Search This Blog

फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर


ऍक्‍युप्रेशर, ऍक्‍युपंक्‍चर

Posted: 07 Apr 2011 04:40 PM PDT

ऍक्‍युप्रेशर, ऍक्‍युपंक्‍चरशरीरातील मर्मस्थाने अतिशय महत्त्वाची असतात. त्यांच्या ठिकाणी 'प्राण'म्हणजे जीवनशक्‍ती विशेषत्वाने एकवटलेली असते व म्हणूनच ते शरीराच्या इतर भागांपेक्षा अधिक संवेदनशील असतात. त्यांचा शरीरातील विविध नाड्या, स्रोतसे आणि अवयवांशी प्रत्यक्ष संबंध असतो. उपचार करण्यासाठी मर्मांचा वापर करता येतो. आतल्या अवयवांना उत्तेजित करण्यासाठी, त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, स्रोतसे-नाड्यांमधील प्राणशक्‍ती खेळती राहण्यासाठी मर्मांवर विशिष्ट थेरपी केली जाऊ शकते. मर्मांना ध्यानात ठेवून केलेल्या अभ्यंग मसाज, तसेच पाठीच्या मसाजमुळे अप्रतिम परिणाम मिळताना दिसतात. मर्मांवर काम करून प्राणशक्‍तीचा संचार व्यवस्थित व्हायला लागला, की संपूर्ण शरीरालाच त्याचा उपयोग होतो. स ध्या सर्वसामान्यांना माहित असणारे ऍक्‍युप्रेशर, ऍक्‍युपंक्‍चर मुळात आयुर्वेदातील "मर्मशास्त्र' विषयाशी अतिशय साधर्म्य दाखवणारे आहे. ऍक्‍युप्रेशर, ऍक्‍युपंक्‍चरच्या इतिहासातही या थेरपीचे मूळ भारतात असल्याचे व नंतर त्याचा प्रसार इजिप्त, चीन वगैरे देशात झाल्याचा किंवा त्या काळच्या बौद्ध भिक्षूंनी ही थेरपी या देशांमध्ये नेल्याचा अंदाज केलेला आहे.


'मर्मावर रामबाण'

Posted: 07 Apr 2011 04:40 PM PDT

'मर्मावर रामबाण'सर्वसाधारण मनःशांतीसाठी ध्यान, प्रार्थना आटोपल्यानंतर शक्‍ती सर्व शरीरात स्वीकार करण्याच्या निमित्ताने जणू एखादी ज्योत सर्व शरीरभर फिरत आहे अशी संकल्पना व टाळी वाजवण्याची संकल्पना ऍक्‍युप्रेशर तंत्रापैकीच एक अतिप्राचीन व अतिसूक्ष्म सोपी पद्धत आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे. भ गवान श्रीकृष्णांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग. त्यांनी कबूल केल्याप्रमाणे, ते एक झाडाखाली शांत बसलेले असताना, त्यांचा गुबगुबीत, लाल, गुलाबी तळवा पाहून व्याधाला वाटले, की पाय म्हणजे एक छोटे पिल्लूच आहे. व्याधाने सोडलेला बाण भगवानांच्या तळपायात लागून त्यांनी प्राण सोडला. येथे सांगावेसे वाटते, की त्यांनी हे आधीच कबूल केले होते की हा एक निसर्गाचा नियम, एक निसर्गाची क्रिया आहे. शरीर सोडायचे ठरविलेलेच होते, पण निमित्त म्हणून मृत्यूचे योग्य मर्म निवडले. शरीरातील मर्म व मर्मवाहिन्या कार्यरत असतात. फक्‍त योग्य जागी योग्य मर्मवाहिनीवर, योग्य मर्मावर विशिष्ट प्रहार केला वा दाब दिला तर जीवनाला साधक किंवा विघातक गोष्ट घडू शकते. स्वतःच्या इच्छेने घेतलेला अवतार संपवताना तसे पाहता श्रीकृष्णांना कारणाची काहीच गरज नव्हती.


