प्राणैषणा, धनैषणा आदी "एषणा' पूर्ण करायच्या असल्या, आपापली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडायची असतील तर त्यासाठी शक्तीची अर्थात बलाची नितांत आवश्यकता असते. आयुर्वेदाने बलाचे तीन प्रकार सांगितले आहेत. त्यांची माहिती...
पुनर्जन्म असतो व तो या जन्मात केलेल्या बऱ्या-वाईट कर्मानुसार चांगला किंवा वाईट, सुखयुक्त किंवा दुःखयुक्त असा मिळणार असतो हे एकदा पटले की साहजिकच चांगल्या कर्माची आवश्यकता ध्यानात येऊ शकते. ही परलोक एषणा होय.
परलोक एषणा पूर्ण करण्यासाठी चारही पुरुषार्थ - ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम यांचे यथायोग्य पालन करायला सांगितलेले आहे.
गुरुशुश्रुषायाम् अध्ययने व्रतचर्यायाम् - गुरुंची सेवा करणे, त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुकरण करणे, विद्येचे अध्ययन करणे, व्रत, अनुशासन अंगी बाणवणे.
दारक्रियायां अपत्योत्पादने भृत्यभरणे अतिथिपूजायां दाने अनभिध्यायाम् -योग्य वेळी गृहस्थाश्रमाचा स्वीकार स्वीकार करून संपन्न, निरोगी अपत्यास जन्म देणे, पदरीच्या व हाताखालच्या लोकांचे भरणपोषण करणे, अतिथीचे स्वागत करून त्याला शक्य ती मदत करणे, यथाशक्ती व योग्य ठिकाणी दान देणे तसेच दुसऱ्याचे धन घेण्यास, काम न करता आयता मिळणारा मोबदला स्वीकारण्यास नकार देणे.
तपसि अनसूयायां देहवाङ्मानसे कर्मणि अक्लिष्टे - तपस्या करणे, असूया त्यागणे, शारीरिक व मानसिक कर्म करत राहणे. यालाच, अपेक्षारहित समाजसेवा करणे, सत्कृत्य करणे, समाजाच्या भल्यासाठी व इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांसाठी विनामोबदला काम करणे, समाज संघटित राहण्यासाठी दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी प्रयत्न करणे या पुरुषार्थाची जोड द्यावी. थोडक्यात स्वतःच्या मर्यादित कुटुंबाच्या बाहेर पडून समाजरूपी मोठ्या कुटुंबासाठी काम करणे म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारणे होय.
देहेन्द्रियमनःअर्थबुद्ध्यात्मपरीक्षायां मनःसमाधौ इति - शरीर, इंद्रिय, मन, विषय, बुद्धी, आत्मा यांची परीक्षा करून या सर्वांचे वास्तव स्वरूप समजून घेऊन मनास समाधी अवस्थेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे मनाचे संतुलन टिकविणे; आसपासच्या इतर लहान-मोठ्या व्यक्तींचे कालमानानुसार, सांप्रतकाळच्या सामाजिक, आर्थिक व्यवस्थेनुसार वेगवेगळे समज असू शकतात, तेव्हा त्यात लुडबूड न करणे; परस्वाधीनता येणार नाही, नुसती शरीरिकच नाही तर मानसिक स्वाधीनता कायम राहण्यासाठी प्रयत्नरत राहणे; हे संन्यासाश्रमाचे प्रत्यक्ष स्वरूप होय.
या प्रकारे जीवनात वेळेवारी योग्य त्या गोष्टींचा अवलंब केला, त्या त्या अवस्थेत आवश्यक ती सर्व कर्तव्ये पार पाडली तर त्यामुळे इहलोकातही सुख, यश, कीर्तीचा लाभ होतो व नंतरही स्वर्गप्राप्ती होते.
कोणतेही काम करायचे असले तर त्यासाठी मुळात ताकद लागते. प्राणैषणा, धनैषणा वगैरे एषणा पूर्ण करायच्या असल्या, आपापली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडायची असतील तर त्यासाठी शक्तीची नितांत आवश्यकता असते. शक्ती म्हणजे बल. आयुर्वेदाने बलाचे तीन प्रकार सांगितले आहेत,
त्रिविधं बलमिति सहजं कालजं युक्तिकृतं च ।
... चरक सूत्रस्थान
सहज म्हणजे जन्मजात मिळालेले, कालज म्हणजे वयानुरूप तसेच ऋतुनुरूप मिळालेले व युक्तिकृत म्हणजे प्रयत्नपूर्वक मिळवलेले.
सहजं यत् शरीरसत्त्वयोः प्राकृतम् ।
... चरक सूत्रस्थान
सहज बल म्हणजे शरीर व मनाला स्वभावतःच मिळालेली ताकद. हे जन्मजात बल आई-वडिलांकडून मिळालेले असते आणि यात जन्मानंतर फारसा बदल करता येत नाही. आपण व्यवहारात
या ठिकाणी आयुर्वेद तसेच घरगुती उपचार ,योगाधरित उपचार अशा विवीध विषयांसबंधी माहिती संकलन हे आमचे उद्दिष्ट आहे Mobile:9604040305, LL 020 - 25888547. |Done as social work.
सकाळ --अतिरेकी हल्ला आरोग्यावर ( डॉ. श्री बालाजी तांबे )
साग्रसंगीत जेवणाच्या वेळी पापड, लोणचे, सांडगे, चार भाज्या, चटण्या, पक्वान्ने असे अनेक पदार्थ खातो तेव्हा आपण असे म्हणत नाही की हा पदार्थांचा अतिरेक झाला. उलट तेव्हा आपण आग्रह करून खाऊ घालतो. मग औषधांच्या अतिरेकाची आपण चर्चा का करतो? कारण शरीराला आवश्यक असणारी, शरीराच्या पेशींची नवनिर्मिती करणारी अन्नयोजना शरीराला हवी असते व ती वैविध्यपूर्ण असणे शरीराच्या दृष्टीने चांगले असते म्हणून चार पदार्थांचा जेवणात समावेश असणे हा अतिरेक आहे असे म्हटले जात नाही. ........
आयुर्वेदीय औषधयोजना जवळजवळ अन्नयोजनेसारखीच असते. शरीरात त्रास होईल असे माहीत असताना शरीरात निर्माण झालेल्या एखाद्या असंतुलनावर वा रोगावर हल्ला करण्यासाठी शरीरात पाठवायचे द्रव्य शरीराला नको असलेल्या पेशीपुरते मर्यादित न राहता त्याचा इतरही पेशींना त्रास होणार आहे, त्यापासून दुसराच काही त्रास उपटण्याची शक्यता असल्यामुळे अशा औषधांचा अतिरेक करू नये, असे म्हणत असावेत.
