Search This Blog

FDA: Evamist Exposure Risky for Children http://dlvr.it/3DHXJ
Patients Lose Weight After Total Joint Replacement http://dlvr.it/3DHXN
Health Reform Law: What It Means for Women http://dlvr.it/3DHXQ

आरोग्य आणि वैद्

आरोग्य आणि वैद्


वैद्यकाच्या दाही दिशा : ...

Posted: 21 Jul 2010 08:07 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २२ जुलै २०१०
'दमा' हा श्वसनाचा विकार आहे हे आपणास सहजगत्या उमगते; पण सतत दमल्यासारखे वाटते हे 'चुकीच्या श्वसनामुळे' असू शकेल हे आपल्या लक्षात येणे जरा कठीण आहे. 'स्पाँडिलायटीस' किंवा 'स्लिप डिस्क'मुळे मान, पाठ दुखते हे आपणास माहीत असते; पण श्वासाचा आकृतीबंध बिघडल्यामुळेही असे होऊ शकते, असे कोणी आपणास सांगितले तर ते खरे वाटणार नाही. मनोविकृतींमुळे नैराश्य व नाहक चिंता निर्माण होतात हे आपण वाचलेले असते; पण श्वसनतंत्र बिघडल्यानेही ते निर्माण होऊ शकतात हे आपल्या गावीही नसते;

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : उपचारांची ...

Posted: 07 Jul 2010 07:38 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर, गुरुवार, ८ जुलै २०१०
सर्वसाधारणपणे उपचार म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर गोळ्या, औषधे, शल्यक्रिया, मसाज, लेप, व्यायाम, आहार-विहाराची पथ्ये, किरणोपचार, मानसोपचार, समुपदेशन या व अशा काही ठोस गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण कोणी नुसते आपले हात हातात घेऊन किंवा स्पर्श करून किंवा शरीराभोवती काही हातवारे करून आपल्याला बरे करतो म्हणाला तर आपल्याला निश्चितच चमत्कारीक वाटेल.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : अस्तित्वाचे ...

Posted: 23 Jun 2010 07:55 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २४ जून २०१०
विविध व्याधी विकारांवर उपलब्ध असलेल्या उपचारपद्धतींकडे एक धावती नजर टाकली तरी त्यांचे अधिष्ठान फार पूर्वीच्या काळी फक्त 'देह' हेच होते उदा. मसाज, सांधे व मऊ उती यांच्या मसाजावर अधिष्ठित चिनी उपचारपद्धत टय़ुइना (Tuina) इ. व आता त्या अधिकाधिक 'मना'धिष्ठित होत चालल्या आहेत. उदा. डॉ. बारव पुष्पोपचार पद्धती इ. हे सहज लक्षात येते. वास्तविक अस्तित्वाचे दोन्ही आयाम 'मन' व 'देह' हे महत्त्वाचे आहेत, परस्परावलंबी आहेत व कोणत्याही व्याधी विकारात दोघांवर उपचार महत्त्वाचे असतात हे विसरून चालणार नाही.

Read more...


सायलंट किलर ‘हिपेटायटिस सी’पासून ...

Posted: 19 Jun 2010 09:04 AM PDT

सुहास धुरी
suhas.dhuri@expressindia.com
सायलंट किलर म्हणून ओळखला जाणारा हिपेटायटिस सी हा आजार दिवसेंदिवस घातक होत चालला असून याबाबत निष्काळजी केल्यास तो थेट मृत्यूच्या दाढेत तो घेऊन जाऊ शकतो अशी भीती जसलोक आणि फोर्टिस रुग्णालयाच्या कन्सल्टिंग हेपॅटोलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. आभा नगराल यांनी व्यक्त केली आहे. इन्सालच्या अभ्यासानुसार  एचसीव्ही चा प्रसार हा भारतात अधिक वेगाने होत असून दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांना याची लागन होत आहे.

Read more...