निदानपंचक - संप्राप्ती

Posted: 07 Apr 2011 04:40 PM PDT

निदानपंचक - संप्राप्तीकोणताही रोग होतो, तेव्हा दोष असंतुलित झालेले असतात. असंतुलित दोष हे धातू आणि मलांनाही दूषित करतात. सर्वांचा परिणाम म्हणून रोगाची विविध लक्षणे प्रकट होतात. रोग होण्यापूर्वी दोष, धातू व मलांमध्ये जी परस्पर प्रक्रिया होते व रोग उत्पन्न होतात, त्याला रोगाची संप्राप्ती असे म्हणतात. नि दानपंचकातील हेतू (रोगाचे कारण), पूर्वरूप, रूप आणि उपशय या चार मुद्‌द्‌यांची आपण माहिती घेतली, आज आपण संप्राप्ती या सर्वात महत्त्वाच्या घटकाची माहिती घेणार आहोत. कोणताही रोग होतो, तेव्हा दोष असंतुलित झालेले असतात. असंतुलित दोष हे धातू आणि मलांनाही दूषित करतात. सर्वांचा परिणाम म्हणून रोगाची विविध लक्षणे प्रकट होतात. रोग होण्यापूर्वी दोष, धातू व मलांमध्ये जी परस्पर प्रक्रिया होते व रोग उत्पन्न होतात, त्याला रोगाची संप्राप्ती असे म्हणतात. संप्राप्तीची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे, यथा दुष्टेन दोषेण यथा चानुविसर्पता ।निर्वृत्तिरामयस्यासौ संप्राप्तिर्जातिरागतिः ।।...माधवनिदान वातादि दोष ज्या ज्या प्रकारे दूषित होतात आणि ज्या ज्या पद्धतीने शरीरात पसरून रोगाची उत्पत्ती करतात, त्याला संप्राप्ती असे म्हणतात.


झुंज मणक्‍याच्या आजारांशी

Posted: 07 Apr 2011 04:40 PM PDT

झुंज मणक्‍याच्या आजारांशीगे ल्या काही वर्षांत मणक्‍याच्या आजारांच्या संख्येत वाढ होत चाललेली आहे. बैठी जीवनशैली, अयोग्य आहारविहार, लठ्ठपणाचे वाढते प्रमाण, मणक्‍याला अपघाती इजा, वाढलेल्या वयोमानामुळे वृद्धांमधील मणक्‍याची झीज, अशा अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. त्याचबरोबर हे आजार बरे करणाऱ्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाणसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानामुळे खूपच वाढले आहे. मणक्‍यांच्या आजारात, गरज नसताना शस्त्रक्रिया न करणे जसे महत्त्वाचे, तसेच गरज असताना योग्य शस्त्रक्रिया वेळेत करणे तितकेच आवश्‍यक ठरते. समाजात याबाबतचे प्रबोधन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यासाठीच नेहमी आढळणाऱ्या मणक्‍याच्या आजारांची व उपायांची माहिती थोडक्‍यात सांगण्याचा प्रयत्न आहे. पाठदुखी व कंबरदुखी आपल्यातल्या प्रत्येकाला कधी ना कधी काही प्रमाणात याचा त्रास झालेलाच असतो, इतकी ही समस्या "कॉमन' आहे. परंतु त्यामुळेच गंभीर आजाराची पाठदुखी दुर्लक्षित होते व असे रुग्ण आमच्यापर्यंत उशिरा पोचतात. खेळताना, व्यायाम करताना, वजन उचलताना कंबरेचा स्नायू अथवा उतिबंध अवघडून पाठदुखी सुरू होते.


कर्करोग

Posted: 07 Apr 2011 04:40 PM PDT

कर्करोगगेल्या काही वर्षांत कॅन्सर या विकारावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत, परंतु निदान लवकर होणे व योग्य उपचार वेळेवर मिळणे महत्त्वाचे ठरते. आ पल्या आयुष्याची सुरवात एका पेशीपासून होते. मानेचे बीजाण्ड (ओव्हम) पित्याकडून आलेल्या शुक्रजंतूने फलित होते व नव्या आयुष्याची सुरवात होते. या फलित बीजाण्ड पेशीचे विभाजन होऊ लागते. या विभाजनामुळे साधारण सारख्या दिसणाऱ्या पेशींचा एक गोळा तयार होतो. हळूहळू या पेशींच्या गोळ्यामध्ये बदल होत जातो व मानवसदृश आकार तयार होतो. काही ठिकाणी पेशींची विभाजनाची आणि संख्या वाढण्याची क्रिया चालू राहते. उदाहरणार्थ, हाताची बोटे छोटी छोटी तयार होतात व वाढत राहतात, इतर काही ठिकाणी पेशींची अशी वाढ होणे लवकरच थांबते. वाढ चालू राहावयाची का थांबावयाची, हे पेशींना येणाऱ्या अनेक प्रकारच्या सूचनांवर अवलंबून असते. ही वाढ होण्याची आणि थांबण्याची क्रिया खूपच काळजीपूर्वक केली जाते. तशी सूचना आली नाही तर आपला आकार चमत्कारिक किंवा बेढब होईल, कर्करोगाचीदेखील सुरवात एकाच पेशीच्या निर्मितीपासून होते. ज्या पेशीची वाढ अथवा विभाजन होऊ नये, अशी पेशी वाढू लागते व त्या पेशीचे झपाट्याने विभाजन होऊ लागते.


No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content