फॅमिली डॉक्टर |
| Posted: 27 Aug 2010 03:57 AM PDT |
| Posted: 27 Aug 2010 03:47 AM PDT केसांचा रंग मेलॅनिनवर अवलंबून असतो. मेलॅनिन नसल्यास तेथे हवेचा एक बुडबुडा तयार होतो. त्यामुळे पांढरा रंग जाणवतो. केस पिकलेला दिसतो. नखात असे झाले, की नखात पांढरा डाग दिसतो. केस आणि नखे आपल्या त्वचेतील पेशीतूनच उत्पन्न होतात. ढोबळमानाने आपल्या त्वचेचे तीन थर मानले जातात. सर्वांत वरचा त्याला एपिडर्मिस (Epidermis) म्हणतात. मधला ज्याला डर्मिस  (Dermis) म्हणतात आणि खालचा त्याला सबक्युटेनियस टिश्यू (Subcutaneous Tissue) म्हणतात. नखे, केस या एपिडर्मिसमधील पेशींचेच जरासे वेगळे रूप असते. त्याचप्रमाणे तळहातावर आणि तळपायावर पडणारे "पट्टे' आणि त्वचेवर उमटणारे मस (वॉर्टस् - - Warts) हेदेखील एपिडर्मिसच्याच पेशींनी बनलेले असतात. या तीन थरांचे सर्व शरीरावर एक प्रभावी आच्छादन बनते. या आच्छादनामुळे बाहेरचे जिवाणू, विषाणू व अन्य किटाणू शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. शरीरातील पाणी बाहेर सांडू शकत नाही किंवा पोहताना बाहेरचे पाणी शरीरात प्रवेश करू शकत नाही. |
| You are subscribed to email updates from फॅमिली डॉक्टर To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
| Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 | |
No comments:
Post a Comment