लक्ष्याच्या बरोबर मध्यभागी लागावा अशी कल्पना करून बाण सोडायचा असला पण बाण सोडायची विद्या संपूर्ण अवगत नसली तर पहिला बाण डावीकडे लागेल, दुसरा उजवीकडे लागेल, तिसरा वर लागेल, चौथा खाली लागेल, अशा तऱ्हेने असंख्य बाण सोडावे लागतील. याचप्रमाणे, रोगावर इलाज करायचा म्हटला तर रोगाचे मूळ कोठे आहे हे न पाहता व त्याच्यावर काय योजना करायची या संबंधी संदिग्धता किंवा चुकीची कल्पना करून घेतल्यामुळे एकानंतर दुसरे, दुसऱ्यानंतर तिसरे अशी अनेक औषधे देण्याची वेळ येते. एखादे औषध दिल्यावर त्या औषधाचा परिणाम कमी व दुष्परिणाम अधिक असे असले तर दुष्परिणाम काढण्यासाठी पुन्हा वेगळी योजना व ती योजना करत असताना होणाऱ्या असंतुलनासाठी तिसरी काही योजना अशा प्रकारे दिवसेंदिवस औषधांच्या संख्येत वाढ होत राहिली तर त्यात काही नवल नाही. खरे पाहता औषधाची योजना करत असताना रोग कुठून सुरू झाला, रोग कशामुळे झाला आहे ह्याचा विचार करून त्याच्या मुळावर घाव घातला तर कदाचित थोड्या औषधामध्ये काम भागू शकेल.
सुरुवात मधुमेहाने झाली म्हणून मधुमेहावरची औषधे, मग रक्तदाब वाढल्यामुळे त्यासाठी औषधे, कंपवात सुरू झाला म्हणून कंप कमी करणारी औषधे, शरीराला झिणझिण्या यायला लागल्या तर त्यावर काही औषधे, पचन बिघडले म्हणून पाचक औषधे, बद्धकोष्ठ झाल्याने तो कमी करणारी औषधे, झोप लागत नाही म्हणून झोपेची औषधे, शरीरात रक्त कमी झाल्यामुळे रक्त वाढविणारी औषधे, या सर्व प्रकारात शरीरात कॅल्शियम ओढले जात नाही म्हणून त्यावरची औषधे, या सर्वाला कंटाळून मेंदू नीट काम करत नाही म्हणून मेंदूची औषधे, या सर्व औषधांचा अतिरेक झाल्यामुळे मेंदूवर पडलेल्या अतिरिक्त कामामुळे विसरभोळेपणा सुरू झाल्याने स्मृतिवर्धक औषधे, असे काही दिवस चालल्यास त्वचा खराब होते, सांधे चालत नाहीत, पायातील संवेदना निघून जाते, झालेली जखम बरी होत नाही अशा चक्रात सापडल्यामुळे १०-१२ वेगवेगळ्या प्रकारची औषधे घ्यावी लागत असतील व त्यातील बहुतेक औषधे इतर औषधांचे दुष्परिणाम झाकण्यासाठीच जर दिली जात असतील तर हा औषधांचा अतिरेक टाळावाच लागेल. दोन वेगळ्या गोळ्या घ्यायला नको म्हणून दोन द्रव्यांच्या मिश्रणाची एक मोठी गोळी बनविण्यामुळे हे काम साध्य होणार नाही. साधारण ६९ सालचा प्रसंग आहे.खूप मोठ्या हुद्द्यांवर काम करून निवृत्त झालेले, बराच काही त्रास होत असलेले एक पोलिस खात्यातले एक अधिकारी त्यांची तब्येत दाखवायला माझ्याकडे आले होते. त्यांना नीट चालता येत नव्हते, पाय ओढत ओढत ते चालायचे, त्यामुळे त्यांना गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्या दोघांनी काखोटीस धरून आणून बसविले होते.
मी त्यांना विचारले, "सध्या तुम्ही कोणती औषधे घेत आहात'?
त्यावर ते म्हणाले, "एकदा वेळ काढून घरी या, जेवायलाच या, तुम्हाला सगळी औषधे दाखवतोच'.
मी गेलो त्यावेळी त्यांच्या ताटाच्या बाजूला २०-२२ छोट्या-छोट्या ताटल्या, वाट्या होत्या, मी म्हटले, "ह्या सगळ्या वाट्या-ताटल्या कशासाठी'?
त्यावर ते उत्तरले, "ही सगळी माझी औषधे'. काही आयुर्वेदिक, काही होमिओपॅथिक तर काही ऍलोपॅथिक. नशिबाने त्यावेळी अजून काही पॅथी उपलब्ध नव्हत्या.
मी म्हटले, "उद्या तुम्हा पुन्हा माझ्या घरी या, तेव्हापर्यंत मी विचार करून ठेवतो'.
ते ज्यावेळी माझ्या घरी आले तेव्हा मी खुर्चीवर येऊन बसलो व त्यांना म्हटले, "जरा उभे राहता का? जरा खोलीच्या त्या कोपऱ्यापर्यंत चाला'.
ते म्हणाले, "मला तुम्ही औषधांचे काही सांगणार होता ना ?'
मी म्हटले, "सांगतो'.
चार पावले चालल्यावर मी म्हटले, "हॉल्ट, अबाऊट टर्न, क्विक मार्च'.
त्यावर ते चकित झाले, माझ्याकडे वळून म्हणाले, "म्हणजे काय'?
मी म्हटले, "खुर्चीत बसा.'
ते म्हणाले, "मला निवृत्त होऊन खूप दिवस झाले व नोकरीतही अनेक वर्षें मला कोणी क्विक मार्च व हॉल्ट सांगितले नाही. आज तुम्ही मला हुकूम देणारे पहिले भेटलात.'
त्यावेळी माझे वय ३५ तर त्यांचे वय असेल ७५-८०.
मी त्यांना म्हटले, "औषधांचा अतिरेक हाच आहे तुमचा रोग, तुम्हाला ही सगळी औषधे कुणी दिली'?
त्यावर ते म्हणाले, "गेल्या वीस वर्षांत वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी ही सगळी औषधे दिली आहेत.'
मी म्हटले, "पण तुम्हाला हॉल्ट कुणीच व कधीच सांगितले नाही. तुम्ही सर्व औषधे अजून घेत आहात, म्हणून मी धाडस करून तुमच्यासारख्या अधिकारी माणासाला "हॉल्ट' सांगितले. आता सगळे थांबवा, बरे होण्यासाठी औषधांचा अतिरेक थांबवणेच तुम्हाला उपयोगी पडेल.'
