाहीसे होते. दरम्यानच्या काळात या अँटीजन विरुद्ध शरीर अँटिबॉडीज तयार करते. तापाच्या सातव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत या अँटिबॉडीज रक्तात आढळतात. या अँटिबॉडीजचे IgG आणि IgM असे दोन प्रकार असतात. पैकी IgM या आत्ताचा संसर्ग निश्‍चित करतात, तर IgG या पूर्वी होऊन गेलेला अथवा अलीकडेच होऊन गेलेला संसर्ग दर्शवितात. NS१ आणि IgM एकाच वेळी दिसू शकतात आणि त्यांनी सध्याच्या तापाचे कारण डेंगी आहे, हे स्पष्ट होते. अर्थात, दुसऱ्या वेळी डेंगीचा संसर्ग झाल्यास IgG आधी दिसतात (ज्या जुन्या संसर्गाच्या असतात) आणि त्यानंतर IgM दिसतात, त्या सध्याच्या संसर्गामुळे आढळतात. या सर्व क्रमामुळे कोणती चाचणी कधी केली, तर योग्य ठरेल हे उपचार करणाऱ्या डॉक्‍टरानीच ठरवायला हवे असते. 

सामान्यतः डेंगी तापाच्या चौथ्या दिवसापासून चेहेऱ्यावर आणि अंगावरदेखील बारीक लाल रंगाचे पुरळ दिसते. खूप थकवा, डोके दुखणे, ताप परत परत येणे असे होते. डेंगीमध्ये इतर काही चाचण्यांचे अहवाल रुग्णाची अवस्था कशी आहे, यासाठी केल्या जातात. 

अ)  हिमोग्राम आणि प्लेटलेट काउंट - पांढऱ्या पेशींची आणि प्लेटलेट्‌ची संख्या कमी होत जाते. सामान्यतः सातव्या दिवशी हे दोन्ही घटक पूर्वपदाकडे परतताना दिसतात. 

ब )  लिव्हर फंक्‍शन चाचणी : डेंगीमध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीपासून SGPT आणि SGOT हे घटक वाढतात. बिलिरुबिन देखील थोडेसे वाढू शकते. अल्बुमिनचे प्रमाण कमी होऊन प्रोटिन आणि अल्बुमिनचे गुणोत्तर बिघडते. 

या चाचण्यांमुळे रुग्ण सुधारतो आहे की बिघडतो आहे, हे ठरवता येते. डेंगीवर ठोस औषध नसल्याने रुग्णाला आराम, गर्दीपासून दूर, ताजा आहार आणि पाण्याचे आणि क्षाराचे प्रमाण योग्य राखणे, हीच उपाययोजना असते. म्हणूनच निदान झाले तरी या विविध चाचण्या परत करत त्याला मॉनिटर करावे लागते.  यामध्ये प्लेटलेट्‌ची संख्या, इतर सखोल तपासण्या बाजूला ठेवून बघत राहाणे हेदेखील डॉक्‍टर करू शकतात. तथापि, प्लेटलेट कमी आल्या तरी त्या डोळ्यांना स्मियरवरती कशा दिसतात, हा विशेष प्रावीण्याचा भाग आहे. विषाणूजन्य आजारांमध्ये प्लेटलेट आकाराने मोठ्या होतात, ज्या मशीनवर मोजता येत नाहीत. सदर बाबीला मेगाप्लेटलेट असे म्हटले जाते आणि तसा उल्लेख प्लेटलेट्‌ची संख्या अजमावतांना अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणूनच मुळात या चाचण्या अर्हतायुक्त अनुभवी पॅथॉलॉजिस्टने केलेल्या असणे रुग्ण आणि तपासणारे डॉक्‍टर यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. 

