Search This Blog

फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर

दृष्टिदोष : कमी दिसणे

Posted: 24 Feb 2011 03:55 PM PST

दृष्टिदोष : कमी दिसणेआपल्या दृष्टिदोषाकडे व्यक्ती कसे लक्ष देते, यावर दृष्टिदोषामुळे होणारा त्रास ठरतो. नजर कमी झाली असली तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात फारशी अडचण न येता सगळे आयुष्य व्यवस्थित कंठणाऱ्या व्यक्ती समाजात असतात. कमी दिसणे हा त्रास विविध कारणांमुळे होऊ शकतो. अपघात, आजार अथवा दोष यामुळे दृष्टिदोष जडू शकतो. जन्मत: असू शकतो किंवा कोणत्याही वयात होऊ शकतो. अकस्मात येऊ शकतो किंवा हळूहळू वाढत जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या कामाला नजरेची आवश्‍यकता असते. आपल्या कामाला आवश्‍यक त्या नजरेचा अभाव असला तर तो दृष्टिदोष म्हटला जातो. चांगली नजर असण्याकरता प्रथमत: पुरेसा उजेड असावा लागतो. प्रकाशाचे किरण डोळ्यांत जावे लागतात. डोळ्यांच्या मागच्या प्रकाशकिरणांचा परिणाम होऊ शकेल असा संवेदनाक्षम भाग- नेत्रपटल असावा लागतो. या नेत्रपटलातील पेशींमध्ये प्रकाशकिरणांनी उद्दीपित होणारे स्वीकारक असावे लागतात. या स्वीकारकांचे कार्य म्हणजे प्रकाशकिरणांमुळे प्राप्त झालेल्या उद्दीपनाचे रूपांतर विद्युतशक्तीत करणे, हे होय. ही विद्युतशक्ती डोळ्याकडून मेंदूकडे ऑप्टिक (Optic) नावाची मज्जातंतूची शीर नेते.

विषनिवृत्ती

Posted: 24 Feb 2011 03:55 PM PST

भगवान शंकर विषातील विषत्वाचा नाश करून ते कंठात धारण करू शकतात तसेच आयुर्वेदातही अनेक द्रव्यातील विषत्वाचा नाश करून त्यातल्या औषधी गुणाला अधिक सारवान बनविण्याचे अनेक उपाय सुचवले आहेत. भगवान श्री शंकरांनी भांग, धोतरा वगैरे विषारी द्रव्यांना आपलेसे केले, यावरूनच त्यांच्यात काही ना काही उपयुक्‍तता असणार हे लक्षात येऊ शकते. या द्रव्यांच्या आहारी न जाता त्यांच्यातले गुण पारखून घेतले, आयुर्वेद शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्यांची व्यवस्थित शुद्धी करून घेतली तर त्यामुळे आरोग्यरक्षण होण्यास, रोगनिवारण होण्यास नक्कीच मदत मिळेल. आयुर्वेदाला "अष्टांग आयुर्वेद' असेही म्हटले जाते. कारण आयुर्वेदाचे मुख्य आठ विभाग आहेत. या आठ विभागांपैकी एक विभाग आहे "अगदतंत्र'. "गद' या शब्दाचा अर्थ "रोग', तसेच "विष' असा आहे. म्हणूनच अगद म्हणजे असे औषध किंवा अशा प्रक्रिया ज्यामुळे रोग दूर होतील, विषत्व दूर होईल. अगद तंत्रामध्ये विषाचा प्रतिकार करण्याबद्दल, विषबाधा झाल्यास विषाचा परिणाम दूर करण्याबद्दल, विषपरीक्षण करण्याबद्दल अनेक उपाय, अनेक औषधे समजावलेली आहेत. विषाची उत्पत्ती कशी झाली याची कथा चरकसंहितेत दिलेली आहे.