सकाळी उठल्याउठल्या, नाश्त्याच्या आधी, नाश्त्याच्या नंतर, अकरा वाजता. जेवणापूर्वी, जेवणानंतर, दोन वाजता.. चार वाजता, सात वाजता, रात्री जेवणाआधी, रात्री जेवणानंतर, झोपण्यापूर्वी, शिवाय रात्री श्वास वगैरे कोंडला तर रात्री उढून पंप किंवा गोळी एवढ्या वेळेला औषधांचा अतिरेक केला तर कसे चालणार? दिवसातून दोन-चार वेळा औषध घ्यायला लागणे ठीक आहे, पण नुसत्या संख्येचा नाही तर वेळांचाही अतिरेक करणे कितपत योग्य आहे?
स्वतःची प्रकृती पूर्णपणे ओळखून औषधे घ्यावीत. औषधात काय आहे, औषधाचे गुणधर्म काय असे लोक आवर्जून विचारतात. पण आपली स्वतःची प्रकृती काय, स्वतःचा गुणधर्म काय, स्वतःच्या शरीरातील कोणता धातू असंतुलित आहे, स्वतःच्या शरीरातून वीर्यक्षय / ओजक्षय होतो आहे का वगैरेंचा विचार कोणीच करत नाही. असा विचार करून कुठले अन्न घ्यायचे व कुठली मोजकीच पण रोगाच्या मुळावर लागू औषधे घ्यायची त्याची योजना करणे इष्ट ठरते व असे केल्यास औषधांचा अतिरेक होत नाही.
- डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१० ४०५.
www.ayu.de

सकाळ -- उपचार खांद्याच्या सांध्यावर (डॉ. संजय देसाई, अस्थिरोगतज्ज्ञ, मुंबई)
खांद्याची सांधेदुखी अत्यंत त्रासदायक आणि दैनंदिन जीवनातील अनेक कृती दुष्कर करणारी ठरू शकते. अशी सांधेदुखी दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया प्रचलीत आहेत. मात्र, सांध्याच्या नैसर्गिक उतींचा विकास होऊ देणारे नवे तंत्र अधिक प्रभावी ठरते...
आपल्या शरीरातील सर्व सांध्यांपैकी आपल्या खांद्यांची हालचाल साधारणतः सर्वात जास्त होत असते. खांद्यामधील हालचाल मंदावली, तर एखाद्याच्या दैनंदिन आयुष्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. जेव्हा खांद्याची हालचाल सीमित होते तेव्हा समोर असलेल्या वस्तूंपर्यंत पोहोचणे, केस विंचरणे, दात घासणे, डोक्यावरून शर्ट ओढणे किंवा पाठ खाजविणे यांसारख्या सोप्या सोप्या गोष्टीसुद्धा करणे कठीण किंवा अशक्यही होऊ शकते, तसेच यामुळे होत असलेल्या वेदना आणि सूज यांकडेही दुर्लक्ष करता येऊ शकत नाही.
प्रचंड वेदना आणि खांद्याच्या सांध्यांची हानी यांचे सर्वात सामान्य कारण म्हणजे संधिदाह असते. गुडघा आणि नितंबाच्या संधिदाहापेक्षा खांद्याचा संधिदाह कमी प्रमाणात आढळून येतो; पण जेव्हा हा होतो त्या वेळेस तो अतिशय मुश्कील अडथळा बनतो. सर्वसाधारणपणे खांद्याचा संधिदाह ५० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांना सतावतो. ज्यांना आधी खांद्याला इजा झालेली आहे, सर्वसाधारणपणे अशा लोकांना याचा त्रास होतो. तसेच हे गुणसूत्रांवरही अवलंबून आहे. याचाच अर्थ या त्रासाचा कौटुंबिक इतिहास असेल तर पुढील पिढीतही हा त्रास उद्भवू शकतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (यूएसए) नुसार सुमारे ७ कोटी वयस्क लोकांना संधिदाह आणि- किंवा सांधेदुखीने त्रस्त आहेत.
ऑस्टिओआर्थरायटिस, ऱ्हुमटाईड आर्थरायटिस आणि धक्क्यामुळे निर्माण होणारा संधिदाह ही सांध्यांच्या हानीची सर्वसाधारण कारणे असतात.
- ऑस्टिओआर्थरायटिस किंवा शरीरातील हाडांची झीज झाल्यामुळे निर्माण होणारा संधिदाह ही एक चांगल्या गुणांचा ऱ्हास करणारी परिस्थिती आहे. यामुळे हाडाच्या बाहेरील बाजूच्या गुळगुळीत आवरण नाहीसे होते. हाडांची सुरक्षा करणारे हे आवरण खांद्याच्या संधिदाहामुळे नाहीसे होते तेव्हा मूळ हाड सांध्यामध्ये उघडे पडते. हा त्रास सर्वसाधारणपणे ५० वर्षे वयाच्या पुढील लोकांना होतो.
- ऱ्हुमटाईड आर्थरायटिस ही सांध्यांमध्ये पद्धतशीरपणे दाह निर्माण करणारी परिस्थिती आहे. यामुळे सांध्यांच्या कडेला दाह निर्माण होतो. यामुळे काळानुसार हाडावरील सुरक्षा आवरण नाहीसे होते आणि हाडे ठिसूळ बनू लागतात. हा त्रास कुठल्याही वयाच्या व्यक्तींमध्ये उद्भवू शकतो आणि तो सर्वसाधारणपणे शरीराच्या दोन्ही भागातील एकाहून जास्त सांध्यांवर परिणाम करतो.
- एखाद्या धक्क्यामुळे निर्माण झालेला संधिदाह एक प्रकारचा ऑस्टिओआर्थरायटिस असतो जो खांद्याच्या सांध्यामधील फॅक्चर किंवा सांधा निखळणे अशा प्रकारच्या त्रासानंतर निर्माण होतो. खांद्याचा सांधा निखळण्यामुळे खांद्यामुळे अस्थिरता निर्माण होऊन त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होते. अनेक वर्षांत पुनः पुन्हा अशा प्रकारे सांधा निखळल्यामुळे त्याचे रूपांतर संधिदाहामध्ये होऊ शकते, तसेच खांद्याला झालेल्या काही फॅक्चरमुळेही संधिदाह निर्माण होऊ शकतो.
जर औषधे आणि व्यायाम यामुळेही संधिदाहाच्या प्रचंड वेदनांपासून सुटका होत नसेल, तर खांद्याचा सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया हाच सर्वात योग्य पर्याय ठरतो. परंपरागत शस्त्रक्रियेमध्ये त्याला टोटल शोल्डर रिप्लेसमेंट असेही म्हणतात. त्यात खांद्यात सांधा बनवणाऱ्या हाडांचा इजा झालेला भाग पूर्णपणे काढून धातू आणि प्लॅस्टिकचे भाग बसवतात. हाताच्या वरच्या बाजूस असलेले गोळ्यांच्या आकाराचे हाड आणि खांद्यामधील त्रिकोणी भाग यामुळे बदलला जातो.