चिकुन गुनिया - डासामुळे होणारा हा आणखीन एक त्रासदायक आजार असून, त्याची लक्षणे डेंगीसारखीच असतात. अर्थात, यात आणखीन महत्त्वाची बाब म्हणजे शरीराचे सांधे विलक्षण दुखतात आणि आखडतात.  या आजारासाठी चिकुन गुनिया अँटीबॉडीज चाचणी उपलब्ध आहे. अर्थात, बरेचदा याचे निष्कर्ष दोन ते तीन आठवड्यांनंतर मार्गदर्शक ठरतात, त्यामुळे त्याला इतर तापांपासून वेगळं करताना इतर चाचण्या बघाव्या लागतात. 

स्वाइन फ्लू - अलीकडे हादेखील मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार परतला असून, त्याचे जास्त रुग्ण पुणे आणि मुंबई अशा गर्दीच्या शहरात सापडतात. यामध्ये रुग्णाला घशात दुखून जोरदार ताप येणे, अंग दुखणे, थकवा येणे, अशी लक्षणे दिसतात. यामध्ये घशातील स्त्राव घेऊन त्यावर PCR  चाचणी करून निदान केले जाते. तथापि, सरकारी धोरणानुसार याची चाचणी ठराविक ठिकाणीच केली जाते आणि त्याचे निश्‍चित निदान करण्यापेक्षा त्यावर प्रभावी असलेले टॅमी फ्लू औषध देण्याकडे यंत्रणांचा कल आहे. 

परंतु, हिमोग्राम या चाचणीत याही रुग्णांमध्ये डेंगीसारखीच निरीक्षणे दिसतात. 

टायफॉईड (विषमज्वर) - हा आजार दूषित अन्न अथवा पाणी ग्रहण केल्यामुळे होतो. सालमोनेला या जंतूमुळे हा आजार होतो. याचे निदान करताना तापाच्या एक ते सात दिवसांपर्यंत ब्लड कल्चर तपासणी करतात. सदर चाचणीला लागणारा वेळ आणि खर्च लक्षात घेता विडाल चाचणी केली जाते. तथापि, ही चाचणी तापाच्या सातव्या दिवसापासून पुढे निष्कर्ष योग्य रीतीने दाखविते. याशिवाय टायफी रॅपिड चाचणीदेखील उपलब्ध असून, त्याचे निष्कर्ष तिसऱ्या दिवशीपासून योग्य ठरू शकतात.

News Item ID: 
558-news_story-1556271494

Flu Test Health Care
Author Type: 
External Author
डॉ. हरीश सरोदे
Search Functional Tags: 
उत्पन्न, डेंगी, औषध, drug, डॉक्‍टर, पुणे, Mumbai, Government, पर्यावरण
Twitter Publish: 

कसा करावा उन्हाळा सुसह्य?

उन्हाळ्याच्या झळा वाढत जातात; तशी जठराग्नीची शक्‍ती अर्थात पचनशक्‍ती कमी कमी होत जाते. वाढलेल्या उष्णतेने जसे नद्या, झऱ्यांचे पाणी कमी होते, विहिरी खोल जातात, तसेच शरीराचे प्रीणन करणारा, तृप्ती देणारा रसधातूही अशक्‍त होतो. अर्थातच, वातावरणातील व शरीरातीलही रुक्षता वाढते. थकवा, निरुत्साह जाणवायला सुरवात होते. उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे धातू शिथिल (ढिले) झालेले असतात. अर्थातच, शरीरशक्‍तीसुद्धा कमी झालेली असते. 

उन्हाळ्याच्या सुट्ट्या हा घराघरांत आनंदाचा विषय असतो. सुट्ट्यांच्या निमित्ताने प्रवास योजायचा असला, आंबा, आईस्क्रीमचा आनंद घ्यायचा असला तरी वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे बाधा येणार नाही, यासाठी काळजी घेणे अपरिहार्य असते. उन्हाळ्यामुळे शरीरात काय काय बदल होत असतात आणि त्यादृष्टीने आपण काय काळजी घेऊ शकतो, याची आज आपण माहिती करून घेणार आहोत. 

