| हृद्रोग व त्यावरील उपचार Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT  हृदय हे मर्म म्हणजे शरीरातील अतिसंवेदनशील व महत्त्वाचा भाग असते. म्हणूनच हृदयात थोडाही बिघाड होतो असे आढळल्यास त्याकडे नीट लक्ष द्यायला हवे. प्राणरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते तातडीचे उपचार घ्यावे लागले, तरी मुळात हृदयात बिघाड का झाला आणि तो मुळापासून बरा कसा होईल याकडे लक्ष द्यायला हवे. आणि पुन्हा अशा प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती सगळी काळजीही घ्यायला पाहिजे. हृद्रोगाचे अनेक प्रकार असतात. हृद्शूळ, हृदवाहिनी अवरोध, हृदगती विकृती वगैरे प्रकार आपण यापूर्वी पाहिले. यानंतर आपण हृद्रोगाचे उर्वरित प्रकार पाहणार आहेत. आमवाताचा परिणाम म्हणून हृद्रोग होऊ शकतो असे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. "आम' हा अपचनातून तयार होतो. अग्नी मंद झाला की तो अन्नाचे पचन व्यवस्थित करत नाही, त्यातून आम म्हणजे अर्धा कच्चा, अर्धा पक्का असा आहाररस तयार होतो आणि हा आम शरीराला अतिशय त्रासदायक ठरणारा असतो. पचन योग्य झाले की जो आहाररस तयार होतो तो सर्व शरीराला ताकद देतो, सर्व शरीरात सहजपणे सामावला जातो, मात्र आम शरीरात सामावला जात नाही, उलट वातदोषाच्या गतीला अडथळा आणतो. यातून आमवात तयार होतो.  
|
| अन्नयोग : पूरिका Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT  गव्हाच्या पुऱ्या कफदोष कमी करतात. उडदाची रोटी बलकारक असते. वेटवी रोटी शुक्रधातूसाठी हितकर असते. रोटी, पोळी, भाकरी वगैरे बनविण्याची आयुर्वेदिक ग्रंथातील पद्धत व त्यांचे गुणधर्म आपण पाहात आहोत. हस्तपूरिका - पुऱ्या उदकेन विमिश्रय संमितां घृतमासिच्य करेण मर्दयेत् ।तत एव च पूरिकां विधाय कृतनिर्धूमसुशुष्क गोमये।ग्नौ ।। सुभर्जिता सा कफहृत् बलप्रदा हृद्रोगवातं शमयेद्वि भक्षिता ।। ...निघण्टु रत्नाकर गव्हाचे पीठ तुपाचे मोहन व पाणी घालून नीट मळवावे. कणीक तयार झाली की त्याच्या हाताने चपट्या पुऱ्या बनवाव्यात. गोवरीच्या निखाऱ्यावर भाजाव्यात. या गव्हाच्या पुऱ्या कफदोष कमी करतात, ताकद वाढवितात. वातासाठी हितकर असतात आणि हृद्रोगामाध्ये हितकर असतात. बलभद्रिका रोटी उडदाचा वापर करूनही रोटी बनविण्याच्या पाककृती आयुर्वेदात दिल्या आहेत. उडीद पचायला जड असतात, मात्र शरीरपोषणाच्या दृष्टीने चांगले असतात. विशेषतः तरुण वयात पचनाचा विचार करून, उडदाच्या पाककृती करून खाणे चांगले असते.  
|
| निरोगी हिरड्या : सशक्त हृदय Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT  सध्या हिरड्यांचे (पेरिओडॉण्टल) आजाराची लक्षणे अंदाजे 40 टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांमध्ये दिसून येत आहेत. हा आजार मुख्यतः दातांभोवती असणाऱ्या बॅक्टेरियामुळे संभवतो आणि तो मधुमेही, धूम्रपान करणारे वा अकाली दात पडणे ही ज्या व्यक्तींमध्ये अनुवांशिक प्रवृत्ती आहे, त्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात उद्भवण्याची शक्यता असते. हिरड्यांचे आजार आणि हृदयरोग व मधुमेहासारखे इतर आजार हे आज बऱ्याच प्रमाणात भारतीयांमध्ये निदर्शनास येत आहेत. हे आजार जरी शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करणारे असले तरीही संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे, की एका आजारामुळे दुसरा आजार होण्याची शक्यता निश्चितच वाढते. सध्या पेरिओडॉण्टल (हिरड्यांचे) आजाराची लक्षणे अंदाजे 40 टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांमध्ये दिसून येत आहेत. हा आजार मुख्यतः दातांभोवती असणाऱ्या बॅक्टेरियामुळे संभवतो आणि तो मधुमेही, धूम्रपान करणारे वा अकाली दात पडणे ही ज्या व्यक्तींमध्ये अनुवांशिक प्रवृत्ती आहे, त्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात उद्भवण्याची शक्यता असते. पुष्कळदा या रोगाची लक्षणे अगदी किरकोळ असतात. सुरवातीस दात दुखण्याखेरीज काहीही त्रास जाणवत नाही.  