परंतु वैद्यकीय तंत्रज्ञानातील आधुनिक सुधारणांसह आता हाडांचे संवर्धन करण्याची नवीन संकल्पना शोधून काढण्यात आलेली आहे. खांदा बदलण्याच्या या तंत्राला "जॉईंट रिसर्फेसिंग टेक्निक' असेही म्हणतात. खांदा संपूर्णपणे बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी हा एक पर्याय आहे. ही एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये रुग्णांना त्यांच्या नैसर्गिक उती मोठ्या प्रमाणात सुस्थितीत ठेवता येतात, तसेच यामध्ये संपूर्ण सांधा न बदलता सांध्याचा केवळ खराब झालेला भाग बदलला जातो. यामध्ये ह्युमरल हाडावर विशेष धातूचे आवरण बसविले जाते. त्यामुळे रुग्णाच्या नैसर्गिक उती मोठ्या प्रमाणात बचावतात. त्यामुळेच हा तरुण रुग्णांसाठी अधिक चांगला पर्याय ठरतो. यासाठी कोबाल्ट कोम संयुगाचा वापर करतात. त्याला छोट्या धातूच्या पट्टीचा आधार असतो. पट्टीच्या आतल्या बाजूस खरखरीत आवरण असते. यात सिमेंटचा वापर केला जात नाही. यामध्ये सिमेंटऐवजी रुग्णाच्या नैसर्गिक विकसित उतींचा वापर बळकटीकरणासाठी केला जातो. यातील खरखरीत सच्छिद्र आवरण रुग्णाच्या नैसर्गिक उतींचा नैसर्गिकरीत्या विकसित होऊ देते. वैद्यकीय परिभाषेत याला "बायालॉजिकल टिश्यू इन ग्रोथ' किंवा "बायोलॉजिकल फिक्सेशन' म्हणतात.
या कृत्रिम सांध्याचा आकार घुमटासारखा असतो, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्थिरता आणि सुविधा मिळते. हे कृत्रिम सांधे अनेक आकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे शल्यविशारदांना आपल्या रुग्णांसाठी योग्य आकाराचे सांधे निवडायला मदत होते.
रिसर्फेसिंगमुळे सांध्यांच्या दुखण्यामध्ये लवकरात लवकर वेदनांपासून सुटका होते, तसेच भविष्यात गरज भासल्यास संपूर्ण सांधा बदलण्याची शल्यक्रिया करणेही शक्य असते.

सकाळ - हेल्थ फॅक्टस् - स्पर्श
- सर्वसाधारण माणसाच्या अंगावरील एकूण त्वचेचे वजन सुमारे ४.२ किलोग्रॅम एवढे असते.
- पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या अंगावरील त्वचेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १.८ चौरस मीटर एवढे असते.
- हातातील चेतातंतूंची संख्या दर चौरस इंचाला सुमारे १३०० एवढी असते.
- स्पर्शाची जाणीव ज्यांमुळे होते त्या चेतापेशींची बोटांच्या टोकांवरील संख्या चौरस सेंटीमीटरला २५०० एवढी असते.
- तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास त्वचेवर वेदना जाणवतात.

सकाळ -- प्रफुल्ल - प्रत्येक व्यक्ती, प्रति परमेश्वर ( डॉ. राजेंद्र बर्वे )
पुराणातल्या गोष्टी वाचणं मोठं रंजक असतं. देव-दैत्य, सुर- असुर, देव आणि राक्षस म्हणजेच सुष्ट आणि दृष्ट अशा प्रतिस्पर्धी शक्तींमधला संघर्ष सतत होत असतो आणि त्यात सुष्ट शक्तीचाच अखेरीस विजय होतो. दुष्टांचे निर्दालन होते आणि सृष्टी त्या भयंकर, अन्यायी, जुलमी दुष्टांपासून मुक्त होते. .......
देव, सुर म्हणजेच सुष्ट शक्ती असं का बरं करते? कारण त्या परमेश्वराचं या सृष्टीवर प्रेम असतं, परमेश्वराचं मन करुणेनं भरलेलं असतं. सृष्टीबद्दल अपरंपार आपुलकी वाटते, म्हणूनच परमेश्वर अशा लढाया करतो बरं! अशी समजूत होते किंवा असल्यास दृढ होते. प्रश्न असा पडतो की परमेश्वर असं का बरं करतो? उत्तर सोपंय हो! त्या परमेश्वरानंच तर सृष्टी निर्माण केली. तो परमेश्वर आपल्यावर बापासारखा प्रेम करतो. तो आपला निर्माता आहे. परमेश्वर सृष्टी निर्माण करतो. असा टाइपचा युक्तिवाद आपल्याला सहसा आढळतो. आपण थोडे चक्रावून जातो. परमेश्वराची ही व्याख्या आकर्षणपण अविश्वसनीय वाटते. मित्र हो, पण ती प्रतिकात्मक मानली तर विलक्षण सामर्थ्य आपल्या मनात निर्माण करू शकते! या व्याख्येप्रमाणे, प्रत्येक जण परमेश्वर ठरतो! मानसशास्त्र म्हणतं की प्रत्येक विचार करू शकणारी व्यक्ती आपल्या मनात आणि मनातर्फे एक सृष्टी निर्माण करते. आपली सृष्टी आपल्या नियमानुसार चालते. रॅशनल विचार करणारी माणसं आपापल्या मनात सृष्टी असते तशीच्या तशी निर्माण करतात. त्यांच्या मनात प्रतिसृष्टी निर्माण होते. काही अविवेकी माणसं, भोळी माणसं त्यांच्या मनात सृष्टी निर्माण करतात ती बरीचशी कपोलकल्पित असते. कल्पना राज्यातली असते. पण असते त्या व्यक्तीनं निर्माण केलेली जो प्रतिसृष्टी निर्माण करतो तो परमेश्वर अशी व्याख्या स्वीकारली तर प्रत्येक व्यक्तीच प्रतिपरमेश्वर झाली! प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराइतकं सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य असतं. प्रत्येक व्यक्ती प्रतिसृष्टी कल्पिणारी प्रतिपरमेश्वर ठरते. मस्त वाटतं ना?
- डॉ. राजेंद्र बर्वे

Esakal- एषणा (डॉ. श्री बालाजी तांबे)
मनुष्याला शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी अवतरलेल्या आयुर्वेदामध्ये मनुष्याच्या इच्छा-आकांक्षा-प्रवृत्तींच्या अनुषंगानेही आरोग्याचा विचार केलेला आढळतो. त्यापैकी तीन मूलभूत इच्छांविषयी आयुर्वेदाने केलेले विवरण...