उन्हाळा येतो हिवाळ्यानंतर. जसजशी थंडी कमी कमी होत जाईल, तसतशी जाठराग्नीची शक्‍ती अर्थात पचनशक्‍ती कमी कमी होत जाते. वाढलेल्या उष्णतेने जसे नद्या, झऱ्यांचे पाणी कमी होते, विहिरी खोल जातात, तसेच शरीराचे प्रीणन करणारा, तृप्ती देणारा रसधातूही अशक्‍त होतो. अर्थातच, रुक्षता वाढते, शरीरशक्‍ती कमी होते. थकवा, निरुत्साह जाणवायला सुरवात होते. उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे धातू शिथिल (ढिले)  झालेले असतात.

अर्थातच, शरीरशक्‍तीसुद्धा कमी झालेली असते. उष्णतेशी जुळवून घेता यावे यासाठी शरीराने आपणहून केलेली तजवीज म्हणजे घामाचे वाढलेले प्रमाण. घाम अत्याधिक प्रमाणात येत असला आणि शरीरातही पित्तदोष, रक्‍तदोष वाढलेले असले, तर घामोळे येण्याचा त्रास होऊ शकतो. लहान मुले तसेच नाजूक त्वचा असणाऱ्यांनाही उन्हाळ्यामध्ये रॅश येण्याचा त्रास होऊ शकतो. 

उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण वाढणे साहजिक असले तरी, कपडे ओले होतील इतका घाम येणे, घामाला एक प्रकारचा तीक्ष्ण गंध असणे फारच त्रासदायक असते. हे टाळण्यासाठी स्नानाच्या वेळी कुळथाचे पीठ, वाळा, अनंत मूळ, नागरमोथा वगैरे द्रव्यांपासून तयार केलेले उटणे लावण्याचा उपयोग होतो. स्नानानंतर काखेमध्ये किंवा अति प्रमाणात घाम येणाऱ्या इतर ठिकाणी तुरटीचा खडा फिरवण्याचाही उपयोग होतो. 

उन्हाळ्यात त्वचेवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून उन्हात जाताना सनस्क्रीन क्रीम लावणे सर्वपरिचित असते. मात्र, त्याबरोबरीने पुढील उपाय योजता येतात. 

स्नानाच्या वेळी साबणाऐवजी अनंतमूळ, चंदन वगैरे शीतल द्रव्यांपासून बनविलेले उटणे वापरण्याने, मसुराचे पीठ व सॅन मसाज पावडर यांचे समभाग मिश्रण वापरण्यानेही उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण होत असते.

उन्हाळ्यात कपडे सुती किंवा रेशमी, शक्‍यतो हलक्‍या रंगाचे घालणे, फार घट्ट कपडे घालणे टाळणे श्रेयस्कर असते. घामोळे आल्यास त्यावर चंदनाचे गंध लावण्याचा उपयोग होतो. वाळा, धणे व नागरमोथा यांच्या चूर्णाचा थंड पाण्यात लेप करण्याने किंवा जांभळाची बी उगाळून लावण्यानेही घामोळ्या कमी होतात. शरीरातील उष्णता कमी व्हावी, बरोबरीने रक्‍तशुद्धी व्हावी यासाठी अनंत कल्प, शतावरी कल्प, संतुलन पित्तशांती गोळ्या घेणेही उत्तम असते. 

‘उन्हाळ्या लागणे’ या शब्दावरून हा त्रास उन्हाळ्यात होत असणार, हे लक्षात येते. उन्हाळ्या लागणे म्हणजे लघवीला जळजळ होणे. हा त्रास उन्हाळ्यात अनेकांना होतो. विशेषतः पुरेशा प्रमाणात पाणी न पिण्याने उन्हाळ्या लागण्याची प्रवृत्ती तयार होते. यावर सकाळ-संध्याकाळ साळीच्या लाह्यांचे पाणी किंवा धणे-जिऱ्याचे पाणी पिणे, अधून मधून शहाळ्याचे पाणी पिणे, धणे, जिरे, अनंतमूळ प्रत्येकी पाव पाव चमचा रात्रभर कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेऊन पिणे, हे उपाय करता येतात. 