यशस्वी भव! (२०१०)

Posted: 15 Jun 2010 05:52 AM PDT

शालांत परीक्षेच्या उंबरठ्यावर

मराठी माध्यम

मराठी (प्रथम भाषा)
लेख-१  | लेख-२  |लेख-३   |

ENGLISH (L.L.)
लेख-१  | लेख-२  | लेख-३ |

संस्कृत (संपूर्ण)
लेख-१  |लेख-२  

संस्कृत (संयुक्त)
लेख-१  |लेख-२  |

हिंदी (संपूर्ण)
लेख-१ | लेख-२  | लेख-३ 

हिंदी (संयुक्त)
लेख-१ |लेख-२  

इतिहास-
लेख-१
| लेख-२ | लेख-३ 

नागरिकशास्त्र
लेख-१ 

भूगोल-
लेख-१  | लेख-२  | लेख-३ 

अर्थशास्त्र
लेख-१  

विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग एक)
लेख-१ | लेख-२लेख-३ 

विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग दोन)
लेख-१ |लेख-२  

बीजगणित
लेख-१ |लेख-२ |लेख-३ 

भूमिती
लेख-१  | लेख-२ 

English Medium

Science & Technology Part I
Article-1  | Article-2  | Article-3  | Article-4 (new) |

Science & Technology Part II
Article-1  | Article-2  | Article-3  |

Geometry -
Article-1    | Article-2  |Article-3  

Algebra -

Article-1  |Article  | Article-3  


वैद्यकाच्या दाही दिशा : उपचारांच्या ...

Posted: 09 Jun 2010 07:50 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर , गुरुवार, १० जून २०१०
तो १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील, रंगभूमीवरील एक नामवंत शेक्सपिअरिअन नट! त्याच भांडवल म्हणजे त्याचा अवाज, पण तोच हळूहळू बसत एक दिवस नाहीसा होतो. सर्व प्रकारचे उपचार तो करून पाहातो; पण कशाचाच उपयोग होत नाही. मग एक दिवस आरशासमोर उभे राहून सराव करताना, संवाद फेकताना आपले शरीर नको एवढे ताठरते हे  त्याच्या लक्षात येते आणि तो हळूहळू शरीरातील विविध स्नायूंमधील हा तणाव प्रयत्नपूर्वक काढून टाकतो आणि एक दिवस, अहो आश्चर्यम्, त्याचा आवाज चक्क पूर्ववत होतो!

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ‘देही’ असो ...

Posted: 19 May 2010 07:48 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २० मे २०१०
'चित्ती असो द्यावे समाधान' या संतवचनाला अनुसरून आणि अगदी आधुनिक चेतावैद्यकाच्या सिद्धांतानुसारही, शरीरस्वास्थ्याकरिता मानसिक समाधान असणे अत्यावश्यक असते. तसे असेल तर शरीरात अनेक प्रकारची पोषक चेतारसायने उदा. आनन्दामाईड्स निर्माण होऊन एकप्रकारची 'फील गुड' भावना तर निर्माण होतेच, पण रक्तदाब, रक्तशर्करा पातळी नियमनापासून ते विविध संप्रेरकांचा समतोल साधण्यापर्यंत अनेक गोष्टी साध्य होतात.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ...

Posted: 05 May 2010 07:56 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, ६ मे २०१०
अमेरिकेतील टेक्सास विश्वविद्यालयातील क्ष-किरण चिकित्सक डॉ. ओ. कार्ल सिमॉनटन यांनी १९७१ साली वर्णन केलेल्या ६१ वर्षांच्या घशाच्या असाध्य कर्करोगाने ग्रस्त रुग्णाची ही कहाणी 'शरीर-मन वैद्यकाच्या' इतिहासात एक नवीन अध्याय सुरू करण्यास कारणीभूत ठरली असं म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. या रुग्णाचा कर्करोग हा अंतिम अवस्थेत होता, त्याला गिळताही येत नव्हते,

Read more...