आयुर्वेदामध्ये सर्वांगीण उपचार कशा प्रकारे केले जातात हे आपण पाहिले. चरकसंहितेत पहिल्या अध्यायातच आयुर्वेदशास्त्र हे केवळ रोग झाल्यावर उपयोगात आणायचे शास्त्र नाही तर दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे शास्त्र आहे असे सांगितले, एवढेच नाही तर आयुर्वेदीय तत्त्वांना स्वीकारून जीवन जगणाऱ्यांचे, आयुष्य असे पर्यंत इहलोकात तर कल्याण होईलच पण परलोकातही कल्याण होईल असेही सांगितले.
आयुर्वेदातल्या या श्लोकात हेच सांगितलेले दिसते,
तस्यायुषः पुण्यतमो वेदो वेदविदां मतः ।
वक्ष्यते यन्मनुष्याणां लोकयोरूभयोर्हितम् ।।
... चरक सूत्रस्थान
आयुष्याचा वेद असणाऱ्या आयुर्वेदशास्त्राचा उगम वेदातून झाला असून ते अतिशय पुण्यकारक आहे आणि त्याचा स्वीकार केल्यास मनुष्याचे उभय लोकांत म्हणजे इहलोक व परलोकातही हित साधले जाईल.
चरकसंहितेमधे तिस्रैषणीय नावाचा अध्याय सांगितला आहे, यातही ही गोष्ट अधिक विस्तृतपणे मांडली आहे.
तिस्रैषणीय म्हणजे तीन एषणा. एषणा म्हणजे इच्छा.
इष्यन्ते अन्विष्यन्ते इति एषणा ।
म्हणजे ज्याचा शोध घ्यायचा, ज्याची इच्छा करायची ती एषणा.
अशा तीन एषणा असतात, पण त्या प्रत्येकाला होतात असे नाही. ज्या व्यक्तीचे मन, बुद्धी, पौरुषशक्ती (पुरुषार्थ - चांगले कृत्य करण्याची शक्ती) व पराक्रम या गोष्टी शाबूत आहेत त्यांना या तीन एषणा असतात.
तद्यथा प्राणैषणा, धनैषणा, परलोकैषणा इति।
... चरक सूत्रस्थान
प्राण एषणा, धन एषणा व परलोक एषणा या तीन एषणा सांगितल्या आहेत.
१. प्राण एषणा - म्हणजे जगण्याची, जीव वाचविण्याची इच्छा. ही इच्छा जन्माला आलेल्या प्रत्येक सजिवाला असते व ती अत्यंत उत्स्फूर्त असते. रोजचे जीवन जगताना, कळत-नकळत आपण ही एषणा अव्याहतपणे पूर्ण करत असतो. जीवनाच्या उत्क्रांतीमध्ये अगदी खालच्या थराला असणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना, जीवजंतूंनाही जीवन शाबूत ठेवण्यासाठी करायची धडपड अंगभूतच असते. उदा. जन्माला आलेल्या बालकाला जसा श्वास घ्यायला शिकवावा लागत नाही तसेच माशाच्या किंवा कासवाच्या पिल्लाला पोहायला कसे हे उपजतच माहीत असते. सरड्यासारख्या प्राण्यांना आपला रंग बदलण्याची असलेली सोय किंवा काही वनस्पतींना जवळ आलेला किडा किंवा कीटक पानामध्ये गपकन बंद करून खाऊन टाकण्याची सोय निसर्गाने दिलेली असते, ती प्राण-एषणेचाच एक भाग असतो. बहुतेक वेळेला ही क्रिया इतकी उत्स्फूर्तपणे घडते की ती इच्छेमुळे केलेली आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. पण डोळ्यात चुकून जाणाऱ्या बोटामुळे इजा होऊ नये म्हणून निमिषार्धात डोळा मिटला जातो तेव्हा ती क्रिया प्रण एषणेमुळेच होत असते. अन्न शोधण्याची, खाण्याची इच्छा, त्रास होणाऱ्या गोष्टीपासून दूर होण्याची इच्छा, भीती, प्रतिकार करण्याची, एखाद्या गोष्टीला विरोध करण्याची प्रवृत्ती, विरोध करणे शक्य नसल्यास नमते घेण्याची प्रवृत्ती या सर्वांचा प्राण एषणेत समावेश होतो.
थोडक्यात सांगायचे तर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कळत-नकळत केलेली प्रत्येक लहान-मोठी क्रिया ही प्राण एषणेमुळे झालेली असते व जिवाच्या उत्क्रांतीनुसार ती अधिकाधिक विकसित व चौरस होत जाते. अर्थातच मनुष्यासाठी ती केवळ प्राण टिकविण्यासाठी नाही तर जीवन अधिकाधिक संपन्न करण्यासाठी कारणीभूत ठरायला हवी.
स्वस्थस्य स्वस्थवृत्तानुवृत्तिः आतुरस्य विकारप्रशमने।प्रमादः।
प्राणरक्षणासाठी, संपन्न जीवन जगण्यासाठी निरोगी व्यक्तीने स्वस्थवृत्ताचे पालन करून आरोग्य टिकविण्याचा प्रयत्न करावा तर रोगी व्यक्तीने विकार-प्रशमनासाठी अप्रमाद म्हणजे कोणत्याही प्रकारची चूक न करता योग्य ते उपचार करावेत.
या दोन्ही गोष्टी सांभाळल्या म्हणजे दिनचर्या, ऋतुचर्या पाळली, मानसिक, सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेदाने सांगितलेली कर्तव्ये पार पाडली, नियमांचे पालन केले आणि रोग झालाच तर तो बरा होण्याच्या दृष्टीने आपण मागील काही लेखांत पाहिलेल्या "दैवव्यपाश्रय, युक्तिव्यापाश्रय व सत्त्वावजय' अशा तिन्ही प्रकारांनी सर्वांगीण उपचार केले तर प्राणांचे रक्षण होऊन, दीर्घायुष्याचा लाभ होईल, जीवन नुसतेच आरोग्यपूर्ण नाही तर संपन्न रीतीने व सर्वार्थाने जगता येईल.

esakal- आरोग्यदूत तंत्रज्ञान!( डॉ. अमोल गोजे )
सर्वोत्तम आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत वेगाने पोचविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा कसा प्रभावी वापर करता येतो, याचे प्रभावी प्रतिमानच बारामतीमधील "आरोग्यजाल' उपक्रमाने उभे केले आहे. त्याची माहिती... .......