उन्हाळ्यात हाता-पायांची आग होणे हीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळणारी तक्रार असते. यावर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे पादाभ्यंग करणे. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याने उष्णता कमी होते.

उपलब्धता असल्यास दूर्वांच्या हिरवळीवर सकाळ संध्याकाळ अनवाणी पायांनी चालण्याने तळपायांचा दाह कमी होण्यास मदत मिळते. 

उन्हाळ्यात संपूर्ण अंगाचाही दाह होऊ शकतो. अशा वेळी कलिंगडाच्या सालीच्या आत असणारा पांढरा गर अंगावर लावण्याचा उपयोग होतो. मेंदीची ताजी पाने वाटून तयार केलेला लेप तळपाय व तळहातांवर लावण्यानेही आग कमी होते. 

उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होणेही स्वाभाविक असते. झोपण्यापूर्वी बंद डोळ्यांवर शुद्ध गुलाबजलाच्या घड्या ठेवण्याचा किंवा गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवण्याचा उपयोग होतो. कोरफडीचा गर बंद डोळ्यांवर ठेवण्यानेही डोळ्यांची आग, लालसरपणा वगैरे त्रास कमी होण्यास मदत होते. 

उन्हाळ्याची उष्णता बाधल्याने नाकाचा घोळणा फुटून नाकातून रक्‍त येऊ शकते, विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास होताना दिसतो. डोक्‍यावर थंड पाणी लावणे, शक्‍य असल्यास आवळ्याचे चूर्ण व पाणी एकत्र करून तयार केलेला लेप टाळूवर लावणे यामुळे रक्‍त थांबण्यास मदत होते. मात्र वारंवार त्रास होत असल्यास अडुळशाच्या पानांचा रस (अर्धा ते एक चमचा) त्यात खडीसाखर घालून रोज घेणे, कोहळ्याचा रस खडीसाखर टाकून घेणे, रात्री झोपण्यापूर्वी घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा नस्यसॅन घृताचे नाकात दोन-तीन थेंब टाकणे, ज्येष्ठमध व मनुका यांचा काढा करून घेणे हे उपाय योजता येतात. 

कमी झालेली पचनशक्‍ती, जलतत्त्वाची कमतरता यांच्यामुळे शरीरात वाढणारी रुक्षता, उष्णता या सर्वांच्या एकत्रीकरणातून मलावष्टंभ, मूळव्याध, तोंड येणे वगैरे त्रासही या ऋतूत होताना दिसतात. यावर पुढील उपाययोजना करता येते. 

आहारात घरचे साजूक तूप, ताजे लोणी यांचा समावेश असणे. जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण तसेच कपभर कोमट पाण्यासह दोन चमचे साजूक तूप घेणे.

भिजत घातलेली एक-दोन अंजिरे, मूठभर काळ्या मनुका रोज सेवन करणे.
 संध्याकाळच्या जेवणात वरण-भात, मऊ खिचडी, वेगवेगळ्या भाज्यांचे किंवा धान्यांचे सूप यांचा समावेश असणे. उन्हाळ्यात रात्री फारशी भूक लागत नाही, अशा वेळी मुगाचे कढण पिणे सर्वांत चांगले. मूग वीर्याने थंड असून, पचायला हलके असतातच; पण ताकद कायम ठेवणारेही असतात.

मुगाचे कढण बनवण्याची पद्धत अशी - अर्धा वाटी मुगाच्या डाळीत आठ कप पाणी, १-२ आमसुले, ५-६ मनुका व चवीपुरते सैंधव घालून शिजवावे. योग्य प्रकारे शिजल्यावर गाळून घेऊन प्यावे. याने उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास म्हणजे हाता-पायाच्या तळव्यांची रसरस होणे, डोळे जळणे, लाल होणे, एकसारखी तहान लागणे वगैरे लक्षणे कमी व्हायला मदत होते.