क्षयरोग

Posted: 27 Apr 2010 11:59 AM PDT

अलकनंदा सुळे - बुधवार, २८ एप्रिल २०१०
डॉ. चित्ररेखा कुलकर्णी

एखाद्या गोष्टीचा क्षय होणे म्हणजे नाश होणे असे आपण समजतो. तसेच क्षयरोगाचा संसर्ग आपल्या शरीरातील निरनिराळय़ा अवयवांना झाल्यास त्यातील पेशींचा नाश होऊन रसग्रंथी व आवरण यांचा क्षय होतो. क्षय हा आजार संसर्गजन्य असून पूर्वी तो गुरांकडून संसर्गित होतो असे समजले जात असे. पूर्वीच्या काळी क्षय हा जीवघेणा आजार होता. त्यास राजयक्ष्मा असे संबोधिले जायचे. तसेच क्षय हा दीर्घकाळ चालणारा आजार असून फक्त फुफ्फुसाचा रोग समजला जायचा. परंतु तो इतर अवयवांनासुद्धा बाधा करू शकतो.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ।। ...

Posted: 14 Apr 2010 08:36 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, १५ एप्रिल २०१०
सुमारे ५ दशकांपूर्वी अमेरिकेतील कान्सास येथील 'मेनिन्जर फाऊंडेशन'च्या प्रेक्षकांसमोर एक अद्भूत प्रयोग सादर झाला. सन १९६२ मध्ये डॉ. शर्न यांनी एक विशिष्ट तंत्र वापरून (Operant Training) हृदयाचे ठोके साधारण ५ मिनिटांइतके वाढविता वा कमी करता येतात हे दाखविले होते. पण मेनिन्जर फाऊंडेशनमधील प्रयोगात, त्या व्यक्तीने आपल्या हृदयाचे ठोके चक्क प्रतिमिनिट ३५० पर्यंत वाढविले (Atrial Flutter) व एका क्षणी तर या व्यक्तीचे हृदय पूर्णपणे थांबले व नंतर परत पूर्ववत झाले.

Read more...


फॅमिली डॉक्टर

फॅमिली डॉक्टर


हृद्रोग व त्यावरील उपचार

Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT

हृद्रोग व त्यावरील उपचारहृदय हे मर्म म्हणजे शरीरातील अतिसंवेदनशील व महत्त्वाचा भाग असते. म्हणूनच हृदयात थोडाही बिघाड होतो असे आढळल्यास त्याकडे नीट लक्ष द्यायला हवे. प्राणरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक ते तातडीचे उपचार घ्यावे लागले, तरी मुळात हृदयात बिघाड का झाला आणि तो मुळापासून बरा कसा होईल याकडे लक्ष द्यायला हवे. आणि पुन्हा अशा प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आवश्‍यक ती सगळी काळजीही घ्यायला पाहिजे. हृद्रोगाचे अनेक प्रकार असतात. हृद्‌शूळ, हृदवाहिनी अवरोध, हृदगती विकृती वगैरे प्रकार आपण यापूर्वी पाहिले. यानंतर आपण हृद्रोगाचे उर्वरित प्रकार पाहणार आहेत. आमवाताचा परिणाम म्हणून हृद्रोग होऊ शकतो असे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. "आम' हा अपचनातून तयार होतो. अग्नी मंद झाला की तो अन्नाचे पचन व्यवस्थित करत नाही, त्यातून आम म्हणजे अर्धा कच्चा, अर्धा पक्का असा आहाररस तयार होतो आणि हा आम शरीराला अतिशय त्रासदायक ठरणारा असतो. पचन योग्य झाले की जो आहाररस तयार होतो तो सर्व शरीराला ताकद देतो, सर्व शरीरात सहजपणे सामावला जातो, मात्र आम शरीरात सामावला जात नाही, उलट वातदोषाच्या गतीला अडथळा आणतो. यातून आमवात तयार होतो.