पूर्वी संपर्कासाठी "दूत' महत्वाचा मानला जात असे. आजच्या आधुनिक काळात संपर्कसाधनात होत असलेल्या क्रांतीमुळे "इंटरनेट' हा जागतिक पातळीवर सर्वांचाच दूत बनलेला आहे आणि हा दूत बारामती परिसरातील नेत्र व हृदयरुग्णांकरीता आता चक्क "देवदूत' बनू पाहत आहे. इंटरनेटने अनेक क्षेत्रांत जशी क्रांती घडविली, तशीच ती आरोग्य क्षेत्रातही घडत असल्याचे आता बारामती परिसरात प्रत्यक्ष पाहता येऊ शकते. या परिसरातील डोळे व हृदयाबाबत तक्रारी असलेल्या रुग्णांना आता इंटरनेटच्या माध्यमातून थेट मदुराईचे "अरविंद आय हॉस्पिटल' आणि बंगळूरचे "नारायणा हृदयालय' या नामांकित रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज उपलब्ध होतो.
"टेलिमेडिसीन' संकल्पनेतून ही अशक्यप्राय वाटणारी बाब बारामतीत प्रत्यक्षात उतरली असून या सुविधेचा फायदा या परिसरातील लोक घेऊ लागले आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचा माहिती तंत्रज्ञान विभाग (व्हीआयआयटी), माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर कंपनी "इंटेल' आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने "आरोग्यजाल' हा कार्यक्रम प्रत्यक्षात उतरला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि काही अवघड प्रकरणांत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे परस्परांशी चर्चा करणे अशी दुहेरी कामे बारामती एमआयडीसीतील रुई ग्रामीण रुग्णालयात आता होत आहेत. २ नोव्हेंबर २००६ पासून या प्रकल्पाची सुरुवात झाली. यातही वैशिष्ट्य असे की हृदयरुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला बंगळूरहून अवघ्या दहा मिनिटांत; तर डोळ्यांसाठीचा सल्ला मदुराईहून अवघ्या २४ तासांच्या आत बारामतीत मिळतो. रुग्णालाही हा सल्ला पाहता येतो. त्यानुसार पुढील काय पावले उचलायची हे ठरविण्यासाठीही त्याला मदत होते.
या "आरोग्यजाल' उपक्रमांतर्गत रुई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांच्या "हृदयाचा आलेख' म्हणजेच "ईसीजी' काढला जातो. "ईसीजी'साठी सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या तंत्रापेक्षा या "ईसीजी'साठी वापरले जाणारे तंत्र थोडे वेगळे आहे. त्यामुळे हा ईसीजी "डिजिटल' स्वरूपात संगणकाच्या पडद्यावर पाहता येतो आणि रुग्णालयातील संगणकामध्ये साठवूनही ठेवला जाऊ शकतो. यासोबतच रुग्णाचे वजन, उंची, रक्तदाब, त्याच्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांतून मिळालेली आणि पूर्वी याच आजाराकरिता इतर डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले असल्यास त्याबाबतची अशी सर्व माहितीही संगणकावर साठवून ठेवलेली असते. बारामतीतील डॉक्टर इंटरनेटद्वारे रुग्णाचा ईसीजी आणि ही अन्य माहिती बंगलोर येथील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवितात. तेथे ते डॉक्टर या साऱ्या माहितीचे विश्लेषण करून चर्चेअंती रोगनिदान आणि उपचारांची रूपरेषा निश्चित करतात. त्यांनी दिलेला वैद्यकीय सल्ला इंटरनेटद्वारे तातडीने रुई प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला जातो. त्यानुसार स्थानिक डॉक्टर रुग्णाला पुढील सूचना देतात. या सूचनांवर आधारित योग्य तो निर्णय रुग्णाने घ्यावा, अशी त्यामागील कल्पना आहे. पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी रुग्ण बंगळूर येथे गेला तर त्याला सगळ्याच बाबतीत चांगल्या सवलती प्राप्त होतात.
डोळ्यांचे आजार असलेल्या रुग्णांबाबत ही प्रक्रिया अशीच पण, थोडी वेगळ्या पद्धतीने होते. त्यासाठी डोळ्यांचे तपासणी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणावर कॅमेरा बसवून डोळ्याच्या बाह्य व अंतर्पटलाची छायाचित्रे काढली जातात. या प्रतिमा व त्या रुग्णाची पार्श्वभूमी, त्याने घेतलेले औषधोपचार यांची माहिती इंटरनेटवरून मदुराईला पाठविली जाते, त्या नुसार तेथील डॉक्टर पुढील सल्ला देतात. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पुण्याच्या ह. वि. सरदेसाई रुग्णालयात मोफत केली जाते.
या दोन्ही सुविधांकरीता रुई ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र "टेलिमेडिसीन दालन' उभारण्यात आले असून, येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचीही सुविधा आहे. एखाद्या रुग्णासंदर्भात प्रत्यक्ष संपर्क साधून चर्चा करण्याची आवश्यकता वाटल्यास या सुविधेचा वापर करण्यात येतो. त्यात रुई प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या रुग्णाची त्या क्षणी असलेली नेमकी स्थिती बंगळूरच्या डॉक्टरांना पाहता येते, तसेच त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या स्थानिक डॉक्टरांशी थेट चर्चा करून त्यांना सल्ला देता येतो. स्थानिक डॉक्टरांनाही रुग्णाची स्थिती अधिक सविस्तर समजावून सांगता येऊ शकते आणि काही शंकांचे निरसन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेता येऊ शकते. एरवी बरेच श्रम, वेळ आणि पैसा खर्ची घालावे लागणारी ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांच्या वेळात अगदी अत्यल्प खर्चात सहजपणे पूर्ण करता येऊ शकते. आजवर ३७५ हृदयरुग्ण व १५० हून अधिक नेत्ररुग्णांना या पद्धतीने सल्ला सुविधा देण्यात आली. या पैकी ३० रुग्ण असे होते की ज्यांना बंगलोर किंवा मदुराईला या कामासाठी जाणे आर्थिकदृष्टया परवडणारे नव्हते. त्यांना या सुविधेमुळे अत्यल्प दरात सल्ला प्राप्त करून घेता आला. वाजवी दरात मिळणारा खात्रीशीर सल्ला असेच याचे वर्णन करता येईल.
केवळ बारामतीच नव्हे; तर शेजारील तालुके व जिल्ह्यांतील रुग्णांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. अंबुमणी रामदास यांनी त्यांच्या बारामती भेटीत या उपक्रमाची सविस्तर माहिती घेऊन समाधान व्यक्त केले आणि अशा प्रकारची सुविधा देशभरातील दुर्गम भागांत उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्याच्या आणखी काही जिल्ह्यांत असे प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त केला. आरोग्याचा उत्तम सल्ला शहरी व ग्रामीण भागातील लोकांना आपल्या गावातच मिळावा या करिता इंटरनेट व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा हा करून घेतलेला उपयोग भविष्यात राज्य व देश पातळीवर एक दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.
