Search This Blog

फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर


'गोड' गैरसमज

Posted: 03 Mar 2011 03:40 PM PST

'गोड' गैरसमजसध्या जगभरात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जगात दर पाच सेकंदाला मधुमेहाचा एक नवीन रुग्ण सापडतो! त्याबरोबरीनेच मधुमेहाविषयीचे गैरसमजही समाजात फोफावत आहेत. ऐकीव/इंटरनेटद्वारा शोधलेल्या माहितीची विश्‍वासार्हता तपासून न पाहताच त्याचे अंधानुकरण केल्याने गैरसमजांमध्ये भरच पडत आहे. हे गैरसमज वेळीच दूर केले पाहिजेत. गैरसमज क्र. 1 - मधुमेह हा फारसा गंभीर आजार नाही. खरे तर बऱ्याचदा मधुमेहाचे निदान होण्यापूर्वीच काही वर्षे शरीरात रक्तशर्करेचे प्रमाण वाढलेले असते. या काळात मधुमेहाची लक्षणे दिसून येत नाहीत. निदान होईपर्यंत स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होण्यास सुरवात झाली असते. यामुळे मधुमेहाचे निदान होताक्षणीच त्यासाठी योग्य ते उपचार घेणे व उपचारांमध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. रक्तशर्करा जितकी योग्य पातळीत राहील, (उपाशीपोटी 70-110 मि.ग्रॅ / डेलि, खाल्ल्यानंतर दोन तासांनी 140 पेक्षा कमी) तितके मधुमेहाचे दुष्परिणाम टाळता येतील. पण मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यास मात्र मूत्रपिंडावर, डोळ्यांवर, हृदयावर व मज्जातंतूंवर परिणाम होण्याची शक्‍यता वाढेल.


आरोग्याकडे काणाडोळा

Posted: 03 Mar 2011 03:40 PM PST

आरोग्याकडे काणाडोळावाचलेला विषय पचविण्यासाठी मेंदूला वेळ न देता घाईघाईने कचरा पोत्यात भरावा, तसे ज्ञान मेंदूत भरल्याचा काहीच उपयोग होत नाही. शांत बसण्यासाठी, डोळ्यांवर घड्या ठेवण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी, ध्यानासाठी वेळ दिला गेला, तर केलेला अभ्यास लक्षात राहायला खूप मदत होते. मिळविलेल्या ज्ञानाचा अनुभव घेऊन ते ज्ञान कसे वापरता येते, ह्यावर यश अवलंबून असते. आरोग्याकडे काणा डोळा करून परीक्षेतील यशाकडे डोळे लावून बसणे बरे नव्हे. मार्च महिना उजाडला, की सगळ्यांचे लक्ष डोळ्यांकडे लागते. म्हणजे सगळ्यांचेच डोळे उघडतात. वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारे विद्यार्थी, आळस अंगी बाणलेले विद्यार्थी, ज्यांना आयुष्यात काहीतरी विशेष करून दाखवायचे आहे, आपल्याला पुढे खूप काही शिकायचे आहे व त्यातून आयुष्यात यश मिळवायचे आहे अशी धारणा असलेले विद्यार्थी किंवा परीक्षेत पहिला नंबर आला तर पालकांनी काही विशेष बक्षीस देण्याचे कबूल केल्यामुळे अभ्यास करणारे विद्यार्थी अशा सगळ्यांचेच डोळे मार्च महिना लागला की उघडतात.


डोळ्यांची काळजी

Posted: 03 Mar 2011 03:40 PM PST

डोळ्यांची काळजीसध्याच्या संगणकीय युगात मात्र डोळ्यांवर कळत-नकळत खूप ताण येत असतो. सध्याची जीवनशैलीही डोळ्यांचे नुकसान करते. रोजच्या धावपळीतही थोडी जरी काळजी घेतली, तरी आपण आपल्या डोळ्यांची कार्यक्षमता टिकवू शकतो. पंचज्ञानेंद्रियांपैकी चक्षुरेंद्रिय ज्या अवयवात असते ते म्हणजे डोळे. जीवनात डोळ्यांचे स्थान अतिशय मोलाचे असते हे आपण सर्वच जण जाणतो. सध्याच्या संगणकीय युगात मात्र डोळ्यांवर कळत-नकळत खूप ताण येत असतो. संगणक, टीव्ही वगैरे अति तेजस्वी स्क्रीनकडे तास न्‌ तास पाहणे, नैसर्गिक प्रकाशाऐवजी अति प्रखर प्रकाशात राहणे, रात्रीची जागरणे, कमी झोप, चमचमीत आहार वगैरे सध्याच्या जीवनशैलीचे अविभाज्य भाग डोळ्यांचे नुकसान करत असतात. म्हणूनच डोळ्यांची काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची हे आपण पाहणार आहोतच, पण तत्पूर्वी डोळा ह्या अवयवाची थोडी माहिती करून घेऊ. नेत्रे श्‍लेष्मणः प्रसादात्‌ ।...सुश्रुत शारीरस्थान ज्ज्ञः प्रसादात्‌ अपि नेत्रयोरुत्पत्तिरनुमीयते ।।...सुश्रुत सूत्रस्थान डोळे संतुलित कफाच्या सारभागापासून आणि मज्जाधातूच्या प्रसादभागापासून तयार झालेले असतात.


डोकेदुखी

Posted: 03 Mar 2011 03:40 PM PST

डोकेदुखीकाहींच्या बाबतीत डोके दुखणे हे एखाद्या प्रकारचे लक्षण असू शकते. क्वचित गंभीर आजाराचेदेखील लक्षण असते. जेव्हा डोके दुखण्याच्या जोडीला शरीरास इतरत्रदेखील त्रास होत असतात तेव्हा असे डोके दुखणे शरीरातील गंभीर आजाराचे लक्षण असण्याची शक्‍यता जास्त असते. असे आजार आहेत किंवा कसे, हे प्रथम पाहणे इष्ट असते. डोके दुखण्याचा अनुभव नसणारी व्यक्ती विरळाच असेल. काहींचे डोके क्वचित दुखते, काहींना त्याचा फारसा त्रास होत नाही, काहींच्या बाबतीत डोके दुखणे हे एखाद्या प्रकारचे लक्षण असू शकते. क्वचित गंभीर आजाराचेदेखील लक्षण असते. जेव्हा डोके दुखण्याच्या जोडीला शरीरास इतरत्रदेखील त्रास होत असतात तेव्हा असे डोके दुखणे शरीरातील गंभीर आजाराचे लक्षण असण्याची शक्‍यता जास्त असते. असे आजार आहेत किंवा कसे, हे प्रथम पाहणे इष्ट असते. या विकारांकडे तातडीने लक्ष देणे जरुरीचे असते. आपल्या मस्तकाच्या बाह्य भागात हाडांची कवटी असते. कवटीला क्रोमियम म्हणतात. कवटीमध्ये मुख्यत्वे मेंदू असतो शिवाय रक्तवाहिन्या असतात. मेंदूवर अभ्रे असतात आणि आत पाणी असते (सेटेब्रो-स्पायनल फ्लुइड).


No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content