अन्नयोग : पूरिका

Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT

अन्नयोग : पूरिकागव्हाच्या पुऱ्या कफदोष कमी करतात. उडदाची रोटी बलकारक असते. वेटवी रोटी शुक्रधातूसाठी हितकर असते. रोटी, पोळी, भाकरी वगैरे बनविण्याची आयुर्वेदिक ग्रंथातील पद्धत व त्यांचे गुणधर्म आपण पाहात आहोत. हस्तपूरिका - पुऱ्या उदकेन विमिश्रय संमितां घृतमासिच्य करेण मर्दयेत्‌ ।तत एव च पूरिकां विधाय कृतनिर्धूमसुशुष्क गोमये।ग्नौ ।। सुभर्जिता सा कफहृत्‌ बलप्रदा हृद्रोगवातं शमयेद्वि भक्षिता ।। ...निघण्टु रत्नाकर गव्हाचे पीठ तुपाचे मोहन व पाणी घालून नीट मळवावे. कणीक तयार झाली की त्याच्या हाताने चपट्या पुऱ्या बनवाव्यात. गोवरीच्या निखाऱ्यावर भाजाव्यात. या गव्हाच्या पुऱ्या कफदोष कमी करतात, ताकद वाढवितात. वातासाठी हितकर असतात आणि हृद्रोगामाध्ये हितकर असतात. बलभद्रिका रोटी उडदाचा वापर करूनही रोटी बनविण्याच्या पाककृती आयुर्वेदात दिल्या आहेत. उडीद पचायला जड असतात, मात्र शरीरपोषणाच्या दृष्टीने चांगले असतात. विशेषतः तरुण वयात पचनाचा विचार करून, उडदाच्या पाककृती करून खाणे चांगले असते.


निरोगी हिरड्या : सशक्त हृदय

Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT

निरोगी हिरड्या : सशक्त हृदयसध्या हिरड्यांचे (पेरिओडॉण्टल) आजाराची लक्षणे अंदाजे 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भारतीयांमध्ये दिसून येत आहेत. हा आजार मुख्यतः दातांभोवती असणाऱ्या बॅक्‍टेरियामुळे संभवतो आणि तो मधुमेही, धूम्रपान करणारे वा अकाली दात पडणे ही ज्या व्यक्तींमध्ये अनुवांशिक प्रवृत्ती आहे, त्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात उद्‌भवण्याची शक्‍यता असते. हिरड्यांचे आजार आणि हृदयरोग व मधुमेहासारखे इतर आजार हे आज बऱ्याच प्रमाणात भारतीयांमध्ये निदर्शनास येत आहेत. हे आजार जरी शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करणारे असले तरीही संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे, की एका आजारामुळे दुसरा आजार होण्याची शक्‍यता निश्‍चितच वाढते. सध्या पेरिओडॉण्टल (हिरड्यांचे) आजाराची लक्षणे अंदाजे 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भारतीयांमध्ये दिसून येत आहेत. हा आजार मुख्यतः दातांभोवती असणाऱ्या बॅक्‍टेरियामुळे संभवतो आणि तो मधुमेही, धूम्रपान करणारे वा अकाली दात पडणे ही ज्या व्यक्तींमध्ये अनुवांशिक प्रवृत्ती आहे, त्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात उद्‌भवण्याची शक्‍यता असते. पुष्कळदा या रोगाची लक्षणे अगदी किरकोळ असतात. सुरवातीस दात दुखण्याखेरीज काहीही त्रास जाणवत नाही.


हृदयविकार व पंचकर्म

Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT

हृदयविकार व पंचकर्मआ पल्या कुठल्यातरी चुकीच्या जीवनपद्धतीमुळे हृदयाला त्रास झाला आहे हे लक्षात घेऊन आपली जीवनपद्धती सुधारण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हृदयविकारावर मात करता येईल हे नक्की. पंचकर्माने हृदयविकार बरा होतो का? असा प्रश्‍न बरेच जण विचारतात. हृदयविकाराच्या व्यक्‍तीने पंचकर्म केंद्रात भरती झाल्यानंतर काही त्रास झाला तर तेथे काही सुविधा असते का? पंचकर्म केंद्र जर गावापासून दूर असेल तर आणीबाणीची वेळ असल्यास रोग्याला काय मदत मिळूू शकते? असे अनेक प्रश्‍न हृदयविकाराच्या रोग्याच्या मनात, रोग्यापेक्षा रोग्याच्या नातेवाइकांच्या मनात उठणे अगदी साहजिक आहे. हृदयविकाराचे निदान झाले की सगळे भांबावून जातात. कर्करोगाचे निदान झाले तर एक प्रकारचे वेगळे वातावरण तयार होते. परंतु हृदयरोगाचे तसे नसते. हृदयरोगाचे निदान झाले तरी मनुष्य बरा होऊ शकतो, याची जेवढी खात्री वाटते, त्याहीपेक्षा अचानक मध्येच रोगी दगावणार तर नाही ना याची भीती वाटत असते.