(शब्दांकन - मिलिंद संगई, बारामती)
- डॉ. अमोल गोजे
(डॉ. अमोल गोजे हे व्हीआयआयटीचे संचालक आहेत.)

esakal-परामेश्वराचा शाप की वरदान? ( डॉ. श्री बालाजी तांबे )
लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत नाहीत असे म्हणतात. पण सध्या लक्ष्मी व सरस्वती दोघी गुण्यागोविंदाने नांदत आहेत असे म्हणण्यासारखी परिस्थिती वरवर तरी दिसते. खरे पाहता लक्ष्मी या शब्दाचा लौकिक अर्थ पैसा असा समजला जातो व त्यामुळे सध्या लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत आहेत असे दिसते. परंतु, लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे तर त्यातून समृद्धी असा अर्थ अभिप्रेत आहे. आरोग्य, धन-धान्य, पशु, घर-दार, पुत्र-पौत्र, संपत्ती, कीर्ती व शांती ह्या सर्व गोष्टींचा समृद्घीमध्ये समावेश होतो. म्हणजे काय की, समृद्धी जर सरस्वतीच्या बरोबर आली तरच ती मनुष्याला अंतिम ध्येयापर्यंत पोचवते व शांती प्रदान करते. .......
सध्या अत्यंत बुद्धिमान मुले कॉम्प्युटर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व एकूण सर्व संगणकाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी धडपडतात. बुद्धिमत्ता असलेले व चांगले गुण मिळालेले सर्वजण शिक्षण घेतात व नंतर त्यांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतात. संगणकाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्याच सध्या जगातल्या श्रीमंत कंपन्या झालेल्या दिसतात. अशा तऱ्हेने जेथे ज्ञान आहे तेथे लक्ष्मी निर्माण झालेली दिसते. अर्थात हे ज्ञान एका विशिष्ट शाखेपुरते मर्यादित नाही. इतर शाखांमध्येही काही मंडळी अतोनात पैसा कमावतात. एखादा हुशार वकील स्वतःची एकवेळ उपस्थिती दाखविण्यासाठी पाच लाख रुपये मागू शकतो. आर्थिक सल्लागारसुद्धा तासागणिक लाखो रुपये कमाई करताना दिसतात. तर, सिनेमात प्रसिद्ध झालेली मंडळी तर नुसते व्यासपीठावर येण्यासाठी ४०-५० लाख रुपये मागू शकतात.
प्रत्येक क्षेत्रात सध्या ज्ञानाची किंमत पैशात झालेली दिसते. समाजातल्या खालच्या व वरच्या वर्गात एवढी आर्थिक तफावत का आहे हे काही समजून येत नाही. समाजातील घटकांची आर्थिक दरी वाढत जायला कारण असणारे ज्ञान कुठले आहे हे मात्र विशेषत्वाने दाखविता येत नाही. अर्थात हे सर्व मिळविलेल्या पैशांमुळे समाजात विषमता उत्पन्न झाली तर नंतर त्या पैशांचा उपयोग होणार नाही व कुठल्या तरी अराजकालाही आमंत्रण मिळू शकेल. म्हणजेच काय तर ज्यावेळी लक्ष्मी-सरस्वतीची मैत्री ही केवळ पैसा व सरस्वती यांची मैत्री असेल पण समृद्धी व सरस्वती एकत्र नसतील तेव्हा खरे पाहता सामाजिक आरोग्य बिघडण्याचाच संभव जास्ती असतो.
या संपूर्ण ज्ञानाच्या शाखेला दिलेला "इ' हा शब्द इलेक्ट्रॉनिक्स वरून घेतलेला आहे. अणुपर्यंत जाऊन पोचल्यावर न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन यांच्या स्वरूपाचा, गतीचा व गूढतेचा शोध घेणे परमात्म्याचा शोध घेण्यासारखेच आहे. ज्या ज्या वेळी आत्मतत्त्वाचा म्हणजे परमानंदाचा शोध घेण्याची वेळ येते त्या त्या वेळी परमगतीची आवश्यकता असते असे श्रीमद्भगवद्गीता म्हणते. या परमगतीत एक गोष्ट लक्षात येते की मध्ये काही अशी निमिषे जातात की त्यावेळी आपण ज्याच्यामागे लागलेलो आहे ती शक्ती अदृश्य झाल्यासारखी दिसते. त्यामुळे हे गूढ अधिकच अनाकलनीय होते. भौतिक ज्ञानाच्या कक्षा रुंदावता रुंदावता जेव्हा इलेक्ट्रॉनपर्यंत येऊन पोचल्या त्यावेळी एक अप्रतिम शक्ती समाजासाठी मोकळी झाली व त्या शक्तीशी काम करणाऱ्या शाखेला "इ' शाखा असे संबोधित करण्यात आले.
या क्षेत्रात काम करणारी बरीच मंडळी स्वतःचे गाव इतकेच नाही तर स्वतःचा देश सोडून परदेशात अशा ठिकाणी जाऊन राहतात, जेथे त्यांचे सामाजिक स्थान दुय्यम असते. तेथे सामाजिक जीवन व सांस्कृतिक जीवन कसेबसे तयार करून जगावे लागते म्हणजेच पुन्हा सामाजिक आरोग्याला बाधा येते असे म्हणायला हरकत दिसत नाही.
जागेवर बसून राहणाऱ्याला कधीच आर्थिक लाभ मिळू शकत नाही हे खरे, पण म्हणून एक गोष्ट मिळवताना दुसरी महत्त्वाची गोष्ट सोडून द्यायची असा व्यवहार आतबट्ट्याचाच समजायला पाहिजे. लक्ष्मीची व सरस्वतीची ही मैत्री येणे-जाणे, उठणे-बसणे इथपर्यंतच्या मर्यादेत राहिली तर सर्वांनाच समाधान व सुख लाभू शकेल. म्हणजेच पैसा हे जीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे हे नक्की परंतु ते सर्वस्व नाही व हा विषय समाजिक आरोग्यापुरता मर्यादित न राहता मानसिक आरोग्यावरही मोठा आघात करतो. "इ'क्षेत्रातील लक्ष्मीची कृपा झालेली मंडळी मोठ्या मानसिक ताणाखाली वावरत असतात.
गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या मुलाला ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर उभे केले व चेंडू टाकणारा समोरून नुसता पळत आला तरी चेंडू नावाची वस्तू आली केव्हा गेली केव्हा हे समजायच्या आधी अंतर्धान पावेल, बरोबर तिन्ही स्टंप घेऊन तर जाईलच, कदाचित बॅटही घेऊन जाईल व खेळाडू मात्र घामाघूम होईल. ही उपमा घेण्याचे कारण असे की संगणकाची काम करण्याची पद्धत एवढी सर्वंकष व विकसित झाली आहे, व त्याची गती "मनासि टाकिले मागे गतीशी तुळणा नसे' अशीच आहे. मोठे प्रसंग, मोठ्या अडचणी, मोठी गणिते चुटकीसरशी सोडविणारा आणि हजारो गोष्टींचा विचार करून निर्णय घेणाऱ्या संगणकाबरोबर काम करणाऱ्याची दमछाक न झाली तरच नवल. संगणकाच्या बुद्धीबरोबर पळाल्याने मानसिक ताण येणारच. या मानसिक ताणापायी मग नाना तऱ्हेची व्यसने लागू शकतात व या मंडळींना नको त्या ठिकाणी पैसे खर्च करायचा मोह होऊ शकतो. लाख मिळाले आहेत तर आत करोड मिळवायला हरकत नाही या विचाराने मारलेल्या उड्यांपायी मानसिक ताण नक्कीच वाढतो. हा सर्व बुद्धीचा प्रताप म्हणावा तर या बुद्धीच्या कामासाठी किती वेळ द्यावा याचाही काही हिशेब दिसत नाही. ही मंडळी काही एक निश्चित वेळ काम करतील असे दिसत नाही. रात्रंदिवस काम केले तर शारीरिक ताणाबरोबरच मानसिक ताण येऊ शकतो, मानसिक दोष उत्पन्न होऊ शकतो, मानसिक इजाही होऊ शकते. डोळ्यांना किती तासांपर्यंत चकचकीत वस्तूकडे पाहू द्यायचे याचा काही नियम दिसत नाही. ज्याअर्थी संगणकाचा किंवा टीव्हीचा स्क्रीन आजूबाजूच्या वातावरणापेक्षा प्रकाशमान आहे, त्याअर्थी त्या पडद्याकडे सतत पाहिल्यास नक्कीच शरीरात पित्त वाढते, त्यामुळे संगणकावर सतत काम करणाऱ्या मंडळीना डोळ्यांची, डोळ्यांच्या नसा, मेंदूच्या नसांची काळजी घेणे आवश्यक असते. विचार करता करता संगणकाबरोबर पळण्यानेही मेंदूत उष्णता निर्माण होऊनही त्रास होताना दिस
तो. "इ'आरोग्याचा विचार करताना संपूर्ण यंत्रणेला त्रास देणारा असा भयंकर रोगाचा व्हायरस आणि त्यामुळे मेंदूला होणारा त्रास हा जसा लक्षात घ्यावा लागेल तसेच नको असलेली माहिती, वेळेचा अपव्यय आणि रेडिएशन यामुळे मनुष्याच्या मेंदूतही एखादा व्हायरस येऊन रोग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधुनिक जगाचा पालनकर्ता, सुपरकॉम्प्युटर (परमसंगणक) मानवतेस वरदान की शाप ठरेल? श्री गुरु दत्तात्रेय व्यावाहारिक, मानसिक व अध्यात्मिक पातळीवर मार्गदर्शन करून मनुष्यमात्राचे कल्याण व संरक्षण करतात, कलियुगात त्यांना तीन डोकी दाखवून भारतीय अध्यात्मामध्ये मोठी संकल्पना सुचवलेली दिसते. आपण जेव्हा बाहेरचा संगणक किंवा "इ' क्षेत्रातली कुठलीही साधनसामुग्री वापरतो तेव्हा आपण जणू बाहेरच्या मेंदूंना जोडून घेतो, म्हणजेच "ई'श्वरचा परम ईश्वर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु याची व्याप्ती तीन मस्तके म्हणजे तीन मेंदूंपर्यंतच मर्यादित राहावी व अतिरेक होऊ नये. यापेक्षा जास्ती डोकी असणाऱ्यांचा शिरच्छेद झाल्याची उदाहरणे आपल्याला सापडतात (उदा. ब्रह्मदेव). या बाहेरून जोडलेल्या डोक्यामुळे अनेक प्रकारच्या सिद्धी मिळतात पण या डोक्यांची संख्या दहा झाल्यावर रावणाचे काय झाले ही कथा मनुष्यजातीला असलेला धोका सुचवते. "इ'क्षेत्राच्या सिद्धीचा केवळ स्वार्थासाठी उपयोग न करता मानव कल्याणाची योजना असावी.
तेव्हा "इ' क्षेत्राने मनुष्यमात्राचे कल्याण साधायचे असल्यास आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. त्यातली पहिला गोष्ट म्हणजे आपण सूक्ष्मापर्यंत किंवा अति गूढ विषयापर्यंत पोचलेले असल्यामुळे त्यातून येणारी बंधने नक्कीच पाळावी लागतील. शक्तिउत्सर्जन किंवा रेडिएशनचा त्रास होणार नाही हे नक्कीच बघावे लागेल, कारण या क्षेत्राशी खेळत असताना वापरलेली सर्व साधने शक्ती उत्सर्जित करणारीच असतील. मनुष्य मनानेही पळू शकणार नाही एवढी गती या सर्व क्षेत्राची असल्यामुळे त्या गतीने बुद्धीला पळावयास लावणे खरोखरच अवघड आहे व त्या गतीने खरोखर पळायचे असले तर आपल्याला बुद्धिवर्धनासाठी आयुर्वेदाची मदत घेण्याचीच आवश्यकता भासेल. शुद्घिप्रक्रिया या क्षेत्रात खूपच महत्त्वाची आहे त्यामुळे आयुर्वेदोक्त पंचकर्मासारखी शरीरशुद्धी वारंवार करून घ्यावी लागेल. त्याही पलीकडे जाऊन मनाला एकाग्रतेची व शांततेची सवय लावण्यासाठी दिवसातून, महिन्यातून व वर्षातून काही वेळ ध्यान, धारणा, स्वास्थ्यसंगीत यांच्यासाठी नक्की द्यावा लागेल. अशा प्रकारे सर्व बाजूंना काळजी घेतली नाही तर समृद्धी व सरस्वतीची मैत्री झाल्यामुळे होण्याऱ्या उत्क्रांतीऐवजी नुसतीच लक्ष्मी व सरस्वती यांच्या मैत्रीतून त्रास उद्भवण्याचा संभव आहे. म्हणून लक्ष्मी व सरस्वती एकत्र राहात नाहीत असे म्हटले जाते. तेव्हा या विद्येचा वापर सृजनात्मक कार्यासाठी होत आहे याकडे लक्ष ठेवायचे व या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी आपण जणू या नवीन युगातील वैज्ञानिक ऋषी या भूमिकेवर काम करत आहोत ही जाणीव ठेवून स्वतःच्या व समाजाच्या कल्याणासाठी काम केले तरच या "इ' क्षेत्रामुळे आपणा सर्वांना समृद्धीचा अनुभव घेता येईल.

Subscribe to:
Posts (Atom)