लठ्ठपणा व वंध्यत्व

Posted: 24 Feb 2011 03:55 PM PST

लठ्ठपणा व वंध्यत्वआपल्या शरीरात असणाऱ्या ऊर्जेचा क्रय आणि विक्रयशी जवळचा संबंध असतो. अतिरिक्त साठलेली चरबी ही बिघडलेल्या मेटाबोलिजमचा परिणाम आहे. त्यातूनच मेटाबोलिजमशी संबंधित अनेक विकार जन्माला येतात. जसे, मधुमेह, उच्च रक्तदाब, वंध्यत्व इत्यादी. सुदैवाने शास्त्रोक्त पद्धतीने घेतलेल्या उपचार पद्धतीमुळे मेटाबोलिजम संपूर्ण नॉर्मल होऊ शकते आणि वरील व्याधी टाळता येतात.  डॉ. जयश्री तोडकर लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिऍट्रिक सर्जन, पुणे. वं ध्यत्व, अर्थातच इन्फर्टिलिटी ही वैवाहिक जीवनात तणावग्रस्त करणारी मोठी समस्या होऊ लागली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये या विषयातील उपचार पद्धती खूप विकसित झालेल्या आहेत, तरीसुद्धा या समस्येचे स्वरूप दिवसेंदिवस उग्र झालेले दिसते. यासाठी स्त्री किंवा पुरुष किंवा दोघांनाही उपचाराची गरज भासू शकते. ही केवळ शारीरिक समस्या नसून, तिला सामाजिक स्वरूपही आहे. स्त्री अथवा पुरुष यांच्या प्रजनन क्षमतेवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. कामाचा ताण, एकमेकांसाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून न देणे, या गोष्टींवर नियंत्रण आणणे शक्‍य असते.

विषनिवृत्तीनंतर महाशिवरात्री

Posted: 24 Feb 2011 03:55 PM PST

विषनिवृत्तीनंतर महाशिवरात्रीजीवनाचा संघर्ष हे एक समुद्रमंथन होय. सूर्यनाडी, चंद्रनाडी किंवा इडा-पिंगला यांच्यातून होणाऱ्या संदेशाचे व चेतनेचे चलनवलन झाल्यामुळे मेरुदंडरूपी मेरुपर्वत घुसळला जाऊन शरीरातील संपूर्ण रससागर ढवळला जातो. त्यातून जशा सिद्धी प्राप्त होतात, तसे काही अंशी धोकेही निर्माण होतात. विषाच्या व्यवस्थापन प्रक्रियेत आयुर्वेदाचा हातखंडा तर आहेच, पण या विषयाचा विचार करणारे आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे असे दिसून येते. शरीरात जमलेले विष पंचकर्माद्वारे काढून टाकणे याला आयुर्वेदिक उपचारामध्ये मोठे महत्त्व दिसते. शिवरात्र जवळ आली की आठवण होते थंडाई, भांग यांची. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास बाग, शेती वगैरे ठिकाणी सर्पदर्शन होते. महाशिवरात्रीच्या आसपास सर्पांची रतिक्रीडाही पाहायला मिळते.

दोषहेतू

Posted: 24 Feb 2011 03:55 PM PST

दोषहेतूप्रकुपित दोषांमुळे नंतर कोणता रोग होईल हे निश्‍चित नसते. त्या त्या व्यक्‍तीच्या प्रकृतीनुसार, रोग होण्याच्या प्रवृत्तीनुसार रोग कोणता होईल हे ठरते. अशा हेतूंना "दोषहेतू' असे म्हणतात. रोगाचे कारण म्हणजे निदान हे आपण मागच्या वेळेला पाहिले. निदानाचे सन्निकृष्ट, विप्रकृष्ट, व्यभिचारी आणि प्राधानिक हे चार प्रकार होतात तसेच अजूनही काही प्रकार होतात. निदानालाच हेतू असेही म्हटले जाते. काही हेतू असे असतात की जे दोषांचा प्रकोप करतात. या प्रकुपित दोषांमुळे नंतर कोणता रोग होईल हे निश्‍चित नसते. त्या त्या व्यक्‍तीच्या प्रकृतीनुसार, रोग होण्याच्या प्रवृत्तीनुसार रोग कोणता होईल हे ठरते. अशा हेतूंना "दोषहेतू' असे म्हणतात. उदा. कडू, तिखट आणि तुरट चवीचे पदार्थ वातदोष वाढवितात गोड, आंबट व खारट चवीचे पदार्थ कफदोष वाढवितात तर आंबट, तिखट, खारट चवीचे पदार्थ पित्तदोष वाढवितात. या ठिकाणी गोड, तिखट, तुरट वगैरे चवी हा दोषहेतू होय. वाढलेला वातदोष किंवा पित्त-कफदोष नेमके कोणते रोग उत्पन्न करतील हे या ठिकाणी नक्की नसते. म्हणून हे फक्‍त दोषहेतू होय. विशिष्ट व्याधी उत्पन्न करणारे जे हेतू ते व्याधी हेतू होय. उदा.

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content