झोपेत घडणाऱ्या घटना

Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT

झोपेत घडणाऱ्या घटनासाधारणपणे झोपेत माणूस निश्‍चल असतो आणि त्याला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची जाणीव होत नसते असे आपण मानतो. तरीदेखील झोपेत काही घटना घडतात. झोप येणे ही माणसाची मूलभूत गरज आहे. झोप ही आपल्या जाणिवेची (awareness)  स्थिती आहे. जागृती, स्वप्नरहित गाढ झोप आणि स्वप्न पडणे या तीन जाणिवेच्या स्थिती सर्वांनी अनुभवलेल्या असतात. योगशास्त्रात चौथी स्थिती मानलेली आहे. त्या स्थितीला "तूर्या' असे नाव असते. साधारणपणे झोपेत माणूस निश्‍चल असतो आणि त्याला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची जाणीव होत नसते असे आपण मानतो. तरीदेखील झोपेत काही घटना घडतात. त्यांची ओळख या लेखात करू या. झोपेत स्वप्न पडतात हे सर्वांनी अनुभवलेले असते. आपल्या झोपेत मेंदूचे कार्य चालूच असते. या कार्यात बदल होत राहतो. हे कार्य एन सेफेलोग्राम (Encephelogram) या यंत्राच्या तपासणीवरून कळू शकते. या कार्याचे दोन मुख्य प्रकार असतात. एका प्रकारात झोपलेल्या व्यक्तीचे डोळे झपाट्याने हलतात. त्याला (Rapid Eye Movement sleep)(REM sleep)  म्ह्हिणतात तर दुसऱ्या प्रकारात डोळ्यांची हालचाल होत नसते.


जपून टाक पाऊल जरा...

Posted: 29 Jul 2010 04:40 PM PDT

जपून टाक पाऊल जरा...पायी हळूहळू चाला, मुखाने विठू विठू बोला, हे काही खरे नाही बुवा. चालायला सुरूवात केल्यावर लक्षात आलं, की पाय दुखताहेत आणि त्यापासून सुटका करायला विठू काही धाव घालीत नाही. बसल्याजागीच विठूमाऊलींचा नाम जप करू. तसे बरेच दिवसांपासून केलेला पायी चालण्याचा किंवा "इव्हिनिंग वॉक' करण्याचा निर्धार आज तरी पूर्ण करायचाच असे ठरविले होते. पण कुठचे काय! चालायला सुरवात केल्यावर लक्षात आले, की आपले पाय प्रचंड दुखताहेत. डॉक्‍टरांकडे गेल्यावर यामागची कारणे कळली आणि हबकलोच. पाय अथवा पायाचा तळवा दुखणे हे वयाच्या 60व्या वर्षानंतर बरेच कॉमन असते पण आजकाल ही व्याधी वयाच्या 25 ते 30व्या वर्षीदेखील जाणवू लागली आहे. यामागे अनेक कारणे आहेत पण त्यांपैकी महत्त्वाची कारणे म्हणजे लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येणे इत्यादी असू शकतात. यावर उपाययोजना म्हणजे वजन कमी करणे, मधुमेहावर ताबा ठेवणे आणि जोडे अथवा चप्पल योग्य आकाराची घालणे. याशिवाय काही ठराविक व्यायाम आणि मसाज केल्याने त्रास दूर होऊ शकतो. साधारणपणे, एक व्यक्ती संपूर्ण आयुष्यात पृथ्वीला तीन वेळा प्रदक्षिणा घातल्या जातील एवढे चालत असते.


ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content