गुलकंद व मोरावळा हे दोन आयुर्वेदिक योग म्हणजे उन्हाळ्यातील वरदानच होत. देशी गुलाबाच्या गुलाबी नाजूक पाकळ्या व खडीसाखरेपासून सूर्याच्या उष्णतेच्या साहाय्याने तयार केलेला शुद्ध गुलकंद, तोही जर प्रवाळयुक्‍त असला तर त्यामुळे उष्णतेचा त्रास निश्‍चित कमी होतो. 

उन्हाळ्यात शरीरातील जलांश कमी होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यामुळेच उन्हाळ्यात सरबत पिण्याची पद्धत असते. मात्र, बाजारात मिळणारी तयार सरबते ही सहसा रासायनिक द्रव्ये व अनैसर्गिक रंग टाकून तयार केलेली असतात. यामुळे सरबताचा खरा फायदा होत नाही. त्यापेक्षा घरच्या घरी खालील पद्धतीप्रमाणे लिंबू सरबत, कोकम सरबत बवनणे कोणालाही जमण्यासारखे असते.

लिंबू सरबत
लिंबू बाराही महिने मिळत असले तरी, उन्हाळ्यात ते विशेष उपयोगी असते. उन्हाळ्यामध्ये भूक न लागणे, पचन मंदावणे, पित्त वाढल्याने जुलाब होणे वगैरे तक्रारी उद्भवू शकतात. लिंबू आंबट चवीचे असल्याने रुचकर असते, भूक वाढवते, दीपक, पाचक, अनुलोमक गुणाचे असल्यामुळे पचन सुधरवते. असे लिंबाचे सरबत उन्हाळ्यामध्ये शरीरातील जलांश टिकवून ठेवण्यास मदत करते.

साहित्य -
१ रसदार कागदी लिंबू
४० ग्रॅम साखर
१ चिमूट मीठ
४०० मिली लि. माठातील थंड पाणी
कृती - थोडेसे केशर, चिमूटभर जिऱ्याची पूड व वरील सर्व घटकद्रव्ये एकत्र करून प्यावे.

कोकम सरबत 
२० ग्रॅम आमसुले भिजत टाकून साधारणपणे अर्ध्या तासाने कुस्करून व गाळून घ्यावी. यात ग्लासभर थंड पाणी, आवडीप्रमाणे (१ -२ चमचे) साखर, चवीपुरते मीठ व थोडे जिऱ्याचे चूर्ण घालून प्यावे. 

बाजारात कोकमचे सिरपही मिळते किंवा कोकमची (रातांबे) ताजी फळे मिळत असल्यास घरीच सिरप बनवून ठेवता येते, त्यात चवीप्रमाणे पाणी, मीठ, जिऱ्याचे चूर्ण टाकूनही झटपट सरबत बनवता येते. हे सरबत उन्हाळ्याच्या झळा लागल्यानंतर किंवा दुपारच्या उन्हातून फिरून आल्यानंतर घेतल्याने उन्हाचा त्रास होत नाही, तसेच पित्ताचे शमनपण होते.

उन्हाळ्यात निसर्गतःच रसाळ फळे येतात. आहारात या फळांचा समावेश करण्यानेही उन्हाळा सुसह्य होण्यास मदत मिळत असते. विशेषतः शहाळे, तुती, कलिंगड, मोसंबी, खरबूज, जाम, डाळिंब, द्राक्षे, प्रकृतीला सोसवत असल्यास आंबा ही फळे योग्य प्रमाणात सेवन करणे चांगले असते. 

थोडक्‍यात, आहारात थोडा बदल केला, घरच्या घरी असणाऱ्या द्रव्यांची नीट योजना केली आणि पित्तशमनाकडे लक्ष ठेवले तर उन्हाळा सुसह्य होईल हे नक्की.

News Item ID: 
558-news_story-1556271227

How to Make Summer Suitable?
Author Type: 
External Author
डॉ. श्री बालाजी तांबे
Search Functional Tags: 
Lemon, Kids, सकाळ, साळीच्या लाह्या, Rose, aloe vera, साखर, मूग, डाळ, आयुर्वेद, सूर्य, डाळिंब
Twitter Publish: 

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content