|
| हृदयविकार व पंचकर्म Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT  आ पल्या कुठल्यातरी चुकीच्या जीवनपद्धतीमुळे हृदयाला त्रास झाला आहे हे लक्षात घेऊन आपली जीवनपद्धती सुधारण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हृदयविकारावर मात करता येईल हे नक्की. पंचकर्माने हृदयविकार बरा होतो का? असा प्रश्न बरेच जण विचारतात. हृदयविकाराच्या व्यक्तीने पंचकर्म केंद्रात भरती झाल्यानंतर काही त्रास झाला तर तेथे काही सुविधा असते का? पंचकर्म केंद्र जर गावापासून दूर असेल तर आणीबाणीची वेळ असल्यास रोग्याला काय मदत मिळूू शकते? असे अनेक प्रश्न हृदयविकाराच्या रोग्याच्या मनात, रोग्यापेक्षा रोग्याच्या नातेवाइकांच्या मनात उठणे अगदी साहजिक आहे. हृदयविकाराचे निदान झाले की सगळे भांबावून जातात. कर्करोगाचे निदान झाले तर एक प्रकारचे वेगळे वातावरण तयार होते. परंतु हृदयरोगाचे तसे नसते. हृदयरोगाचे निदान झाले तरी मनुष्य बरा होऊ शकतो, याची जेवढी खात्री वाटते, त्याहीपेक्षा अचानक मध्येच रोगी दगावणार तर नाही ना याची भीती वाटत असते.  
|
| झोपेत घडणाऱ्या घटना Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT  साधारणपणे झोपेत माणूस निश्चल असतो आणि त्याला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची जाणीव होत नसते असे आपण मानतो. तरीदेखील झोपेत काही घटना घडतात. झोप येणे ही माणसाची मूलभूत गरज आहे. झोप ही आपल्या जाणिवेची (awareness)  स्थिती आहे. जागृती, स्वप्नरहित गाढ झोप आणि स्वप्न पडणे या तीन जाणिवेच्या स्थिती सर्वांनी अनुभवलेल्या असतात. योगशास्त्रात चौथी स्थिती मानलेली आहे. त्या स्थितीला "तूर्या' असे नाव असते. साधारणपणे झोपेत माणूस निश्चल असतो आणि त्याला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची जाणीव होत नसते असे आपण मानतो. तरीदेखील झोपेत काही घटना घडतात. त्यांची ओळख या लेखात करू या. झोपेत स्वप्न पडतात हे सर्वांनी अनुभवलेले असते. आपल्या झोपेत मेंदूचे कार्य चालूच असते. या कार्यात बदल होत राहतो. हे कार्य एन सेफेलोग्राम (Encephelogram) या यंत्राच्या तपासणीवरून कळू शकते. या कार्याचे दोन मुख्य प्रकार असतात. एका प्रकारात झोपलेल्या व्यक्तीचे डोळे झपाट्याने हलतात. त्याला (Rapid Eye Movement sleep)(REM sleep)  म्ह्हिणतात तर दुसऱ्या प्रकारात डोळ्यांची हालचाल होत नसते.  
|
| जपून टाक पाऊल जरा... Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT  पायी हळूहळू चाला, मुखाने विठू विठू बोला, हे काही खरे नाही बुवा. चालायला सुरूवात केल्यावर लक्षात आलं, की पाय दुखताहेत आणि त्यापासून सुटका करायला विठू काही धाव घालीत नाही. बसल्याजागीच विठूमाऊलींचा नाम जप करू. तसे बरेच दिवसांपासून केलेला पायी चालण्याचा किंवा "इव्हिनिंग वॉक' करण्याचा निर्धार आज तरी पूर्ण करायचाच असे ठरविले होते. पण कुठचे काय! चालायला सुरवात केल्यावर लक्षात आले, की आपले पाय प्रचंड दुखताहेत. डॉक्टरांकडे गेल्यावर यामागची कारणे कळली आणि हबकलोच. पाय अथवा पायाचा तळवा दुखणे हे वयाच्या 60व्या वर्षानंतर बरेच कॉमन असते पण आजकाल ही व्याधी वयाच्या 25 ते 30व्या वर्षीदेखील जाणवू लागली आहे. यामागे अनेक कारणे आहेत पण त्यांपैकी महत्त्वाची कारणे म्हणजे लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येणे इत्यादी असू शकतात. यावर उपाययोजना म्हणजे वजन कमी करणे, मधुमेहावर ताबा ठेवणे आणि जोडे अथवा चप्पल योग्य आकाराची घालणे. याशिवाय काही ठराविक व्यायाम आणि मसाज केल्याने त्रास दूर होऊ शकतो. साधारणपणे, एक व्यक्ती संपूर्ण आयुष्यात पृथ्वीला तीन वेळा प्रदक्षिणा घातल्या जातील एवढे चालत असते.  
|
No comments:
Post a Comment